ब्लॉग दुवा
शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान
ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच.
आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो. शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे योगेश जाधव, राहुल राऊत, संतोष शिगवण यांनी या गीतासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.
सुधारित लिंक - आता फाईल ओपन व्हायला हवी
शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत
गीत : अपूर्व जयंत ओक
गायक : नंदेश विट्ठल उमप
संगीत : राहुल रमेश राऊत आणि योगेश जाधव
रुद्राचा अवतार हा शिवरुद्राचा अवतार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
गणरायाच्या कृपेने होते सारे साकार
शिवशंभूची शक्ती करते ह्रदयांवर संस्कार
ऐका ही ललकार ही तरुणाईची ललकार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
नाही जोश वरवरचा हा खेळ नसे फक्त
या धमन्यांतून वाहते शिवभक्ताचे रक्त
गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
आमची निष्ठा आमची श्रद्धा आमचे शिवरुद्र
तुमचे कौतुक तुमच्या टाळ्या तुमचे शिवरुद्र
तालाची ही भाषा बोलणारे शिवरुद्र
मानाची ओळख आम्हा देणारे शिवरुद्र
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आम्ही वारसदार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
याच प्रकल्पासाठी एक आणखी काव्य लिहिलं होतं जे आता सार्वजनिक करायला हरकत नाही. अधोरेखित अक्षरांवर ठेका धरावा
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 3:28 pm | आनन्दा
गीत कुठाय?
9 Nov 2016 - 3:29 pm | वेल्लाभट
ऑडीयो लिंक आहे ना
9 Nov 2016 - 3:50 pm | सत्याचे प्रयोग
ऑडीयो लिंक उघडत नाही
9 Nov 2016 - 4:28 pm | वेल्लाभट
साईन इन केलं नसेल गूगलला तर ते करून बघा. होईल डाउनलोड.
9 Nov 2016 - 4:09 pm | संदीप डांगे
ऐकलं, खूप जबरदस्त!
9 Nov 2016 - 4:36 pm | नाखु
उमप म्हणजे तेच ना देवा तुझ्या गाभार्याला उंबराच नाही वाले ? का दुसरे कुठले?
9 Nov 2016 - 4:39 pm | वेल्लाभट
ते बहुदा आदर्श शिंदे
9 Nov 2016 - 7:29 pm | खटपट्या
नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ अख्यानवाले विठ्ठल उमप यांचे सुपुत्र.
वेल्लाभट यांचे अभीनंदन.
ऑडीयो लींक न उघडल्यामुळे गाणे अजून ऐकु शकलो नाही.
9 Nov 2016 - 7:42 pm | वेल्लाभट
आता बघा. लिंक बदलली आहे.
9 Nov 2016 - 8:10 pm | खटपट्या
हो आता ऐकू येतेय.
कोणत्याही चित्रपटात खपून जाइल असे झालेय गाणे.
9 Nov 2016 - 4:20 pm | पद्मावति
जबरदस्त! गीत, गायन, संगीत सगळंच टॉपनॉच.
9 Nov 2016 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरा, मजा आली. अभिनंदन ओ सेठ तुमचं.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2016 - 5:09 pm | पाटीलभाऊ
मजा आली. छान गीत.
9 Nov 2016 - 5:31 pm | किसन शिंदे
मला कसं सापडत नाहीये. ती लिंक सकाळपासून दोनदा उघडून पाह्यली
9 Nov 2016 - 7:43 pm | वेल्लाभट
आता बघा. लिंक बदलली आहे.
9 Nov 2016 - 5:56 pm | पैसा
मस्त जमलय! शब्द पण टाक ना इथे!
9 Nov 2016 - 6:41 pm | चांदणे संदीप
जबरदस्त रचना! सर्व सहभागी ढोल-ताशा वादकांना स्फूर्ती देत असेल यात शंकाच नाही!
...इथे येऊन जरासा अडखळलो.
क्रिटिसाईज करत नाहीये पण, म्हणजे बघा, हे शब्द इतके मनात रुतून बसलेत, आदरणीय कुसुमाग्रजांच्या "गर्जा जयजयकार क्रांतिचा" या कवितेचे शीर्षक व ध्रुवपद असलेले हे शब्द अगदी उसने आणल्यासारखे वाटले!
बाकी, ती ऑडिओ लिंक अजून ऐकायला मिळाली नाहीये पण ऐकायला नक्कीच आवडेल!
आणि,
याबद्दल अभिनंदन!
Sandy
9 Nov 2016 - 7:43 pm | वेल्लाभट
सर्वात आधी
सूचनेचा स्वीकार करतो. भविष्यात नक्कीच हे टाळण्याचा प्रयत्न करेन.
आणि तुमच्या कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद. :)
आता लिंक बदलली आहे. उघडेल आता फाईल.
9 Nov 2016 - 6:51 pm | वेल्लाभट
डांगेसाहेब, पद्मावतिताई, नाखु, प्राडॉ, पाटीलभाऊ, किसन, पैताई
सगळ्यांचे अनेक आभार :)
9 Nov 2016 - 7:29 pm | खटपट्या
शिवरुद्रचा लोगो जबरा जमलाय
9 Nov 2016 - 9:39 pm | मोदक
गीत झकास.. एकदम भारी..!!!
फक्त ताशांचा कडकडाट जरा जोरात हवा होता, किंवा कदाचित सगळे एकदम बरोबर असेल पण ढोल ताशा पथकाचे गीत असल्याने मला ढोल ताशांचा भारदस्त आवाज अपेक्षित असल्याने असे मत झाले असावे.
10 Nov 2016 - 8:34 am | वेल्लाभट
अॅग्रीड
10 Nov 2016 - 7:17 am | स्रुजा
वाह वाह ! वेल्लाभट, अभिनंदन !
10 Nov 2016 - 8:34 am | वेल्लाभट
स्रुजा मोदक खटपट्या
मनापासून आभार!
10 Nov 2016 - 9:42 am | प्रीत-मोहर
आवडेश!!!