रोजचा पेपर
कुठले कुठले लेख
पुस्तकं
मॅगझीनस्
ईंटरनेटवरचं मटेरीअल
सग्गळं आपल्याला झेपणा-या परीघात
.
.
.
काढ टिपणं
मार स्टॅटस् तोंडावर
फेसबुक वर नोटस्
व्हाॅटस् अप वर पोस्टस्
लिहीता येतंय, लिहीता येतंय
लाव धडाका
.
.
मिळेल त्यावर टीका
सेफ टार्गेटस् शोधायची
कॅबीनेट मिनिस्टर्स वगैरे
नगरसेवक डेंजर, येऊन मारू शकतो
किंवा हवेत बाण सोडायचे
समाज-बिमाज, शिक्षण व्यवस्था, पोलिस वगैरे
गेला बाजार जुने दिवस, बालभारती, संस्कृती
अगदीच काही नाही सुचलं तर
बळीराजाची कैफियत, सैनिकाचे बलिदान
जय जवान, जय किसान
कोरडे उमाळे तिच्यायला....पण
हमखास हिट
.
.
.
हिरीरी महत्त्वाची
कुंपणावर बसायचं
पटकन उडी मारता येते,
कुठेही.
मेगाबायटी लिहायचं
काॅपी पेस्ट तर काॅपी पेस्ट
दुवे पेरायचे दणकून
हायपरलिंकांच्या पिंका
बरं असतं ते
.
.
.
अस्वस्थता वाटली पाहिजे
तीन दिवस गॅप पडली तर
कीबोर्ड घ्यायचा ओढून
सुचतंच काहीतरी
ललित, मुक्तक, कथा, लघुकथा
निबंध, विडंबन, अनुवाद, परीक्षण
कविता, गझल, चारोळी, रूबाई
काहीही....अगदी काहीही चालेल
शेवटी काय
.......आपली मळमळ निघाल्याशी कारण
प्रतिक्रिया
10 Nov 2016 - 10:45 pm | सतिश गावडे
=))
10 Nov 2016 - 11:01 pm | यशोधरा
भारी.
10 Nov 2016 - 11:22 pm | संदीप डांगे
क्या बात!
11 Nov 2016 - 12:08 am | कवितानागेश
ब्येष्ट!
11 Nov 2016 - 8:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
लैच खणखणीत
11 Nov 2016 - 8:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
लैच खणखणीत
11 Nov 2016 - 9:12 am | मराठमोळा
रिअल वर्चुअअॅलीटी.. :)
11 Nov 2016 - 11:37 am | प्राची अश्विनी
क्रेक्ट.
11 Nov 2016 - 3:41 pm | गिरिजा देशपांडे
मस्त.
12 Nov 2016 - 9:59 am | नाखु
ह्ये , जब्राट
1 Dec 2016 - 1:11 am | सुज्ञ
मस्त
1 Dec 2016 - 5:28 am | टवाळ कार्टा
खी खी खी