अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक १.......

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
25 Nov 2016 - 10:27 pm

.

गेले वर्षी मांडू-इन्दोर-उजैन- महेश्वर अशी सहल करून झाल्यानंतर घरातील सर्वानी आणखी एक सहल हवी असा आग्रह धरला. आपल्याला काय भटकायची जाम आवड. म्हटले चला यावेळी राजस्थान एम पी त घुसू या. तीन महिने अगोदर ट्रेन बुकिंग केले. हॉटेले परवडतील व स्टेशन पासून फार लांब नसतील अशी निवडून त्यांचेही ऑन लाईन बुकिंग केले व बिन्धास्त झालो. यावेळी जयपूर - झांशी- ओर्छा -ग्वलिअर ही स्थाने निवडली होती.

माझ्या स्नेही वासंती घैसास यानी फार पूर्वी ओर्छा या भारतीय टूर ऑपरेटर्स कडून दुर्लक्षित जागी भेट देण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार मी जायचे पक्के ठरविले होते. पूर्वी माउंट अबू येथील हॉटेल कर्मचार्‍याने जयपूर पहा असे सुचविले होते सबब जयपूरचा ही समावेश झाला.मला राजेरजवाडयांच्या इतिहासात फारसा रस नाही त्यामुळे त्यांच्या आख्यायिका वगैरे सांगणारा गाईड नावाचा प्राणी मी माझ्यापासून लांबच ठेवत असतो. दुसरे असे की गाईड बोलायला लागला की आपले लक्ष मूळ कलाकृतीवरून विचलित होते असा माझा अनुभव आहे. तिसरे असे की हा प्राणी गाईड च्या धंद्यातून फारसे पैसे न मिळवता प्रवाशास मी एम्पोरियम मधे कसा सोडीन याचा विचार जास्त करतो. सबब आपणच काही माहिती गोळा करावयाची व आस्वाद घेत भटकायचे असा माझा प्लान असतो.

आता या सहलीकडे वळण्यापूर्वी एका महत्वाच्या आस्वादक अभ्यासाकडे आपण जरा पाहू या.
आपणास सर्वाना माहीत आहे की राजस्थान , मध्य भारत कर्नाटक व आंध्र हे तेथील निरनिराळ्या दगडांसाठी प्रसिद्ध आहेत. ग्रानाईट साठी दक्षिण भारत तर संगमरवर,धोलपूर सॅन्डस्टोन साठी राजस्थान व मध्य भारत हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र हा मुख्यता: बेसाल्ट या अग्निजन्य दगडासाठी माहित आहे. तरीही अजंता एलोरा येथील गुफात काही प्रमाणात सॅन्डस्टोन आहे पण त्यातील शेडस राजस्थान सारख्या आकर्षक नाहीत.आपल्याकडे बाहेरून सॅन्ड्स्टोन आणून बंगल्याला बाहेरून श्रीमंती आणण्याची फॅशन पुण्यात दिसते.लाईमस्टोन हा असाच एक प्रकार आहे पण तो सॅन्डस्टोन पेक्षा जरा नरम असतो. सॅन्ड्स्टोन या प्रकारात असंख्य रंग व छटा येतात सबब सार्वजनिक इमारतीत ही हा वापरला जातो. उदा. सी एस टी ची इमारत बी एम सी ची इमारत. इजिप्त मधील अबु सिम्बेल ,जॉर्डन मधील पेट्रा ही सॅन्ड्स्टोन ची ठळक उदाहरणे आहेत. राजस्तानात संडासापासून प्रासादा पर्यत या दगडाचे प्राबल्य आपल्याला दिसून येते. यात सिलिकॉन डाय ऑक्साईड प्रंमाणे मायका चे ही काही प्रमाण असते. याचा प्रत्यय काही चमचम करणारे दगड आपल्या पायाखाली राजस्थान मधे आपल्याला पाहायला मिळतात.

जयपूर येथील बिर्ला मंदिर , जवाहर सर्कल, वर्ल्ड ट्रेड पार्क, अल्बर्ट हॉल संग्रहालय,हवामहल,सिटी पॅलेस , जंतर मंतर, आमेर किला, जयगड किला, नाहरगड किला, गालताजी .

