हात दाखवून अवलक्षण

नाखु's picture
नाखु in काथ्याकूट
24 Oct 2016 - 10:26 am
गाभा: 

करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.

  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.

विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला)
कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे.

काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे.

मिपाकरांना काय वाटते?

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 3:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते.

परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा, उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 11:23 pm | श्रीगुरुजी

परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा,

तसं असेल तर तुम्ही "संडास" हा शब्द तुमच्या संदर्भात उच्चारलेला नसताना सुद्धा कोणीतरी दुसर्‍या कोणाच्यातरी संदर्भात उच्चारलेला आहे अशी समजूत करून का बरे आक्षेप नोंदविला? वरील "सभ्य नियमानुसार" ज्या कोणाच्या संदर्भात हा शब्द लिहिला गेला असेल त्यानेच आक्षेप घ्यावा. इतरांनी त्यावर आक्षेप घ्यायचे या "सभ्य नियमा"विरूद्ध आहे.

उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.

त्याचा आणि माझा धर्म एकच आहे. मग त्याच्या धर्मावर काय तोंडसुख घेणार?

असो.

बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक विचारू का..?

कोणत्या गोष्टीला / व्यक्तीला किती महत्व द्यायचे ते प्रत्येकजण ठरवत असतो, "७ लोककल्याण मार्ग" किंवा "वर्षा" ला किती सिक्यूरिटी द्यायची आणि एखाद्या बँकेच्या ATM ला किती द्यायची याचे पोलीसांचे आखाडे ठरलेले असतात. नीरक्षीरविवेक किंवा समानता म्हणून प्रत्येक ठिकाणची सिक्यूरिटी समानच असली पाहिजे हा आग्रह अवास्तव वाटतो.

त्याच प्रमाणे, मी (किंवा अन्य कोणीही) सोन्याबापूंचे प्रतिसाद जितक्या गंभीरपणे घेतो* तितकेच सर्वांचे प्रतिसाद गंभीरपणे घ्यावेत किंवा "९०% फालतु प्रतिसाद असतात पण १०% चांगले असतात म्हणून ते गंभीरपणे घ्यावेत" वगैरे युक्तीवाद कितीही तर्कशुद्ध असतील तरी कुणाला किती महत्व द्यायचे याचेही प्रत्येकाचे आखाडे ठरलेले असतातच आणि ते ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले पाहिजेच.

त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेला नीरक्षीरविवेक, खुद्द तुम्ही किंवा फारतर तुम्ही कमावलेल्या आदरामुळे थोड्या प्रमाणात तुमचे मित्रवर्य (तेही लॉजीकल लिहिल्यास.!!) यांपर्यंत विस्तारू शकतो. त्यापुढे तो विस्तारावा ही तुमची अपेक्षा त्या त्या व्यक्तीने (स्वतः) कमावलेल्या मुल्यावर अवलंबून असणार नाही का..?

नीरक्षीरविवेक सगळीकडे सारखा असलाच पाहिजे ही रामशास्त्री भूमीका कितीही बरोबर असली तरी आतंर्जालाच्या फॉरमॅटमध्ये किती प्रमाणात अंमलात आणता येईल..?

(* याचे कारण तुमच्याकडून लॉजीकल उतरे येतात तसेच येथे तुमच्याशी चर्चा करण्याचे कारणही हेच आहे.)

(बाद्वे, आत्ताच गुरूजींचा प्रतिसाद बघितला. आपण दोघे नंतर सावकाश बोलूया का..?)

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 1:56 pm | बोका-ए-आझम

मी कोणाच्या तरी नावावरून विनोद केल्यावर मला बॅन करण्यात आलं होतं. आणि इथे तुम्ही आक्षेप घेतलेला प्रतिसाद जसाच्या तसा आहे, आयडीही बॅन झालेला नाही. तरीही तुम्ही All men are equal and some are more equal असं म्हणताय? कोण more equal आहे ते उघड दिसतंय इथे, तरीही? रच्याकने डांगे अण्णांनी श्रीगुरुजींना वैयक्तिक प्रतिसाद दिल्यावर तुम्हीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो तुमचा हक्क जर इतरांनी मान्य केलाय, तर सुज्ञ यांच्या प्रतिसादावर बाकीच्यांचा प्रतिसाद न देण्याचा हक्क तुम्ही अमान्य करत कामा नये.
माझ्याबद्दल बोलायचं तर एकदा तुम्हालाच मी सरळसरळ म्हणालो होतो (मुविंनी चंपाबाईंच्या विरोधात काढलेल्या धाग्यावर) की मी biased आहे आणि हे मी उघडपणे मान्य करतो. बाकी तुम्ही माझ्या चुका दाखवून दिल्यावर मान्य केल्या नसतील तर बोला.

अप्पा जोगळेकर's picture

25 Oct 2016 - 5:52 pm | अप्पा जोगळेकर

इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय
हे वाक्य लिहिले नसते तर असा श्लेष झाला आहे हे तुलनेने कमी लोकांना लक्षात आले असते.

मृत्युन्जय's picture

26 Oct 2016 - 5:34 pm | मृत्युन्जय

पहिली गोष्ट जो प्रतिसाद वाचला जातो तिथेच फक्त प्रतिवाद केला जातो. मिपावरचे १००% प्रतिसाद मी वाचत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिसादाला प्रतिवाद करणे अर्थात जमत नाही. त्यामुळे माझ्या नीरक्षीर विवेकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. आपलाही नीरेक्षीर विवेक अनेक प्रकरणांमध्ये दिसला नाही. मी काही प्रत्येक वेळेस आक्षेप घेतलेला नाही. जिथे तुम्हाला दाखवुन दिले तिथे देखील तुम्ही वैचारिक मतभेदांच्या नावाखाली वेगळी भूमिका घेतली होती.

दुसरी गोष्ट आपल्या मित्राची चूक झाली आहे आणि ते तसे स्पष्टपणे दाखवुन दिले आहे. त्याची चूक झाल्याबद्दल तुम्ही त्याला समज दिलीत का? कदाचित व्यनिवरुन दिली असेल. इथे दिसत नाही. इतरांवर कंपुबाजीचे आरोप करताना आपण उघड उघड कंपुबाजी करता आहात हे स्पष्टपणे नमूद करतो. इतःपर राग मानुन घेउ नये.

तिसरी गोष्ट संडास म्हणजे संदीप डांगे हे उमजलेच नाही प्रतिसाद वाचल्यावर द्देखील. पुढचे प्रतिसाद वाचुन तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले. पण प्रतिसाद कर्त्याने ते त्या अर्थाने वापरल्याचे दिसत नाही. "संडास ने मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्ह्टले" असे काही लिहिल्याचे दिसत नाही. संडास झाली आहे म्हणजे घाण केली आहे या अर्थाने वापरलेला हा शब्द दिसतो. इथे संडास हा शब्द थोडा ग्राम्य नक्की वाटतो. पण तो व्य्कतिविषयक टिप्पणी म्हणुन येत नाही असे सकृतदर्शनी प्रतीत होते. त्यामुळे मी प्रतिस्स्साद वाचला असता तरी अशी काही टिप्पणी केली नसती. इतःप्पर जर ही टीप्पणी त्याच अनुषंगाने असेल तर मी स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो.

चौथी गोष्ट म्हणजे डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटले म्हणुन हा संदर्भ लावला गेला आहे असे तुम्ही म्हणत असाल तर मुळात डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले देखील मला कुठे दिसले नाही. नाहितर मी नक्कीच त्या प्रतिसादावरही स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त केला असता. जर ते तसे म्हणाले असतील तर मी इथेच स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो आणि प्रतिसादाची पातळी खालावण्यास ते देखील जबाबदार आहेत असे नमूद करु इच्छितो ( जर श्री सूज्ञ यांनी मुळात संदीप डांगे यांचा संडास असा उल्लेख केला असेल).

पाचवी गोष्ट "इथे भाजपाचे दलाल नकोत "असे म्हणुन मग डांगे वरती "मी श्री गुरुजींना दलाल म्हणालो" हे आधी सिद्ध करा अश्या अर्थाची मखलाशी करतात. या पर्श्वभूमीवर सोज्ञ यांच्या संडास शब्दाचा आणी संदीप डांगे यांचा फारच लांबचा संबंध आहे. त्यांनी तर तो प्रतिसाद डांगे यांना उद्देशून लिहिलेला देखील दिसत नाही (अर्थात वरती म्हटल्याप्रमाणे डांगे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून "हरामखोर "हा आक्षेपार्ह शब्द वापरला असेल तर ओढुन ताणुन संबंध लावता येइल). असे असताना त्यांनी असे म्हटले असेल असे गॄहीत धरुन सूज्ञ यांचा निषेध करणे म्हणजे पराचा कावळा करणे होइल.

सहावी गोष्ट पुर्वी मिपावर तुम्हाला कोण काय म्हणाले होते हे अर्थात माझ्या लक्षात रहायचे कारणच नाही, कारण बहुसंख्य मिपाकर एक सैनिक म्हणुन आपला आदर करतात. मी देखील त्याला अपवाद नाही. या आधी बरेचदा खरडवहीत आणी धाग्यांवर जाहीरपणे मी तसे बोलुन दाखवले आहे. त्यामुळे कुठल्या डू आयडी ने तुमच्याबद्दल कुठे काय घाण केली आहे हे माझ्या लक्षात असण्याचे कारण नाही. खासकरुन तो आयडी आधीच बॅन झाला असेल तर ते प्रतिसाद देखील बहुधा आधीच उडले असतील (जर बॅन त्या अनुषंगाने असेल तर) त्यामुळे ते प्रतिसाद मी वाचले असण्याची शक्यता नाही. वाचले असतील तरी त्याच्याशी सहमती दर्शवली असण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे कुठल्या डु आयडीने तुम्हाला कधीतरी त्रास दिला त्याचा संदर्भ इथे लावण्याची काहीच गरज नाही. (आपण त्या प्रतिसादात केवळ बोकाभाउंचा उल्लेख केलेला दिसतो पण मूळ प्रतिसादत माझा उल्लेख आहे त्यामुळे त्या अनुषंगाने हे सर्व चालले असल्याने हे सगळे लिहितो आहे). तस्मात तुमचे वैयक्तिक स्कोर सेटलिंग करताना माझ्यावर आगपाखड करण्याची गरज कळली नाही. शिवाय एखाद्या डु आयडीच्या विक्षिप्तपणावर मिपाचे नियम ठरत नसतात. तसे असले असते तर मोगाखानच्या शेकडो आयडींच्या मर्ज्जीनुसार हे संस्थळ चालले नसते? थोडक्यात वड्याचे तेल वांग्यावर ओतु नये. इथे लोक आपले कामधंदे सांभाळुन मौजमजेसाठी येतात. संदीप डांगे अथवा सोन्याबापुंचे प्रतिस्साद किंवा त्यांचा उल्लेख किंवा ओढुन ताणून आणलेला संदर्भ दिसला रे दिसला की प्रतिसाद द्यायचाच या इर्ष्येने इथे यायला मलातरी वेळ नाही.

