७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग

मोदक's picture
मोदक in भटकंती
6 Nov 2016 - 2:47 pm

************************

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

भाग ५ - रोहतांग आणि केलाँग

भाग ६ - केलाँग ते कारू

भाग ७ - लेह शहर आणि BRO

भाग ८ - पँगाँग लेक

भाग ९ - खार्दुंगला पास

भाग १० - कारगिल वॉर मेमोरीयल

************************

कारगिल वॉर मेमोरियल बघून दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि श्रीनगरकडे कूच केले. सकाळी सकाळी निघाल्यामुळे फारसे ट्रॅफिक नव्हतेच.

लगेचच २५ किमी अंतरावर या कंट्रोल पॉईंटला पोहोचलो.

.

झोजिला खिंडीत स्वागत.. संपूर्ण ट्रीप दरम्यान मनरावशी बोलणे सुरू होतेच, त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली "रोहतांग पास आपण डोंगराच्या बाजूने पार करतो तर झोजिला दरीच्या बाजूने.. त्यामुळे समोरून आर्मीचे ट्रक आलेच तर आपण डोंगरच्या बाजूला नीट जागा बघून थांबायचे आणि ट्रकला पास होवून द्यायचे." आम्हाला हा प्रकार करावा लागला नाही कारण आंम्हाला आश्चर्यकारकरीत्या समोरून फारसे ट्रॅफिक लागलेच नाही.

.

झोजिलाचा रस्ता खराब आहे हे माहिती होतेच आणि रोहतांग पास मार्गे खराब रस्ता अनुभवल्याने आता कोणताही खराब रस्ता पार करण्याची तयारी होती.

खराब रस्ता + ट्रकचे ट्रॅफिक + मेंढरे..

.

झोजिलाच्या आणखी काही छटा...

.

.

लाईनने येणारे ट्रक..

.

झोजिलाच्या धुळीत आमची अशी अवस्था झाली होती.

.

श्रीनगरच्या रस्त्यावर वाटेत एका ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक लागले, अक्षरशः गाड्या जागेवर लावून इकडे तिकडे चक्कर मारून यावे इतका वेळ लागला. तेथून कसेबसे पुढे आलो, वाटेत एक "हजरतबल" नावाचा फाटा दिसला.

.

श्रीनगरला पोहोचलो. चंदिगडच्या सरदारने हॉटेलवाल्याचा पत्ता दिला होताच, तेथे चेक इन केले, मुख्य म्हणजे रेनकोट धुतले आणि गाड्यांना विश्रांती देवून रिक्षाने फिरायला बाहेर पडलो.

दल लेक.

.

दल लेकमध्ये शिकार्‍यात बसून फेर्‍या मारताना विक्रेते येवून ना ना तर्‍हेच्या वस्तू, फोटो वगैरे विकत होते. येथे खरेदी करताना बारगेनिंग करावेच लागते.

तेथेच एका शिकार्‍यामध्ये चिकन, मटण आणि फिश कबाब खाल्ले. दल लेक नंतर एक दोन उद्याने आणि चश्मेशाही वगैरे ठिकाणांना भेटी दिल्या.

.

.

*******************************

दुसर्‍या दिवशी श्रीनगरहून निघालो.

या रस्त्यावर अक्षरशः प्रत्येक १०० / २०० मीटरवर एक पेट्रोलींग पार्टी दिसत होती आणि त्यांच्याकडे मेटल डिटेक्टर आणि वेगवेगळे स्निफर डॉग दिसत होते. आम्ही नाश्ता करायला थांबलो तेथे सुद्धा हॉटेलच्या गच्चीवरून पहारा सुरू होता.

.

यथावकाश जवाहर टनेल पाशी पोहोचलो. मी लगेच गाडी बाजूला घेवून क्लिकक्लिकाट सुरू केला. नंतर लक्षात आले की तेथे फोटोग्राफी प्रोहिबिटेडचा बोर्ड होता. कोणीही हटकायला आले नाही. मग मुकाट कॅमेरा खिशात घातला आणि गाडीला स्टार्टर मारला.

जवाहर टनेल.

.

फोटोग्राफी प्रोहिबिटेड. (जवाहर टनेलचे अनेक फोटो जालावर उपलब्ध आहेत, म्हणून इथे टाकले आहेत. तरीही कोणाला हरकत असल्यास फोटो येथून काढून टाकण्यास हरकत नाही)

.

वाटेत एका ठिकाणी लहानसे मंदिरासारखे स्ट्रक्चर उभे केले होते. जवळ जाऊन पाहिले तर हे दिसले. __/\__

.

हा असा नजारा जागोजागी दिसत होता.

.

.

आर्मीचे ट्रकही होतेच..!

.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी गावांमध्ये असे प्रकार बघायला मिळाले. बहुदा प्रचंड थंडीमुळे एकत्र बसून शेकोटी करता यावी असे काहीसे असावे.

.

जम्मू काश्मीरातले एकंदर अतिशय उद्धट ट्रॅफिक आणि वळणावळणाचे सिंगल रोड यांमुळे आजचा प्रवास थकवणारा झाला. आजच्या प्रवासात दोन अविस्मरणीय गोष्टी अनुभवल्या..

एके ठिकाणी रस्त्याशेजारी पाटी बघितली "रफ्तारका शौक है तो पी टी उषा बनो"

नंतर पटनीटॉपजवळ आम्ही थांबून टीपी करत असताना अचानक समोरून एक बुलेट येवून थांबली.

विशाल नामक एक युवक एकटाच दिल्लीहून निघाला होता आणि लेह ला चालला होता. हेल्मेट नाही, फॉर्मल ड्रेस आणि फारसे सामानही सोबत नाही. बराच वेळ हिंदीतून गप्पा झाल्यावर त्याने बाँब फोडला...

वैसे मे पूना से हूं.. औंध में रहता हूं..

आम्ही मग शुद्ध मराठीवर येवून MH12 च्या नंबरप्लेट दाखवल्या आणि आम्ही पण पुण्याचे आहोत हे सांगितले. त्याला पुढील प्रवासाची इत्यंभूत माहिती देवून आम्ही पुढे निघालो.. रात्री अमृतसरला पोहोचलो.

*********************************************

सकाळी लवकर जाग आली आणि फारसा थकवा जाणवत नव्हता मग मी एकटाच उठलो आणि अमृतसर फिरायला बाहेर पडलो.

बाहेर पडल्या पडल्या एक लस्सीचा ठेला बघितला आणि मोठा ग्लास लस्सी रिचवली.

.

येथेही एक मजा. त्या ठेलेवाल्याजवळ त्याचाच एक मित्र असावा असा माणूस उभा होता. दोघेही पगडीवाले सरदार. गाडीची नंबरप्लेट बघून गप्पा सुरू झाल्या. नेहमीचे प्रश्न झाले, मग लदाख-कारगिलवरून आलो म्हटल्यावर आणखी विषय निघाले आणि गप्पा रंगल्या..
मी लस्सी संपवून निघालो तेंव्हा ठेलेवाल्या शेजारी उभा असलेला सरदार मला पैसे देऊ देईना.

"पैसे किस बात कें..? आप जाओ जी.. चिंता मत करो"

मी गोंधळून एकदा त्याच्याकडे बघतो आहे आणि ठेलेवाल्यकडे बघतो आहे.. तर परत हा बाबाजी तेच सांगू लागला.

"आप मेहमान लोग हैं, पैसे का इतना क्या.. हम देख लेंगे जी..!!"

या भानगडीत तो ठेलेवाला काहीच बोलत नव्हता.. मग मीही त्या सरदारला १० वेळा धन्यवाद देत देत हट्टाला पेटून ठेलेवाल्याला पैसे काढून दिले आणि निघालो.

सरदारांची मेहमाननवाजी ऐकली होती, आज त्याची एक झलक अनुभवली. नंतरच्या प्रवासातही.. एक दोन ठिकाणी साधा रस्ता विचारायला थांबलो की पत्ता सांगणारे लोक अगदी आग्रहाने "चलो चाय नाश्ता करो" असा हुकूम सोडायचे.

अमृतसरच्या रस्त्यांवर लिची ची रेलचेल होती.

.

पुन्हा हॉटेलवर आलो, विजय आणि रोहितचे आवरले होते. मग गाड्यांना एका ठिकाणी वॉशींग + पॉलीश करायला दिले आणि रिक्शाने भटकत भटकत सुवर्ण मंदिरात आलो.

मंदिराच्या आवारात प्रवेश केला

.

दर्शनाला प्रचंड गर्दी असल्याने आंत जाण्याचा फारसा उत्साह नव्हता. मिपावरच एके ठिकाणी कधीतरी वाचले होते की सुवर्ण मंदिराच्या आवारात एक म्युझीयम आहे आणि तेथे जर्नेलसिंग भिंद्रनवाले वगैरे प्रभृतींचे फोटो "शहीद" करार देवून मोठ्या आदराने लावले आहेत. यथावकाश ते म्युझीयम पाहिले आणि फोटोही सापडले. (तेथे फोटो काढायला बंदी होती - हा फोटो अंतर्जालावरून घेतला आहे)

.

तेथे फक्त भिंद्रनवालेच नव्हे तर शाबेग सिंग, सतवंत सिंग, बियंत सिंग यांचेही फोटो लावले होते. पुढील लढाईची तयारी असावे अशा प्रकारचे बांधकामही सुरू होते. सुवर्ण मंदिराबद्दल इतकेच, लगेचच तेथून बाहेर पडलो. एका ठिकाणी तांब्याचे मोठाले कॉफी मग मिळाले. ते घेवून जालियनवाला बाग कडे कूच केले.

.

.

.

इंडियन ऑईलची ज्योत तेथेही होते

.

.

जालियनवाला बाग स्मारक.

.

.

एके ठिकाणी असे मोठ्या आकारात "वन्दे मातरम" कोरले होते.

.

गोळ्या लागलेल्या भिंती जपून ठेवल्या होत्या.

.

.

.

तेथे असे अनेक झाडांचे सैनीक केले होते आणि त्यांच्या बंदुका स्मारकाच्या दिशेने रोखलेल्या दाखवल्या आहेत.

.

.

.

भव्य आणि उंच स्मारकाचे कोणत्याही ठिकाणाहून दर्शन होत होते.

.

जालियनवाला बाग म्युझीयम मध्ये एक भव्य तैलचित्र होते. ते चित्र एका फ्रेममध्ये बसलेच नाही इतके मोठे होते आणि तेथे प्रचंड गर्दी होती.

.

शहीदी कुआं

.

.

शहीदी कुआं पासून दिसणारे स्मारक..

.

दुपारी वाघा बॉर्डरकडे कूच केले...

.

पाकिस्तान - नेक्स्ट स्टेप..

.

.

येथे एक घोळ झाला. आम्ही त्या संकुलात प्रवेश करणार इतक्यात तेथील जवानांनी प्रवेश बंद केला आणि अक्षरशः ५ फुटांच्या अंतराने आम्हाला प्रवेश नाकारला गेला. तेथे बांधकाम सुरू होते त्यामुळे प्रेक्षकांची संख्या मर्यादीत ठेवली जात होती. येथे परत कधीतरी येवू असा विचार करून आम्ही परत फिरलो.

हाताशी वेळ होता म्हणून अटारी स्टेशनकडे मोर्चा वळवला.

अटारी स्टेशन.

.

येथे रेल्वेचे वेळापत्रक लावले होते.

.

प्लॅटफॉर्म..

.

रात्री सुवर्णमंदिराजवळ एका झकास ठिकाणी जेवण हादडले आणि सकाळी लवकर निघायचे असल्याने रात्रीच बॅगा आवरून झोपलो.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

6 Nov 2016 - 5:02 pm | प्रशांत

मोदकराव हा ही भाग आवडाला

निओ१'s picture

7 Nov 2016 - 12:41 am | निओ१

अप्रतिम.
शब्द नाही आहेत काही लिहण्यासाठी माझ्याकडे आज.

पद्मावति's picture

7 Nov 2016 - 1:20 am | पद्मावति

अगदी, अगदी....हेच म्हणायचे आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Nov 2016 - 1:01 am | लॉरी टांगटूंगकर

एक नंबर मोदकपंत! झक्कास!

वरुण मोहिते's picture

7 Nov 2016 - 2:06 pm | वरुण मोहिते

सगळं पाहिलं आहे पण मी विचार करत होतो कारण सुवर्ण मंदिराच्या इथे जेवण जबरदस्त मिळत कितीतरी ठिकाणी ..आलं आलं शेवटी आला ते

पी. के.'s picture

7 Nov 2016 - 2:59 pm | पी. के.

हा ही भाग आवडाला

अरिंजय's picture

7 Nov 2016 - 3:18 pm | अरिंजय

दादा, नेहमी प्रमाणे झकास

पाटीलभाऊ's picture

7 Nov 2016 - 7:49 pm | पाटीलभाऊ

नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटो

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 May 2017 - 4:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण फोटो नीट करा म्हणजे अजुन मजा येइल वाचताना