प्रवास ५

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
25 Nov 2016 - 12:05 am

प्रवास ४

दोघे एकमेकांसमोर बसले होते. अश्रफ कसल्यातरी विचारात गुंग होता. आशुतोष त्याच्या विचारांचा रोख कुठे आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. समोर टेबल वर नकाशे, पेनं पडलेली होती. अनेक कागदांवर कच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. आशुतोष त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता पण त्याला काही ते जमत नव्हतं.

"मी सांगितलेली कामं खरंच करू शकशील का तू?" अश्रफने आशुतोषला विचारलं.

""अर्थात, पण आधी काय चाललंय ते कळू तरी दे मला"

"ऐक तर मग" अश्रफ बोलला आणि पाण्याची बाटली उघडून एक मोठा घोट पिला आणि नकाशा उलगडला.

"तू नव्हतास तेव्हापासून ते कालपर्यंत मला ज्या ज्या बातम्या मिळत गेल्या आहेत त्यानुसार एक गोष्ट निश्चित आहे. चीन ची पाऊलं नेक्स्ट जेन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे पडत आहेत. आणि हीच गोष्ट आपल्यासाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. अर्थात आपलं काम म्हणजे चीन च्या या प्रयत्नात हरप्रकारे खोडा घालायचा. तो कसा घालायचा यावरच मी गेले कित्येक दिवस डोकं बडवतोय. प्लॅन्स भरपूर आहेत पण रिस्की आहेत"

आशुतोष जॅकेट ची चेन लावत म्हणाला, "रिस्की आहेत म्हणूनच आपण इथे आहोत" मेजर सिद्दीकीने गिफ्ट केलेलं त्याचं आवडतं काळं जॅकेट त्याने व्यवस्थित जपून ठेवलं होतं.

आशुतोष ला काय म्हणायचं ते अश्रफ ने क्षणात ओळखलं. स्मित करत तो बोलला, "एक गोष्ट लक्षात ठेव यादव, रॉ हि एका वेगळ्याच विचारसरणीवर विचार करते. बाकीची तत्व तुला लक्षात येत जातीलच हळू हळू, पण सध्या महत्वाचं म्हणजे इथे देशासाठी मरायला तयार आहोत वगैरे म्हणून अजिबात चालत नाही. आपण मरायसाठी नाहीच आहोत मुळी. जिवंत राहून नाकावर टिच्चून काम फत्ते करायचं आणि कुणाला वास पण आला नाही पाहिजे. असं झालं तरच ऑप्स सक्सेसफुल होतात. साधारण आर्मी वाल्यांची मेंटलिटी अशी असते की देशासाठी लढता लढता मेलो म्हणजे खूप मोठा पराक्रम झाला, आणि ते खरं असेलही. पण इकडे तसं चालत नाही....."

"गॉट युअर पॉईंट ब्रो" हे तत्वज्ञान ही आशुतोष ने बऱ्याचदा ऐकलं असल्यामुळे अश्रफ ला जास्त बोलू न देता आशुतोष उत्तरला.

"गुड. आता आपल्याला हे तर माहितीये की बातमी अणूप्रकल्पासंबंधी आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपल्याला ऑन फिल्ड जॉब करावा लागणारे. इकडे बसून काही करता येईल असं वाटतं नाही"

आता आशुतोष ची भुवई उंच झाली.
"म्हणजे, चीन मध्ये?"

"चीन आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा"

"म्हणजे पाकिस्तान पण इन्व्हॉल्व आहे तर"

"पाकिस्तान इन्व्हॉल्व नसतो असं कधी होतच नाही. ग्वादार तर ऑलरेडी चिन्यांच्या ताब्यात आहे. सिपीईसी बद्दल ऐकलंयस का कधी?"

"नाही"

मॅप काढत अश्रफ पुढे बोलू लागला.

