अंकुर

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
27 Nov 2016 - 9:37 pm

सप्तसरुच्या काट्यामधुनी झरझर लागे पाझरु
कृष्णवनीच्या खोडामागे चाले रे पाखरु

घनान वारा भनान होई सप्तसुरांचे तरु
सृष्टीचे हे सारमिलन रे अवचित अंबर झरु

चकोर चांदणी नभात दिसता आम्ही रे बावरु
टपटप चाले सावज ऐसे टपटप रे पाखरु

उनाड गाई खळ्यात येत्या लागती हंबरु
उत्थानाची सांजकृपाळी मोत्यांनी पांघरु

अवखळ येती गंगामाई उधळे रे वासरु
कृष्णकळ्यांच्या वेलीवरती जिंकू किंवा मरु

कविता

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

27 Nov 2016 - 11:26 pm | शार्दुल_हातोळकर

छान आहे कविता....

कवि मानव's picture

28 Nov 2016 - 12:08 am | कवि मानव

छान !!

गौरी कुलकर्णी २३'s picture

2 Dec 2016 - 7:37 pm | गौरी कुलकर्णी २३

छान.... सुंदर लयीमध्ये कविता रहावी अशीच सुरु !