प्रेम....?

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
7 Nov 2016 - 6:40 pm

भेटत....ती पण नाही,
भेटत....मी पण नाही...
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवणे मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही...
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे...
समजत...ती पण नाही,
रागवत... मी पण नाही...
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत... ती पण नाही...
थांबत... मी पण नाही...
जेंव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी...
ऐकत... ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत.. ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...!

विराणीरेखाटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

7 Nov 2016 - 6:46 pm | मराठी कथालेखक

वा वा ..छान.
मला हे गाणे आठवले (बघ पुन्हा एकदा तुझी तुलना जावेद अख्तरशी :)
ये बता दे मुझे जिंदगी
प्यार की राह के हमसफ़र
किस तरह बन गए अजनबी
ये बता दे मुझे जिंदगी...
फूल क्यों सारे मुरझा गए
किस लिए बुझ गयी ये चांदनी
ये बता दे मुझे जिंदगी..

कल जो बाहों में थी
और निगाहों में थी
अब वो गर्मी कहा खो गयी
न वो अंदाज है
न वो आवाज है
अब वो नरमी कहा खो गयी
ये बता दे मुझे जिंदगी...

बेवफा हम नहीं
बेवफा तुम नहीं
फिर वो जज्बात क्यों सो गए
प्यार तुमको भी है
प्यार हमको भी है
फासले फिर क्यों ये हो गए

ये बता दे मुझे जिंदगी...

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 6:49 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद :)

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2016 - 6:52 pm | प्राची अश्विनी

ही कविता या आधी वाचलीय. गुगललं तर खूप ठिकाणी दिसते. तुम्ही लिहिली का?

मी लिहिलेली आहे पण मी १०१३ मध्ये fb वर टाकली होती तेंव्हा व्हायरल झाली असेल

यशोधरा's picture

7 Nov 2016 - 7:13 pm | यशोधरा

१०१३?

१०१३ मध्ये एफबीवर टाकली होती का? अच्छा. तरीच व्हायरल झाली असावी. बादवे, तेव्हा तुम्ही कितवीला होतात?

सरळ पास होत आल्या असतील तर तेव्हा नववीत असणार. नववीत अशी प्रेमकविता लिहिल्यानंतर घरी नक्कीच महाभारत होणार. किंवा मग बारावीत यायला काही जास्त वेळ लागू शकतो.

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 4:32 pm | मराठी कथालेखक

हरकत नाही...तेच तर वय असतं प्रेम करण्याचं :)

पैसा's picture

9 Nov 2016 - 9:39 pm | पैसा

णववीत असताणा हे प्रेम करायचे वय?????

अन्नू's picture

10 Nov 2016 - 1:19 pm | अन्नू

=)) =)) =))
बिचार्‍या असं वाचून गोंधळल्या असतील ना!

मराठी कथालेखक's picture

12 Nov 2016 - 12:51 pm | मराठी कथालेखक

म्हणजे मुद्दाम प्रेम केलंच पाहिजे असं नाही पण त्या वयात अनेकदा होतं..निदान आकर्षणाची भावना तरी अगदी पराकोटीची असते.

पैसा's picture

12 Nov 2016 - 2:11 pm | पैसा

मी नववीत असताना काय करत होते आता आठवतेय. शाळेत मुलगे ही दुय्यम जमात समजत असायचो आम्ही. घरी भाऊ आणि त्याचे मित्र, शेजारची मुले सगळे मिळून क्रिकेट, लगोरी, गोट्या, विटीदांडू, पत्ते इ. खेळ खेळत असायचो. तेव्हा प्रेम बिम कशाशी खातात हेच माहीत नव्हते.

मी एक भयंकर मोठा जोक केला होता. ड्रॉइंगच्या तासाला सरांनी ट्रे चं चित्र काढायला सांगितलं. बॉर्डरचे डिझाईन काढायचे होते तेव्हा मी पेपरमधे नुकतेच पाहिलेले बदामातून आरपार गेलेल्या बाणाचे चित्र रिपीट करून बॉर्डर काढली होती. त्यावर ड्रॉइंगचे सर खुर्चीतून खाली पडून हसले होते. मात्र मी ते त्याचा अर्थ माहीत नसताना काढले आहे हे सरांना समजले त्यामुळे त्यांनी बरे मार्क्स दिले होते.

दुसरा किस्सा याहून वाईट आहे. बारावीत असताना एका मैत्रिणीला तिच्या बॉयफ्रेंडने लिहिलेले शोन्या वगैरे भाषेतले पत्र वहीतून माझ्या हाताला लागले आणि शाळेच्या लायब्ररीतच हे काय आहे हे लक्षात न येता मी त्याचे जाहीर वाचन केले होते. मात्र पत्र वाचून संपेपर्यंत मला त्याचा अर्थ समजला कारण तोपर्यंत मी ३ वर्षानी मोठी झाले होते. ती मैत्रीण फारच गोड आहे त्यामुळे मला माफ करून टाकले. तिचे त्या मुलाशी नंतर लग्नही झाले त्यामुळे नंतर सगळेच किस्सा या सदरात जमा झाले. पण मी जाहीर पत्रवाचन केल्यामुळे जर का तिच्या घरी कुठून कळले असते तर माझी शंभरी भरली असती.

