मंगळ आणि शनी

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 6:28 am

५ मिनिट गटार गंगेजवळ उभे राहिले कि डोक्यावर डास वारली नृत्य करू लागतात तद्वतच माणूस जन्माला आला कि नवग्रह त्याच्या डोक्यावर फेर धरून नाचू लागतात . डोक्यावरचे डास दोन चार टाळया वाजवून पळवता येतात पण हे नव ग्रह एकदा का मानगुटीवर बसले कि मरेपर्यंत काही पिच्छा सोडावयाचे नाहीत . त्यातले मंगळ आणि शनि तर खास टेरर , म्हणजे जर कोणा हतभागी मुलीच्या कपाळी मंगळ आला की मग ती कितीही सुस्वरूप, सुस्वभावी सद्गुणी असो, ती पांढऱ्या पायाची बनुन स्वतः च्या नवऱ्याला खाणारी कैदाशीण होऊन जाते .( by the way माझ्या बायकोला कडक मंगळ आहे आणि लग्न केलेस तर दोन महिन्यात देव्बाप्पाशी appointment fix असे मला निक्षून सांगितले गेले होते, पण मरण सोडा दोन महिन्यात साधे जुलाब सुद्धा झाले नाहीत-सासरच्या नातेवाईकाकडे हादड हादड हादडून वजन मात्र वाढले- तर ते एक असो) बऱ हा मंगळ बराच स्त्री लंपट दिसतो. म्हणजे बायकांची छेड काढतो पण पुरुषांच्या फारसा वाटेला जाताना दिसत नाहि. म्हणजे मी तरी कडक मंगळाच्या जावयामुळे बायको किंवा सासरा मेल्याचे ऐकले नाही कधी . दुसरा टेरर ग्रह म्हणजे शनि. हा मात्र स्त्री पुरुष समानता मानतो असे दिसते म्हणजे आता पर्यंत तसे मला वाटत होते पण एवढ्यात शनि शिंगणापूरचा वाद झाला आणि मला कळले कि हा विशेष स्त्री द्वेष्टा आणि स्त्रियांना घाबरणारा आहे. अहो नाहीतर ज्याच्या नावाने नुसते लोक चळ चळा कापतात त्याला बायकांची कसली भीती?. आलीच एखादी शहाणी चौथर्यावर चढून तर मिनिटात डोळे काढून(तिचे) तिच्या हातावर ठेवायचे. नाहीतरी त्याची तशी खासियत आहेच म्हणे त्या गावात. पण काय आहे, बाई पाहून त्याची तारांबळ उडाली असणार, अहो डोळे काढणं सोडा आमची तर बायको कडे (स्वतःच्या सुद्धा) डोळे मोठे करून बघायची टाप नाहि.ह्या बाया पण भारी, स्वतःच्या नवऱ्याला हिंग लावून विचारत नाहीत पण शनीला तेल लावयाला मात्र जाणार...आहे कि नाही गम्मत!
-आदित्य कोरडे

शब्दक्रीडाविचार

प्रतिक्रिया

खूप मागे जय हनुमान नावाचे एक सिरीयल यायचे त्यातील शनी ग्रह (आणि त्याबरोबर ढय्या नावाने असलेला बुटका आणि साडेसाती नावाने असलेला एक लांब माणूस) पाहून शनीची भीती मनातून कायमची हद्द पार झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1c/Awadhi_jalebi.jpg

कंजूस's picture

27 Oct 2016 - 7:31 am | कंजूस

मठ्ठाही पाठवा. भावनगरी,गाठ्याही येऊ द्या.शनि-मंगळ त्रासावर तोडगा - जिल्ब्या वाटा मार्गशिर्षात. ( हा उपाय जळगावात लक्ष्मीप्राप्तीसाठी करतात असं ऐकून आहे. यांना मिळते का माहित नाही , जिलबी विकणाय्रांना नक्कीच मिळते.)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 7:41 am | अत्रुप्त आत्मा

मूळ पा. क्रुतीत मठ्ठा आहेच की! ;)

याची कार्यक्रमपत्रिका देऊनच आत सोडावे ही विनंती !

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 7:49 am | संदीप डांगे

;) +11111

नाखु's picture

27 Oct 2016 - 8:54 am | नाखु

आणि ती यादी अद्ययावत ठेवावी उगा "दिव्य भास्करच्या तेजाने मिपा (उ)जळविण्याचे प्रयोग व्हायला नकोत.

नाखु खालमाने

असंका's picture

27 Oct 2016 - 11:21 am | असंका

+१...

भालचंद्र_पराडकर's picture

27 Oct 2016 - 8:53 am | भालचंद्र_पराडकर

पण मरण सोडा दोन महिन्यात साधे जुलाब सुद्धा झाले नाहीत- अच्छा म्हणून इथं येऊन रोजच्या रोज धाग्याच्या जिलब्या टाकताय का?

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 8:57 am | संदीप डांगे

मिपाची कुंडली तपासा, एवढ्यात कोणता ग्रह वक्री बिक्री झाला काय, शनी मंगळ राहू केतू इत्यादी फार गडबड तर नै करत हैत?

