...
....................
कथा क्रमांक एक
एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो..
तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो...
तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो..
तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही..
असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो..
फकीर हसतो व म्हणतो..अरे एव्हढेच ना? मी तुला हवे ते देतो..माझ्या कडे तशी शक्ती आहे..त्या बदल्यात तू मला पण हवी ति गोष्ट दिली पाहिजे..
तो माणूस आनंदाने मनात म्हणतो काय मागाल ते देईन..कारण देण्या जोगे माझ्या कडे काहीच नाही...
व त्या फकिराला सांगतो..मान्य आहे..
फकीर आपल्या शक्तीने.. सुंदर बायको..धन ...गाडी.. आदी निर्माण करतो.ते पाहून माणूस आनंदीत होतो..अन त्या सुंदरीचा हात पकडणार इतक्यात तो फकीर त्या ला थांबवतो..व म्हणतो...
" अरे मित्रा मला जे हवे ते तू दिल्या शिवाय ह्या गोष्टी तुला मी देणार नाही"
आनंदाने बेहोष झालेला तो माणूस म्हणतो.." माग हवे ते..मला जर देवाने काहीच दिले नाही तर तू काय मागणार अन मी काय देणार"???
या वर फकीर हसतो. व म्हणतो " तुला देवाने २ हात दिले आहेत बदल्यात ते तू मला दे..व या सर्व गोष्टी घेऊन जा"
हे ऐकताच त्या माणसाला उपरती होते व तो फकिराचे आभार मानत पुढे जातो..
निचोड असा की..देवाने आपल्याला बुद्धी..धडधाकट शरीर दिले आहे ..त्याचा उपयोग करत संपत्ती निर्माण करून तिचा उपभोग घेण्या ऐवजी माणूस देवाने हे दिले नाही माझे नशीब फुटके असे म्हणत कुढत असतो..
...............................
अरबस्थाना तील दोन बोधकथा...
....................
कथा क्रमांक दोन.
एक धनी वयस्कर माणूस अरबस्थानात रहात असतो..
वय ७५....तो श्रद्धाळू असतो
शुक्रवारी मशीदीत जाऊन परमेश्वराची आराधना करण्या साठी तो निघतो. त्या काळात दळण वळणाची आधुनिक साधने नव्हती
त्याच्या कडे एक अबलख उमदा अरबी घोडा होता..त्यावर कमावलेल्या चामड्याचे खोगीर तो चढवतो व शुक्रवारी मशीदीत परमेश्वराची आराधना करण्या साठी प्रस्थान करतो..
मशीद घरापासून लांब असते..
मशीदी जवळ आल्यावर तो घोडा मशीदी च्या बाजूला बांधतो...
त्या काळात चो-या होत असल्याने मशीदीच्या बाजूला २-४ मुले खेळत असतात त्यातल्या एका मुलाला बोलवून तो व घोड्याकडे लक्ष देण्यास त्या मुलाला सांगतो व त्या बद्दल तुला चांगले बक्षीस देईन असे म्हणतो...
बक्षीस म्हटल्यावर तो मुलगा खूश होतो अन आनंदाने ते काम स्वीकारतो...
त्या नंतर तो मशीदीच्या पाय-या चढू लागतो..
*
मशीदी च्या बाजूच्या गल्लीत चोर बाजार असतो..
त्या बाजारात एक व्यापारी असतो..तो दुकान उघडतो...
व देवास प्रार्थना करतो की..हे दयाघना आज चांगला चोरीचा माल मिळू दे जो विकून मला आज चांगला नफा होईल
*
इकडे ज्या मुलाला घोड्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते तो "टपोरी" टाईपचा असतो..तो विचार करतो..हा म्हातारा म्हणाला खरं बक्षीस देतो म्हणून पण काय सांगावे? नाही दिले तर?
हा विचार मनात आल्यावर तो मुलगा घोड्या च्या पाठीवरचे खोगीर सोडतो..व ते घेऊन सू बाल्या करतो व चोर बाजारात येतो.
तो वर सांगितलेल्या दुकानदारा कडे येतो व त्याला खोगीर दाखवतो..
कमावलेल्या चामड्याचे ते खोगीर बघून मालक आनंदतो.व चेह-यावर आनंद न दाखवता भावात घासाघीस सुरू करतो..
शेवटी ५० रु सौदा ठरतो..व तो मुलाला ५० रु देतो..
तो मुलगा पण ५० रु घेतो व ऐष करायला निघून जातो...