सुज्ञ's picture

27 Oct 2016 - 12:05 am | सुज्ञ

सरकार एकदा प्रतिक्रिया वाचून घ्या ..

सुज्ञ's picture

27 Oct 2016 - 12:08 am | सुज्ञ

इथे आहे वाचा

काँग्रेस ची आधी निंदा करून मग आडून शिरसंधान :) खो खो खो

श्रीगुरुजी's picture

27 Oct 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी

वरील प्रतिसादातील लिंकमधून ---

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हरामखोर आहेत, लोकशाहीचे हत्यारे आणि दलाल (इंग्रजीतील pimp ह्या अर्थाने) आहेत तसेच 'या विशिष्ट बाबतीत' भाजपची बाजू सांभाळू पाहणारे भाजपप्रेमीही कोणत्याही प्रकारे त्या दोघांपेक्षा तसूभर कमी आहेत हे जाणवत नाहीये!

एकंदरीत "दलाल" हा शब्द यांचा खूप लाडका दिसतो. परंतु हरामखोर व दलाल हे शब्द वापरण्याचे प्रयोजन समजले नाही कारण या सभ्य नियमानुसार जर आपल्याला कोणी हरामखोर व दलाल म्हटले असेल तरच आपण त्या व्यक्तीला हरामखोर व दलाल म्हणून परतफेड करायची असते. परंतु राज व फडणविस यांनी इथे कोणाला हरामखोर किंवा दलाल म्हटल्याचे पाहण्यात नाही.

मृत्युन्जय's picture

27 Oct 2016 - 8:05 pm | मृत्युन्जय

अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी आहे. भाजपाचा एवढा पराकोटीचा द्वेष खरंच उबग आणणारा आहे. पण काय करणार? मिपावर काही लोकांना इम्युनिटी दिसते आहे. चालायचेच. पण ही असली भाषा फडणवीसांबद्दल वापरणे किळसवाणे आहे. अर्थात सदर सदस्याच्या समर्थकांना यात काही आक्षेप वाटेलसे दिसत नाही. "काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे महत्वाचे आहे असे दिसते "असे इतरांना बोलुन लब्धप्रतिष्ठित सदस्य स्वतःच अशी वागणुक करताना दिसतात. असो. असोच...

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 11:54 am | सुज्ञ
सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 12:11 pm | सुज्ञ

मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 12:42 pm | गामा पैलवान

पैसाताई,

महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.

म्हणे विश्वास दाखवा! काहीही हं पैसाताई! विश्वास कोण आणि कोणावर दाखवणार? महिला पोलिसांची अब्रू मुंबईत दिवसाढवळ्या लुटली जात होती तेव्हा कोण पोलिसांच्या बाजूने उभं राहिलं होतं? राज ठाकरे की आजून कोणी? कोणाच्यात हिम्मत होती?

पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याची नुसती बातमी पण छापायची नाही. कुठे गेलं होतं अभिव्यक्तीस्वातंत्र्य? दंगलींच्या नंतर साधा मोर्चा काढायला परवानगी नाकारली गेली. मग पोलिसांना आधार कोणी द्यायचा? राज ठाकरे म्हणाले मी नाही ऐकत. मी मोर्चा काढणारच. तसा तो काढला. चव्हाण सरकारला झक मारंत परवानगी द्यावी लागली. न देऊन चालतंय का!

आज राज ठाकऱ्यांच्या नावाने घटनाबाह्य म्हणून शिमगा केला जातो. मग २०१२ च्या दंगली काय घटनात्मक होत्या का? उगीच काहीतरी पोकळ बुडबुडे सोडायचे. काय तर म्हणे तर खंडणी! अरे, हाड!

इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत आणि विचारवंतांना शाब्दिक कसरती सुचताहेत. सुदैवाने फडणविसांना या परिस्थितीची जाण आहे. म्हणून बैठक बोलावली. हे जर मिपावरील विचारवंतांना कळंत नसेल तर त्यांनी आपापल्या अकला चुलीत घालून पाहाव्या. देवजाणे कदाचित उपयोग होईलही.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 12:46 pm | गामा पैलवान

पैसाताई, वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशून दिला असला तरी कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.

भक्त प्रल्हाद's picture

25 Oct 2016 - 12:57 pm | भक्त प्रल्हाद

इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत

कोणापासुन? मनसे पासुन?
हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?

पैसा's picture

25 Oct 2016 - 1:37 pm | पैसा

हे म्हणजे पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत म्हणून त्यांची दहशत सहन करून त्यांच्याशी बोलणी करा याच धर्तीवर बोलणे झाले.

अजून दुसरी उपमा देते. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्‍याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 4:49 pm | संदीप डांगे

दुसऱ्या उपमेबद्दल माझे टंकनश्रमवाचवले त्याबद्दल धन्स.

अगदी हेच म्हणणार होतो,

अनुप ढेरे's picture

25 Oct 2016 - 2:11 pm | अनुप ढेरे

a

अभ्या..'s picture

25 Oct 2016 - 2:40 pm | अभ्या..

बॉडी प्रपोर्शन चुकलेय.
तोंड मोठे झालेय शरीरापेक्षा. (तसे आहेच म्हणा वाच्यार्थाने)

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 2:57 pm | सुज्ञ

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या कायद्यानुसार त्यांना चर्चेस बोलावले असे विचारणाऱ्यांसाठी .

१. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय पार्टीशी , नेत्याशी , फिल्मस्टार्स शी काही वाद असल्यास चर्चा करू नये असा कोणता कायदा नियम आहे
२. असा कायदा असल्यास त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ?
३. मुख्यमंत्र्यांनी सिनेमात दंगा करणाऱ्यास संरक्षण देणार नाही असे कधी म्हटले आहे का ?
४. चर्चा करून होणारे संभाव्य वाद मिटवले याला मांडवली म्हणतात ?
५. पाच कोटी द्या वगैरे ठाकर्यांचा स्वतःचा प्रश्न आहे आणि ते चुकीचेच आहे ( अर्थात त्यांच्या खळ्ळ खत्याक संस्कृती ला ते धरून आहे ) . मुख्यमंत्र्यांनी त्यास कधी समर्थन दिले ?
६. आपण सर्व गोष्टीकडे मांडवली ,वसुली ,खंडणी वगैरे सोडून सारासार विचार करायला कधी शिकणार ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Oct 2016 - 3:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

पट पट नाही साद्यांत उत्तर देतो थोडी सवड मिळाली की.

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 3:43 pm | सुज्ञ

२. असा कायदा असल्यास* त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ?

*नसल्यास असे वाचावे

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 4:37 pm | शब्दबम्बाळ

तुम्ही सांगा पाहू...
1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता?
2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का?
3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे?
4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले?
5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये)
6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?)
7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो!
8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात?

मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते...

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 3:13 pm | संदीप डांगे

माझे काही प्रश्न:

1. दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर?

आधी याचे उत्तर मिळू देत, बाकी प्रश्न नंतर...

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 3:29 pm | श्रीगुरुजी

हे बेकायदेशीरच आहे.

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 3:35 pm | सुज्ञ

दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर?

हे बेकायदेशीरच आहे. दंगे करणाऱ्यांविरुद्ध पोलीस बळ वापरणार नाही असे कोणीही कुठेही म्हटले नाही. पण उगाच दंगे घडू नयेत ( कोणी बेकायदेशीर कृत्य करू नये ) यासाठी उपाययोजना केली

राज ठाकरे यांच्या पक्षाच्या संस्कृती अथवा विचारांशी इथे कोणीही सहमत नाही. साध्य प्रश्नाचे चर्चा करून मार्ग मिळाला .आता त्यात राज ठाकर्यांना थोडे राजकीय महत्व मिळाले पण नंतर ५ कोटी वगैरे नाटक करून ते त्यांनी घालवले.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 3:34 pm | संदीप डांगे

2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल भारतीय कायद्याने काय करावे असे सुचवले आहे?

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 3:38 pm | सुज्ञ

२. अशी धमकी देणाऱ्याबद्दल भारतीय कायद्याने काय करावे असे सुचवले आहे?
ज्याला धमकी मिळाली तो कोर्टात जाऊ शकतो . तो कोर्टात का गेला नाही हे तुम्ही त्यांना विचारा. पोलीस संरक्षण त्यांना दिलेले होते व ते असणार

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 4:15 pm | संदीप डांगे

धमकी राज्यशासनाला आहे, कारण ते होऊ न देणे, झाल्यास निस्तरने, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे सरकारचे काम, धमक्यांना भिणे नव्हे!

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 5:38 pm | श्रीगुरुजी

धमकी चित्रपट theaters ना होती. त्यांना राज्य सरकार संरक्षण देणार होतेच. घाबरण्याचा प्रश्नच नव्हता.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 5:40 pm | संदीप डांगे

मग वाटाघाटी केल्यातच कशाला?

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 5:45 pm | श्रीगुरुजी

तोडफोड व अशांतता टाळायला

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 5:49 pm | संदीप डांगे

म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती होती ना?

पण त्यासाठी पोलिसदल, फारच झालं तर सैन्य आहे की!

आणि बघा तुम्ही म्हणता प्रतिवाद करा... श्या!

आपलीच विधानं बाईजवर एकामागे एक लिहा आणि लॉजिक शोधा

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 6:00 pm | श्रीगुरुजी

ती भीति नसते हो. नुकसान, अशांतता इ. टाळण्यासाठी सरकारला प्रयत्न करावेच लागतात. पोलिस किंवा सैन्य हा अंतिम उपाय असतो. त्याआधी बोलणी, जमावबंदी, धरपकड, लाठीमार, अश्रूधूर आणि सर्वात शेवटी गोळीबार असा क्रम असतो. एकदम शेवटचे पाउल कधीही उचलले जात नाही.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 6:17 pm | संदीप डांगे

शिक्षक मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा नेमकं कोणतं पाऊल कोणत्या क्रमवारीने होतं ते बघायला लागेल!

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 10:24 am | हतोळकरांचा प्रसाद

खरंच बघा! सुरळीत चालू असलेल्या मोर्चात अचानक गोंधळ/हिंसा (जी सरकारच्या मते शिक्षकांनी नव्हे तर भाडोत्री गुंडानी केली) झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. इथे आधीच हिंसात्मक आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे चर्चेचाच मार्ग पहिला असणं स्वाभाविक आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि इथेही आधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडून दंडुकाप्रसाद द्यायला हवा होता म्हणजे मग सरकार निर्भीड आहे असं सिद्ध झालं असतं?

अनुप ढेरे's picture

25 Oct 2016 - 5:52 pm | अनुप ढेरे

तोडफोड तोडायची म्हणून ही मांडवली? ही आपल्या फेल्युअरची कबूली आहे.

पैसा's picture

25 Oct 2016 - 6:00 pm | पैसा

आपल्याच पोलीस आणि न्यायसंस्थेवर अविश्वास का?

उदया कुणीही पाठीराख्यांच्या बळावर राज्याला/शहराला वेठीस धरेल .
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो.

पैसा's picture

25 Oct 2016 - 4:59 pm | पैसा

हा घ्या घरचा आहेर. मुख्यमंत्री कसे बरोबर सांगणार्‍यांनी आता पर्रीकरांना पण द्या शिव्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/army-donation-voluntary-no...

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 5:30 pm | श्रीगुरुजी

हरीदासाची कथा मूळपदावर! अनेकदा सांगितले आहे. वाटाघाटी किती कोटी द्यायचे यासाठी नव्हत्याच.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 5:54 pm | संदीप डांगे

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 6:03 pm | श्रीगुरुजी

तेच तेच लिहायचा आता कंटाळा आला आहे.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 6:13 pm | संदीप डांगे

अपेक्षित प्रतिसाद!

म्हणे प्रतिवाद करा.... लोल!

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 10:55 pm | श्रीगुरुजी

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!

बलाचा प्रयोग करण्याआधी वाटाघाटी, चर्चा इ. च्या माध्यमातून वादावर तोडगा काढणे हे लोकशाहीचा मुडदा पाडणे नसून लोकशाहीला धरूनच आहे. त्याबद्दल खंत वाटण्याचे कारणच नाही. उलट शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 12:09 pm | संदीप डांगे

शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी.

^^^

केंद्रात आणि राज्यात भाजप आहेच, पाकी कलाकारांवर बंदी घालू शकतात, कोणालाच कोणती खंत राहणार नाही की कोलांट्या उड्या मारायची गरजही!

तुमचे विधान तर असे आहे की अजूनही भाजप दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे ह्यावर तुमचाच विश्वास बसलेला नाहीये, लोल!

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 1:16 pm | श्रीगुरुजी

बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा येईलच. पण मग बंदी नाही म्हणून आम्ही घेत बसणार म्हणजे तुमच्या घराला कुलुप नाही म्हणूण आम्ही चोरी करणार आणि चोरी होऊन द्यायची नसेल तर कुलुप लावा असे चोरीचे समर्थन केल्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीची सक्तीच करावी लागली तर आम्ही काय खायचे, काय ल्यायचे हे सरकार ठरविणार या टीकेप्रमाणे आम्ही चित्रपटात कोणाला घ्यायचे, कोणती भूमिका द्यायची हेसुद्धा सरकारच ठरवायला लागले अशी टीका सुरू होईल.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 1:24 pm | संदीप डांगे

=)) =))

आताही कोणी काय बघायचे हे कोणीतरी दुसरंच ठरवत आहे !!!

जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी

जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!

हा युक्तीवाद वरवर पाहता लॉजिकल वाटू शकेल, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीत असे करता येईलच असे नाही. पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अ‍ॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल. जो देश भारताचा शत्रू आहे, ज्या देशातील नागरिक भारताचे शत्रु आहेत, जो देश सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करून इथल्या नागरिकांचे प्राण घेऊन, इथली मालमत्ता उद्ध्वस्त करून भारत नष्ट करण्याचा अथक प्रयत्न करीत आहे अशा देशातील नागरिकांना इथे येण्यास अधिकृत बंदी नसल्याने इथे बोलावून त्यांचे खिसे भरणे याला विरोध करणे योग्यच आहे.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 2:54 pm | संदीप डांगे

सेन्सॉर आहे! पण तो मुद्दा नाहीये!

देशभक्ती दाखवायची जबरदस्ती किंवा देशभक्ती दिसणार नाही याची भीती किंवा हे दोन्ही... ;)

गणामास्तर's picture

26 Oct 2016 - 2:59 pm | गणामास्तर

पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अ‍ॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल.

भारीचं आयडिया कि एकदम. मोठ्या पडद्यावर निळे चित्रपट लागलेच्च पाहिजेत असा कुणी तरी युक्तिवाद (यशस्वी) केला पाहिजे खरा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 12:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस लोकशाहीला सन्मानाने पालखीत घेऊन मिरवलाच जातं!

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 1:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

क्लासच!!!!!!

बहुतेक वेळा मिरवले गेले नाही म्हणून आम्हीही मिरवणार नाही असं म्हणणं आहे का प्रसाद भाऊ??

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 5:43 pm | हतोळकरांचा प्रसाद

अजिबात नाही बापु! जरूर नाचावं कि पण सोयीस्करपणे नाही! उगाच पराचा कावळा करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा वगैरे जरा जास्त वाटतं!

पैसा's picture

25 Oct 2016 - 5:58 pm | पैसा

ती मोठी अचिव्हमेंट असल्यासारखे सैन्याला चार पैशे मिळाले तर बरे अशी आधी कशाला झैरात करत होते? सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी का सांगितले नाही की आपला खंडणीला विरोध आहे? (आता पर्रीकर बोलल्यामुळे हा शब्द मी अधिकृतरित्या वापरत आहे.) ते समजले मारे तडजोड घडवून आणली म्हणून आपले कौतुक होईल. आता चारी बाजूनी फटके बसले, पर्रीकारांनी तर मस्त पूजा केली असणार खाजगीत. आता तो मी नव्हेच का!

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 6:01 pm | श्रीगुरुजी

कोणी अशी जाहिरात केली?

पैसा's picture

25 Oct 2016 - 6:24 pm | पैसा

http://www.misalpav.com/comment/892286#comment-892286
http://www.misalpav.com/comment/892316#comment-892316
http://www.misalpav.com/comment/892293#comment-892293

हे सगळे तुमचेच प्रतिसाद एकदा नीट वाचून बघा बघू! त्यात मुख्यमंत्र्यानी सगळा तोडगा काढला असे तुम्ही म्हणालात ना!

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 10:40 pm | श्रीगुरुजी

वरीलपैकी एका प्रतिसादात मी लिहिले आहे की "बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले."

वरील वाक्यातून ५ कोटी रूपये मिळाले अशी फडणविसांनी किंवा मी जाहिरात केली आहे का? मी सुरवातीपासूनच हेच लिहिले आहे की रा़ज ठाकर्‍यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करणे हाच वाटाघाटींचा प्रमुख उद्देश होता. तो साध्य झाला. त्याव्यतिरिक्त ५ कोटींची देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला फलक, भविष्यात पाकड्यांवर बंदी हे त्यातून निघालेले दुय्यम मुद्दे आहेत.

रविकिरण फडके's picture

25 Oct 2016 - 5:20 pm | रविकिरण फडके

"म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो" हे खरे.
तो सोकावू नये असे वाटत असेल तर Pastor Niemoller च्या खालील ओळी लक्षात ठेवाव्या, हे बरे.
First they came for the Socialists, and I did not speak out,
Because I was not a Socialist.
Then they came for the Trade Unionists, and I did not speak out,
Because I was not a Trade Unionist.
Then they came for the Jews, and I did not speak out,
Because I was not a Jew.
Then they came for me—and there was no one left to speak for me.

झुंडशाही ही कुणाच्या, कधी, आणि कशी अंगावर येईल,
काय ठाऊक कधी तुमचाही करण जोहर होईल?

बबन ताम्बे's picture

25 Oct 2016 - 7:11 pm | बबन ताम्बे

.

साहना's picture

26 Oct 2016 - 4:30 am | साहना

सदर पास्टर महोदयांना भारतांतील भक्त मंडळींची ओळख नव्हती. इथे भक्त मंडळींना आपल्या परसांत काहीही गोंधळ झाला तरी शेजाऱ्याच्या भानगडींत नाक खुपसण्याची सवय. भाजप आणि संघाला मुस्लिम महिलांची चिंता, आपल्या हिंदूंना शाळा किंवा देऊळ चालवू देत नाहीत त्या बाबतीत डोके जमिनीत.

सध्या भाजप आपल्याच समर्थकांना ढोला प्रमाणे दोन्ही बाजूने वाजवत आहे आणि भक्त मंडळी त्याचे सुद्धा समर्थन करीत आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

25 Oct 2016 - 6:13 pm | अप्पा जोगळेकर

हैला,
पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते.
आता 'राज ठाकरे' एका चित्रपटा संदर्भात 'वर्षा' वर गेले तर ती मांडवली असते.
यावेळी पहिल्यानेच श्री गुरुजींच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 6:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 6:39 pm | संदीप डांगे

मनसे च्या ठिकाणी कोणतंही नाव टाका, चित्रपटाच्या ठिकाणी कोणताही विषय घ्या, गुंडगिरीला घाबरून एका घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे, पक्षभक्ती व विरोध क्षणभर बाजूला ठेवून विचार करावा सर्वांनी!

अप्पा जोगळेकर's picture

25 Oct 2016 - 7:20 pm | अप्पा जोगळेकर

घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे
साहेब, कसल्या लोकशाहीच्या बाता चालू आहेत. राजकारण कोणत्या थरापर्यंत बोकाळले आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी कोणताही कायदा न तोडता जनतेचे, पक्षाचे,स्वतःचे कमीत कमी नुकसान होईल असा तोडगा काढला.
राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार?
तो तर या व्यवस्थेचा दोष आहे.
व्यवस्था बदलण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. सत्तेत राहण्यासाठी 'ऐ दिल..' किंवा 'नाणिंज' सारख्या तडजोडी करणे आवश्यक आहे.
पाच कोटींच्या प्रस्तावाला माझा विरोध होता असे मुख्यमंत्री स्पष्ट म्हणत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवायचे.
शिवाय पाच कोटींची मागणी राज ठाकरेंनी केली तरीदेखील त्याचा दोष मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर का फोडला जातो ते कळत नाही.
या वाटाघाटी करत असताना त्यांनी नजिकच्या निवडणुकांसंदर्भात काही वाटाघाटी केल्या असतील तर त्यात काही गैर आहे असे वाटत नाही.
फार फार तर मुख्यमंत्र्यांनी साधन शुचिता पाळली नाही इथपर्यंत आरोप त्यांच्यावर करता येईल. पण मुख्यमंत्रीपदी बसणार्‍या माणसाला अशी साधन्शुचिता पाळता येत नाही.
माझ्या मते मुख्यमंत्र्यां साठी ही 'विन-विन' नसून 'लूज-लूज' सिचुएशन होती. म्हणजे काहीही केले तरी या क्रूतीबद्दल मार खावा लागणार हे त्यांना स्पष्ट माहीत असावे. पैकी कमीत कमी त्रास होईल असा पर्याय त्यांनी निवडला.
प्रूथ्वीराज चव्हाण किंवा फडणवीस यांच्यासारख्या चतुर आणि स्वच्छ सीएमना अशा कसरती करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अन्यथा त्यांना राजकीय आत्महत्या करावी लागेल. शिवाय नंतर एखादा बनेल माणूस त्यांच्या जागी येउन बसेल नाही का ?

पैसा's picture

25 Oct 2016 - 7:31 pm | पैसा

जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही?

त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:35 pm | संदीप डांगे

परत एकदा टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद!

दोघांच्या वादात मुख्यमंत्री का कडमडले?

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 10:51 pm | श्रीगुरुजी

जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही?

त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!

मुख्यमंत्र्यांनी यच्चयावत प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही. सुरवातीला करण जोहर व इतर काही जण राजनाथसिंगांना भेटून आले होते. त्यांनी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबतीत फडणविसांशी बोलण्यास सांगितले होते कारण राज्यातील कायदासुव्यस्थेचा प्रश्न केंद्राच्या नसून राज्याच्या हातात असतो. त्याला अनुसरूनच मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र समोरासमोर आणले. जर राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्‍या व्यक्तीची गरजच नव्हती. परंतु ते दोघेही आपल्या भूमिकेवर अडून होते.

अभ्या..'s picture

25 Oct 2016 - 11:04 pm | अभ्या..

राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्‍या व्यक्तीची गरजच नव्हती.

हायला, नावांत पण राजकारण

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 11:08 am | अप्पा जोगळेकर

जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते?
गॄहखाते फडणवीसांकडेच आहे ना.ही सेटलमेंट करुन शांतता राखता आली तर बरे, शिवसेनेला शह देता आला तर बरे, मुंबई निवडणूकीच्या वाटाघाटी करता आल्या तर बरे असा प्रयन असावा. त्यात चुकीचे काय आहे ?

जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही?
शंकेखोर लोकांनी जेव्हा वर्तमानपत्रे, समाज माध्यमे इत्यादीतून प्रश्न विचारले तेंव्हा सांगितले. आधीच एक्स्प्लनेशन देणे म्हणजे जणू काही गुन्हा केला आहे असे वाटून घेतल्यागत झाले असते.

ज्या कसल्या वाटाघाटी देवघेव करायची ती त्यांना करू देत. सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही. मला कोण विचारतोय म्हणा! खरे तर स्वतः मुख्यमंत्र्यानीच इतर दोघांशी चर्चा करायचे कारण नव्हतेच. कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते. बरे चर्चा केली तर स्पष्ट सांगायला पाहिजे होते की तुम्हा दोघाना कुठच्या खड्ड्यात जाऊन पडायचे तिकडे पडा, पण सैनिकांना यातून लांब ठेवा. आता आमच्यासारखे आलतूफालतू लोक सोडा, पर्रीकरांनी हे एक्झॅक्ट शब्द वापरले आहेत तेव्हा हे वागणे किती अश्लाघ्य आहे हे तुम्ही लोकच ठरवा.

पर्रीकरांबद्दल काय वाटेल ते इथे मिपावर बोलले गेले आहे. त्या लोकांच्या माहितीसाठी सांगते. केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री होते. तेव्हा एकदा नारायण राणेंचे आमदार नसलेले चिरंजीव गोव्यात गाड्यांचा ताफा घेऊन येत होते. प्रवेश कर भरायच्या बूथवर कर्मचार्‍यांनी त्याना अडवले आणि नियमाप्रमाणे ज्या गाड्या सिंधुदुर्गात नोंदणी झालेल्या आहेत त्या सोडून मुंबई रजिस्ट्रेशन वाल्या इतर गाड्यांसाठी प्रवेश कर भरा सांगितले. राणेंच्या ताफ्यातल्या लोकांनी लगेच गुंडगिरी करून टोल बूथची मोडतोड केली आणि तिथल्या कर्मचार्‍यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी राणे सुपुत्राला झोडून काढून आत टाकला होता आणि त्याला सोडवायला स्वतः नारायण राणेंनी येऊन जामीन भरला होता. ही एका लहान राज्याच्या मुख्यमंत्र्याची धमक.

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 12:30 pm | अप्पा जोगळेकर

सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही.
हे चुकीचेच आहे. 'देणगी द्या' असे राज ठाकरे यांनी सांगितले. सीएमने नाही. काल तर त्यांनी मी या देणगी प्रस्तावाला विरोध केला असेही सांगितले.

कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते.
फडणविसांकडे गॄहखाते सुद्धा आहेच ना.

पर्रीकर चांगले काम करतात. फक्त त्यांनी वाचाळ पणा कमी केला तर मस्तच.
प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी.
फ्डणवीसांनी मध्यस्थी केली म्हणजे फार मोठा गुन्हा केला अशा स्वरुपाच्या आरोपांना आक्षेप आहे. इतकेच.

पैसा's picture

26 Oct 2016 - 2:57 pm | पैसा

पर्रीकर वाचाळ अजिबात नाहीत. फटकळ जरूर आहेत. काही कृती न करता नुसती बडबड करणार्‍याला वाचाळ म्हणतात. पर्रीकर १० करतील आणि एक बोलतील. एक तर ते खरे बोलतात किंवा मग बोलत नाहीत. इतके खरे बोलणे नुसते ऐकायलाही बर्‍याच लोकांना सोसत नाही.

इरसाल's picture

26 Oct 2016 - 5:34 pm | इरसाल

हे मुख्यमंत्री मधे पडायचं प्रकरण, घटस्फोटातुर कौन्सिलिंगसाठी गेलेल्या पतिपत्नी सारखं नाही वाट्त ???

पैसा's picture

26 Oct 2016 - 6:17 pm | पैसा

सांभाळा! साधारण असंच कायतरी मी म्हटलं की उद्या नवराबायकोच्या भांडणात मुख्यमंत्री पडणार का, तर गुर्जी मला म्हणले मी जामोप्यासारखे लिहिते आहे. =))

बादवे, या नव्राबायकोला घटस्फोट नको होता. 'वो' ला संसारात सामावून घेण्यासाठी नवर्‍याने बायकोला काय गिफ्ट द्यावी, का तिच्या माहेरच्याना गिफ्ट द्यावी असा काहीसा मामला होता. असं नाही का तुम्हाला वाटत? =)) =)) मग तिथे कौन्सेलर काय सांगणार? मेव्हणीला हिर्‍याचा सेट द्या आणि तिघांनी नांदा सौख्यभरे? =))

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:33 pm | संदीप डांगे

राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार?

^^ आप्पा, तुम्ही नक्की काय बोलताय हे लक्षात येतंय काय?

राज ठाकरे ताकदवान आहेत व तेही मुख्यमंत्री ह्या पदापेक्षा?
मग सारा कारभार राज ठाकरे का चालवत नाहीत? किंबहुना इतका ताकदवान माणूस राज्यात सत्तेवर का नसावा?

एखादी व्यक्ती ताकदवान आहे हे म्हणतांना तुम्ही सांप्रत सरकारला कमकुवत म्हणत आहात चक्क! आताच्या सरकारचे हात मागच्या सरकारने बांधलेत का?

राष्ट्रवादीवर, पवारांवर ते किती क्षुद्र आहेत अशी हिरीरीने मांडणी करणारे आज बस फडणवीस अडकलेत म्हणून राज ठाकरेला खूप महत्त्वाचा, डेंजर वगैरे सिद्ध करण्यात टंकनबळ घालवत आहेत,

आधी संताप येत होता आता हसू येतंय...

अप्पा जोगळेकर's picture

25 Oct 2016 - 9:56 pm | अप्पा जोगळेकर

राज ठाकरे मुख्यमंत्रीपदापेक्षा ताकदवान आहेत, सांप्रत सरकार कमकुवत आहे, आताच्या सरकारचे हात बांधलेत असे मी कुठेच लिहिले नाही.ते कदाचित तुम्ही ठरवून टाकले असेल.
मी फक्त ते म्हणजे राज ठाकरे ताकदवान आहेत इतकेच लिहिले.
कोणत्याही पक्षाच्या राज्य सरकारला दखल घ्यावी लागते इतके उपद्रव मूल्य आहे म्हणून ताकदवान.
सत्ता मिळवण्याइतके बलवान नव्हेत.
बाकी राष्ट्रवादी, पवार आणि फडणवीस ही तुलना उचित नाही.
पवारांना फडणविसांइतकी राजकीय उंची गाठणे अशक्य आहे.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 10:02 pm | संदीप डांगे

चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल,

काय राव बोलताय? आपली विधानं परत एकदा वाचून बघा, नक्की काय अर्थ निघतोय,

राज ठाकरेंना अटक झाली होती तेव्हाचे वातावरण आठवत असेल... ते तेव्हा होतं आता नाही.

