नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता
नजरेतही तूच दिसलास ,
स्वतः दुःख देऊन मला
असा दर्दभरा का हसलास ?
कधी व्हावे गुलाब असे मला वाटे
पण नंतर आठवी की जीवनात असती काटे
मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे
परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !
प्रतिक्रिया
28 Oct 2016 - 3:30 am | चित्रगुप्त
... परंतू सर्वांनाच उमगणारे गुलाबाचे मोठे रहस्य आम्हाला नाही उमगले ताई. जरा इस्कटून सांगा ना आखिर वो कौनसा राज है, जिसे सारी दुनिया जान गयी है.
28 Oct 2016 - 6:19 am | गौरी कुलकर्णी २३
काटे सोबत असतानाही किंबहूना तो आयुष्याचा भाग असताना कसे आनंदी अन् डौल सांभाळून राहावे, ही गुलाबाचीच शिकवण आहे ! तूम्हाला काय वाटते चित्रगुप्त दादा ?
28 Oct 2016 - 6:13 pm | चित्रगुप्त
गुलाबाबद्दल कल्पना चांगली वाटली, परंतु काव्य तितकेसे चपखल वाटले नाही. पुढील काव्यासाठी शुभेच्छा.
28 Oct 2016 - 1:12 pm | शार्दुल_हातोळकर
अजुन थोडे कोपरे तासता आले असते...
पुढील लेखनासाठी शुभेच्छा...
28 Oct 2016 - 6:26 pm | शब्दबम्बाळ
फूल तो फूल हैं आँखों से घिरे रहते हैं
काँटे बेकार हिफ़ाज़त में लगे रहते हैं
उसको फ़ुरसत नहीं मिलती के पलट कर देखे
हम ही दीवाने हैं दीवाने बने रहते हैं
--वसीम बरेलवी