तू फक्त चल म्हण
मी कधीची तयार आहे
बेगडी समाजाच्या बेड्या
तोडायला आतुर आहे
तू फक्त बोल म्हण
मी सांगायला तयार आहे
न उल्लेखलेल्या घटनांची
आज फुटणार माळ आहे
तू फक्त हो म्हण
सगळं मी निभावणार आहे
संगत-सोबत असेल तुझी तर
समाजाला अंगावर घेणार आहे
तू फक्त.... फक्त....
आहे मी म्हण.......
म्हण मात्र ...
जोवर अंगात प्राण आहे...
कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा
जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'
प्रतिक्रिया
26 Nov 2016 - 11:01 pm | जव्हेरगंज
अतिशय सुंदर!!
एक माफक सुचवणी: काही ठिकाणी लय बिघडलीय.
तसेच कविता अजून धारधार होऊ शकते.
एका उत्तम कवितेचं मटरेल याच्यात नक्कीच आहे!
30 Nov 2016 - 3:09 pm | विशाल कुलकर्णी
सहमत आहे. लिहिताना स्वतःशीच गुणगुणून पाहायचं.
कविता सुंदरच !
26 Nov 2016 - 11:16 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद. प्रयत्न करते. खरं तर सुचली.. लिहिली आणि इथे add केली... थोडी घाई झाली बहुतेक. मलाही जाणवलं लै तुटते आहे. पण मला जे भाव अपेक्षित होते त्यासाठी हेच शब्द सुचले
27 Nov 2016 - 12:01 am | खटपट्या
खूप खूप आवडली...
27 Nov 2016 - 1:02 am | शार्दुल_हातोळकर
मस्त !! आशय खुप छान आहे....
27 Nov 2016 - 6:20 am | एस
हात शिवशिवताहेत. :-)
30 Nov 2016 - 3:16 pm | नाखु
होऊ द्या खर्च......
आपली आवड कार्यक्रमाचा श्रोता नाखु विविधभारतीवाला
30 Nov 2016 - 5:38 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी
27 Nov 2016 - 11:48 pm | कवि मानव
आवडली... छान धार आहे कवितेला
29 Nov 2016 - 5:37 pm | टर्मीनेटर
मस्त...मला खरंतर कवितेतलं जास्ती काही कळत नाही...पण जेवढं कळल ते मस्त होतं...
2 Dec 2016 - 6:18 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद