हात दाखवून अवलक्षण

नाखु's picture
नाखु in काथ्याकूट
24 Oct 2016 - 10:26 am
गाभा: 

करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.

  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.

विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला)
कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे.

काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे.

मिपाकरांना काय वाटते?

प्रतिक्रिया

विशुमित's picture

24 Oct 2016 - 10:36 am | विशुमित

इसकाळ वरील हे दोन्ही विचार पटले --

सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र, ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही.
- मनमोहन बहादूर, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त)

उत्तर कमांडचे माजी लेप्टनंट जनरल बी. एस.जैस्वाल यांनी म्हटले की, सैनिक कल्याण निधी कोणाला भीक मागत नाही. जर एखादा चित्रपट निर्माता सैनिक कल्याण निधीला योगदान देत असेल, तर त्याने अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मदत करावी. मात्र, यापद्धतीने जमा केलेला पैसा सैनिक कधीही स्वीकारणार नाही. सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करून देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘

समाज शेकडो विकृतींनी भरलेला आहेच. ही त्यातलीच एक मनोवृत्ती.
आपल्याला राग आला की आपण एक सकारात्मक गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला थोडे समाधान मिळेल.
या संस्थळावर जाऊन आपण सारेजण एक हजार किंवा त्या पटीत रक्कम देऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हजार कोटी रुपये तिथेही पडून आहेत, आणि दरवर्षी जमतात त्यातले निम्मेही खर्च् केले जात नाहीत.

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 11:12 am | संदीप डांगे

हा सारा पब्लिसिटी स्टंट आहे, घाणेरड्या लेव्हलवर!

चांदणे संदीप's picture

24 Oct 2016 - 11:26 am | चांदणे संदीप

मुद्दा क्र. १ व २ यावरच काथ्याकूट बास आहे!

अशा वेळेस न्यायालय स्वत:हून मध्ये का पडू शकत नाही हाही मला पडलेला एक प्रश्न आहे.

Sandy

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Oct 2016 - 11:40 am | हतोळकरांचा प्रसाद

हि सेटलमेंट म्हणजे राजकीय अपरिहार्यता वाटली, फडणवीस आणि राज ठाकरे यांची. ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अशांतता हि गृहविभागाच्या दृष्टीने चान्गली गोष्ट नव्हती आणि आंदोलनात सहभागी लोकांची ऐन दिवाळीत अटक हि मनसेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नव्हती. तेव्हा हा मधला मार्ग काढला गेला असावा.

बाकी "कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे" हे सार कशावरून ते कळले नाही. कारण मनसेने पैसे द्या आणि काहीही करा असे म्हटलेले नाही. त्यांची पत्रकार परिषद आणि मराठी वाहिन्यांवरून मला वाटतं ह्या खालील अटी मनसेने ठेवल्या होत्या - त्याही चित्रपट प्रदर्शितच न होऊ देण्याची भूमिका मागे घेण्यासाठी.

१. चित्रपट निर्माता संघाने यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेऊ नये असा निर्णय लिखित स्वरूपात द्यावा.
२. करण जोहर ने आपल्या सिनेमाच्या सुरुवातीला जवानांना श्रद्धांजली वाहणारा फलक दाखवावा.
३. चित्रपट "चालो अथवा न चालो", करण जोहरने सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपये द्यावेत.
४. मनसे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका मागे घेत आहे, चित्रपटावरील बहिष्कार कायम आहे आणि लोकांनाही तसे आवाहन आहे.

यावरून पैसे द्याआणि पाक कलाकरांना आणा असा अर्थ निघू शकत नाही. बाकी शेपटाला कशाकशाचे आणि कसले कसले बोळे लावून आग लावत फिरणाऱ्या इतर कोणाचीही जनतेला घृणा वाटत नाही हे काही नवल नाही.

बाकी मनसेने ह्या प्रकरणात काय केले असते तर ते सर्वग्राह्य झाले असते ते वाचायला आवडेल. बाकी आज ऐकलेल्या दोन बातम्यांनी मन विषण्ण झाले. आपले बीएसएफचे अजून एक जवान गुरनामसिंग शहीद झाले आणि इकडे श्याम बेनेगल यांनी फवाद खान याला घेऊन चित्रपट काढायचा ठरवल्याचे बातमी ऐकिवात आली. छान आहे!

मृत्युन्जय's picture

24 Oct 2016 - 11:46 am | मृत्युन्जय

सरकारने यापुढे मांडवली किंग म्हणुन नावलौकिक कमवावा. या क्षेत्रात त्यांना बर्‍याच संधी आहेत आणि सरकारचे अश्या प्रकरणांना हाताळण्याचे कौशल्य देखील वादातीत दिसते.

पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटांमध्ये काम करु नये अशी इच्छा एखाद्या पक्षाची मनसा असण्यात काहिच गैर नाही. सर्वसामान्य जनतेची अशी भावना किंवा इच्छा होणे देखील समजु शकते. सर्वसामान्यांच्या भावनांना आवाहन घालत स्वतःची इमेज सुधारण्याचा एखाद्या पक्षाचा प्रयत्न देखील समजुन येतो, पण ... पण जर:

१. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा अजुनही काढुन घेतला गेलेला नसेल
२. पाकिस्तानी नागरिकांना (भारतीय संविधानानुसार बनवलेल्या) कायद्याने भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी नसेल
३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल

तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.

मनसेबरोबर मांडवली करायला लावुन फडणावीसांनी असे चित्र निर्माण केले आहे की जणू:

१. मनसे म्हणजे प्रतिसरकार आहे
२. राज ठाकरे हे सर्वोच्च पातळीवरचे देशभक्त आहेत (तसे ते नाहित असे काही मी म्हणत नाही.)
३. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे
४. यापुढे व्यवसाय / धंदा करण्यापुर्वी फक्त कायदा पाळणे महत्वाचे नसुन सर्व राजकीय पक्षांची महत्वाकांक्षा आणि त्यांची व्हिजन पाळणेही महत्वाचे आहे.
५. सरकार इतके नाकर्ते आहे की एका नगण्य अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षासमोर देखील त्याला मान तुकवावी लागते.
६. कायदा आणि सुवव्यवस्था इतकी विस्कळीत आहे की हम करे सो कायदा म्हणणार्‍या विचारशक्तीच्या खळळ खट्ञाक परंपरेला आभान देउ शकत नाही.

हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती. पण तसे केल्याने विरोधकांनी सरकारच्या "देशभक्तीवर" ताशेरे ओढवले असते. याला भिन बहुधा सरकारने असले उरफाटे निर्णय घेतले असावेत,

चांदणे संदीप's picture

24 Oct 2016 - 12:38 pm | चांदणे संदीप

अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे:

३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल
तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.