*
इकडे तो माणूस मशीदीतून बाहेर येतो..लांबन बघतो घोडा जागेवर आहे हे पाहिल्याने खूश होतो व त्या मुलाला १०० रु बक्षीस देण्याचे मनात ठरवतो..
घोड्याजवळ आल्यावर तो इकेडे तिकडे बघतो..पण तो मुलगा नजरेस न पडल्याने बाजूच्या मुलाकडे त्याची चौकशी करतो..
पण मुले सांगतात..इथेच होता पण कुठे गेला ते माहीत नाही....
तो वृद्ध माणूस मनातून १०० रु वाचले म्हणून खूश होतो व घोड्यावर टांग मारताना त्याला कळते की खोगीर नाही..
परमेश्वराची इच्छा असे म्हणतं तो घोड्याचा लगाम पकडतो व चोर बाजारात दुकानदाराकडे येतो..व जुने खोगीर आहे का? अशी चौकशी करतो...
१० मिनिटा पूर्वी माल घेतला व लगेच विकला जाणार यामुळे तो दुकानदार मनात देवाचे आभार मानतो..
तो वृद्ध माणूस अडलेला आहे हे बघून तो म्हणतो..खोगीर आहे व त्याची किंमत १०० रु होईल असे त्याला सांगतो..
त्या माणसाकडे पण काही पर्याय नसल्याने तो खोगीर विकत घेतो..घोड्याच्या पाठीवर चढवतो..व घरचा रस्ता चालू पडतो...
*
कथेचा निचोड असा की जे परमेश्वराच्या मनात असते तसेच घडत असते..त्या माणसाने १०० रु खर्च करायचे ठरवले असतात पण मुलगा न दिसल्याने १०० रु वाचले असे त्याला वाटत असते..पण तसे घडणे नसते..त्याचे १०० रु खर्च होणार ते झालेच..मुलगा टपोरी असतो त्याच्या मनात पाप येते त्या मुळे त्याला १०० रु मिळणार त्या ऐवजी ५०रु मिळतात..दुकानदार श्रद्धाळू असल्याने त्याचा ५० रु माल १०० रु विकला जातो व त्याला नफा होतो
प्रतिक्रिया
21 Oct 2016 - 6:06 am | टवाळ कार्टा
मी पयला
दोन्ही कथा समजल्या
21 Oct 2016 - 7:20 am | खेडूत
कथा छानेत.
अरबस्थानात प्राचीन काळी रुपये चालत की काय?
21 Oct 2016 - 8:22 am | बाजीप्रभू
दुसरी गोष्ट जास्त आवडली. पहिली गोष्ट कोणत्याही देशाच्या नावावर खपून जाईल
बादवे, दुसऱ्या गोष्टीवरून मिपाकरांसाठी एक बोधकथा लिहायचा मोह होतोय. (आवडणार असेल तरच पुढे लिहितो.. फक्त झलक देतो.)
कथा क्रमांक तिन.
एक हौशी वयस्कर माणूस मिपावर वावरत असतो..
वय ७५....तो फक्त वाचाळु असतो.
दर शुक्रवारी मिपावर जाऊन नवे लेखन वाचण्यासाठी ऑनलाईन येत असतो. त्या काळात घरबसल्या इंटरनेटची आधुनिक साधने नव्हती. पण त्याच्या शहराजवळच एक सायबर कॅफे होता. त्यादिवशी(शुक्रवारी) तो भरपेट नास्ता करून मिपावरील नवीन नवे लेखन वाचायला जाण्यासाठी प्रस्थान करतो. सायबर कॅफे घरापासून लांब असते.. जवळ आल्यावर तो चप्पल कॅफेच्या बाहेर काढून ठेवतो.
त्या काळात चो-या होत असल्याने कॅफेच्या बाजूला २-४ मुले खेळत असतात त्यातल्या एका मुलाला बोलवून तो व चपलेकडे लक्ष देण्यास त्या मुलाला सांगतो व त्याबद्दल तुला चांगले बक्षीस देईन असे म्हणतो...
(धागाकर्ते नाराज होणार नसतील तरच पुढे लिहितो. नाहीतर इथेच आवरतं घेतो.)
21 Oct 2016 - 11:02 am | मृत्युन्जय
मशीदी च्या बाजूच्या गल्लीत चोर बाजार असतो.. त्या बाजारात एक व्यापारी असतो..तो दुकान उघडतो...व देवास प्रार्थना करतो की..हे दयाघना आज चांगला चोरीचा माल मिळू दे जो विकून मला आज चांगला नफा होईल
चोरबाजारात दुकान असणारा, माल चोरीचा आहे हे माहिती असुनही विकत घेणारा आणि मुळात चोरीचा माल स्वस्तात मिळावा म्हणुन प्रार्थना करणारा माणुस फक्त श्र्द्धाळु आहे म्हणुन त्याचा नफा होता असे सांगणारी कथा बोधकथा असावी की निर्बोधकथा?