"कुणी आणला रॉ मध्ये तुला काय माहित. बरं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीन चा खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरापासून ते थेट काशी पर्यंत, म्हणजे चीन मधल्या काशगर पर्यंत हायवे बांधायचा चीन चा प्रयत्न आहे. वन बेल्ट वन रोड पॉलिसी च्या अंतर्गत हा प्रोजेक्ट वेगात चालू आहे. वन बेल्ट म्हणजे सागरी मार्ग, जो एनर्जी सिक्युरिटी च्या नावाखाली चीन विकसित करत आहे. यात ग्वादार बंदराचा विकास करणे, चितगाव आणि श्रीलंकेतील बंदरांचा वापर करणे हे सगळे प्रकार आहेत. त्याला 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' असं गोंडस नाव त्यांनी दिलंय. हे पर्मनंट धोके भारत आज उरावर घेऊन जगतोय. त्याला काउंटर करण्यासाठी आपले सुद्धा अनेक प्रयत्न सुरु आहेत. वन रोड म्हणजे हा सीपीईसी. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराचं कारण चीन ने पुढं केलंय, आणि काही अंशी ते खरंही आहे. हा कॉरिडॉर एस्टॅब्लिश झाला तर चीन ला आखातातुन पेट्रोलियम इंपोर्टस साठी हिंदी महासागरात उतरण्याची गरज पडणार नाही आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि टाईम वाचेल. यासाठी जवळपास 55 बिलिअन डॉलर्स इतका पैसा ओतला जाणार आहे."

"पण हे सगळं अणूउर्जेशी कसं संबंधित आहे ते अजून कळत नाहीये मला"

"सांगतो. ट्रेड हे एक कारण झालं. आजच्या घडीला नेक्स्ट जेन प्रोजेक्ट साठी लागणारं मटेरियल अमेरिका, जपान आणि फ्रांस या तीनच देशांकडे उपलब्ध आहे. अमेरिका ते चीन ला देण्याची सुतराम शक्यता नाही, जपान आणि भारताच्या वाढत्या मैत्रीमुळे चीन उघडपणे जपान चा मत्सर करतोय. आणि खरं कारण म्हणजे फ्रान्स मधल्या अरेवा कंपनी कडून अटॉमीक मटेरियल मिळवण्याबाबत करार करण्यात चीन केव्हाच यशस्वी झालाय. जगाच्या डोळ्यांखालून हे मटेरियल चीन पर्यंत कसं पोहोचवायचं इथे खरी गोम आहे. खुल्या समुद्रात हे सगळं कुठे ना कुठे तरी ट्रॅक होणार त्यामुळे तो मार्ग पत्करायला फ्रांस तयार नाही. हे मटेरियल आखातापर्यंत आणायला फ्रांस समर्थ आहे. पण तिथून ते चीन मध्ये कसं पोहोचवायचं हा गहन प्रश्न आहे. आणि त्याच उत्तर सिपीईसी हे आहे. हा रोड नसेल तर हे सगळं करायला चीन ला अरेबियन बेसिन मधून ऑपरेट करावं लागेल आणि तसं केलं तर आपली नेव्ही त्यांना सोडणार नाही. सीपीईसी ला पाकिस्तान नाही म्हणण्याचा प्रश्न च नाही कारण चीन ने इतकी वर्षे भारताविरोधात त्यांना साथ दिली आहे आणि या उपकाराखाली पाकिस्तान दबून गेलाय. राहिला प्रश्न मधल्या देशांचा, त्यातले काही देश फ्रान्स चे पाठीराखे आहेत तर काहींना चीन ने बक्कळ पैश्याखाली दाबून ठेवलाय."

आशुतोष थोडंसं सावरून बसला. चीन ला हे मटेरियल मिळालं तर चीन काही ते विधायक कामांसाठी वापरणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं. पण याही पेक्षा भयानक म्हणजे चीन कडून ते जर पाकिस्तान ला मिळालं असतं तर ते आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात पसरायला वेळ लागला नसता.

"पण हे सगळं होऊन हि डील याच मार्गाने होईल हे ठामपणे कसं सांगणार आपण? आणि जर आज आपल्याकडे इतकी माहिती आहे तर मग इतके दिवस आपण काही केलं नाही का?"