सुबोध खरे's picture

26 Oct 2016 - 9:40 am | सुबोध खरे

डांगे अण्णा
आपला मुद्दा सिद्ध करण्याच्या नादात एका राजकीय पक्षाला आपण फक्त गुंडांचा गट म्हणुन ठरवून मोकळे झालात. आजही या पक्षाचे विविध महापालिकांत सव्वाशे च्या वर नगरसेवक असतील. मागच्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला परंतु त्यांच्या अगोदरच्या निवडणुकीत १३ आमदार होते.
तेंव्हा चार पाच हजार गुंड हाताशी धरून हि भाषा अति होते आहे असे वाटते.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 10:45 am | संदीप डांगे

'फक्त गुंडांचा गट' हे माझे नव्हे, तुमचे शब्द आहेत.

आपले शब्द दुसऱ्यांच्या तोंडी कोंबून फार मोठा तीर मारला असे वाटून घेण्याचा नाद अनेकांना लागलाय, तुमच्यासारखे सुविद्य लोकही त्यात सामील होतात हे बघून सखेद आश्चर्य वाटले.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 10:30 am | हतोळकरांचा प्रसाद

ते तेव्हा होतं आता नाही.

हे कशावरून ठरवता बुआ तुम्ही? मला वाटतं खरंच गल्लत होतेय, तुमचा वैयक्तिक विरोध आणि मनसेची खरी ताकद यात! साहेब आज हि राज ठाकरेंचं भाषण सर्व माध्यमे बाकी सगळं बाजूला सारून थेट प्रक्षेपित करतात! प्रत्येक वेळेला मतदान आणि निवडून आलेल्या लोकांची संख्या हेच एकमेव गणित नसतं हे सांगण्याची गरज आहे का? या हिशेबाने आठवलेंना तर राजकारणातून संन्यासाच घ्यावा लागला असता!

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 11:13 am | अप्पा जोगळेकर

चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल
मुख्यमंत्री जेरीस आले असे तुम्हीच ठरवून टाकले त्याला काहीही आधार नाही. माझ्या मते करण जोहर चित्रपट रिली व्हावा यासाठी आणि राज ठाकरे काहीच वाटाघाटी कशा होत नाहीत यासाठी जेरीस आले होते. त्याचा फायदा मुख्यमंत्र्यांनी करुन घेतला. त्यात काहीच चूक नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 10:46 pm | श्रीगुरुजी

म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!

प्रत्येकाचं वेगवेगळं दुखणं आहे. आपला नेहमीचा मुद्दा आपण उचलण्याच्या आतच मनसेने यशस्वीपणे पळविला व मनसे त्याचा निवडणु़कीत फायदा घेईल हे शिवसेनेचे दुखणं. तर फडणविसांनी वाटाघाटी केल्याने तोडफोड, दंगे टळले व त्यामुळे फडणविसांना धारेवर धरण्याची संधी गेल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं दुखणं. तर कलेला, कलाकारांना देशाचं, सीमेचं बंधन नसतं असा फुटकळ व संतापजनक प्रतिवाद करून पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 3:00 am | शब्दबम्बाळ

<पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.>
वा वा!! सुंदर भाषा... आपल्यापेक्षा वेगळे मत असणे म्हणजे गुन्हाच नाही का??
मग काय म्हणताय, पाठवायचय का त्यांना पाकिस्तानला? का कोणी तशी मागणी करेपर्यंत थांबायच म्हणता??

कायद्याचे राज्य आणण्याची अपेक्षा असलेल्या एका तरुण मुख्यमंत्र्याने आपली जबाबदारी हटकून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकां बरोबर वाटाघाटी करून आपल्या पदाचा आणि जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला हे दुखणं सुद्धा आमच्या सारख्या अनेकांना आहे. उद्या मुंबईत इस्लामी गुंड प्रभावी झाल्यानंतर मुख्य मंत्री असल्या वाटाघाटी करून "१००% हिजाब नको पण हिंदू मुलींनी किमान केस तरी झाकावेत" असा तोडगा काढतील. आणि भक्त मंडळी "इस्लामी गुंडापासून होणारी हिंसा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुसुद्देगिरीने कशी टाळली" ह्याहूची हरिकथा सांगत बसतील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 12:35 pm | हतोळकरांचा प्रसाद

एकूणच जनतेच्या मतांचा खूप आदर करता तर तुम्ही. म्हणूनच जनतेच्या मतांवर अधिकृत बनलेल्या आणि अजूनही जनप्रतिनिधी बाळगून असणाऱ्या पक्षाचा उल्लेख तुम्ही वारंवार फुटकळ गुंडांचा पक्ष असा करत आहात. बाकी तुमची उदाहरणे मात्र फक्त तुमचा मुद्दा पुढे रेटण्यासाठीची आहेत असं मला वाटतं. असे झाले तर तसे झाले तर... बरेच काही झाले तर बरेच काही होऊही शकते. सद्यपरिस्थितीत तरी तसे काही घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यानी चर्चेने प्रश्न सोडवला (मूळ प्रश्न सुटलाय कि नाही माहित नाही, कारण अजून हि काही चित्रपट रांगेत आहेत आणि श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत) म्हणून उद्या राज्यात बेकायदेशीरपणा बोकाळणार असे म्हणणे हा "क्राय फाऊल" वाटतो.

पुंबा's picture

26 Oct 2016 - 1:23 pm | पुंबा

श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत

हे खोटे आहे असा खुलासा स्वतः बेनेगलांनी केला आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 5:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओह्ह! आय इट माय वर्ड्स देन! त्या नारायण कि काहीतरी नावाच्या दिग्दर्शकाने तसं म्हटल्याचा विडिओ आला होता मध्ये त्यावरून माझं तसं मत होतं. तसं नाही घडलं तर छानच!

ज्योति केंजळे's picture

25 Oct 2016 - 7:09 pm | ज्योति केंजळे

"मातोश्री"
अप्पा लीहा बघु १०० वेळा ;)

ट्रेड मार्क's picture

25 Oct 2016 - 11:09 pm | ट्रेड मार्क

तुम्ही "लिहा" लिहा बघू १०० वेळा ;)

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:18 pm | संदीप डांगे

पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते

^^^

आप्पा, डिटेल्स प्लिज...!

गणेश उमाजी पाजवे's picture

26 Oct 2016 - 9:42 pm | गणेश उमाजी पाजवे

खालील लिंक पहा http://www.dnaindia.com/mumbai/report-pawar-and-thackeray-talked-cricket...यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंना भारत-पाकिस्तान म्याच साठी भेटल्याची स्पष्ट बातमी आहे.

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 7:46 pm | गामा पैलवान

पैसाताई,

एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्‍याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.

साफ चूक ! इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार?

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

25 Oct 2016 - 7:58 pm | पैसा

खरेच वाचवले? का सगळी स्टंटबाजी नुसती? बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही? मग तसे असेल तर पोलिसांच्या वाईट अवस्थेला इतर राजकारण्यांइतकेच तेही जबाबदार आहेत.

मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो? सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे? त्याना फ्री हँड द्या आणि मग बघा काय होते ते. आपल्याला वाचवणार्‍या राजला पोलीस अटक करणार नाहीत असे व्हायला ही काही मोगलाई नाही. मग आरोपी कोणी सोम्या गोम्या असो की कोणी तथाकथित मोठा माणूस. जो आदेश असेल तो पोलीस पाळतीलच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 9:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

स्टंटबाजी होती की नाही हे एखाद्याच्या पूर्वग्रहदूषित विचारांवर अवलंबून नसेल काय? मला नाही वाटत ती स्टंटबाजी होती..बाकीच्या पक्षांना त्या गोष्टीची दाखल घ्यावी वाटली नाही. आणि आता ते पोलिसांकडून कसली बुआ वसुली करत आहेत? त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा रोख जाहीर केला होता आणि त्यासाठी तरीही कायदेशीर कारवाई करू नका असा सांगीतल्याचं ऐकिवात नाही.

इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार?

या गामा पैलवान यांच्या विधानावर मी प्रश्न विचारलाय. आता क्लिअर आहे ना? वाचवण्याची किंमत म्हणून पोलीस राजला पकडणार नाहीत असा पैलवान यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो ना? त्यापलिकडे मी एक अक्षरही बोललेले नाही. राज ठाकरे काय म्हणाले का म्हणाले नाहीत हे इथे कुठून काय आले?

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 7:54 am | हतोळकरांचा प्रसाद

ओके,क्लीअर! पण इथे पोलीस हा मुद्दाच नाही आणि त्यांना मोकळीक देण्याचा तर आणखीनच नाही. त्यांची भूमिका आंदोलनानंतर आली असती आणि मला वाटतं ती त्यांनी नक्कीच पार पाडली असती.

महाराष्ट्र पोलीस म्हणजे वस्त्र हरण होणारी द्रौपदी आहे का ? मग देवेंद्र काय डोळ्यावर पट्टी बांधणारे धृतराष्ट्र आहेत ?

पोलिसांना वाचवायची जबाबदारी १ आमदार असलेल्या ठाकरे पक्षावर आहे तर मुंबईची आणि महाराष्ट्राची परिस्तिथी कठीण आहे.

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 7:50 pm | गामा पैलवान

भक्त प्रल्हाद,

कोणापासुन? मनसे पासुन?
हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?

पोलिसांचा जीव कोणामुळे धोक्यात आहे ते इथे पाहायला मिळेल : http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2016/10/14215945/Court-Order-...

संजय राठोड आणि पंढरीनाथ माळी जिवंत आहेत का मेलेत ते तरी कोणी सांगतोय का? राज ठाकऱ्यांच्या नावाने शिमगा कशासाठी?

आ.न.,
-गा.पै.

हुप्प्या's picture

25 Oct 2016 - 8:20 pm | हुप्प्या

सिनेमा हे मनोरंजनाचे साधन आहे. ते निवांतपणे, आनंदी वातावरणात बघण्यातच लोकांना स्वारस्य असणार. राज ठाकरेशी पंगा घेऊन, त्याच्या नाकावर टिच्चून समजा मुख्यमंत्र्यांनी तमाम थेटरांना कडेकोट संरक्षण दिले, तर अशा बंदूकधारी लोकांनी वेढलेल्या थेटरात, अत्यंत तंग वातावरणात सिनेमा बघायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येतील का? उगाच कशाला लफड्यात पडा? असा विचार करुन घरीच बसणारे जास्त असणार. "जेव्हा डीव्हीडी येईल तेव्हा पाहू" किंवा "वातावरण निवळल्यावर पाहू" असेच बहुतांश लोक ठरवणार. सिनेमा ही काही तळहातावर शीर घेऊन पहायची गोष्ट नाही!