21 Oct 2016 - 11:23 am | संदीप डांगे
चोरी करणाऱ्याला पाप लागतं , तो माल विकत घेणाऱ्याला नाही असं असावं,
थोडे बदल केले तर ही विसंगती काढून टाकता येईल, जुने सामान विकत घेणारा व विकणारा व्यापारी असू शकतो, भंगार व सेकंड हॅन्ड वाला, तो नियुक्त केला तर विसंगती टळेल!
21 Oct 2016 - 11:30 am | मृत्युन्जय
चोरीचा माल विकत घेणारा आणी चोरीचा माल स्वस्तात विकत घेता यावा अशी प्रार्थना करणारा माणुस श्रद्धाळु आणि सद्वर्तनी असु शकतो??? ही विसंगती तर नक्कीच आहे शिवाय बोधकथेचा मुलामा दिलेला असल्याने ती जास्तच खटकते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बोधकथेचा बाज आणायचा असेल तर दुकानदार हा सदवर्तनी आणि चोरीचा माल विकत घेण्याची आशा न बाळगणारा दाखवावे.
21 Oct 2016 - 12:31 pm | गामा पैलवान
मृत्युन्जय,
आपण भारतात ज्याला दुर्वर्तन म्हणतो ते अरबस्थानात सद्वर्तन असू शकतं. किंबहुना आहेच.
आ.न.,
-गा.पै.
21 Oct 2016 - 12:35 pm | भम्पक
अरबस्थानातली बोधकथा आहे ती ......त्यांच्या आणि आपल्या मानण्यात फरक असणारच..आता पहाना तिकडे श्रद्धाळू च मुडदे पाडतात आणि त्याला ईश्वराचे कार्य म्हणतात. त्या मानाने हा चोर दुकानदार तर लै साधा सरळ....
21 Oct 2016 - 1:55 pm | Ram ram
इतका सुंदर बोध मिळाला की बस
21 Oct 2016 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
दुकानदार श्रद्धाळू असल्याने त्याचा ५० रु माल १०० रु विकला जातो व त्याला नफा होतो
"श्रद्धाळू माणुस, तोही चोरीचा माल विकणारा आणि त्यामुळे त्याला होणारा नफा" या ती गोष्टी एकवटलेल्या बघून काय बोध घ्यावा बरे !? :)
21 Oct 2016 - 2:26 pm | नाखु
पहिली कथा स्थल काल यांच्या सीमेत टाकण्याची जरूरी नाही.चांगली आहे,काय आहे ते पहावे नसण्यापेक्षा..
अता दुसरीकडे वळू (म्हणजे बोधकथेकडे)
घोड्यावरून मशीदीत जाणारा मनुष्य क्ष्रद्धाळू जरूर आहे पण कमालीचा विसराळू आणि भोट+कंजुष आहे.
(कारण आपेल्च खोगीर आपल्याला परत विकत घ्यावे लागले हे त्याच्या लक्ष्यात आले नाही हे अजब आहे)
मुलाने तर कहरच केला खोगीर ठेऊन घोडा घेऊन गाब झाला असता तर किमान पुढचे दहा-पंधरा दिवस तरी मशीदीच्या आसपास नवीन बकरा शोधायला यावे लागले नसते. (करावे ते दणक्यात्,पुन्हा असा लग्गा थोडीच लागतो)
दुकानदार मात्र पक्का (मेरे पापाका सपना सबका माल अपना) टाईप दिसतोय.
असो मिपाबहेरही अश्या बोधकथांमधूनही फसले जाणारे,फसवणारे आणि फसण्याचाही फायदा लाटणारे आहेत इतकाच काय तो बोध.
बाळबोध नाखु
21 Oct 2016 - 3:10 pm | पगला गजोधर
वाचून,
अरबस्थानातील व्यवहार रुपयांमध्ये चालतात, हा बोध झाला.