"ठामपणे काहीही सांगता येणार नाही. जर या मार्गाने झाली तर ती असफल करणे हे आपलं काम आहे. बाकी दुसरीकडे दुसऱ्या मार्गांची काळजी घ्यायला आपल्यासारखे काही जण आणखी कुठे तरी डोकं खाजवत बसलेच असतील. दुसरं म्हणजे आपण अनेक गोष्टी करतोय. बलुचिस्तान मधल्या फुटीरतावाद्यांनी आत्ताच डोकं वर काढणं हा काय तुला योगायोग वाटतो? आणि बलुचिस्तानमध्येच गडबड व्हावी हाही टोगायोग वाटतो काय? बघ बरं जरा नकाशात कुठे आहे बलुचिस्तान ते. त्या सर्व प्रकाराचा एक सूत्रधार तुझ्यासमोर बसला आहे आणि बाकी सूत्रधार दिल्लीत रॉ च्या ऑफिस मध्ये बसले आहेत. पण ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते"

हे अश्रफ नावाचं रसायन काय आहे ते एव्हाना आशुतोष ला कळून चुकलं होतं. पन त्याला साधे साधे प्रश्न पडले होते. आणि उत्तरं मिळाल्याशिवाय तो नीट काम करू शकणार नाही याची अश्रफ ला सुद्धा खात्री होती. त्यामुळे तो आशुतोष च्या सगळ्या शंकांचं निरसन करत होता. शॉर्ट ट्रेनिंग वर आलेल्या मुलांना सांभाळून घ्यावं लागतं हे तो जाणून होता.

"हे इतकं सगळं चाललंय पण अमेरिका कुठेच मध्ये दिसत नाहीये. तिचा भारतविरोधी आवाज कुठे तरी उमटायला पाहिजे होता"

"नाही. अमेरिका यात आपल्या बाजूने उतरून आपल्याला पूर्ण साहाय्य करतीये. तू म्हणतोस तसं कित्येक वर्षे भारतविरोधी राहून अमेरिका पाकिस्तान ला गोंजारत होती आणि त्यानिमित्ताने आशिया मध्ये सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत होती. पण आता त्यांनाही कळून चुकलंय कि दक्षिण आशिया मध्ये भारत आणि चीन च काय ते कामाचे देश आहेत. त्यातही चीन कम्युनिस्ट, त्यामुळे साहजिकच त्यांनी आपल्याला जवळ केलंय. चीन शी उघड उघड शत्रुत्व त्यांना परवडणारं नाही, कारण अमेरिकन बाजारपेठेत चिनी गुंतवणुकीला मोठं महत्व आहे. अमेरिका स्वार्थापुरतं काम करणार, पण आपल्याला तरी कुठं अजून काही पाहिजे?"

"पण मग हे इथे अनंतनाग मध्ये सगळं करायचं कारण काय? मला वाटलं इथेच ऑप असणार आहे आणि त्यासाठीच पाठवलं गेलंय मला. रॉ मधली लोकं पण असं वेड्यासारखं करतील असं वाटलं नव्हतं मला."

नकाशातलं डोकं वर काढून अश्रफ ने आशुतोष कडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला,
"रॉ च्या प्रत्येक फालतू कृती ला सुद्धा कारण असतं. तुला काय वाटलं तुला फक्त मला भेटायला पाठवलंय इकडे? तू आणि इतर दोघे अनंतनाग मध्ये, तिकडे चार एजंट आसाम मध्ये, सहा अरुणाचल मध्ये असे तेरा रॉ एजंट्स भारतातच अंतर्गत कामामध्ये बिझी आहेत हे खबर एव्हाना चीन कडे गेली सुद्धा असेल. यामुळे ते रिलेटिव्हली बेसावध राहतील हे आपल्याला चांगलंच आहे. आज त्याच चीन एजंटला लूप मधून बाजूला काढायचं आपल्याला. हे घे. रात्री 11.30 ला काम झालं पाहिजे. पण मी खरंच तुला या सगळ्यात इन्व्हॉल्व करावं कि नाही हा विचार करतोय."

