(लहानपणी कधीतरी वाचली होती, आज आठवली काही निमित्ताने)
तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या!
साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे! एवढ्यात तो मुलगा समोरून येतो, मोठमोठ्याने वेदमंत्र अस्खलित संस्कृतात उच्चरत, यांना अभिवादन करून पुढे जातो. त्याची आई म्हणते हाच कि माझा मुलगा!
दुसरी म्हणते, माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही, त्याच्या सुंदर आणि धष्टपुष्ट शरीरावर तरुणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात, तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो, चौघीना प्रणाम करतो, नजर खिळवून बसलेल्या तरुणींकडे बघत मिशिवर पीळ देत मिश्किल हसतो व पुढे जातो,
आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट, इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात, ती म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत, चारचौघांसारखा आहे तो. अरे, हा काय समोरून येतोय. तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो, आईला लाडिक रागावतो की का गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन!
तो मडके घेऊन घरी जातो.
इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते, काय गं, मग आमच्या तिघीपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला, दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तिसरी साहजिक नाराज होती.
ती चौथी स्त्री म्हणाली, "तिघींपैकी? मला तर फक्त एकीचाच 'मुलगा' दिसला, जो आता आईच्या डोक्यावरचे मडके घेऊन गेला"
(सांप्रत घटनांशी संबंध आपल्या जबाबदारीवर लावावा व बोधही घ्यावा)
प्रतिक्रिया
15 Nov 2016 - 7:20 pm | मोदक
बरोबरै...
मुलगे लै होवून गेले पण "नेमकी जबाबदारी" ओळखून स्वतः निर्णय घेणारा आणि पुढाकार घेवून निभावणारा मुलगा हाच खरा "मुलगा"
15 Nov 2016 - 7:25 pm | मराठी कथालेखक
कथा छान आहे.. बाकी संबंध अजूनतरी ध्यानात आला नाही.
15 Nov 2016 - 7:39 pm | विवेकपटाईत
गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन!
हे वाक्य २-३ वाचा, आजची बातमी हि वाचा. पूर्ण कळेल.
15 Nov 2016 - 7:53 pm | प्राची अश्विनी
ओह्. आता कळले.
पण ती "ऐकावं जनाचे, करावे मनाचे" वाली गाढव विकायला गेलेल्या शेतकरी व त्याच्या मुलाची गोष्ट पण आठवली. काही ही केलं तरी ज्यांना बोलायचंय ते बोलतातच.
15 Nov 2016 - 7:57 pm | मोदक
किंवा
"राजा भिकारी आणि राजा मला घाबरला" असे दोन्हीकडून बोलणारा उंदीर.
15 Nov 2016 - 10:02 pm | संदीप डांगे
सध्या राजाच सेम त्या उंदरासारखं दोन्हीकडून बोलतोय असं प्रजेला दिसतंय! ;)
16 Nov 2016 - 10:18 am | मोदक
ज्या प्रजेला काळाच रंग दिसत आहे त्यांना चष्मे काढायला सांगा, अनेक मूळ व्याधी बऱ्या होतील.
16 Nov 2016 - 11:03 am | संदीप डांगे
=)) जनरायलेझेशन
16 Nov 2016 - 12:47 pm | मोदक
हा हा.. चष्मा काढा हो. नीट वाचून प्रतिसाद द्या. =))
16 Nov 2016 - 1:07 pm | संदीप डांगे
इथे माकड आणि टोपीवाला यांची कथा वापरता येईल, =))
16 Nov 2016 - 10:11 am | धर्मराजमुटके
त्या आईला ह्या पुत्राबरोबर अजून एक पुत्र होता. तो तिच्यासोबत जाऊन पाणी घेऊन आला. यात आईने, दुसर्या मुलाने आणि पहिल्या मुलाने देखील कोठे चकार शब्द काढला नाही ना वक्तव्य केले.
पण इतरांच्या मुलांना दुसर्यांच्या आयांची काळजी.
असो. हे सहसंवेदनेचे चांगले लक्षण आहे.
दुसर्यांच्या दु:खाने दु:खी होतो तोच खरा माणूस ! हर गोविंद ! हर गोविंद ....... अरविंद... हर गोविंद !
16 Nov 2016 - 10:58 am | अप्पा जोगळेकर
केजरीवालचे हस्तक मिसळपाव.कॉम या संस्थळावर सुद्धा आहेत असा बोध मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर घेत आहे.
शिवाय लवकरच इथे माता म्हणजे भारतमाता आणि हंडा उचलणारा तिसरा तरुण म्हणजे 'मोदी' असा बोध मोदी समर्थक स्वतःच्या जबाबदारीवर घेतील अशी शक्यता आहे.
16 Nov 2016 - 1:47 pm | संजय पाटिल
अहो, ते नोटा बदलायला गेलेल्या आई बद्दल बोलत असावेत असे मला वाटते. चुकभूल देणे-घेणे..
16 Nov 2016 - 6:45 pm | गामा पैलवान
.... संदीप डांग्यांचं खरंच कौतुक आहे. त्यांच्याशी इंटरअॅक्शन (=वार्तालाप?, =बोलाचाल?) करणारा माणूस स्वत:चा स्वभाव इतरांसमोर उघड करंत असतो. तेव्हा सांभाळून. ;-)
-गा.पै.
16 Nov 2016 - 7:39 pm | संदीप डांगे
=))
16 Nov 2016 - 7:53 pm | प्रसाद गोडबोले
कथा पुढे चालु ....
चौथी चे वाक्य पुर्ण होते ना होते तोच पहिलीच्या मुलाने पाठवलेले मेकॅनिक आणि प्लंबर येवुन पाणवठ्यावर मोटार बसवायचे काम सुरु करतात. अन दुसरीच्या मुलाने पाठवलेले लोकं पाणवठ्यावर मोट टाकुन घेतात अन साईडला कुंपण बांधुन घेतात !
अन दुसर्या दिवशी तिसर्या स्त्रीचा अडाणी मुलगा दुष्काळग्रस्त म्हणुन तहसीलदार ऑफीसवर फॉर्म भरायला जातो !
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
(सांप्रत घटनांशी संबंध अजिबात लावु नये व बोध तर मुळीच घेवु नये)
16 Nov 2016 - 9:10 pm | टवाळ कार्टा
=))
16 Nov 2016 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा पुढे सुरु.....
पाचवीला वाटलं आता काय बोलावं. चौघींची मुलं कर्तबगार निघाली. आता ही बोलणारच होती, पण ही काही दिवसापूर्वीच्या घटनेत हरवून गेली. हिचा मुलगा अंगणात समुद्रातील नुकतेच आणलेले मासे वाळू घालत होता, म्हाताराही अंगणात बसलेला होता. डोळ्यानं फारसं दिसत नाही, ऐकायला कमी येतं. स्मरणशक्ती कमी झालेली. अंगणात मासे वाळत घातलेत म्हणून कावळे येऊन बसायचे. मुलगा त्यांना हाकलुन लावायचा. म्हातारं, आपलं काही तरी झावळ झावळ काळं दिसतं म्हणून लेकाला विचारतं 'काय रे राजा, काळं काळं काय येतंय आणि जातंय... मुलाने एकदा सांगितले. बाबा, कावळे येताहेत आणि जाताहेत. थोडा वेळ झाला की, म्हातारं तेच विचारायचा. 'काय रे राजा, काळं काळं काय येतंय आणि जातंय. बाबा, कावळे येतात आणि जातात. थोडा वेळ गेला की म्हातारं आपलं सुरु.... 'काय रे राजा....'
राजा आत मात्र भडकून जातो. 'सालं म्हातारं कामाचं ना धामाचं, एकदा समजून सांगितलं तरी समजत नाही. सालं मरतही नाही. म्हातार्याला काही आवाज पोहचत नाही. म्हातारी मात्र घरातून ते शांतपणे ऐकत असते. तीला आपला लहानपणीचा लेक आठवतो. बाबा, अंगणात काय आहे, शंभर वेळेस बाबांनी न कंटाळता उत्तर दिलं होतं. 'बाळा त्याला काऊ म्हणतात'
म्हातारीनं....डोळ्याला लुगडं लावलं आणि काहीही न बोलता डोक्यावरचं मडक्याला हात लावला आणि म्हातार्याच्या दिशेने निघून गेली. चौघीही न बोलणार्या म्हातारीकडे एकटक पाहातच राहील्या....!
प्रा.डॉ.दिलीप दवणे. ;)
|
16 Nov 2016 - 9:10 pm | टवाळ कार्टा
=))
17 Nov 2016 - 11:26 am | बोका-ए-आझम
मिपावर हे सर्व वाचणा-या सहाव्या स्त्रीने मिपावर असलेल्या ' गमन ' या बटणावर क्लिक केलं आणि निमूटपणे टीव्ही आॅन करुन ' खुलता कळी खुलेना ' बघायला सुरूवात केली.