प्राची अश्विनी's picture

13 Nov 2016 - 10:13 am | प्राची अश्विनी

:):)

मारवा's picture

13 Nov 2016 - 11:10 pm | मारवा

किती निरागस होती पुर्वीची मुले मुलीँ किती उशीरा प्रेमा बिमात कीवा थेट लग्ना नंतरच प्रेमात पडायची

मारवा's picture

13 Nov 2016 - 11:10 pm | मारवा

किती निरागस होती पुर्वीची मुले मुलीँ किती उशीरा प्रेमा बिमात कीवा थेट लग्ना नंतरच प्रेमात पडायची

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 3:31 pm | मराठी कथालेखक

मला सातवीत एक मुलगी आवडायची.. एका मित्राची सहावीत असलेली बहीण. पण ते आकर्षण थोडंच टिकलं.
आठवीपासून वर्गातली एक मुलगी आवडायची ..हळू हळू म्हणजे नववी-दहावीपर्यंत तिच्या प्रेमातच पडलो याची खात्री झाली. ..हे एकतर्फी प्रेम बरीच वर्षे टिकलं (पूढे वाटा वेगळ्या होवूनही).. इतर आकर्षणं वाटत राहिलीत पण तरी हे प्रेम मनात अनेक वर्षे होतं

पैसा's picture

15 Nov 2016 - 3:43 pm | पैसा

व्यक्ती तितक्या प्रकृती! तुम्ही फारच प्रेमळ दिसता बा!

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 3:46 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद:)
पण एकतर्फी प्रेमाचा मनाला त्रासच होतो... असे असताना अभ्यासावरचे लक्ष उडू न देणे, परीक्षेत चांगले गुण मिळवणे म्हणजे स्वतःचा कस लागतो.
असो... गेले ते दिवस ..राहिल्या त्या आठवणी

पैसा's picture

15 Nov 2016 - 4:27 pm | पैसा

कविता तशी चांगलीच आहे ओ. मी जरा टैमपास करत होते. पण आईशप्पत नववीत असताना मी खरोखरच प्रेमनिरक्षर होते. त्यामुळे हा अभ्यासाकडे दुर्लक्ष वैग्रे प्रॉब्लेम आला नाही कधी! दुसरे म्हणजे नववीतल्याच काय, जे लोक शिकत आहेत त्यानी आपल्या अभ्यासावर काहीही करून लक्ष केंद्रित करावे असं मला आपलं वाटतं. प्रेमात पडून नापास झाला समजा, किंवा मग शिक्षण अर्धं सोडून लग्न्/संसार असले काही केलं तर नुकसान कोणाचं शेवट?

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 4:54 pm | मराठी कथालेखक

पण आईशप्पत नववीत असताना मी खरोखरच प्रेमनिरक्षर होते

चांगलंच आहे.

प्रेमात पडून नापास झाला समजा, किंवा मग शिक्षण अर्धं सोडून लग्न्/संसार असले काही केलं तर नुकसान कोणाचं शेवट?

खरी गोष्ट आहे.. आणि अभ्यास करुन परीक्षेत यश मिळवणं कठीण नाहीच.. प्रेमात यशस्वी होण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागतो हे मात्र कधीच कळलं नाही...

बाडिस. आमचं बालवाडीपरेम होल मिपाफ्येमस हाय. ;-) णववी तर लय लांब र्हायली! ख्यिक! तवर फकस्त एकं-दोनं शिकवायचे. त्यामुळं कोटीपर्यंत अजून ग्येलो नव्हतू नायतर पराकोटीचं हुतं का नाय त्ये सांगता येनं आवघड हाय!

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 3:38 pm | मराठी कथालेखक

त्यामुळं कोटीपर्यंत अजून ग्येलो नव्हतू नायतर पराकोटीचं हुतं का नाय त्ये सांगता येनं आवघड हाय!

:)
मी वाचालेलं नाही... लिंक द्याल काय ?

ग्रेंजर's picture

9 Nov 2016 - 5:00 pm | ग्रेंजर

:)

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 7:17 pm | Bhagyashri sati...

आणि हो सकाळ ह्या दैनिकात सुध्दा मी ही कविता प्रसिद्ध केली होती, म्हणून ही कविता जर गुगल वर असेल तर त्यात काही नवल नाही, आणि तरीही तुम्हाला विश्वास नसेल तर तुमची ईच्छा !

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 7:20 pm | Bhagyashri sati...

हे पहा विश्वास नसेल तर तो तुमच्या जवळ ठेवा, कारण ती कविता मी लिहिलेली आह एवढ मला माहिती आहे, आणि असल्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही

संदीप डांगे's picture

7 Nov 2016 - 7:27 pm | संदीप डांगे

याही प्रतिसादाची गरज नव्हती..