ओर्छा येथील, जहांगीर महल, राजा महल, रामराज मदिर, चतुर्भूज मंदिर, लक्ष्मी मंदिर , व छत्री समाध्या.

ग्वालियर येथील मानसिंह पॅलेस, गुजरी महल, सास बहू मंदिर.,तेली का मन्दिर व जयविलास पॅलेस ई ना आपण भेटी देणार आहोत.
या पहिल्या भागात एवढेच..
जाता जाता -- खाली माझे घरील वॉलपेपर
त्या खाली -- जयपूर जयगड येथील त्याचा नैसर्गिक अविष्कार--
.

.

प्रतिक्रिया

जॉनी's picture

25 Nov 2016 - 10:34 pm | जॉनी

चौरा, दगडांचा अभ्यास भटकांतीपूर्व म्हणून केला होता की अजून काही?
वाचतोय, आमेर किल्ल्याच्या फोटूच्या प्रतीक्षेत

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 8:23 pm | चौकटराजा

मी दगडांच्या प्रेमात आहे तो गोनिदांच्या सहवासात असल्यापासून त्याना निरनिराळे रंगीत दगड सापडवून ते चक्रावर घासून निररनिराळे आकार तयार करण्याचा नाद होता. ते काही वेळेस मला व माझ्या भावाला या कामाला लावत.
बाकी दगड हा विषय अगाध आहे. अग्निजन्य, स्तरजन्य व रूपांतरीत असे स्थूलमानाने त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण होते एवढेच माझे ज्ञान आहे. त्यात ग्रानाईट व इटालियन मार्बल हे आवडते आहेत.

जॉनी's picture

26 Nov 2016 - 9:15 pm | जॉनी

एकदम करेक्ट.
अगाध विषयातलीच एक गंमत सांगतो, ब्लॅक ग्रॅनाईट आजकाल सर्रास वापरतात किचन मध्ये, तो ग्रॅनाईट नसतोच. :)

चित्रगुप्त's picture

25 Nov 2016 - 11:27 pm | चित्रगुप्त

व्वा पंत. तुम्ही खूपच सुंदर जागांचे भ्रमण करून आलात. आता प्रवासवर्णनाची वाट बघत आहे.
ओरछा म्हणजे शांत, रमणीय, गर्दीपासून दूर असलेली जागा. सुंदर भग्नावशेष, दाट जंगल, नितळ पाण्याची बेतवा नदी, नदीतल्या खडकावर दिवसभर नागडे पडले रहा तरी बघणारे कोणी नाही..... मला ओरछा बद्दल पु.ना.ओकांनी सांगितले होते, त्यानंतर बरेचदा जाऊन राहून आलोय. अलिकडे मात्र खूप वर्षात जाणे झाले नाही, तरी पूर्वीसारखेच असेल अशी आशा आहे. 'ओरछा की नर्तकी' नामक प्रसिद्ध कादंबरी (बहुतेक वृंदावनलाल वर्मा यांची) आहे असे ऐकले आहे, पण अद्याप वाचलेली नाही.
आपल्याकडे प्राचीन कलेबद्दल किती अज्ञान, अनास्था आहे, याचा ओरछा मधील नमुना :
.

अरेरे... केवळ नालायक लोक आहोत आपण.. :-( :-(

प्रतिक्षेत.कोणते दगड दाखवणार? 'मांडू-इन्दोर-उजैन- महेश्वर' भटकंती धाग्याची लिंक?

चौकटराजा's picture

27 Nov 2016 - 8:52 am | चौकटराजा

कंका ,मांडूचे माझ्याकडे त्रिमितीय फोटो मी काढलेत पण त्याला पहायला त्रेमितीय टी व्ही लागतो. बाकी त्याचा धागा काढला नव्हता. आमचे कडे आलात तर बरेच ठिकाणचे फटू आहेत. पहाता येतील. वल्लीनाही बोलवू.

