गाभा:
आय्टीवाल्यांची ऐट टांगणीला लागून ६ महिने झालेत. अजुन किती महिने वाट (पहावी) लागणार आहे ते माहित नाही.
रोज वेगवेगळ्या बातम्या कानावर येताहेत पण सर्वच निराशा. आयटीत करीयर करावे की नाही हा प्रश्न पडलाय- करायचे नसेल तर कय पर्याय आहेत तेही माहित नाही. कुठेही ह्याबाबत कौस्लिंग होत नाही. अनेक समुदायात ही सोडून इतर अनेक गोष्टींवर चर्चा दिसते आहे.
आयटीचे भविष्य कसे आहे?
जॉब मिळेपर्यंत काय करावे?
प्रतिक्रिया
11 Feb 2009 - 2:24 pm | नितिन थत्ते
आय टी ही सर्विस इंडस्ट्री असल्यामुळे, आय टी ला स्वतःचे भवितव्य नसते. मॅन्युफॅक्चरिंग आणि आर्थिक क्षेत्रामध्ये परिस्थिती सुधारल्याशिवाय, आय टी मध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता नाही.
टेलिकॉम, कृषी ही क्षेत्रे त्या मानाने चांगल्या स्थितीत असावा.
आय टी (किंवा कुठलेही क्षेत्र) निवडण्याचा निर्णय तात्कालिक स्थितीवर अवलंबून नसावा. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्याची आवड आणि कुवत जास्त महत्त्वाची.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
11 Feb 2009 - 3:45 pm | त्रास
सर,
आम्ही जर CS, IT engg, MCA, MCM केले असेल तर गेली ३-४ वर्षे आम्ही आयटीत जायचे हेच स्वप्न उरशी बाळगून होतो. इन्वेस्ट्मेंट तर केलेली आहे, आवड होतीच पण....
11 Feb 2009 - 4:09 pm | नितिन थत्ते
आवड म्हणून आय टी चे स्वप्न पाहिले असेल, तर 'धीर धरा' एवढेच आत्ता म्हणता येईल.
मंदीनंतर तेजी येतेच आणि मग तुमच्या पुढे खूप संधी असतील. मंदीचा परिणाम वर्षभर टिकेल असा अंदाज आहे.
मंदीचा मार साध्या मेकॅनिकल इंजिनिअरांना तसेच इतर क्षेत्रातही सहन करावा लागतोच.
आपण सध्या सार्वत्रिक मंदीचा परिणाम पाहतोय. त्यावर चर्चाही खूप होते आहे. परंतु अनेक क्षेत्रांमध्ये अघोषित मंदी येत असते. जिची चर्चाही होत नाही.
धीर धरा.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
11 Feb 2009 - 2:28 pm | महेंद्र
आय टी मधे जे लोक जॉब करतात त्यांच पण सध्या असं सुरु आहे.. चेक करा..
जोक अपार्ट :- सध्या आयटी चं भवितव्य भारतात तरी फारसं ब्राइट नाही. माझ्या मित्राच्या मुलाला फक्त १.६ लाख पॅकेज मिळालं पास आउट झाल्या बरोबर..
हे रेसेशन कमित कमी १ वर्ष तरी चालेलं असं माझं मत आहे.
मुंबईत आणी पुण्याला कन्स्र्ट्रकशन बिझिनेस कमी होईल आणि रिअल इस्टेट मार्केट पण स्टॉक मार्केट प्रमाणेच कोसळेल असा माझा अंदाज आहे.
एक्स्पर्ट लोक आपलं मत देतिलच..
महेंद्र
11 Feb 2009 - 2:39 pm | अमोल केळकर
मुंबईत आणी पुण्याला कन्स्र्ट्रकशन बिझिनेस कमी होईल आणि रिअल इस्टेट मार्केट पण स्टॉक मार्केट प्रमाणेच कोसळेल असा माझा अंदाज आहे.
वा ! वा ! तसं झालंच तर बर्याच जणांच ( माझे पण ) पुण्यात घर घ्यायचे स्वप्न पुर्ण होईल. त्याच बरोबर पुण्यातील महागाई थोडी स्वत होईल.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
11 Feb 2009 - 2:42 pm | घाटावरचे भट
पुन्यातली बिल्डरं लैच माजलीत राव....
11 Feb 2009 - 3:04 pm | आनंदयात्री
आता बिल्डरांची मिडल मॅनेजमेंट भ्रष्टाचार करतीये. बिल्डर पैसे कमी करत नाहीत असे सांगतात, अडुन रहातात. नंतर हळुच तुम्हाला फोन करतात, पर्सनल बोलायचेय म्हणतात, पैसे कमी करुन देतो - कमी केलेल्या अमाउंटचे ३०% द्या म्हणतात. अन खरेच बरेचसे पैसे कमी करतात.
11 Feb 2009 - 4:18 pm | त्रास
१०-१२ जणांनी एकत्र येउन बांधली तर स्वस्तात अपार्ट्मेंट होते; त्यासाठी रेट खाली यायची कशाला वाट पहाता?.
पण टिमवर्क काय अस्ते रे भाउ? मराठी मान्साला जमल व्ह्यय त्ये?
11 Feb 2009 - 3:51 pm | त्रास
शिक्षकांना एव्हढा पगार मिळवायला ४ वर्षे लागतात; त्यापेक्षा बरा आहे १.६ लाख पगार. पण तेव्हढा देणारा आहे कुठे हो?
11 Feb 2009 - 2:55 pm | महेंद्र
कन्स्ट्रक्शन इक्विप्मेंट कंपनिज जेसिबी सारख्या कि ज्यांचं प्रॉडक्शन महिना भर बुक असायचं त्यांची पण वाट लागली आहे. टोटल प्रॉडक्शन २० ते २५ टक्के झालं आहे. त्याला वापरण्यात येणारी किर्लोस्कत इंजिन्स च्या कंपनी चे पण ३रर्ड क्वार्टर चे निकाल एनकरेजिंग नाही. आमचा एक मित्र कळवतॉ की त्या कंपनिने ऑलरेडी ५ दिवसांचा आठवडा केला आहे आणि पगारात पण २० टक्के कपात केली आहे.
इतर कंपन्यांची अवस्था पण काही फार वेगळी नाही. इंजिनिअरींग कंपन्यांना पण रेसिशन चा त्रास आहेच..हेच कारण आहे प्रॉपर्टी मार्केट कॅश होण्याचे माझ्या मते...
ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे मार्केट ची वाट लागणार...
महेंन्द्र
11 Feb 2009 - 7:23 pm | कलंत्री
मंदाबाईचा फेरा इकडेतिकडे येवो न येवो पण मराठीभाषेला मात्र मंदीचा फेरा चांगलाच विळखा घालतोय. जरी थोडासा प्रयत्न केला तर चांगली आणि गोंडस मराठी शब्द वापरता येतील.
उदा. रेसेशन ( मंदी), बुक ( नोंदणी), कंस्ट्रक्शन ( बांधकाम, इमारती), ३र्ड क्वार्टर (तिमाही), बिल्डर ( बांधकाम व्यावसायीक), जोक अपार्ट ( विनोदाचा भाग सोडून द्या),
अरे, मित्रांनो, थोडावेळ विचार केलातरी कितीतरी मराठी शब्दांना पुर्नसंजीवन देता येईल.
11 Feb 2009 - 9:27 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे कलंत्री साहेब.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
11 Feb 2009 - 9:41 pm | टिउ
आम्ही सुद्धा अग्री करतो...कितीही टाईम लागला तरी चालेल पण मराठी वर्ड आठवल्याशिवाय प्रतिक्रिया मुळीच देउ नये असा ठराव आम्ही मांडतो.
(युअर्स ओन्ली) टिउ
11 Feb 2009 - 11:26 pm | सुक्या
तेजी / मंदी ही चालुच असते.
एक सरकारी नोकरी सोडली तर मंदी चा तडाखा हा जवळ्पास सर्वच क्षेत्रांना बसला आहे. वित्त, सेवा, माहीती तंत्रज्ञान, उत्पादन ही सगळी क्षेत्रे कुठे तरी एक दुसर्यावर अवलंबुन असतात. सरकारी नोकरी मिळवायची तरी बरीच दिव्ये पार पाडावी लागतात. त्यातही केवळ घर चालवणे हा हेतु असेल तर ठीक आहे. चाकोरीबाहेर जाउन काही करायचे असेल / समाधान शोधायचे असेल तर थांबा. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी नक्की येइल.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
12 Feb 2009 - 3:45 am | पिवळा डांबिस
आजच अमेरिकन काँग्रेसच्या सबकमिटीने इथल्या सगळ्या मोठ्या बँकांच्या सीईओजना डिपोझिशन देण्यासाठी बोलावलं होतं. सिटीबँकेचे आपले विक्रम पंडितही होते त्यात!
या सगळ्या बड्या धेंडांना काँग्रेसच्या मेंबर्सनी खरपूस भाजून काढलं....
रोख होता तो मुख्यत्वे बोनसेस विषयी आणि आउट्सोर्सिंग विषयी....
आता या निमित्ताने आउटसोर्सिंगबद्दलचा सगळा विरोध बाहेर पडतोय...
आणि त्याला इथल्या पब्लिकमध्येही भरपूर पाठिंबा मिळतोय....
बहुतेक सरकारकडून मदत घेणार्या उद्योगांच्या आउटसोर्सिंगवर तरी निर्बंध येणार...
तेंव्हा बॉटमलाईन ही की सांभाळून रहावे....
पुढले वर्ष-दीडवर्ष (घराचा हप्ता भरून) घरखर्च चालवता येईल इतके तरी सेव्हिंग्ज (इन्व्हेस्टमेंट नव्हे; तर कधीही बँकेतून काढता येईल अशी रक्कम) ठेवावे...
म्हणजे जरी जॉब गेला तरी आपले कुटूंब अगदी रस्त्यावर यायची वेळ येणार नाही....
इकॉनॉमी वर यायला तितका काळ लागेल असे वाटते आहे....
नवीन जॉब शोधणारांचे तर जास्तच कठीण! कारण ले-ऑफ झालेल्या अनुभवी लोकांचे तांडे त्याच पोझिशन्ससाठी ऍप्लाय करणार....
वरील मजकूर लिहायला दु:ख्ख वाटते पण इथे तरी ही वस्तुस्थिती आहे. आपल्या भारतातल्या मित्रांना 'हेडस अप' द्यावा म्हणून लिहिले...
12 Feb 2009 - 5:24 am | त्रास
उपयोगी सल्ला. धन्यवाद
12 Feb 2009 - 6:49 am | आम्हि
अरे, मित्रांनो, थोडावेळ विचार केलातरी कितीतरी मराठी शब्दांना पुर्नसंजीवन देता येईल. (कलंत्री साहेब)
पुनर्सन्जिवन म्हनाय्चे आहे का आप्ल्याला? :-०
12 Feb 2009 - 7:23 am | नितिन थत्ते
या धाग्याचा विषय 'आर्थिक मंदी आणि करियरच्या संधी' आहे.
मराठी भाषेतील इंग्रजी शब्दांचा वापर आणि त्या शब्दांना प्रतिशब्द या विषयाची चर्चा दुसरा धागा काढून त्यावर करावी.
त्रास यांचा प्रॉब्लेम खराखुरा आहे त्यावर काही काथ्याकूट करता आला तर त्यांच्यासारख्या इतरांना फायदा होऊ शकतो. भलते फाटे फोडून विषयांतर होऊ शकते.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
12 Feb 2009 - 8:50 am | त्रास
धन्यवाद. मनातले बोललात. इथे आमची गोची होतेय आणि ह्यांना मराठी भाषेचे कौतुक सुचरेय. आमचे पोट भरले की आम्ही चांगली मराठी बोलायचा प्रयत्न करु.
13 Feb 2009 - 2:32 pm | आम्हि
१००% सहमत....
त्रास रावान्ना झलेल्या त्रासाबद्दल जाहिर दिल्गिरि मगितलि जावि...
(लोकान्च्या भावनान्ना मान देनारे - आम्हि)