मराठी कथालेखक's picture

27 Oct 2016 - 1:09 pm | मराठी कथालेखक

ग्रहांवर माझाही विश्वास नाही पण मंगळबद्दल मी (टीव्हीवरील कार्यक्रमांत - बहूधा शरद उपाध्येंचा कार्यक्रम) ऐकलेली माहिती थोडी वेगळी आहे. ती अशी :
मंगळाची मुलगी नवर्‍याला खाते वगैरे असं नसून मंगळ असलेल्या व्यक्तीची (स्त्री वा पुरुष) कामेच्छा इतर लोकांपेक्षा बरीच जास्त असते (above average म्हणू शकतो) त्यामुळे मंगळ नसलेला जोडीदार मंगळवाल्याला व्यक्तीची इच्छा तिला पाहिजे तितकी पुर्ण करु शकत नाही. यातून समस्या उद्भवू शकतात म्हणून मंगळ असलेल्या व्यक्तीने मंगळ असलेल्याच व्यक्तीशी विवाह करावा.
आधी म्हंटल्याप्रमाणेच माझा या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही , फक्त ज्योतिष काय मानतात हे इथे मांडायचे आहे.

उपयोजक's picture

27 Oct 2016 - 5:55 pm | उपयोजक

मराठी कथालेखक तुमचं बरोबर आहे.
आदित्यजी जरा अभ्यास करुन प्रगटायचं.
अधुरा ग्यान इज मोअर डेंजरस दॅन अग्यान.

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 6:03 am | आदित्य कोरडे

जरा अधिक स्पष्ट करून सांगाल काय तुम्हाला काय म्हणायचंय?

कुंडलीत काय पृथ्वी बघणार?

NiluMP's picture

28 Oct 2016 - 11:45 pm | NiluMP

;-)

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 6:16 am | आदित्य कोरडे

मंगळ असलेल्या व्यक्तीची (स्त्री वा पुरुष) कामेच्छा इतर लोकांपेक्षा बरीच जास्त असते (above average म्हणू शकतो) एक भरमसाठ विधान आहे,हे इतके तर्कदुष्ट आहे कि त्याचा प्रतिवाद किंवा प्रतिसाद द्यावा हीदेखील त्याची लायकी नाही. तुमच्या कडे (किंवा अगदी शरद उपाध्येच्या कडे काही संख्याशास्त्रीय माहिती , एखादा सर्व्हे रिपोर्ट काही असेल तर अगत्याने शेअर करावा. ....लाखो करोडो किलोमीटर दूर वरच्या दगड माती किंवा वायू च्या गोळ्यांमुळे जे स्वतः सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचे गुलाम आहेत ते पृथ्वीवरच्या मानव प्राण्यांचे फक्त आयुष्य नियंत्रित करूशकतात हे ज्यांना पटते त्यांना सलाम....

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 6:23 pm | संदीप डांगे

लाखो करोडो किलोमीटर दूर वरच्या दगड माती किंवा वायू च्या गोळ्यांमुळे जे स्वतः सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचे गुलाम आहेत ते पृथ्वीवरच्या मानव प्राण्यांचे फक्त आयुष्य नियंत्रित करूशकतात हे पटवून घेणे म्हणजे ज्योतिष एवढेच ज्यांना वाटते त्यांनाही ढोपरापासून नमस्कार!

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 6:35 pm | आदित्य कोरडे

नमस्कार( ढोपारापासून असला तरी) स्वीकारला? सुबुद्धी लवकर मिळावी हा आशीर्वाद ....मी माझ्या पुरते हे संभाषण थांबवतोय...आपला निर्णय आपल्या पाशी

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 6:46 pm | संदीप डांगे

आपला अहंकार आपल्यापाशी, गावभर गाजवत फिरू नये असे थोर म्हणतात...

भालचंद्र_पराडकर's picture

30 Oct 2016 - 7:20 pm | भालचंद्र_पराडकर

डांगेसर! स्वतःच्या वडिलांच्या cool पणाचे किस्से रोज मिपावर रतीब टाकल्यासारखे टाकणारे हे धागाकर्ते मिपासदस्यांकडून थोडाच विरोध झाल्यावर किती अकांडतांडव करताहेत?
मजेशीर विरोधाभास नं? ;)

मराठी कथालेखक's picture

29 Oct 2016 - 8:02 pm | मराठी कथालेखक

मी आधीच म्हंटले की माझा त्यावर विश्वास नाही. फक्त ज्योतिषी लोक काय मानतात (निदान उपाध्येंसारखे काही ज्योशिषी तरी) ते मी लिहिले त्यामुळे सर्वे रिपोर्ट वगैरे मला मागण्यात अर्थ नाही.

मंगळ असलेल्या व्यक्तीची (स्त्री वा पुरुष) कामेच्छा इतर लोकांपेक्षा बरीच जास्त असते (above average म्हणू शकतो) एक भरमसाठ विधान आहे,हे इतके तर्कदुष्ट आहे कि त्याचा प्रतिवाद किंवा प्रतिसाद द्यावा हीदेखील त्याची लायकी नाही.

मान्य !! पण मला वाटते खालील विधानही त्याच लायकीचे होते , नाही का ?

कोणा हतभागी मुलीच्या कपाळी मंगळ आला की मग ती कितीही सुस्वरूप, सुस्वभावी सद्गुणी असो, ती पांढऱ्या पायाची बनुन स्वतः च्या नवऱ्याला खाणारी कैदाशीण होऊन जाते

धर्मराजमुटके's picture

29 Oct 2016 - 6:15 pm | धर्मराजमुटके

रोज रोज असले लेख टाकले की लिहिणार्‍याचे आणि वाचणार्‍याचे दोघांचे मन अगदी 'कोरडे' होऊन जाते.

दिवाळीच्या शुभेच्छा !

सतिश गावडे's picture

29 Oct 2016 - 7:00 pm | सतिश गावडे

कोरडे साहेब, तुमच्या पिंटू लेखावर मंगळ आणि शनीची वक्रदृष्टी पडली काय?

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 10:08 pm | आदित्य कोरडे

ऐकावे ते नवलच!