नक्कीच। वल्लीबरोबर विसापूर करायचं आहेच. विचारून दिवस ठरवा.माझ्या या ट्रिपचे बरेचसे फोटो फ्याम्लिचेच काढले गेले होते त्यामुळे धागा /वृतान्त लिहिला नव्हता. बाकी ते ३डी फोटो कसे काढले वगैरे उत्सुकता भारी वाढलीय. एक चांगला कट्टा जमेल यात शंकाच नाही.लवकर ठरवा.

चौकटराजा's picture

27 Nov 2016 - 8:38 pm | चौकटराजा

या कम्पनीचा एक ट्रॅव्हल कॅमेरा मजकडे आहे . त्यात ३डी ची सोय आहे. पण त्रिमिती टी व्ही व " ते" चष्मे लागतात पहायला.

फोटो दिसले नाहीत. वालुकाश्म, चुनखडीचा दगड, संगमरवर इत्यादी खडकांची माहिती आणि फोटो पहायला आवडतील. पुभाप्र.

प्रचेतस's picture

26 Nov 2016 - 8:40 am | प्रचेतस

फोटो दिसत नाहीत.

सविस्तर लेखांच्या प्रतिक्षेत.

नाखु's picture

26 Nov 2016 - 8:59 am | नाखु

तुम्हाला गाईडची अ‍ॅलर्जी का? आम्चे एक मित्र गाईड आहेत ते माहीती देतात किल्ल्याची, पण घाबरवत नाहीत हा मोठ्ठा फायदा आहे.

सहलीचे फक्त संकल्प करणारा नाखु

प्रचेतस's picture

26 Nov 2016 - 9:46 am | प्रचेतस

आम्ही पण गाईड कधी घेत नै हो. बाकी कोण हो तुमचे ते न घाबरावणारे मित्र?

नाखु's picture

26 Nov 2016 - 3:39 pm | नाखु

माहीती दिली जाईलच असे नाही.

समक्ष भेट हाच उपाय.

एक खुलासा एक दिलासा वैचारीक चळव्ळ नाखु

यशोधरा's picture

26 Nov 2016 - 9:57 am | यशोधरा

फोटो दिसत नाहीयेत :(

फेदरवेट साहेब's picture

26 Nov 2016 - 10:21 am | फेदरवेट साहेब

फटू दिसेनात

बोका's picture

26 Nov 2016 - 11:17 am | बोका

ओर्छा या भारतीय टूर ऑपरेटर्स कडून दुर्लक्षित

ओरछा म्हणजे शांत, रमणीय, गर्दीपासून दूर असलेली जागा. सुंदर भग्नावशेष, दाट जंगल, नितळ पाण्याची बेतवा नदी,

सहमत.
गेल्याच वर्षी ओरछा ला जाऊन आलो. मिपाकरांनो, highly recommended !
चौराकाकांच्या वर्णनाच्या प्रतिक्षेत.

श्रीधर's picture

26 Nov 2016 - 11:28 am | श्रीधर

फोटो दिसत नाहीयेत
फोटोच्या प्रतिक्षेत.

कंजूस's picture

26 Nov 2016 - 11:36 am | कंजूस

झाशी की रानी मालिका चालू असताना मुलीने झाशीला ट्रिप काढायला लावली. फक्त ग्वाल्हेर (ग्वालिअर) आणि ओर्छा पाहिलेले. वेळेअभावी दतिया राहिलेले. खूप मराठी कुटुंबं राहातात तिकडे.रानीचा मृत्यु पुरुषी वेषात ग्वाल्हेरमध्ये झाला. अर्धे शहर शिंद्यांच्या मालकीची जमीन आहे. सामान्य जनता राणीबद्दल फार आदराने बोलते. तिथे स्मारक आहे.पुण्यतिथीच्या दिवशी बय्राच स्त्रिया राणीसारखा वेष, तरवारी घेऊन साजरा करतात. शिंद्यांबद्दल राग आहे.
मराठी लोकांनी पर्यटनाची सुरुवात झाशी अथवा तंजावूरपासून करावी.

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 12:29 pm | चौकटराजा

फोटो दिसत नाही ? अरे कोण आहे रे तिकडे ..... ? मी आता काय करू कोणी सांगेल काय ,,,,,, ?