17 Nov 2016 - 11:50 am | जिन्गल बेल
खिक्क
17 Nov 2016 - 12:02 pm | विशुमित
लाजवाब बोकाशेठ ...!!
बाकी बोधकथा आवडली
17 Nov 2016 - 12:22 pm | प्रसाद गोडबोले
बाकी ह्या बटानाचे नाव बदलले पाहिजे , गमन म्हणजे तर सरळ सरळ अश्लील झाले की हो =))))
-
अखिल मिपीय #स्वमतांध_दांभिक संस्कृतीरक्षक समिती अध्यक्ष
मार्कस ऑरेलियस
17 Nov 2016 - 2:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले. क्लास.
तुम्ही जर आज सहाव्या स्रीबद्दल लिहिले नसते, तर आज सहाव्या म्हातारीच्या कथेने माझ्या मनात आकार घेतलाच होता. आता सातवी म्हातारी... कथा पुढे सुरु. पढ़ना न भूले, आज रात ११ बजे.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2016 - 11:03 pm | सतिश गावडे
अकरा वाजून गेले की हो दिलीप दवणे.
18 Nov 2016 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल लेखकाला कधी झोप लागली कळलं नाही. आपल्यासारखे उत्तम वाचक आमच्या कथेची वाट पहात आहेत हे वाचून डोळे भरून आले. लेखकाचा मुड़ आहे आणि सातव्या म्हातारीचा चिखलाचा गोळा तयार आहे, बस योग्य आकार देणे बाकी आहे.
लवकरच हजर होतो.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2016 - 11:56 am | याॅर्कर
मी आईला भेटायला जाताना सोबत फोटोग्राफर घेवून जात नाही,आणि फोटोग्राफर आले तरी त्यांना सोफ्यापर्यंत येऊ देत नाही. -- अजित पवार
17 Nov 2016 - 12:23 pm | विशुमित
<<<<मी आईला भेटायला जाताना सोबत फोटोग्राफर घेवून जात नाही,आणि फोटोग्राफर आले तरी त्यांना सोफ्यापर्यंत येऊ देत नाही. -- अजित पवार>>
हो हे अगदी खरंय...
अवांतर:
माझा एक मावस भाऊ अजित दादा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या बारामतीच्या घरी बंदोबस्ताला होता. दादा येणार आहेत म्हंटल्यावर इतकी शांतता असायची की घरातील लहान मुले सुद्धा वुई का चुई नाही करायचे.
आणखी एक अनुभव-
एका मित्राबरोबर, आरोग्य खात्यात असणाऱ्या त्याच्या पत्नीचे स्व जिल्यात बदलीच्या कामा निमित अजित दादा ना भेटायला गेलो होतो. बोलत असताना सुनेत्रा ताईंचा फोन आला-
ताई तिकडून- आई (दादांची) आणि मी माझ्या आजोळाला आलो आहे.
दादा: होय..कधी?
ताई- २ दिवस झाले
दादा- च्यायला मग आज सांगतेय वोय
ताई- अहो २ दिवस झाले तुम्हाला फोन करतेय तुम्ही उचलेच नाहीत
दादा (PA ला- लका सगळे फोन उचलतो आणि माझ्या बायकोचाच फोन कट करतो वय र! )- बरं ठेवतो फोन, इथे एकाच्या बायकोची त्याच्या घरा शेजारी बदली करायची आहे.
मित्र गोरोमोरा झाला होता. (पण दादांनी लगेच संबंधित खात्या मध्ये फोन करून नियमात बसत असेल तर बदलीचे आदेश काढायला सांगितले होते.)
आता असेल दादांना बराच वेळ कुटुंब सोबत वेळ घालवण्यासाठी...
17 Nov 2016 - 2:45 pm | इरसाल
पण ते दादा ताई म्हणजे भाउ बहिण आहेत का ?
17 Nov 2016 - 3:11 pm | विशुमित
ताई ऐवजी वहिनी वाचावे ...
संपादित करता येईल का प्रतिसाद?
17 Nov 2016 - 1:56 pm | jp_pankaj
ज्यावर घटनेवर सगळी बोधकथा बेतली आहे,ती माऊली म्हणत असेल...
"पुत्र झाला ऐसा गुंडा, ..."
17 Nov 2016 - 5:30 pm | यशोधरा
कथेचे सार ते हेच की काय?