पाकीस्तान बरोबर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असतील. मालाची आयात-निर्यात सुरळीत सुरू असेल. सीमेवर बससेवा निर्धोक सुरू असेल. लोकांचे येणे-जाणे इकडून तिकडे नेहमीसारखे सुरू असेल तर फक्त चित्रपट उद्योगाला मार का??

Sandy

राज ठाकरे काही मूर्ख नाहीत. चित्रपट हा time sensitive धंदा आहे. योग्य वेळी चित्रपट रिलीस नाही झाला काही दिवस जरी लेट झाला तरी गल्ला ५०% कमी होऊ शकतो. त्यामुळे मूठभर गुंड घेऊन खूप त्रास निर्माण करता येतो.

शब्दबम्बाळ's picture

24 Oct 2016 - 2:30 pm | शब्दबम्बाळ

आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!

महाराष्ट्रात काय राजेशाही आहे कि हुकूमशाही?
म्हणजे मनात आलं कि एखादी गोष्ट स्वतःच चुकीची ठरवून, त्यावर 'निवाडा' करण्यासाठी लोकांना बोलवून दंडाची रक्कम आणि शिक्षेचे स्वरूप स्वतःच ठरवून परत, हि आमच्या रयतेची इच्छा होती म्हणूनच कारवाई केली असे म्हणणे?!
असल्या प्रवृत्तींना 'सरकारमान्यता' मिळून गेली या प्रसंगातुन... आता असले कुठलेही राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे पक्ष आपल्या 'मना'नुसार लोकांना वेठीला धरणार आणि सरकार समंजसपणे मध्यस्ती करून मांडवली घडवून आणणार!(अर्थात स्वतःचा फायदा दिसत असेल तरच!)

<<"या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.">>
आयते कोलीत म्हणजे काय? हा जो काही कारनामा केला गेला आहे, तो काही अनावधानाने केला आहे असे आपल्याला वाटते का? स्पष्ट राजकीय खेळी आहे हि...

आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!

आता, निवडणूक जवळच आहेत आणि शिवसेनेला धडा देखील शिकवायचा आहे. मग शिवसेनेची मते खाणारा पक्ष कोणता तर मनसे! त्याला जरा बळकटी देणे पण गरजेचे आहे... पण हे सगळे जनकल्याणार्थ असेही दिसले पाहिजे, मग सैन्यदल आठवते!

सैन्याला समर्थन म्हणजेच राष्ट्रवाद हि जी प्रतिमा आजकाल बनवायची चालली आहे ती देशाला घातक आहे असे वाटते! त्या विरोधात जास्त काही बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह असे काहीसे चित्र तयार होऊ लागले आहे...

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी

आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!

राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. जर बोलणी करून हिंसक आंदोलन रद्द करता येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. जर बोलणी करूनसुद्धा समोरचा ऐकत नसेल तर शेवटी पोलिस वापरावेच लागले असते.

आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!

दोन्ही गोष्टीत प्रचंड फरक आहे. पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. सामान्य जनतेत याविषयी विरोधाची भावना नव्हती. याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.

दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हा फक्त एकदाच व एकाच ठिकाणी होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण देणे फारच सोपे होते. याउलट हा चित्रपट राज्यात शेकडो चित्रपटगृहातून अनेक दिवस दाखविला जाणार होता. इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.

मराठी_माणूस's picture

24 Oct 2016 - 3:53 pm | मराठी_माणूस

याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.

जनतेला चित्रपट न बघण्याचा अहींसक मार्ग उपलब्ध आहे. चित्रपट न बघणे हा गुन्हा होउ शकत नाही.कोणाला काहीही करायची गरज नाही. सुंठी वाचुन खोकला जाईल.

> राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते.

उद्या मुख्यमंत्र्यांनी tutu घालून चौपाटीवर नाच करून शांतता आणता येईल तर करावी काय ?

कायद्याची कसोटी तेंव्हाच असते जेंव्हा कायद्याची अंबलबजावणी करणे कठीण असते. खंडणी देऊन कसली शांतता ? मग द्यावे काश्मीर पाकिस्तानला आणि घ्यावी विकत शांतता !

> पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता.

विरोध १ माणसाचा असेल किंवा १०० कोटी जनतेचा काहीही फरक पडत नाही. रिपब्लिक ह्याचा अर्थच मुळांत कायद्याचे राज्य असा असतो. कायदा लागू करण्याचे काम मुख मंत्र्यांचे आहे. "बाई संध्याकाळी वाड्यावर या मदत केली जाईल " हे निळू फुलेंचे (चित्रपट मधील) काम आहे.

लोकांची भावना असेल पाकिस्तान विरोधी तर लोक पाहणार नाहीत चित्रपट. आणि एक आमदार असणाऱ्या राज ठाकरेला मूठभर नाही तर काय म्हणायचे ?

> इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.

तर उद्या हिजाब ना घालता येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकू अशी कुना मुस्लिम संघटनेने धमकी दिल्यास मुख्यमंत्री वाटाघाटी करून "मुलींनी फक्त केस झाकावेत" हा तोडगा काढणार आहेत का ?

पक्ष भक्ती आणि व्यक्ती पूजा सुविचारी माणसाला सुद्धा कशी लाचार बनवू शकते हे तुमचे उत्तर दाखवून देते.

मोदक's picture

24 Oct 2016 - 3:00 pm | मोदक

सहमत..

सरकारने हे प्रकरण हाताळताना थोडी परिपक्वता दाखवणे अपेक्षित आहे. :(

विशुमित's picture

24 Oct 2016 - 12:33 pm | विशुमित

<<<हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती.>>>

-- सहमत..

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 1:25 pm | श्रीगुरुजी

या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते.

- यातील करण जोहरची भूमिका पूर्णतः कायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून अयोग्य होती.
- राज ठाकरेची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून योग्य होती.
- फडणविसांना कायदेशीर भूमिकेच्या बाजूने उभे राहणे बंधनकारक होते आणि त्याचवेळी लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालले नसते.

राज्य सरकारला कोणत्याही तर्‍हेने हिंसाचार, तोडफोड होऊन न देता कायद्याच्या बाजूने उभे राहण्याची व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याची दुहेरी कसरत करायची होती. समजा राज्य सरकार पूर्ण गप्प राहून या वादात पडलेच नसते तर तोडफोड वगैरे होऊन प्रचंड नुकसान होऊन अशांतता निर्माण झाली असती व बेकायदेशीर मार्गाचा विजय झाला असता व त्यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असती. समजा राज्य सरकारने लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले असते तरीसुद्धा तोडफोड, लाठीमार होऊनही चित्रपट चालू राहिलाच असता व अशा परिस्थितीत आपण लोकभावनेकडे दुर्लक्ष करून विजय मिळविला व भविष्यात सुद्धा याच मार्गाने पाकड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करून सरकारच्या संरक्षणाखाली चित्रपट प्रदर्शित करू शकतो अशी विजयी भावना करण जोहरच्या मनात निर्माण होऊन त्याने आपल्यात भूमिकेत कोणताही बदल केला नसता. अशा परिस्थितीतही लोकभावनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राज्य सरकारवर आला असता.