पंगा घेतला तर धंद्याचे वांधे होणार हे ओळखून करण जोहरने तडजोड करायचे ठरवले असणार. मला वाटते सिनेमासारखे क्षेत्र जे निव्वळ लोकप्रियतेवरच चालते त्यांना हे करावेच लागणार.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 9:47 pm | संदीप डांगे

काय गम्मत आहे बघा, राज ठाकरे 'पाकिस्तान कलाकार विरोधी जनभावना' त्यांच्यासोबत आहे ह्या गृहितकातून आंदोलन करण्याची धमकी देतात,

कसले आंदोलन तर एक चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचे, प्रदर्शित झाला तर लोक बघतील आणि निर्मात्याला पैसे मिळतील, हा सैनिकांचा अपमान आहे असं त्यांचं म्हणणं,

जर जनभावना ह्यांच्या सोबत आहे तर मग चित्रपटगृहात सिनेमा बघायला नक्की कोण जातंय?

फडणवीस नक्की कोणत्या जनभावना सांभाळत आहेत?

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 10:04 pm | संदीप डांगे

इतका पोकळ युक्तिवाद चाललाय, असो.

राम राम! रजा घेतो.

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 11:21 pm | सुज्ञ

नक्कीच रजा घ्या . कितीही निरर्थक बोललात आणि स्वतः ची खळखळ बाहेर काढलीत तरी जितके जास्त बोलाल तितके अजूनच अडकत जाल आणि व्यक्तिगत व्हाल. कारण १. मुख्यमंत्र्यांनी योग्य मार्ग निवडून प्रश्न सोडवला आहे , २. सर्वाना संरक्षण देण्याचे कायम मान्य आहे , ३. त्यांनी स्वतः कोणतेही पैसे मागितले नाहीत अथवा ठाकरे जे म्हणतात त्याला त्यांचे कुठलेच समर्थन नाही ४. मुख्यामंत्र्यांचे याला समर्थन आहे असे राज ठाकरेही कोठे म्हणाले नाहीत.५. बोलावलेली चर्चा घटनाबाह्य नियमबाह्य नाही. हे सर्व सडेतोड मुद्दे आहेत.
या व अनेक मुद्यांवर उगीचच ठाकरे मोठे झ्हाले काय , त्यांची ताकद मोठी झ्हाली का , घटनादत्त पदापेक्षा कोण मोठे वगैरे बालिश युक्तिवाद करून स्वतःचे हसे करून घेऊ नका . राज ठाकर्यांनी आंदोलन चालू केले म्हणून त्यांचे नाव आले इतकेच. ६१ आमदारांच्या पक्षाने हे केले असते तर त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी चर्चेस बोलावलेच असते . असो .आपला राज ठाकर्यांना अवाजवी महत्व मिळाल्यामुळे आलेला राग आम्ही समजू शकतो त्यावर "राज ठाकरे एक सत्य" असा एक्सपिरियंसी धागा काढा आणि चर्चेस विराम द्या. धन्यवाद.

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 2:53 am | शब्दबम्बाळ

मला पडलेले काही प्रश्न मी वरती विचारले आहेत, त्याची कृपया उत्तरे द्याल का??

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 11:54 pm | गामा पैलवान

पैसाताई,

१.

मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो?

२००६ साली भिवंडीत घांगुर्डे आणि जगताप या पूर्णपणे निरपराध पोलिसांना जाळून आणि गळे कापून ठार मारण्यात आलं. काय कारवाई झाली त्या धर्मांधांवर? तरीपण २००८ साली तुकाराम ओंबळे जिवावर उदार झाले हे त्यांचं वैयक्तिक शौर्य आहे. शासनाकडून कसलाही पाठींबा नाही. परत लिहितो, २६/११ ची चौकशी दडपण्यात आलेली आहे. हे माझं मत नसून हुतात्मा अशोक कामते यांची वीरपत्नी विनिता कामते यांचं मत आहे.

भेकडकसाबला जिवंत पकडलं म्हणजे पोलीस सुरक्षित आहेत असा अर्थ निघंत नाही.

२.

सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे?

पोलीस हतबल आहेतंच. महिला पोलिसांची अब्रू दिवसाढवळ्या राजरोस लुटली जातेय आणि त्याबद्दल साधी बातमीही येऊ नये? प्रत्यक्ष आयुक्त अरूप पटनायक दंगेखोरांना मोकळं सोडतोय. पोलिसांना जाळून ठार मारण्यात येतंय आणि तुम्ही विचारताय की ते हतबल कसे? वस्तुस्थितीपासून इतकी फारकत घ्यायची? हस्तिदंती मनोरा सोडा आता.

३.

बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही?

हे असंबद्ध विधान आहे. कोण कसली किंमत पोलिसांकडून वसूल करतोय म्हणताहात तुम्ही? चालू प्रकरणाचा पोलिसांशी काडीमात्र संबंध नाही. जर राज ठाकऱ्यांना अटक व/वा अटकाव करायचा ठरवला असता तर आणि तरंच पोलिसांचा हस्तक्षेप झाला असता. नेमका तोच होऊ नये म्हणून फडणवीस आटापिटा करताहेत.

आ.न.,
-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

26 Oct 2016 - 12:10 am | ट्रेड मार्क

इथे पोलीस काय व किती करू शकतात हा प्रश्नच नाहीये/ नसावा. पोलीस दंगे हाताळायला १००% सक्षम आहेत तरी पण दंगे झाले की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आलंच. दंगेखोरांबरोबरच निरपराध नागरिक तसेच पोलीस सुद्धा जखमी होऊ शकतात. हे यापूर्वी झालेल्या कित्येक आंदोलनात सिद्ध झालेलं आहे. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला असावा.

सध्याची एकूण पार्श्वभूमी बघता म्हणजे आरक्षणाच्या मागण्या, विविध मोर्चे, खुसपट काढायला तयार असलेले विरोधक ईई मुळे मुख्यमंत्र्यांनी अजून एका चित्रपट प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून वाद आणि दंगे नको अशी भूमिका घेतली असावी. मुख्यमंत्रांनी ५ कोटी द्यावेत असा प्रस्ताव ठेवलेला नाही. राजने केलेली ही मागणी आहे आणि जी KJ ने मान्य केली. आता यात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पार्टीज मान्य असताना स्वतः नाही म्हणणे म्हणजे सुटत आलेला तिढा परत वाढवणे झाले असते. जर का आतबट्याचा व्यवहार करायचाच असता तर हा ५ कोटींचा मुद्दा जाहीर केलाच नसता. परस्पर व्यवहार झाले असते व तुम्हाआम्हाला पत्ता सुद्धा लागला नसता. त्यातूनही आतबट्ट्याचा व्यवहार झालाच नसेल असं पण नाही, पण ते सिद्ध होण्यासाठी पुरावे नाहीत.

त्यातून याला खंडणीचे स्वरूप देणे ही चाल ज्याने कोणी खेळली ती यशस्वी झाली म्हणायची. सध्या परिस्थिती अशी आहे की काहीही केलं तरी ते कसं चूक आहे हे सांगायला कोणीतरी पुढे येतंच. त्यातून परिस्थिती, वाक्य, शब्द तोडूनमोडून वा सरमिसळ करून दाखवण्यात बरेच लोक्स वाकबगार झालेत.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 12:59 am | संदीप डांगे

जाताजाता:

बापूसाहेब,

जाऊद्या, काही लोकांचे सुसंस्कृतपणाचे नियम आयडी बघून ठरतात, 'लोक भुंकतात' असे म्हटले की भुकम्प होतो पण 'कोल्हेकुई, गरळ ओकणे' हे शालीनतेचे लक्षण, मोदी, वाजपेयींबद्दल वाईट लिहिणे ब्रह्महत्या पण केजरीवालला थेट शिवीच म्हणणे सुसंस्कृत.

इथे आत्ताच एक टेराबाईटी लिहून इतरांच्या सुसंस्कृतपणाचे माप काढण्याचा प्रयत्न करणारे विद्वान, त्यांचा माझा काहीही संबंध नसताना 'मी माझ्या आईबद्दल लैंगिक भावना ठेऊन आहे' असा स्पष्ट आरोप करून मोकळे झाले होते, अजूनही तो प्रतिसाद तिथेच असेल, मी काही स्क्रीनशॉट घेत नाही कि एक्सेल मेंटेन करत नाही, तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती,

------------

असो.

हे स्वसंवादातले किंवा व्यनीतले चुकून इथे आले काय..?

सुज्ञ's picture

26 Oct 2016 - 1:39 am | सुज्ञ

अवघड आहे

अभिदेश's picture

26 Oct 2016 - 2:53 am | अभिदेश

फारच विनोदी प्रतिसाद..

दुसर्‍याने तुमच्या कपड्यावर चिखल फेकला तर 'हा बघा कपड्यावर चिखल आहे' असे लोकांना दाखवत फिरायचे असते का ?
एका फडतूस चर्चा. त्याकरता एवढ संतापून स्वतःचा आब घालवण्याची काय गरज आहे.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 12:04 pm | संदीप डांगे

चिखल फेकणारा 'मी कित्ती सुंसंस्कृत' असा बोभाटा करत गावभर हिंडत असेल तर त्याला त्याची खरी ओळख करून द्यावी लागतेच!

बाकी, तुम्हाला काय अर्थ काढायचे ते तुम्ही काढा!

अर्धवटराव's picture

26 Oct 2016 - 3:32 am | अर्धवटराव

या धाग्यावर इतकं दळण कांडण चाललय अजून ?? तिकडे बिचारा सायरस मिपाकरांच्या अमुल्य मदतीकडे आशेने बघतोय... कसं होणार मिपाचं...

१) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा.
२) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा.
३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात.
४) इतक्या सोप्या भांडवलावर एकमेकांची पार ऐसीतैसी करून मिपाकर आपली दिवाळी साजरी करतात.

मजा आहे.

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2016 - 7:50 am | बोका-ए-आझम

ते इथल्या यच्चयावत स्वघोषित राजकीय पंडितांना समजलं नाही. माझं मत फडणवीसांनी चूक केली असं जरी असलं तरी तुमचं हे विश्लेषण पटण्यासारखं आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 8:08 am | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज यांची राजकीय अपरिहार्यता होती आणि करणची व्यावहारिक. आणि त्यातून वाईट काहीही घडले नाही असे मला वाटते. पण काही लोक असा आव आणत आहेत की सगळे कायदे पायाखाली तुडवून काहीतरी जगावेगळं करण्यात आलं. मला वाटतं भारतीय राजकारणाचा आणि राजकारण्यांचा पूर्वोतिहास पहिला तर हे अजिबात अयोग्य नाही. पण असो, सध्या मोदींविरोध (आणि राजविरोधही) इतका उत्स्फूर्त असतो की काहीही केलं तरी ठोक पडणारच आहे.

सुबोध खरे's picture

26 Oct 2016 - 9:45 am | सुबोध खरे

+ १००

साहेब..'s picture

26 Oct 2016 - 10:07 am | साहेब..

+१००

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 11:38 am | कैलासवासी सोन्याबापु

पहिले म्हणजे पूर्वोतिहासात जे झाले ते आत्ता विरोध करणाऱ्यांना मंजूर होते हा निष्कर्ष कसा काढलात?? सगळे जरी नाही तरी बरेच कायदे आधीही पायदळी तुडवले गेले होते (आणीबाणीत तर सगळेच समजा) जे चूकच होते, अन आजही माफक प्रमाणात कायदेबाह्य झाले आहे काम, मध्यस्थ कोणी असावे कोणी नाही त्याच्या कंडिशन , गरज, परिस्थिती ह्यांचा पूर्ण धांडोळा घेणार मध्यस्तीचा कायदा उर्फ "लॉ ऑफ आर्बिट्रेशन" भारतात अस्तित्वात असून इच्छूकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. त्या उपरही जर ठाकरे अन फडणवीस बिचारे वगैरे वाटत असले तर सोडून द्या. फडणवीस जिथे उत्तम काम करतायत तिथे कौतुक करायलाच हवे, मराठा मोर्चाला त्यांनी जितके संयतपणे हँडल केले ते स्तुत्यच होते, फक्त इथे खेळी चुकली, अन त्या चुकलेल्या खेळीवर टीका करायचा हक्क एक नागरिक म्हणून प्रत्येकाला असावा, टीका करणारा फुल टाईम राजकीय विरोधक आहे असे समजणे म्हणजे शिक्के मारणे होय.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 3:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

सोन्याबापू मी कसलाही निष्कर्ष काढला नाही आणि कोणाहीबद्दल वैयक्तिक तर नाहीच! वरील प्रतिसादांवरून जे निरीक्षण आहे ते सांगितले. बाकी आर्बिट्रेशन कायद्याचा म्हणाल तर तो व्यावसायिक तंट्यांसाठी (कमर्शिअल डिस्प्युट्स) असावा. भावनिक तंटे (सेंटीमेंटल डिस्प्युट्स) कव्हर करतो कि नाही माहित नाही. पण मुळात इथे कायद्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच कुठं आहे? इथे राज्याचा मुख्यमंत्री दोन गटांना बोलावून दोघांची बाजू बाजू समजावून घेऊन घातलेले आंदोलन स्थगित करवतो यात चुकीचं किंवा बेकायदेशीर ते काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 4:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

१. करण जौहरचं जे काही नुकसान होणार होतं, ते आर्थिक होतं का भावनिक? बरं तो स्वतः सीएम कडे गेला होता का??

२. कायद्याने मध्यस्थीथी होऊ शकली असती का? तर होय, पहिले तर मुख्यमंत्र्यांना ह्या शुल्लक भांडणात पडायची गरज नव्हती, दुसरे म्हणजे स्वतःहून बोलवायचीही गरज नव्हती, जर कैक प्रतिसाद म्हणतायत तसे की भविष्यातली हानी टाळायला जर मध्यस्थी करायचीच होती तर सरळ कोर्टाला विनंती करून परस्पर दोन्ही पार्टी रुपी बॉल कोर्टाच्या कोर्टात टाकून नामानिराळे राहून आपलीच छवी वाचवता आली असती.

ए दिल है मुश्किल ह्या चित्रपटनिमित्ताने महाराष्ट्रात झालेला वाद हा नवा नाहीये, तर असले वाद ह्या अगोदर तामिळनाडू मध्ये "कट्टी" ह्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी झाला होता, त्याच्याबद्दल जालावर वाचले जाऊ शकते, इच्छा असल्यास जरूर लाभ घ्यावा ही विनंती. जर आपण कायदाबाह्य नाही असे म्हणता आहात तर प्रथम आपण ते तसे का म्हणता आहात ह्याला समर्थनार्थ काही तर्क द्या, हि अजून एक पूरक विनंती करतो.

शांतपणे चर्चे बद्दल आभार :)

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 5:54 pm | अप्पा जोगळेकर

ते लॉ ऑफ अर्बायट्रेशन वगैरे अधिकॄत मध्यस्ठी साठी लागू होते. म्हणजे कमिशन मिळणार असेल तर. इथे कमिशन वगैरे मिळाले नाही. निदान तसे सिद्ध करता येत नाही. नोटरी पेपरवर मध्यस्थ म्हणून सीएमचे नावसुद्धा नाही. ज्या दोन पार्टीत मध्यस्थी झाली त्यांचे नाव सुद्धा नोटरी पेपरवर नाही.
शिवाय ते कोर्टात जाऊन स्वतःची छबी वाचवणे वगैरे भानगडीत जनतेचे नुकसान व्हायचे ते झालेच असते.
स्वतःच्या छबीची पर्वा न करता जनतेच्या,पक्षाच्या, स्वतःच्या हिताचा निर्णय घेतला म्हणून त्यांना मार्कच द्यायला पाहिजेत.
हे वर्तन कायदाबाह्य आहे असे म्हणता तर त्याच्या समर्थनार्थ काही तर्क मिळाले तर आमच्या माहितीत भर पडेल. म्हणजे ते कोणत्या सेक्षन अन्वये कायदाबाह्य आहे वगैरे.
आणि जर हे भांडण इतके क्षुल्लक होते तर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली या कॄतीला मुख्यमंत्र्यांनी एखादा गुन्हा किंवा घटनाबाह्य वर्तन केले अशा पद्धतीने का झोडपले जात आहे.

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 6:00 pm | अप्पा जोगळेकर

मला खालील व्याख्या सापडली.
Any commercial matter including an action in tort if it arises out of or relates to a contract can be referred to arbitration.
इथे सरळ सरळ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सौदा असा शब्द आहे.
त्यामुळे हा कायदा प्रस्तुत केसमधे गैरलागू असावा असे वाटते.

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Oct 2016 - 11:13 am | श्री गावसेना प्रमुख

आपले फुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाउ शकणार्‍या लोकांना बीजेपी ने केलेली विधायक कामे का दिसत नसावी बरे,तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 1:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्यात पुरोगामित्वाचा काय अन कधी संबंध आला?? मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडायला नको होता, इतका साधा मुद्दा आहे, त्याला सहमती अगदी भाजप समर्थक मित्रांनी सुद्धा दर्शवली आहे, मग आता एका मुद्द्याला विरोध केला म्हणून ते पण फुरोगामी झाले का काय?

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Oct 2016 - 2:31 pm | श्री गावसेना प्रमुख

शरद पवारांनी शशांक मनोहर ह्यांच्या सोबत ऑस्ट्रेलियन खेळाडुंसाठी बाळासाहेबांची भेट घेतली होति तेव्हा पवारांनी नव्हता का चुकीचा पायंडा पाडला.

पुंबा's picture

26 Oct 2016 - 6:18 pm | पुंबा

तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.

हो.. हे अत्यंत अवघड आहे. विशेशतः द हिंदूने आपला दर्जा खूप कसोशीने टिकवला आहे. त्यांचे रिपोर्टर्सचे जाळे, कॉन्टॅक्ट्स, अतिशय विद्वान सदरलेखक(काही बायस्ड डावी मंडळी वगळता) हे जबरदस्त समीकरण आहे, त्यामुळे त्यांची एडीटोरियल मते कितीही एकांगी वाटली तरी हिंदूची बातमी म्हटलं की विश्वासार्ह वाटते, ती विश्वासार्हता दुसर्‍या कुठल्या वृत्तपत्राला मिळाली नाही असे वाटते.

(अता मीच काकु टाकल्याने धाग्यावर येणे अनिवार्य आहे)

हा तुमचा मूळ प्रतिसाद (९०% पर्यंत वस्तुस्थीतीला धरून आणि तर्कसंगत आहेच)

१) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा.
२) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा.
३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात.

माझे चार पैसे (ही वयक्तीक माझी मते आहेत ती सगळ्यांना मान्य्/दुजोरा देण्या लायक घ्यावीत असे नाही)

फडणवीसांना या निर्णयाचे संभाव्य (अपप्रचार आणि माध्यम मोडतोड अनुभव लक्ष्यात घेता ) काय होणार हे राजकीय परिपक्वतेने माहीत होते तर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राजच्या तोंडून आंदोलन मागे घेण्याची,करणच्या तोंडून स्वयंस्फुर्तीने सैनीक मदतनिधीची आणि निर्माता संघाकडून नैतीकतेच्या मुद्द्यावर पुन्हा पाक कलाकार न घेण्याची घोषणा करणे क्रमप्राप्त होते.
शेवटी हा निर्णय वजा मध्यस्ती तोडगा मी शांततेसाठी आणि लोकभावनेचा आदर म्हणून व दोन्ही बाजूंच्या मागणीवरून केला आहे असे जाहीर करणे (धोनी फिनिशींग टच ९७ धावा गंभीरच्या,कोहली ४८,पण लक्ष्यात धोनीचा फटका, ही उपमा खास श्री गुरुजींसाठी)

नेमके हेच टाळावे म्हणून मोदींनी संवेदन्शील विषयाबाबत सर्व राजकीय पक्ष्याच्या मातब्बर नेत्यांना बोलावून देशाच्या सुरक्षेबाबत कल्पना दिली आणि पुढचा (गणंगाचा अपवाद वगळता) अपप्रचार खुबीने टाळला.

खरे तर या तोडगा चर्चेत आवर्जून अगदी शिवसेना नेत्याला व राष्ट्रवादी,आणि इं कॉ नेत्यालाही बोलावले असते तरी चालले असते.मुख्यमंत्री फक्त राज ठाकरेंनाच महत्व देतात असे चित्र झालेच नसते.(ते किती महत्वाचे आहेत हा वेगळा चर्चा विषय आहे)

सगळ्यांसमोर पत्रकार परिषद झाली असती तर मुख्यमंत्र्याने असे खुलासे देत बसावे लागले नसते (अशी चतुराई करण्याची सुवर्णसंधी फडणवीसांनी घालवली असे माझे प्रामाणीक मत आहे)
एकीकडे मराठी मोर्च्याचे आयोजक चर्चेस येण्यास तयार नाहीत पण त्यांच्या वतीने निलेश राणे ईशारा मात्र देत आहेत तेंव्हा फडणवीसांनी चर्चेस आलात तर काहीतरी सकारात्मक नक्कीच घडते असा निर्भेळ संदेश दिला गेला असता.
(फडणवीस काही चुकीचे वागले असतील तरीही त्यांची पाठराखण करण्याइतका झापडबंद विचार मी नक्कीच करू शकत नाही, जे सत्ता स्थापनेच्या वेळी अपरिपक्व वर्तन सेनेने केले तेच अता फडणविसांनी केले इतकेच मी म्हणेन आणि हे माझे ठाम मत आहे०)

प्रचेतस's picture

26 Oct 2016 - 12:15 pm | प्रचेतस

प्रतिसादाखाली तुमची सही नसल्याने हा प्रतिसाद बाद धरणेत येत आहे.

-
प्रचेतस (कार्यकारी अध्यक्ष, नाखु फ्यान क्लब)

नाखु's picture

26 Oct 2016 - 12:35 pm | नाखु

नंतर सही जोडण्याची काही व्यवस्था/तरतूद आहे काय?

खुलाश्यातील खलाशी नाखु

अभ्या..'s picture

26 Oct 2016 - 12:38 pm | अभ्या..

तर्तूद आहे की,
किती देणार निधीसाठी?

नाखु's picture

26 Oct 2016 - 12:41 pm | नाखु

सांगणार नसाल तर नक्कीच देऊ. अपेक्षीत व्यनीत पाठवणे (उगा पत्रकार परिषद बोलवू नै)

सुमडीतला नाखु

छ्या, मला वाटले "निधी देतो पण पत्ता द्या" असे काही म्हणाल!!

म्हणून ही चाचपणी केली.

पक्षातल्याच कार्यकर्त्याकडून निधी का मागीतला गेला याच धक्क्यातून अजून न सावरतो तोच हा पत्ता मागणे म्हणजे फार थोर वगैरे.

किलवर सत्ती नाखु

अर्धवटराव's picture

26 Oct 2016 - 9:06 pm | अर्धवटराव

तुम्ही म्हणताय तो एंगल आहेच या घटनेला. संभाव्य राजकीय परिणामांची गोळाबेरीज करण्यात मुख्यमंत्री चुकले काय हा निराळा मुद्दा आहे. माझं म्हणणं इतकच, कि हे सेटलमेण्ट एक सामान्य, सर्वमान्य आणि सरळधोप घटना आहे. यात कायद्याची दलाली, घटनाबाह्यता, बेकायदेशीर घटना, चुकीचे पायंडे वगैरे सारखं अजीबात काहि झालं नाहि.

मिपाकरांचं एक आगळं (थोडं विचीत्र) रूप प्रकटलं या धाग्यावर. त्याचं थोडं आश्चर्य वाटलं मात्र :)

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 2:48 pm | श्रीगुरुजी

हा लेख सुद्धा चांगला आहे.

http://www.pudhari.com/news/rajniti/94840.html

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 2:57 pm | शब्दबम्बाळ

या बातमीमध्ये चांगले विश्लेषण दिलंय!

"स्पष्ट होते ते हेच की, केंद्रातून चित्रपटाला बंदी नाही म्हणायचे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा चालू ठेवायचा, केंद्रीय मंत्र्यांकडून मनसे हा गुंडांचा पक्ष आहे असे बोलवून घ्यायचे आणि इकडे राज्यात कायदा, न्यायालय, संविधान न मानणाऱ्या राज यांच्याशी खलबते करायची अशी दुटप्पी भूमिका भाजपने घेतली. तसे पहिले तर पूर्वी झाल्याप्रमाणे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकरवी शेलक्या शब्दात राज यांच्यावर शब्दांचे अस्त्र सोडता आले असते. परंतु भाजपने शेलार यांना शांत बसविले. ‘मनसे’ आणि राज यांना सूट दिली. १२ मनसेच्या कार्यकर्त्यांची दिखाऊ धरपकड केली. चित्रपट संघटनेने राज यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने राज किती देशभक्त आणि मुंबईत किती प्रभावी आहेत हे ‘मनसे’पेक्षा भाजपला जास्त दाखवायचे होते. शिवसेनेला या प्रकरणामध्ये बघ्याची भूमिका घ्यायला लावून भाजपने एका दगडात दोन-तीन पक्षी मारले."

आता चुकीच्या गोष्टींना कोणी विरोध केला कि लगेच ते सगळे लोक "फुरोगामी" वगैरे होणार असतील तर असो मग!
केवढी ती पक्षनिष्ठा!
(अवांतर: सत्ताबदल होण्यासाठी मी हि बराच लांबचा प्रवास करून भाजपा ला मतदान केलं होत बर का! पण इतका 'कट्टर' नाहीये मी, कुठल्या पक्षासाठी ते पण!)
मग नेहमीची कारण सुरु होतात "आधी असे तसे झाले होते त्या वेळी तुम्ही कुठं होतात? आत्तापर्यंत सगळे सज्जन होते का?"

जमलंच तर वरती काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत... बऱ्याच प्रश्नांची उत्तरे वरच्या परिच्छेदातच आहेत पण अर्थातच ती चुकीची असणार! :)

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 3:03 pm | संदीप डांगे

सहमत!

सुज्ञ's picture

26 Oct 2016 - 3:44 pm | सुज्ञ

आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे.

तुम्ही सांगा पाहू...
1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता?

<<कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावो.
2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का?

<< नाही
3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे?
.
<< ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही.
4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले?

<< सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका .

5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये)

<< राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही.
6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?)

<< मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार

7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो!
<< मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही.

8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात?

<< रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे .

मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते...
<< तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे.

अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचा देखील कंटाळा आला

सुज्ञ's picture

26 Oct 2016 - 3:52 pm | सुज्ञ

माननीय श्री शब्दबंबाळ.

आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे.

तुम्ही सांगा पाहू...
1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता?

-- कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावलि

2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का?

-- नाही

3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे?
.
-- ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही.

4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले?
-- सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका .

5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये)

---राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही.

6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?)

--- मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार

7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो!

-- मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही.

8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात?

--- रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे .

मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते...
-- तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे.

अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचं देखील कंटाळा आला

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 4:19 pm | शब्दबम्बाळ

आपण किती सुज्ञ आहात ते दिसले प्रतिक्रियेवरून!! :D
चालूदे आपली पूजा...!

सुज्ञ's picture

26 Oct 2016 - 11:54 pm | सुज्ञ

मग नक्की कशी बांधली पूजा ? :D कशी वाटली ?

सुबोध खरे's picture

26 Oct 2016 - 7:24 pm | सुबोध खरे

येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट विचारताना दिसला कि कारण जोहर ने काय बेकायदेशीर केले?
उद्या समजा चार्ल्स हेब्दो सारख्या विचारसरणीच्या भारतीय माणसाने महंमदावर सिनेमा काढला (ज्यात महम्मद पैगंबरांविषयी कोणतेही अनुदार उदगार नाहीत) आणि त्याला सेन्सर बोर्डाचे सर्टिफिकेटही मिळाले. त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही? कि केवळ "प्रक्रिया" म्हणून कायद्याचा "रक्षक" होऊन मुंबईत दंगली होऊ द्याव्यात.
मिपावरील "सुजाण,निधर्मी, सुधारक किन्वा सनातनी अशा सर्व" माणसांची काय प्रतिक्रिया असेल?

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 7:50 pm | संदीप डांगे

तुम्ही धार्मिक दंगली आणि हा विषय कसा कुठे जोडत आहात हे कळले तर उत्तम!

धार्मिक दंगली व्यापक असतात, त्यांच्यावर चर्चेतूनच मार्ग काढतात, तसेच पोलीस व सैन्याची मदत घेतली जाते.

तुम्ही वरील बादरायण मुद्दा उपस्थित करून सदर घटनेविरोधात लोक का बोलत आहेत हे समजले नाही असे दाखवत आहात.

या आधीही असे विरोध झालेले आहेत, त्यावर काय झाले? वेलेन्टाइन डे , गर्ल्फ़्रेंड व वॉटर हे चित्रपट याबद्दल हिंदू संघटनांनी आंदोलने (काही वेळेस हिंसक) केली आहेत, त्यावेळी ते कसे हाताळले गेलेत ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर जरूर द्यावी.

सुज्ञ's picture

26 Oct 2016 - 11:58 pm | सुज्ञ

सुबोध काका .. मुद्दा बरोबर आहे पण चार्ली हेब्दो वगैरे खूप होतय.. उदाहरण देण्यात अतिरेक झ्हाला .. इथले वाचक मुद्दा सोडून चोथा चघळतात म्हणून म्हटले हो ..

सुज्ञ's picture

27 Oct 2016 - 12:01 am | सुज्ञ

साडीच्या पदराचा कसा चोथा चघळला . मुद्दा सोडून .. तसेच काहीसे . :)

भक्त प्रल्हाद's picture

27 Oct 2016 - 1:19 am | भक्त प्रल्हाद

त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही?

सुबोध काका अशा वेळीहि त्यांनी काय्द्याचाच मार्ग वापरावा आणि फाजिल धमक्यांना भीक घालु नये असे माझे मत असेल.

शासनाने हैदर, रश्दी, तस्लिमा, आणि हुसेन, सगळ्यांच्याच अभिव्यक्तीचा हक्क अबाधित राखावा.

सुबोध खरे's picture

26 Oct 2016 - 8:04 pm | सुबोध खरे

बेकायदेशीर आणि कायदेशीर यात फरक करायचा तर तो धार्मिक किंवा सामाजिक असा करून कसा चालेल?
तुम्हाला झेपत नसेल तर उत्तर देऊ नका. फाटे फोडू नका.