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 12:30 pm | चौकटराजा

मला एकट्यालाच दिव्य दृष्टी प्राप्त झाली का काय ....? आँ ...?

तुमच्या फोटोच्या या लिंक्स गुगल लॅागाउट करून दिसतात का पाहा. पब्लिक अॅक्सेस चेक करा.

Photo १)

* photos 2

photo 3

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 1:14 pm | चौकटराजा

कंका गुगल लोगिनला जाउन अडकतोय मी.....
हे पब्लिकली प्रक्रन कुठे डिक्लेअर करायच बॉ? मी मागे फोटोबकेट वापरीत होतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2016 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

गुगल्फोटोमध्ये पब्लिक शेअरींगसाठी...

१. एकच चित्र शेअर करताना, चित्र पूर्ण आकारात उघडल्यावर (थंबनेल नाही)....

२. अल्बममधील सर्व चित्रे शेअर करताना, अल्बम उघडल्यावर...

... दिसणार्‍या विंडोच्या वर उजवीकडे असलेल्या आयकॉन्सपैकी खालील (share) आयकॉनवर क्लिक करा...

...व पुढे त्यातील पर्याय वापरून काम पुरे करा.

फेसबुकला फोटेो टाका तिथून इकडे आणायला सोपे आहे. गुगलला मारा गोळी.

कंजूस's picture

26 Nov 2016 - 2:04 pm | कंजूस

तुम्हाला माझ्या "फेसबुक-kanjoos" ( तात्पुरते कंजूस व्हा) ग्रुप मध्ये add केलय तिकडे फोटो टाका. मग आणू इकडे. तिकडचे फोटो फेसबुकवरच्या इतर फ्रेंडसर्कलला नाही दिसणार.

कंजूस's picture

26 Nov 2016 - 6:34 pm | कंजूस

१)

२)

३)

दगडांचा रंग, पोत फार सुरेख.

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 8:05 pm | चौकटराजा

ही भिन्त आमच्या घरातील आहे. यासारखी नैसर्गिक भिंत जयगड( जयपूरचा) इथे पाहिली तिचा फोटो इथे देण्याच्या प्रयत्न करतो.

यशोधरा's picture

26 Nov 2016 - 8:11 pm | यशोधरा

हे कोणते दगड आहेत?

रादर हे तुम्ही कसे मिळवलेत वगैरे सविस्तर लिहाल का?

चौकटराजा's picture

26 Nov 2016 - 8:30 pm | चौकटराजा

हा वॉलपेपर आहे. आपण गरीब माणूस. आपण काय घरात खरे दगड बसवणार ? आपल्याला घरात लावायचा असेल तर बोहरी आळीत पुण्यात मिळतो. ३४०० ला एक रोल. ( ५७ चौ फूट )

यशोधरा's picture

26 Nov 2016 - 8:34 pm | यशोधरा

ओह! काय पचका झाला माझा! =))

प्रचेतस's picture

27 Nov 2016 - 12:30 am | प्रचेतस

=))

कंजूस's picture

26 Nov 2016 - 8:32 pm | कंजूस

भिंत

बोका's picture

27 Nov 2016 - 10:29 am | बोका

बदामी किल्ल्यातील एक भिंत.
x

चौकटराजा's picture

28 Nov 2016 - 10:28 am | चौकटराजा

हंपी बदामी बेल्लारी हा भाग लोहयुक्त मातीचाच आहे. बेल्लारी ते होस्पेट या रेल्वे प्रवासात बाजूला अशी धातूमिश्रीत लाल माती
मालगाड्यांमधून उचलण्याचे काम चालते.

अजया's picture

26 Nov 2016 - 6:52 pm | अजया

छान सुरुवात.
डिटेल वर्णनाच्या प्रतीक्षेत.

फार सुरेख भिंती. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंतीही अशा स्वरूपाच्या तांबूस आहेत. इतर किल्ल्यांसारख्या काळ्याकभिन्न नाहीत. यामुळेही सिंधुदुर्गाचे वेगळेपण ठसते.

akshayajamgaonkar@gmail.com's picture

19 Jan 2019 - 1:12 am | akshayajamgaonk...

ओर्छा माहिति हवि आहे.