त्यामुळे कायदेशीर बाजूने उभे राहणे व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याच्या भूमिकेच्या बाजूने उभे राहणे हे राज्य सरकारसाठी आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी या विशिष्ट प्रकरणात पूर्णतः परस्परविरोधी असल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली होती.

इतर कोणत्याही सूज्ञ सरकारने जे केले असते तेच फडणविसांनी केले. अशांतता व हिंसाचार टाळण्यासाठी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व त्यात यश आले. मनसेने चित्रपटाविरूद्ध आंदोलन न करण्याचे मान्य केल्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रश्न निकालात निघाला. त्याचवेळी भविष्यात पाकड्यांना काम ने देण्याचे जाहीर केल्यामुळे लोकभावनेचाही आदर राखला गेला. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रूपये देणगी देण्याचे जाहीर करून करण जोहरने सैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अर्थात तो खरोखरच ५ कोटी देईल का, भविष्यात पाकड्यांना न घेण्याचा निर्णय खरोखरच पाळेल का हे आज तरी सांगता येणे अवघड आहे. या ५ कोटीला खंडणी म्हणणे पटत नाही कारण हे पैसे सैनिकांना जाणार असून राज ठाकरेच्या खिशात जाणार नाहीत. या चर्चेत काही डील झाले का, राजला टेबलाखालून काही मिळाले का, फडणविस मनसेपुढे झुकले का इ. गोष्टी अजून तरी माहित नाहीत व जोपर्यंत त्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल स्पेक्युलेशन करणे योग्य नाही.

माझ्या दृष्टीने दृष्टीने फडणविसांनी एका वादग्रस्त व अशांतता निर्माण करू शकणार्‍या या स्फोटक विषयावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी योग्य प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. माझ्या दॄष्टीने हा विन-विन तोडगा होता.

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 1:28 pm | संदीप डांगे

यझ प्रतिसाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 1:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही तुमच्या महफिलीतले नाही का त्यामुळे आमचा प्लस वन =))

गामा पैलवान's picture

24 Oct 2016 - 6:43 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

यझ प्रतिसाद म्हणून हेताल्नी करण्यापेक्षा प्रतिवाद करा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 7:24 pm | संदीप डांगे

मृत्युंजय साहेबांनी केलेला प्रतिवाद पुरेसा आहे, मी केल्यास पुनरुक्ती होईल , वेळेचा अपव्यही!

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 9:53 am | हतोळकरांचा प्रसाद

यझ प्रतिसाद म्हणजे नेमकं काय?

मृत्युन्जय's picture

24 Oct 2016 - 3:06 pm | मृत्युन्जय

सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.

सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.

लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.

एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.

शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.

त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 3:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्लसच वन, शिवाय लोकभावना लोकभावना करणाऱ्यांना आत्ता बोलूनही उपयोग नाहीये मृत्युंजय भाऊ, हातच्या काकणाला आरसा कश्याला ह्या नियमाने, करण जोहरचा जो सिनेमा (नावही आठवत नाही) रीलीज होणार आहे, त्याचे कलेक्शन फिगर पाहून ही लोकभावना होती का लोकभावनेच्या गोंडस नावाखाली मांडवली होती हे चित्र स्पष्ट होईलच, तोवर तुमच्या प्रतिसादाला मम् म्हणतो आम्ही बापडे

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 3:38 pm | श्रीगुरुजी

सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.

सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. जर कायद्याच्या बडग्याची सक्ती करण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर सर्वप्रथम चर्चेचाच मार्ग स्वीकारावा लागतो व फडणविसांनी तेच केले आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत. मनसेच्या आंदोलनाविरूद्ध निश्चितच पोलिस यंत्रणेचा वापर करता आला असता. परंतु पोलिस वापरूनसुद्धा तोडफोड, हिंसात्मक आंदोलन पूर्णपणे टाळता आले नसते. श्रीनगरमध्ये अनेक महिने संचारबंदी असूनसुद्धा व सैनिक/पोलिस अश्रुधूर, पेलेट गन्स इ. चा वापर करत असूनसुद्धा जनता दगडफेकीसाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर येत होती. इथे तर फक्त लाठ्या हातात असलेले थोडे पोलिस चित्रपटगृहांवर तैनात असते व आंदोलकांनी त्यांना भीक घातली नसती.

राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते, चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मनसेचे बरेच कार्यकर्ते पकडले गेले असते. एवढे होऊनसुद्धा अशांतता टाळता आली नसती. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.

सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.

सरकार कायद्याचे पालन करीत होतेच. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते आणि चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते कारण या दोन्ही गोष्टी कायद्याच्या विरूद्ध झाल्या असत्या. जर मनसेने हिंसक आंदोलन केले असते तर त्याला तोंड द्यायची सरकारची तयारी होतीच. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्वात आधी चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे व चर्चा अपयशी झाल्यास कायद्याच्या बडग्याची सक्ती करणे हेच मार्ग सरकारपुढे असतात व फडणविसांनी नेमके तेच केले आहे.

लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.

लोकभावना कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, परंतु लोकभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. कायदे बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे व या विशिष्ट प्रकरणात इतक्या कमी वेळात कायदे बदलणे अशक्य आहे. लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करता येतो आणि चर्चेच्या माध्यमातून नेमके तेच झाले आहे. निदान भविष्यात तरी पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही ही जाहीर कबुली हे त्याचेच उदाहरण आहे.

एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.

संबंध हे एकतर्फी सुधारत नसतात. संबंध सुधारणे हा एकेरी मार्ग नसतो. भारताने आपल्या बाजूने संबंध सुधारण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एखाद्या पाकड्याला चित्रपटात घेतल्यामुळे संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. चित्रपट बॅन झालेला मला आवडला असता. परंतु तसे करणे कायदेशीर नाही व त्यामुळे तसे होणे शक्य नाही.

शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.

भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात एखाद्या गोष्टीवर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. जर लोकांना पाकड्यांची तीव्र चीड असेल तर ते नक्कीच तो चित्रपट बघणार नाहीत.

त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.

नॅशनलिझमचा कसला आला आहे बुरखा? सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजप ती जबाबदारी ओळखूनच हे प्रकरण हाताळत आहे. फडणविसांनी संघर्षाचा मार्ग टाळून दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एक कायदेशीर तोडगा काढून शांतताभंग टाळला व लोकभावनेचाही आदर केला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 3:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे.

कुठल्या सनदी नुसार हा सनदशीर तोडगा काढला आहे म्हणे?

कायदेशीर म्हणता आहात तर कुठल्या कायद्यान्वये हा तोडगा वर्षांवर काढायचा ठरला त्याचा मसुदा किंवा किमान कलम क्रमांक अन त्या कलमाची वाक्यरचना विदास्वरूप द्यावीत ही नम्र विनंती.

जाता जाता

सनदशीर ह्या शब्दाचा उगम सनद उर्फ इंग्रजीत "charter" ह्यावरून आलेला आहे त्यामुळे सनदशीर म्हणले की मूळ सनदीची संहिता देणे बंधनकारक असते किंवा त्या सनदीच्या अंतर्गत कार्य करणे अपेक्षित असते म्हणूनच टॅली प्रो वापरणारे खंडीभर "अकाउंटंट" असले तरी महत्व "चार्टर्ड अकाउंटंट" उर्फ सनदप्राप्त सनदी लेखपालालच असते, हेच सीएस, वकील, डॉक्टर इत्यादी पेशांना सुद्धा लागू होते, ह्याची नोंद घेऊन संबंधितांनी "सनदशीर" हा शब्द वापरला असावा अशी अपेक्षा आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 3:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

कुठल्या कोर्टाने "असे वाद झाल्यास परस्पर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही वादी अन फिर्यादी पक्षाला बोलवून तोडगा काढावा अन शांतता प्रस्थापित करावी" असा आदेश दिलाय का? असल्यास तो लेखी असेलच, त्याची प्रत जमल्यास द्यावी ही विनंती, तसेही असे आदेश द्यायचेच असले तर ती शक्ती फक्त सुप्रीम कोर्टाकडे आहे असे वाटते, कारण "एपेलेट ज्यूरीसडीक्शन" फक्त सुप्रीम कोर्टाचे असते असे वाटते, तरीही असा कायदा असल्यास तो द्यावा म्हणजे पुढील अभ्यासाला बरे पडेल

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी

फडणविसांनी राज व करणला एकत्र बोलावून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर किंवा घटनेच्या विरोधी होते का?

एखाद्या वादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते. १९८५ मध्ये राजीव गांधींनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी या धार्मिक संस्थेशी व त्या संस्थेच्या लोंगोवाल (जे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते किंवा निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधीही नव्हते) यांच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढला होता. त्याच वर्षी अखिल आसाम विद्यार्थी परीषदेच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. १९८६ मध्ये मिझोराममधील बंडखोर लाल डेंगाशी वाटाघाटी करून शांततेसाठी तोडगा काढण्यात आला होता. फुटिरतावादी हुरियत नेत्यांशी सुद्धा केंद्र सरकारने वाटाघाटी केल्या आहेत.

कोणत्याही वादात सुरवातीला चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटस्फोटाचे प्रकरण असो किंवा एकाने दुसर्‍याची बदनामी केल्याचा आरोप असो, सर्वात आधी दोन्ही बाजूंनी एकत्र बोलून वाद मिटवावा यासाठीच प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न अपयशी ठरले तर कायद्याची कारवाई सुरू होते.

फडणविसांनी नेमके तेच केले आहे. दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. समजा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असता तर त्यांना चित्रपटाला संरक्षण द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावीच लागली असती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 9:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:44 pm | श्रीगुरुजी

मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध केलेले राडे आठवत असतील. यावेळीही तसेच राडे होण्याची वाट बघायची होती का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 9:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 10:21 pm | संदीप डांगे

राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष असतो.
पण मनसे तोडफोड करणारा, विध्वंसकारी, राज्यव्यापी, जनतेपेक्षा मोठा पक्ष असतो.

त्याईची सतरंजी अटकेल हाये, एवढी दलाली(इंग्रजीत Pimp या अर्थाने)….? _/\_

भक्त प्रल्हाद's picture

24 Oct 2016 - 10:24 pm | भक्त प्रल्हाद

काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर तिथे तोडगा काढायला कोणि प्रयत्न करत नाही. पण इथे करतात, यावरुनच मनसे किती मोठी दहशतवादी संघटना असेल याची कल्पना येते. याची कल्पना महाराष्ट्राबाहेर राहणार्या बीड-नंदुरबार च्या लोकांना येणार नाही, पण ती मुख्यमंत्र्याना आहे, म्हणुनच त्यांनी जिवाची बाजी लावुन हा संघर्ष टाळला.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:25 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात १०० माणसे मरण्याची वाट बघायला हवी होती का?

भक्त प्रल्हाद's picture

25 Oct 2016 - 12:43 am | भक्त प्रल्हाद

तोडगा काढताना फक्त एका बाजुला पैसे खर्च कराय्ला लावायला नको होते.
राज ठाकरें नी प्रत्येक पाकिस्तानी कलाकाराच्या बदल्यात ५ करोड स्वतः आर्मीला द्याय्ला हवे होते.
किंवा निदान २.५ करोड तरी.

किति माणसे मारायची हे ठरवायला राजबरोबर वेगळी मीटींग ठेवावी. फक्त मोदिंना बोलवु नका म्हणजे झाले.

==

हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी

मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून. अशांतता टाळण्यासाठी आंदोलन मागे घेतले जावे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. ५ कोटी देणे, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक दाखविणे इ. गोष्टी नंतर आलेल्या आहेत. राज ठाकरेंनी किती द्यावे किंवा अजिबातच न द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.

हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?

मुस्लिमांबरोबरही यापूर्वी बोलणी करून तडजोड केल्याची उदाहरणे आहेत. हुरियतच्या नेत्यांबरोबर चर्चा करणे हे एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे सप्टेंबर १९९३ मध्ये ५-६ पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजरतबाल मशिदीत प्रवेश केल्यावर सैनिकांनी मशिदीला वेढा घालून त्यांना अडकवून ठेवले होते. मशिदीत अतिरेक्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. अतिरेक्यांना पळून जाणे अशक्य होते. तरीसुद्धा तत्कालीन केंद्र सरकारने अतिरेक्यांशी बोलणी करून मशिदीचे नुकसान न करण्याच्या अटीवर वेढा उठवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते.

गणामास्तर's picture

25 Oct 2016 - 3:08 pm | गणामास्तर

मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून.

गुरुजी, पाच कोटी देणे हा तोडग्याचा प्राथमिक वा दुय्यम भाग होता हेचं मुळात इथे दुय्यम आहे. मुख्य प्रॉब्लेम या असल्या
तोडग्याशीचं आहे.
बाकी पूर्वी कुणा कुणासोबत कसे तोडगे काढले गेले याचा इथे काही संबंध आहे असे मला वाटत नाही, उगाचं समोरचा
चिखलात खेळला म्हणून आम्ही शेणात लोळलो म्हणण्याला काही अर्थ नसतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 3:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

मग नक्की काय करायला हवे होते हे जरा सांगाल का?

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 3:30 pm | संदीप डांगे

मुख्य प्रॉब्लेम या असल्या
तोडग्याशीचं आहे.
^^^ सहमत!

काय करायला पाहिजे होते?

१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे.
2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे.
3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,

मनसे दंगा करेल म्हणून हा सरकारने दोघांना बोलावून तोडगा काढणे चुकीचा पायंडा पाडणे आहे, हुर्रीयात किंवा इतर आतंकवादी, नक्षलवादी, अलगाव्वदी संघटन यांची मनसे सारख्या राजकीय पक्षाबरोबर तुलना करणेच चुकीचे.

ह्या प्रकरणात चित्रपट किंवा पाच कोटी महत्वाचे नाहीत, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुंडगिरी करणाऱ्याला भिऊन असले तोडग्याचे पाउल उचलणे लोकशाहिस मारक आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, चारपाच हजार गुंड हाताशी असले की कोणीही काहीही कबूल करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो हा संदेश जात आहे.

राज ठाकरे ह्या घटनाबाह्य व्यक्तीला महत्त्व देणे खटलेलं आहे,

व्हाटबौटेरीच करायची असेल तर राहुल गांधीने अध्यादेश मागे घ्यायला लावल्यावर विरोधकांनी केलेला थयथयाट आठवावा.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 3:39 pm | श्रीगुरुजी

काय करायला पाहिजे होते?

१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे.
2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे.
3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,

चित्रपटाला संरक्षण देण्यात येणारच होते. परंतु ते देऊनसुद्धा तोडफोड टाळता आली नसती. त्यामुळे सामोपचाराने मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक होते.

मनसे धरणे आंदोलन करण्याची किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये असा प्रचार करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि करण तर चर्चेच्या आदल्या दिवसापर्यंत गप्प होता व त्याच्या वतीने काही जण पाकड्यांना घेण्याचे समर्थन करीत होते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने अशी भूमिका आधीच घेतली असती तर तडजोडीची वेळच आली नसती.

गणामास्तर's picture

25 Oct 2016 - 4:13 pm | गणामास्तर

१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे.
= सहमत. आपण अशी अपेक्षा सरकार कडून करणे योग्य आहे.

2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे.
= मनसे कसलाही विरोध अहिंसक मार्गाने करेल असे वाटत नाही. आपल्या सारख्या काही लोकांचा जरी अशा प्रकारांना विरोध असला तरी काही लोकांचा त्याला सपोर्ट आहे आणि अजून काही लोक सपोर्ट करतील अशी मनसे ला अपेक्षा असल्यामुळे ते धिंगाणा घालून स्वताचे उपद्रवमूल्य वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारचं.

3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
= जर सरकारने अशी काही बंदी घातलेली नाही आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही फरक पडत नसेल तर कायद्याच्या चौकटीत राहून पाकी कलाकारांना घेण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला कळत नाहीये. जेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा तरी वातावरण इतके तापलेले नव्हते, आपले पंप्र सुद्धा पाकिस्तान दौरा करत होते आणि नवाझ शरीफांना आमंत्रणे धाडीत होते.

कपिलमुनी's picture

24 Oct 2016 - 3:36 pm | कपिलमुनी

बेष्ट प्रतिसाद !

पैसा's picture

24 Oct 2016 - 5:23 pm | पैसा

कुठले विन विन? कुठली लोकभावना? माझा दुसरीकडचा प्रतिसाद इथे चिकटवते. ही आहे लोकभावना.

पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?

सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?

सैनिक खंडणीच्या पैशांवर जगत नाहीत म्हणून माजी अधिकार्‍यांनी झोडपून काढले आहे ना, त्याचा अर्थ समजत असला तर जरा तरी लाज वाटून घेऊ देत हे नालायक. अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना.

फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 5:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमच्या गावचा असा रास्त उल्लेख वाचून छाती टरारली पाव इंच! थँकयु ताय! बातमी दिल्या बद्दल

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी

फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.

क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

पैसा's picture

24 Oct 2016 - 9:01 pm | पैसा

उद्या कोणा नवरा बायकोचे भांडण झाले तर ते फडणवीस सोडवत बसणार का?

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 9:04 pm | श्रीगुरुजी

काहीही काय? नवराबायकोचे भांडण हा एका कुटुंबातला खाजगी वाद आहे. समाजाचा त्याच्याशी संबंध नाही.

बादवे, वरील प्रतिसाद वाचून कायम विषय भलतीकडेच भरकटविणार्‍या, असंख्य डुआय असणार्‍या आणि प्रचंड फॅन फॉलोइंग असणार्‍या एका ट्रोलची आठवण झाली.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 9:13 pm | श्रीगुरुजी

बादवे, खालील वाक्यांवर प्रतिसाद अपेक्षित होता.

क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

पैसा's picture

24 Oct 2016 - 10:47 pm | पैसा

करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. हे ब्लॅकमेलिंग कशाला? आम्ही तो सिनेमा बघणार नाहीच पण म्हणून मनसे गुंडगिरी करणार असेल तर आमचा अजिबात पाठिंबा नाही. करण जोहर आणि मनसे यांच्याकडून कसलीही चांगल्या कामाची अपेक्षा अजिबात नाही पण ही मांडवली फडणविसानी करावी याचा जास्त राग आला आहे. धमक्या देऊन मनसे दंगल करणार होते? करून बघू देत. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दंगलीमधे सैन्याला बोलावावे लागले? गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.

फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:35 pm | श्रीगुरुजी

>>> करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते.

ते दोघे तसे करीत नव्हते, त्यामुळेच फडणविसांना त्यात पडावे लागले.

>>> गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.

पोलीस संरक्षण हा शेवटचा पर्याय शिल्लक होताच. परंतु त्यापूर्वी चर्चने मार्ग काढणे आवश्यक होते.

>>> फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?

नुसते गप्प बसून लक्ष ठेवायचे? दंगेधोपे टाळून वाद मिटविणे हे त्यांचे कर्तव्य होते व तेच त्यांनी केले.

