लावू नका दिवे येणार
अंधाराचे दिवस मुजोर
बुलेट्प्रूफ जॅकेटात रेडी
सूर्य आणि इतर चोर.
तारे ठेवा फ्रिजमध्ये
गोठवलेल्या चंद्रावर
अंधाराची मालकी येतेय
गुरुशुक्र बंडावर
बल्ब सुद्धा विझतील असा
घनघोर अंधार वळणावर
सूर्यालाही चढवा म्हणावं
गॉगल जरा डोळ्यांवर
सूर्यावरच राज्य आलंय
लपाछुपी खेळताना
अंधार मात्र करेल भोज्जा
खिडकीमागे लपताना
गूढ्गोत्री मांडून ठेवा
अंधाराची कुंडली
सूर्याने साल्या चोरांची
मुट्कुळीच बांधली.
येणार आहे अंधार असा
ट्यूब लाईट लावा राव
सूर्यालाही दिसेनाश्या
कवींचा मी आहे बाप.
प्रतिक्रिया
22 May 2014 - 12:20 am | मुक्त विहारि
मस्त....
22 May 2014 - 8:05 pm | विवेकपटाईत
सूर्यालाही दिसेनाश्या
कवींचा मी आहे बाप.
कवीचा जागी विश्लेषक हा शब्द मस्त वाटला असता. कारण गेल्या आठवड्यात बरेच विश्लेषकांचे मते ऐकली *crazy* *drinks*
23 May 2014 - 10:52 am | इरसाल
मिपावर पुन्हा एकदा स्वागत !
मागचे काय झाले नवीन नाव एक्दम भारी हाय हां!
23 May 2014 - 11:57 am | भृशुंडी
काहितरी गफलत होते आहे, मी इथे पहिल्यांदाच सदस्यत्व घेतलंय.
2 Nov 2016 - 7:31 pm | मारवा
तुमचे जुने लेखन शोधतांना
ही कविता सापडली
जबर आहे
तुम आदमी इंटरेस्टींग हो !