अश्रफ ने आशुतोष च्या हातात चिट्ठी सरकवली. ती घेत आशुतोष ने थोडं रागातच विचारलं,
"कसल्या आधारावर तू इतका डाऊट घेतोयस माझ्यावर?"

हसतच अश्रफ उत्तरला, "रॉ एजंट असून तुला मी मराठी आहे हे समजायला पूर्ण एक दिवस लागला, याउपर काय बोलणार"

एकूणच, चीन बघत असलेली स्वप्न आणि त्याचा भारतावर अपेक्षित असलेला परिणाम दोघेंसुद्धा जाणून होते. राष्ट्रवाद आणि भारतासमोर उभी असलेली संकटे याबद्दलच्या कल्पना दोघांच्याही डोक्यात अगदी क्लिअर होत्या. देशाला धोका ठरू शकणाऱ्या गोष्टींना उध्वस्त करण्यासाठी रॉ आणि एजंट्स अहोरात्र झटत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच वेळी चीन ला 'तुमच्या लोकांचा आम्हाला काश्मीर प्रदेशात त्रास होत आहे' असा संदेश आय एस आय च्या नावाने मिळाला होता आणि आय एस आय कडे इतकी हिम्मत कशी काय आली असा विचार करत चिनी अधिकारी सिगार ओढत हसत बसले होते. थोड्याच वेळांत त्यांना 'त्यांच्या लोकांच्या' हत्येबद्दल सुद्धा संदेश जाणार होताच.

11.30 ला काळं जॅकेट घातलेल्या आणि तोंड झाकलेल्या इसमाकडून एका व्यक्तीची पॉईंट ब्लॅंक रेंज वर गोळी घालून हत्या झाली.

क्रमश:

हे ठिकाण

प्रतिक्रिया

एस's picture

25 Nov 2016 - 9:16 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

महासंग्राम's picture

25 Nov 2016 - 9:53 am | महासंग्राम

कडक झाला आहे हा भाग पण....

vikrammadhav's picture

25 Nov 2016 - 11:44 am | vikrammadhav

मस्त झालाय हा भाग !!!! पुभाप्र.

नाखु's picture

25 Nov 2016 - 12:09 pm | नाखु

समजबुद्धी कमी असल्याने लगेच टोटल लागेना पण कळेल हळू हळू...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत नाखु

शलभ's picture

25 Nov 2016 - 12:32 pm | शलभ

मस्त चाल्लाय प्रवास..

स्वाती दिनेश's picture

25 Nov 2016 - 12:53 pm | स्वाती दिनेश

ताणली जाते आहे. पुभाप्र.
स्वाती

इरसाल कार्टं's picture

25 Nov 2016 - 2:21 pm | इरसाल कार्टं

वाट पहात होतो भागाची, अधाश्यासारखा वाचून काढला.
मस्त.

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2016 - 2:28 pm | टवाळ कार्टा

कडक

जॉनी's picture

25 Nov 2016 - 6:00 pm | जॉनी

तुमच्या प्रतिसादांमुळे लिहायचा हुरूप येतोय.

संजय पाटिल's picture

27 Nov 2016 - 5:51 am | संजय पाटिल

पण लवकर लवकर लिहा

स्पार्टाकस's picture

28 Nov 2016 - 5:45 am | स्पार्टाकस

साधारण अंदाज आला आहे. काही प्लॉट्स डोक्यात सेट झाले आहेत.. बघू अंदाज बरोबर निघतोय का.

सस्नेह's picture

29 Nov 2016 - 3:28 pm | सस्नेह

पुभाप्र.

jp_pankaj's picture

29 Nov 2016 - 5:43 pm | jp_pankaj

वाचतोय

अनन्त अवधुत's picture

30 Nov 2016 - 6:41 am | अनन्त अवधुत

पुभाप्र