किसन शिंदे's picture

7 Nov 2016 - 11:16 pm | किसन शिंदे

डांगेण्णा, खरं तर या ही उपप्रतिसादाची गरज नव्हती.=))

भावनाओं को समझो. ;)

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 2:36 pm | संदीप डांगे

ब्वॉर्र! =))

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 7:34 pm | Bhagyashri sati...

का गरज नव्हती,माझी कविता असल्यावर मी का ऐकुन घ्यायचं कुणिही काहीही म्हणेल,मग काय सर्व ऐकुन घ्यायच का तुम्ही ऐकुन घ्याल का ?

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2016 - 10:58 pm | प्राची अश्विनी

कविता आवडली. आणि रागावू नका. ज्या अर्थी इतक्या जणांनी copy केली त्या अर्थी खरंच छान आहे.

बरोबर आहे तुमचे... संदीप डांगे माझ्या लिखाणावर तर प्रतिसाद पण देत नाहीत. :(

पैसा's picture

9 Nov 2016 - 9:53 pm | पैसा

प्रतिसाद तो पण देत नाही
उपप्रतिसाद मीही देत नाही
फाट्यावर मारणे त्याला जमत नाही
दुर्लक्ष करणे मला पटत नाही.

ग्रेंजर's picture

12 Nov 2016 - 1:41 pm | ग्रेंजर

भारीच :)

संजय पाटिल's picture

14 Nov 2016 - 10:25 am | संजय पाटिल

=))

विखि's picture

7 Nov 2016 - 8:07 pm | विखि

काहीही असो, आप्ल्याला तर आवडली कवीता

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 8:16 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद

कवि मानव's picture

8 Nov 2016 - 2:33 pm | कवि मानव

मला कवितेची मांडणी आवडली !!

नाखु's picture

8 Nov 2016 - 3:39 pm | नाखु

या कवितेमधले नाही हे क्रियापद फार फार आवडले.

मी मिपा उघडले नाही.
मी कविता वाचली नाही.
मी अभ्यास केला नाही.
मी प्रतिसाद दिलाच नाही.
मी काहीच वाचले नाही.
आणि तरिही वाचलोही नाही.

रा रा आत्मुदा संपादीत "नाही (म्हणू) सरसावून बाही" या आगामी चारोळी संग्रहातून साभार

थोडे माफ करा शब्दांशी खेळुन बघतो.
शेंगा मी खाल्याच नाही.
टरफले कुणी टाकली मजला ठाऊकच नाही.
उचलण्याचा प्रश्नच नाही
मी स्वाभिमानशुन्य नाही.
विडंबनाची खाज आहे केवळ दुसरा हेतु नाही.
मिसळ खावुन थोडा बहकलो तरी
मी तसा माणुस वाईट नाही.
गोड मानुन घ्या प्रतिसाद माझा
मी असा असलो तरी तसा नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Nov 2016 - 4:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Nov 2016 - 4:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर

भाजप आणि शिवसेना यांचावर आहे का हि कविता?

सस्नेह's picture

8 Nov 2016 - 6:43 pm | सस्नेह

=))

ग्रेंजर's picture

9 Nov 2016 - 4:59 pm | ग्रेंजर

ह्म्म्म, whats app वर हीच कविता खाली भाजप - शिवसेना असं लिहून आलेली वाचल्याचं आठवतंय, निवडणूक निकालानंतर :)

सच६४८६'s picture

8 Nov 2016 - 4:33 pm | सच६४८६

पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर....

वा वा ...खूपच सुंदर...
कोणाचीतरी आठवण आली...
एका क्षणासाठी तो चेहरा डोळ्यात तरळून गेला
आणि आसवासंगे विरूनही गेला...

सस्नेह's picture

8 Nov 2016 - 6:47 pm | सस्नेह

हे उगाचच आठवले,
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी..

सिरुसेरि's picture

8 Nov 2016 - 7:06 pm | सिरुसेरि

छान कविता . हे तलत मेहमुदचे गाणे आठवले .

"हमसे आया ना गया
तुमसे बुलाया ना गया
फासला प्यारका
दोनोंसे मिटाया ना गया "

जव्हेरगंज's picture

8 Nov 2016 - 7:49 pm | जव्हेरगंज

चांगली कविता!!!

अनुप ढेरे's picture

9 Nov 2016 - 5:10 pm | अनुप ढेरे

छान आहे कविता !

पाटीलभाऊ's picture

9 Nov 2016 - 5:17 pm | पाटीलभाऊ

चांगली कविता

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2016 - 7:47 pm | ज्योति अळवणी

वाचली आहे कविता अगोदर. आज कवयित्री कोण ते कळलं. खूप सुंदर आहे कविता. खूप आवडली. तुमच्यापर्यंत आवडलेली भावना पोहोचवता आली याचा आनंद आहे

हृषीकेश पालोदकर's picture

13 Nov 2016 - 11:37 am | हृषीकेश पालोदकर

चांगली कविता

राम राम मिपा's picture

15 Nov 2016 - 5:15 pm | राम राम मिपा

मस्तच !
<< पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत.. ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...! >>>

Bhagyashri satish vasane's picture

16 Nov 2016 - 8:16 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद :)