७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - लेह शहर आणि BRO

मोदक's picture
मोदक in भटकंती
2 Sep 2016 - 1:46 pm

************************

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

भाग ५ - रोहतांग आणि केलाँग

भाग ६ - केलाँग ते कारू
************************

.

.

__/\__

यथावकाश कारूमधून सकाळी निघून लेह ला पोहोचलो. बुलेट घेताना ज्या साठी घेतली आणि आयुष्यातले एक महत्वाचे लक्ष्य पूर्ण झाले होते. प्रिय भारतदेशाच्या माथ्यावरील एका महत्वाच्या ठिकाणी माझ्या लाडक्या गाडीसह पोहोचलो होतो.

अडीच तीन हजार किमी सलग प्रवास करताना,

पुणे; लोणावळा-खंडाळ्याच्या सुखद आल्हाददायक वातावरणात..
प्रेमळ गुज्जू लोकांच्या गुजरातमध्ये..
बुट व मोजे असतानाही पाय भाजून काढणार्‍या रखरखीत राजस्थानात..
"गाडी, तिच्यावर लादलेले सामान + मी" असे ३०० किलोपेक्षा जास्त वजनदार धूड काडेपेटीसारखे उडवणार्‍या वादळी हरियाणात..
मख्खन प्राठे आणि दाल मखनी सोबत पुदिना घातलेला उसाचा रस पाजणार्‍या चंदीगडमध्ये..
देवभूमीतला अप्रतीम नजारा दाखवत घाटामधून, नदीशेजारून तर लार्जीच्या खत्तरनाक बोगद्यातून शांत शीतल हिमाचल प्रदेशात..
आणि शेवटी..
बर्फाळ वातावरणातून, थंडगार पाणी अंगावर उडवून घेत आणि आर्मीच्या जवानांना भेटत भेटत एकदाचे खराब रस्त्यातून लेह ला पोहोचलो होतो..!!!!

सलग वेगाने कापलेले अंतर, खराब रस्ता, बदलते टोकाचे हवामान (आणि मी..!) किती काय काय सहन केले गाडीने.. पण एकदोनदा झालेल्या त्रासाशिवाय काहीही अडचण आली नाही.

...लेहला लाडक्या गाडीसह पोचलो..!!!!!!!!

(यात मोठेपणा काहीही नाही. भारतभरातले भरपूर लोकं हा प्रवास करतात.. मी ही त्या गटात सामील झालो इतकेच काय ते)

लेहचे प्रशस्त रस्ते,

.

एक चौक

.

लेहच्या आजुबाजूला सगळे वाळवंटी डोंगर आहेत. त्यामुळे कुठेही, कसेही पहा.. मातीचा डोंगर दिसत होताच..

.

.

प्रवेशद्वार..

.

हे बहुदा "मोती मार्केट" होते. लेहचे एक मार्केट. मला तेथे तांब्याच्या कांही वस्तू मिळाल्या आणि बोन चायनाचे तिबेटी पद्धतीचे नाजुक नक्षीकाम केलेले कप मिळाले. [ हे सगळे पुढे पुण्याला असे वागवत आणले माझे मला माहिती ;) ]

.

प्रार्थना स्थळ.. येथे लोक प्रदक्षिणा घालत हे प्रेयर व्हील फिरवत होते.

.

यल्लो नंबरप्लेटच्या दुचाक्या.

.

लेह पॅलेसवरून दिसणारे धुळीतले लेह.

.

भितीदायक प्रवेशद्वार..

.
.

लेह शहराच्या एका बाजुस झाडांचा लवलेश दिसत नव्हता तर दुसर्‍या बाजूस थोडीफार झाडी दिसत होती.

या मधल्या एका मैदानाच्या रेफरन्सने दोन्ही फोटो बघा.. (पॅनोरमा आहे पण येथे खूपच लहान दिसत आहे)

.

लेह विमानतळाकडे जाताना असे मोठे मोठे बोर्ड दिसत होते..

.

.

भारत माता की जय..!!!

.

लेहमध्ये मुक्कमाची सोय विजयच्या एका नातेवाईकांकडे; त्यांच्या दुसर्‍या घरात म्हणजेच आर्मीच्या बराकीत झाली होती. त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये सोय करण्याचा प्रयत्न केला होता पण (आमच्या सुदैवाने) ते अयशस्वी झाले.. मग पुढचे चार दिवस सैनीकांसोबत मुक्काम ठोकला. त्यांचे अनुभव ऐकत, आर्मीच्या मेसमधले जेवण आणि आर्मी स्पेशल जाड स्लिपींग बॅगमधले ते चार दिवस खास होते.

लेहमध्ये भरपूर फिरलो. "लदाखी कमीज" मिळवण्यासाठी सगळी दुकाने पालथी घातली. तिबेटीयन पद्धतीचा तो कुर्ता एका ड्रायव्हरच्या अंगावर बघितला. निळसर आकाशी रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि त्याला लहान मुलांच्या झबल्याला असतात तशी फक्त चार बटणे.. तो कुर्ता शोधत बरीच दुकाने भटकल्यानंतर एका दुकानदाराने डिट्टेल माहिती विचारली.. कुर्ता कसा होता.. त्याचा रंग कसा होता.. कुठे पाहिला वगैरे वगैरे. नंतर तो बोलता झाला.

"वो तो यहाँके टॅक्सी ड्रायव्हर का युनीफॉर्म है. आपके लिये नही है वो.."

मी : !!!! (आता काय उत्तर देणार त्याला.)

पुन्हा थोडे सावरून म्हणालो. "उसमे क्या बात है.. हमारे यहाँ किसको पता है कि वो ड्रायव्हर का युनीफॉर्म है या और क्या.."

पण ते त्याला पटले नाही. तेथेही नकार घेवून बाहेर पडलो.

बादवे.. लेहला पुरूष दुकानदार खूपच कमी, दुकानाच्या काऊंटरवर महिलांचे राज्य होते.

लेहबद्दल बरेच काही आहे लिहिण्यासारखे. भरपूर मिलीटरी आणि बाकी सगळ्या गोष्टी भरपूर महाग असलेले आणि "किती का महाग असेना.. मिळत तर आहे" असे वाटायला लावणारे दुर्गम भागातले एक मोठे टुमदार खेडेगांव आहे.

आर्मीच्या "सद्भावना" उपक्रमाचा फायदा उपटणारे लोक भेटले तसे हाटेलात जावून चहा मागवल्यावर तो आणून देणारे व नंतर "वैसे तो हम चाय बनाते नहीं हैं लेकिन आपने बोला इसलिये आपके लिये बनाई" असे म्हणून बिल न घेणारे प्रेमळ हॉटेलवाले भेटले. "आमची गाडी नो पार्किंग झोनमध्ये असूदे कारण आंम्ही टूरिस्ट आहोत" असे रस्त्यावरच्या पोलीसला ठणकवणारी एक दुकानदार बाई भेटली तसेच विजयच्या ह्योसंग अकिला ला बसणारे पार्ट शोधण्यासाठी खटपट करणारे मेकॅनीकही भेटले.

खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. __/\__

या वेगळ्या विश्वातल्या लोकांमध्ये सर्वात जास्त भावले ते BRO चे लोक..

अत्यंत खडतर वातावरणत, प्रतिकूल निसर्गाशी सामना करत, आपण आज केलेले काम उद्या शब्दशः मातीमोल होणार आहे हे माहिती असूनही तितक्याच उत्साहाने काम करण्याला वेगळेच धैर्य लागते. तिकडे याही धैर्याची कमतरता नाही. आणि त्या खडतर वातावरणातही विनोदबुद्धी व्यवस्थीत सांभाळून ठेवली आहे.

BRO चे रस्त्याच्या बाजुला असलेले वेगवेगळे संदेश बघत जाणे हा नितांतसुंदर अनुभव होता.. त्यातले काही संदेश येथे देत आहे. गूगल इमेजवर BRO असे चेक केले तर भरपूर वेगवेगळे संदेश मिळतील..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

रारंगढांग...

.

.

शेवटी सगळ्या सैनीकांना आणखी एकदा कडक्क सॅल्यूट...!!!

.

क्रमशः

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

2 Sep 2016 - 2:09 pm | सामान्य वाचक

लडाख ला जाण्यापूर्वी आणि तिथून परत आल्यावर, सैनिकांबद्दल आदरात खूप फरक पडला
हे सारे ऐकून माहित होते, पण जेंव्हा प्रत्यक्ष बघितले तेंव्हा जाणवले

Big salute to our soldiers

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 2:35 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन
बाकी त्या झबल्यासकट फोटो टाकायचा की.

प्रशांत's picture

2 Sep 2016 - 2:41 pm | प्रशांत

मस्तच

गणामास्तर's picture

2 Sep 2016 - 2:45 pm | गणामास्तर

फोटोचं बघ कि बे काय तर एकदाचं. एका तर धाग्यावरचे बघू दे कि :(

ते चिंचवड खादाडी वरचे लाळगाळू प्रतिसाद तुमचेच का..?

गणामास्तर's picture

2 Sep 2016 - 3:03 pm | गणामास्तर

नक्की कुठले प्रतिसाद आपणांस लाळगाळू वाटले ते कळवले म्हणजे सांगता येईल.
आत्ता अत्ता मला कुठल्या आयडीने कुठला प्रतिसाद दिलाय ते आठवेना (एक्सेल शीट मेंटेन करावीच म्हणतो आता)

तुंम्हास प्रतिसादाचा रोख कळाला नाही. चिंचवडच्या एखाद्या हाटेलात मटण पॅटीस उडवताना समजावून सांगेन.

बाबा योगिराज's picture

2 Sep 2016 - 2:49 pm | बाबा योगिराज

मस्त. छान सफर चालू आहे.
फोटू फारच आवडले, आणि लेह मधील लोकांचे वर्णन सुद्धा आवडले.

आपलाच
बाबा योगीराज.

एस's picture

2 Sep 2016 - 3:14 pm | एस

_/\_

लोनली प्लॅनेट's picture

2 Sep 2016 - 3:18 pm | लोनली प्लॅनेट

वाचत आहे.. सफर छान चालू आहे

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 3:39 pm | संदीप डांगे

काय हो? आज थोडक्यात आटोपले? फोटोसह कडक वॄत्तांताची सवय लागलेली, पुभाप्र.

पुढील भागापासून गाडी पुन्हा रस्त्यावर येईल..! :)

किल्लेदार's picture

2 Sep 2016 - 3:54 pm | किल्लेदार

ते भितीदायक प्रवेशद्वार सन्कर गोम्पा चे आहे काय?

ते भितीदायक प्रवेशद्वार लेह पॅलेस चे आहे. संकर गोम्पा खार्दुंगलाच्या वाटेवर आहे ना..?

किल्लेदार's picture

2 Sep 2016 - 4:32 pm | किल्लेदार

ओह ओके....हो ते खारदुन्गला च्या वाटेवर आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 4:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

आहाहा!! माझं घर :)

पाटीलभाऊ's picture

2 Sep 2016 - 7:02 pm | पाटीलभाऊ

मस्त फोटो...

अत्यंत खडतर वातावरणत, प्रतिकूल निसर्गाशी सामना करत, आपण आज केलेले काम उद्या शब्दशः मातीमोल होणार आहे हे माहिती असूनही तितक्याच उत्साहाने काम करण्याला वेगळेच धैर्य लागते.

+1111

अरिंजय's picture

2 Sep 2016 - 7:31 pm | अरिंजय

अप्रतिम फोटोज् आणि भावना छान व्यक्त केल्यात.

खटपट्या's picture

2 Sep 2016 - 9:01 pm | खटपट्या

वा छान फोटो. हा भाग एवढा रखरखीत का? थंडीमुळे झाडे उगवत नाहीत की काय ?

मोदक's picture

2 Sep 2016 - 9:10 pm | मोदक

याची कल्पना नाही.

लेह पॅलेसमध्ये एका शीलालेखात असे लिहिले आहे की "येथे जर झाडे लावली तर पाऊस पडेल व डोंगरवरची माती चिखल खाली येवून अनर्थ होईल."