बोध घेण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे,
पैसे कमावण्याची कृपा करण्याबाबत उपरवालेका प्रेफरन्स ध्यानात आला,
पहिला प्रेफरन्स - चोर बाजारातील, चोरीच्या वस्तू खरेदी करून चढ्या भावाने विकणारा दुकानदार, लक्षात घ्या, शुक्रवारी प्रार्थनेच्या वेळी सुद्धा दुकान व्यवहार करीत होते (प्रार्थने सारख्या गोष्टीत त्याने वेळ घालवला नाही) एकूण फायदा ५० चलन
दुसरा प्रेफरन्स - टपोरी मुलगा ज्याने विश्वास घात करून चोरी केली, लक्षात घ्या, शुक्रवारी प्रार्थनेच्या वेळी सुद्धा बाहेर टपोरीगिरी करत फिरत होता (प्रार्थने सारख्या गोष्टीत त्याने वेळ घालवला नाही) ,एकूण फायदा ५० चलन
शेवटचा प्रेफरन्स - चांगुलपणाने समाजात वावरणारा श्रद्धाळू व दयाळू (१०० चलन टीप देण्याच्या विचार करणारा), शुक्रवारी प्रार्थनेत रममाण होणारा.
,एकूण फायदा उणे १०० (- १००) चलन
बघा म्हणजे झालं ....
21 Oct 2016 - 8:08 pm | पीके
आनि हे सगळं चाललय अरबस्तानात!!!...
या...
26 Oct 2016 - 2:45 pm | विजुभाऊ
श्रद्धाळू माणसाने १०० रुपये खर्च केले.
टपोरी मुलाने ५० रुपयेम्कमावले
चोरीचा माल विकनाराने ५० रुपये कमावले
यावरून असे जाणवते की इश्वराच्या प्रार्थनेत वेळ घालवणाराचे नुकसान होते.
त्या वेळेत चोरी करणाराचे आणि चोरीचा माल घेवुन विकणाराचा फायदाच होतो
2 Jan 2017 - 4:54 pm | समाधान राऊत
असाही तो व्यक्ती १००चलन बक्षिस देणार होता मग त्याचा तोटा कसा, मुलाला लक्ष ठेवायला सांगितले नसते तर मात्र तो त्याचा तोटा झाला असता,उलटपक्षी त्या मुलाने चोरी करुन स्वता:चा ५०चलन तोटा केला असे का म्हणु नये
या दोघांमध्ये प्रार्थना करनारा व न करनारा असा तातपुरता विचार केला तरी हरकत नसावी
21 Oct 2016 - 6:12 pm | chitraa
श्रीगुरुजी मोड ऑन :
अरेरे! प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट असणारा हिंदुस्तान कुठं आणि चोरीच्या मालाची गोष्ट असणारा अरबस्तान कुठं !
माई मोड ऑन ..
अरे अवीबाळा, पुढं त्या खोगीरचोराला सरकारने मोठी सजाही दिली असेन ना रे? पर्वाच अरबस्तानाच्या राजकुमाराला खुनाबद्दल देहदंड आल्याचे पेप्रात आले होते, असे आमचे हे बोलत होते.
21 Oct 2016 - 9:44 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्गा....भारीये =))
22 Oct 2016 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्हीही गोष्टी आवडल्या. लिहित राहा. लो यू... :)
-दिलीप बिरुटे
22 Oct 2016 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
लो यू... :)
प्रा डाँचा स्वभावच फार प्रेमळ... पहिल्यापासून ;) :)
23 Oct 2016 - 10:14 am | कैलासवासी सोन्याबापु
जाऊ द्या काका, ती आमसूलवाली गोष्टच भारी होती हो!
26 Oct 2016 - 5:28 am | साहना
कथा १ :
दुसऱ्याची बायको सुंदर हे ह्याला कसे ठाऊक ? ती तर हिजाब मध्ये असेल ना ? दाल में कुछ तो काला है ।
"दुसऱ्याला ४ बायका मला फक्त दोन " असं बदल केला तर कथा जास्त चांगली होईल.
कथा २:
मला ह्यांतील बोध काहीही समजला नाही. मशिदीच्या बाजूला चोर गल्ली असताना तेथील एका मुलावरच विश्वास ठेवणे चुकीचे वाटते. आमच्या देवळांत फार तर चपला चोरीला जातात. मुलाची टीप १०० रुपये होती तर मुलाने ५० रुपयांत खोगीर विकावे हे काही समजले नाही. अपेक्षित टीप ची किंमत खोगिराच्या तुलनेत फार कमी असती तरच चोरी करणे फायद्याचे ठरले असते.
आणि एखादी घटना घडून गेल्यानंतर "परमेश्वराच्या मनात होते" म्हणण्यात काय अर्थ आहे ? समाजा पायऱ्या उतरताना तो वृद्ध मेला असता, घोड्याला साप चावला असता, किंवा आकाशातून वीज पडली असती तरी सुद्धा "परमेश्वराच्या मनांत होते" हे लॉजिक चालले असते. ह्यांत काहीही बोध नाही.