पैसा's picture

24 Oct 2016 - 11:40 pm | पैसा

तेच तेच लिहायचा कंटाळा आला. आता पुढे टंकाळ्याचा अधिकार वापरत आहे. तुमचे म्हणणे कुठूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायची काही शक्यता असेल तर महाराष्ट्रातल्या १०० पैकी ९५ लोकांना या प्रकाराचा भयंकर राग आला आहे हेही त्यांच्यापर्यंत पोचवा ही हात जोडून विनंती. आपण सगळ्यानीच बापड्या करण जोहरला यथाशक्ती १०/११ रुपयाचे चेक्स पाठवून देऊया. गरिबाला तेवढीच मदत. त्यातले पैसे त्याने अजून कोणाला दानधर्म केले तरी आमचे काही म्हणणे नाही. पण सैनिकांची चेष्टा कृपा करून थांबवा आता.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:49 pm | श्रीगुरुजी

१०० पैकी ९५? सोशल मिडियावर जसा अनेकांनी विरोध केला आहे, तसेच अनेकांना हा तोडगा पटलेला आहे.

मग करण जोहर आणि राज ठाकरे असे कोण मोठे समाजाचे धुरीण लागून गेले की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा? एक फडतूस सिनेमा म्हणजे काय लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? करण जोहर रडला म्हणे आपली, आपल्या लोकांची रोजीरोटी बुडाली मग उद्या कोणा रस्त्यावरच्या मजुराला मुकादमाने कामावरून काढून टाकले आणि त्याची रोजीरोटी बुडाली तर त्याला मुख्यमंत्री स्वत मदत करणार का? कायदा आणि सरकारला मजूर आणि करण जोहर दोघे सारखेच ना?

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:40 pm | श्रीगुरुजी

ती बैठक राज किंवा करणसाठी किंवा त्याच्या चित्रपटासाठी नसून दंगेधोपे टाळण्यासाठी होती.

पैसा's picture

25 Oct 2016 - 12:42 am | पैसा

काहीही हं श्री! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2016 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना.
भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.

> या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते.

इथे राज ठाकरेंना स्टॅकहोल्डर म्हणणेच मुळांत चुकीचे आहे. ठाकरे ह्यांनी स्टेक होल्डर बनण्याचा प्रयत्न केला तेंव्हाच त्यांना हिसका दाखवायला पाहिजे होता.

उद्या मुलीची छेड काढणाऱ्याला तिच्या लग्नाच्या वेळी "स्टेक होल्डर' म्हणावे काय ?

रेड रायडींग हूड मध्ये लांडग्याची जी भूमिका होती, शोले मध्ये गब्बर ची जी भूमिका होती, रामायणात रावणाची जी भूमिका होती, बाजारांत हफ्ता गोळा करायला येणार्यांची जी भूमिका असते, काश्मीर मध्ये पाकिस्तानची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरे ह्यांची वरील घटनेत होती.

टर्मीनेटर's picture

24 Oct 2016 - 2:16 pm | टर्मीनेटर

सब गंदा है...पर धंदा है ये...
जिथे आर्थिक फायदा नुकसानीच्या गोष्टी येतात तिथे चित्रपट व्यावसायिक काय किंवा राजकारणी व मुख्यमंत्री काय सगळे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायला तयार होतात. हीच गोष्ट ह्या प्रसंगातून ह्या तिघांनी दाखवून दिली आहे....बाकी सेना आणि सैनिक वगैरे गोष्टी ह्या लोकांसाठी नगण्य आहेत.

रविकिरण फडके's picture

24 Oct 2016 - 2:58 pm | रविकिरण फडके

(ह्यातील काही मुद्दे रिपीट झाले असतील तर क्षमस्व.)
शेवटी लावलेच की नाही करण जोहरला गुढगे टेकायला खळ्ळ खट्याक 'संस्कृती'पुढे (चुकलो, लोकेच्छेपुढे)? आपली लोकशाहीदेखील अशीच गुढगे टेकील लवकरच केंव्हातरी. मग आपण आपली शस्त्रे खाली ठेवू व आनंदोत्सव साजरा करू. आपण खाली ठेवलेली शस्त्रे केव्हातरी आपल्यावरच उगारली जातील पण ते नंतर पाहता येईल.

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये व जे कोणी इथे असतील त्यांनी भारत सोडून जावे अशी हाकाटी उरीच्या हल्ल्यानंतर सुरु झाली. ज्या कोणी (उदा. सलमान खान) त्याविरुद्ध सूर लावला त्याच्यावर हल्लाबोल झाला. आपली राष्ट्रनिष्ठा कशी मोठी हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली. पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.

पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का? पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.) शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.

ह्या तमाशाची परवाच्या दिवशी तात्पुरती सांगता झाली. ('तात्पुरती' अशासाठी की 'ह्यापुढे मी पाकिस्तानी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेणार नाही' अशी हमी करण जोहरकडून घेतली आहे.) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती, म्हणजे मांडवली, केली. करण जोहरने पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यायचे असा करार झाला. त्यावर शिवसेनेने 'लष्कराला खंडणीचा पैसा नको' अशी कॉमेंट देण्याचा उपचारदेखील पार पाडला. असे सर्व यथासांग झाले. ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. परिस्थिती बदलली म्हणून पूर्वीचे करार रद्द करता येत नसतात. तशी कोणी मागणी जर करत असेल तर ते घटनाबाह्य आहे. प्रत्येक नागरिकाचे अधिकार राखण्यास सरकार बांधील आहे अशी तर्कशुद्ध आणि न्यायाची भूमिका सरकारची असायला हवी होती. त्याविरुद्ध कोणी येत असेल तर त्याचा कठोरपणे बीमोड करणे हे सरकारचे कर्तव्य होते. निदान ज्या पक्षाचे पंतप्रधान 'भारताची राज्यघटना हा माझा धर्म आहे' अशी जाहीर भूमिका घेतात त्या पक्षाची तरी. पण कसचे काय? निवडणुकींच्या आणि मतांच्या हिशोबापुढे सगळे दुय्यम असते, हेच खरे. (शिवसेनाशी आपले फाटलेलेच आहे. मनसे तरी आपल्या बाजूला असलेला बरा, निदान विरुद्ध तरी नको अशी भाजपाची भूमीका असावी.)

आता ह्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल करता येईल. 'आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का' असा प्रश्न शबाना आझमी हिने केला आहे, तिलाही राष्ट्रद्रोही ठरविता येईल. आणि हो, देशातील वाढत्याअसहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रतन टाटा ह्यांना देखील.

आणि हे सर्व लिहिल्याबद्दल मलासुद्धा. पण मी काही शबाना आझमी, रतन टाटा ह्यांच्या पंक्तीत बसणारा नव्हे. मी एक क्षुल्लक इसम. म्हणून मला माफही करतील कदाचित.

शेवटी एवढेच, की हे राजापेक्षा राजनिष्ठ लोक राजालाही तापदायक ठरू शकतात.

साहना's picture

25 Oct 2016 - 6:40 am | साहना

माझ्या मते सर्व घटनेचे अनालिसिस करणारा सर्वांत चांगला कमेंट हा आहे.

> ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे.

भाजपचे खरे रूप हेच आहे ह्याची शंका अनेकांना आधीपासून होतीच म्हणून विशेष आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य अश्या गोष्टीचे वाटते कि सभ्य, चांगली माणसे अचानक "लोकेच्छा", "दिवाळीचं वेळी शांतता" इत्यादी इत्यादी करणे देऊन आणि शाब्दिक कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करीत आहेत.

काँग्रेस पक्ष भ्रष्ट असला तरी किमान आपल्या चमच्याची खूप काळजी घेतो. भाजपच्या समर्थानात नाचणाऱ्या भक्तगणांच्या गळ्यांत मात्र शेवटी धोंडाच पडेल असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 3:13 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.

या कारणात काय हास्यास्पद आहे? ज्या प्रमाणात भारतात पाकड्यांना कामे दिली जातात त्या प्रमाणात भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटात कामे दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे (खरं पाकिस्तानी चित्रपटात काम करणार्‍या भारतीय कलाकारांची संख्या शून्याच्या जवळपासच आहे). कोणतीही देवाणघेवाण/व्यापार/व्यवहार एकतर्फी होऊ शकत नाही. आपण इथे बोलावून पाकड्यांना कोट्यवधी रूपये देऊन चित्रपटात झळकवायचे आणि आपल्या एकाही कलाकाराला तिथे काम नाही असे किती दिवस चालणार? पाकिस्तानी कलाकारांना जे पैसे मिळतात त्यातील काही भाग करांच्या रुपाने त्यांच्या सरकारकडे जातोच व सरकारकडून त्यातला काही भाग दहशतवादासाठी वापरला जातो. म्हणजे आपणच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकड्या कलाकारांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आहोत.

पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही.

पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना एकटे पाडायचे हे त्यामागे कारण नाही. भारताने अशी कारवाई करून पहिल्यांदाच तसे अधिकृतरित्या जाहीर केले. पहिल्यांदाच कारवाईची जाहीर कबुली करताना भारत अत्यंत सावध होता. आम्ही फक्त दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करीत आहोत, ही कारवाई पाकिस्तानविरूद्ध नसून पूर्वी आमचाच भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये केली इ. स्पष्टीकरण भारताने दिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात इतर देश आपल्याविरूद्ध जाऊ नयेत, आम्ही स्वसरंक्षणासाठी असे केले, इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा हा त्यामागे उद्देश होता व तो उद्देश सफल झाला.

दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का?

का चालू नये? हरकत काय आहे?

पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.)

सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.

पाकिस्तान व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूला अर्थपुरवठा करण्याऐवजी इथलेच कलाकार घ्यावेत हा मुद्दा योग्यच आहे.

रविकिरण फडके's picture

24 Oct 2016 - 3:44 pm | रविकिरण फडके

"सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे."

कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.

असो. ह्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. आपण सहमत होणार नाही ह्यावर सहमत होऊया.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 3:45 pm | श्रीगुरुजी

कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.

ते पैसे मनसेला मिळणार नाहीत हो किंवा राजच्या खिशातही जाणार नाहीत. सैनिक कल्याण निधीला ते पैसे दिले जाणार आहेत.

याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी

याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?

ती बैठक मुळात सैनिक कल्याण निधीला देणगी देण्यासाठी बोलविलेली बैठक नव्हती. चर्चेच्या माध्यमातून दिवाळीत निर्माण होणारी संभाव्य अशांतता टाळणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला व त्यातून भविष्यात पाकड्यांवर बंदी, सैनिक कल्याण निधीला देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक इ. अजून काही गोष्टी बाहेर आल्या. परंतु मूळ उद्देश आंदोलन रद्द करणे हाच होता.

मोदक's picture

24 Oct 2016 - 9:05 pm | मोदक

ते काहीही असले तरी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून सैनीक कल्याण निधीला देणगी देणवण्याची गोष्ट पटली नाही.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी

ते ठीक आहे. परंतु ही देणगी हा चर्चेतला सेकंडरी आऊटकम आहे. तो चर्चेतला प्राथमिक मुद्दा नव्हताच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 4:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

सैनिक कल्याण नाव घेतले की काहीही कायदेशीर होईल का? असे असले तर सैन्याचे नाव संबंधित खराब करत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, उद्या तुमची कॉलर धरून कोणी काढ सगळे खिशातले पैसे आर्मी फंडला द्यायचे म्हणले तर तुम्ही राष्टरकार्य असल्यासारखा द्याल का आपल्या घामाचा पैसा? अन तो पैसा सैन्य स्वीकारेल ह्याची काय शाश्वती, त्यांनी नाकारल्यास तुमचा पैसा तुम्हाला परत पोच करायचे ओनस कोणाचे असेल? आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का ? ह्याचा जरूर विचार केला जावा

आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का

सेमच बाप्पू,
मला सेम उधारण आमच्या इथले आठवलेले. सगळ्यांच्या होलसेल जयंत्या ब्यंत्याचे पैसे आम्ही देत नै. नवीन दुकान टाकले की एरीयावाईज एक सर्टिफिकेट मिळते. त्याला ४-५ ह्जार मोजायचे एकवट्ट. मग त्यांचे ते सगळ्या मंडळांना पैसे देतात. मंडळे आमच्याकडे फिरकत नैत. एकूणच ह्या मिलिभगत प्रकरणात प्रथमदर्शनी विनविन सगळे दिसत असले तरी स्वतःचे मत (वर्गणी नाहि द्यायची असे) मांडायची सोय नाही. एकट्याने ह्या सिस्टिमशी लढायची ताकद नाही आणि धंदा करु की हेच करत बसू म्हणून आम्ही सहन करतो. जवळपास सर्वत्र शहरात ही सर्वमान्य प्र्याक्टीस झालीय.
वरील आर्मीसाठी खंडणी प्रकरणात तोच पायंडा पडू नये हीच इच्छा.

तुमच्या मुलाला कुणी किडनॅप करून उद्या सैनिक निधीला पैसे द्यायला लावले तर ते नैतिक दृष्ट्या बरोबर वाटते का ? (उदाहरणादाखल)

रविकिरण फडके's picture

24 Oct 2016 - 4:32 pm | रविकिरण फडके

आणि BTW , आपण सर्वानीच पाकड्या पाकडे इत्यादी शब्द टाळावेत. सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत आपापसात.
(अर्थात, ह्यालाही उत्तर असेलच. आम्ही असंस्कृत लोकांबद्दल बोलतोय, असे.)

विशुमित's picture

24 Oct 2016 - 4:43 pm | विशुमित

++ सहमत..

बोका-ए-आझम's picture

24 Oct 2016 - 4:57 pm | बोका-ए-आझम

असताना मनसेला एवढं महत्व देण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. त्यामुळे त्यांनी असले स्टंट करणं हे समजण्यासारखं आहे. पण मुख्यमंत्र्यांना हे अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करण्याची काय गरज होती? येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला चुचकारून शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी मनसेच्या एवढ्या पायघड्या घालणं आवश्यक नव्हतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 5:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

पोचट शक्तीचे अफाट प्रयोग हो ! =))

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी

क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 12:24 am | बोका-ए-आझम

राज ठाक-यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःलाही प्रतिबंधात्मक अटक करायला हवी होती, ज्याचे आदेश गृहमंत्री म्हणून ते देऊ शकत होते. सरकारने मध्यस्थी करावी असं ना करण जोहर म्हणत होता, ना राज ठाकरे म्हणत होते.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 3:24 pm | श्रीगुरुजी

- चित्रपटावर बंदी घालण्यात येणार नाही हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

- चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल हे राजनाथसिंग व फडणविसांनी पूर्वीच सांगितले होते.

- एका चित्रपटगृहावर निदर्शने करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना आधीच अटक केलेली होती.

- प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात येणार होते.

सरकार संपूर्णपणे कायदेपालन करणार होते.

परंतु एवढे करून तोडफोड, दंगेधोपे व त्यातून निर्माण होणारी अशांतता व हिंसाचार पूर्णपणे टाळणे अशक्य होते. प्रत्यक्ष राज ठाकर्‍यांना व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करूनसुद्धा काही कार्यकर्ते मोकळे राहिलेच असते व त्यांनी तोडफोड केलीच असती. संपूर्ण महाराष्ट्रात किमान ७००-८०० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविला जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटगृहावर किमान १० पोलिस ठेवले तरी ७-८ हजार पोलिस गुंतुन पडले असते. दिवाळीत दहशतवादी हल्ल्याचा धोका कायमच असतो आणि अशा परिस्थितीत इतके पोलिस वेगळ्या कामात अडकवून ठेवणे योग्य झाले नसते. आणि एवढे पोलिस ठेवूनसुद्धा तोडफोड पूर्णपणे टाळता आली नसती. काश्मिरमध्ये संचारबंदी असून व सैनिक पॅलेट गन्स घेऊन उभे असताना सुद्धा तिथले नागरिक संचारबंदी मोडून गन्सची भीति न बाळगता रस्त्यावर येऊन दगडफेक करीत होते. इथे तर हातात लाठ्या घेतलेले १०-१२ पोलिस काय करू शकणार होते?

अशा परिस्थितीत आंदोलन टाळण्यासाठी सामोपचाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक होते. समजा बोलणी फिसकटली असती तर शेवटी पोलिस फोर्स होताच. परंतु कोणत्याही संघर्षात/वादात बलाचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. वादावर चर्चेच्या, सामोपचाराच्याच माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आधी केला जातो. खलिस्तान आंदोलन, काश्मिर आंदोलन, आसाम आंदोलन, नक्षलवादी, मिझोराम आंदोलन इ. वादात वाटाघाटी करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला गेला होता. नक्षलवादी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य, मिझोरामचा लाल डेंगा, आसाममधील विद्यार्थी, हुरियतचे सदस्य हे काही जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते. तरीसुद्धा त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी अंगदाला शिष्टाईसाठी पाठविले होते आणि भगवान श्रीकृष्णानेसुद्धा महाभारत युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाशी वाटाघाटी केल्या होत्या (इथे मी फडणविसांची श्रीराम किंवा श्रीकृष्णाशी तुलना करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नये).

मनसेचा एकच आमदार असला तरी मनसेकडे भरपूर कार्यकर्ते आहेत व मनसे या पक्षाचे उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचे मौन किंवा उपोषण नाही किंवा अंनिसचा मोर्चा नाही. मनसे आंदोलनातून हिंसाचार, तोडफोड होण्याचा इतिहास आहे. मनसेचे आंदोलन कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी त्यातून अशांतता निर्माण होऊन जनतेला त्रास होणार होता. राज ठाकर्‍यांना किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकेत ठेवून आंदोलन दडपता आले नसते.

कायद्याचे पालन करणे हे जसे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक आहे तसेच शांतताभंग होऊन न देणे ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी मनसेशी बोलणी करून आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे व बोलणी फिसकटल्यास पोलिस फोर्स वापरून कायद्याचे पालन करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु पोलिस फोर्स वापरून तोडफोड पूर्णपणे टाळणे शक्य झाले नसते. त्यामुळेच त्यांनी दोघांना एकत्र बोलावून वाटाघाटींच्या माध्यमातून आंदोलन रद्द करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी लिहिल्याप्रमाणे ५ कोटींची देणगी हा काही चर्चेतील मुख्य मुद्दा किंवा अट नव्हती. आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे हाच चर्चेतील प्राथमिक मुद्दा होता.

या विषयावर खालील लेख चांगला आहे.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavi...

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 12:33 am | शब्दबम्बाळ

जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल.
आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!

पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल?
मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!

विशुमित's picture

25 Oct 2016 - 9:59 am | विशुमित

बरोबर आहे..

मनसे अध्यक्षा सकट सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंदात्मक कारवाई करायला पाहिजे होती. वेळ पडली तर अध्यक्षा ला चोप देत पोलीस स्थानकात डांबून ठेवायला पाहिजे होते.
मागील आघाडी सरकार ने त्यांचे खूप लाड पुरवले. खळ खट्याक ची धमकी देऊन सार्वजनिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीना
चाप बसवण्याची संधी फडणवीस यांच्या सारख्या कर्तबदार मुख्यमंत्र्यानी घालवली आहे. याचा खेड वाटतो.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 3:34 pm | श्रीगुरुजी

जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल.
आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!

वर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.

पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल?
मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!

राज ठाकरे हा उधोजींइतकाच बेभरवशाचा व स्वतःच्या ताकदीबद्दल अवास्तव भ्रम बाळगणारा आहे. शेवटी हे दोन्ही बंधू शिवसेना संस्कृतीत वाढले आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे, आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा आहे, आपण स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो अशा भ्रमात हे दोघेही वावरत असतात. या दोघांबरोबरही युती किंवा तडजोड करणे अत्यंत अवघड आहे हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. भाजपचे मुख्य ध्येय स्वबळावर लढण्याचेच आहे. त्यामुळे मनसेला दुखवू नये किंवा सेनेला चुचकारावे अशा गोष्टी भाजप करणार नाही.

राजाभाऊ's picture

25 Oct 2016 - 8:35 pm | राजाभाऊ

>>पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?<<

सत्तेत नसुनहि राज ठाकरेंचीच चालते महाराष्ट्रात, तेंव्हा जनाची नाहि तरी मनाची लाज असेल तर फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी...

डावीकडून आणि उजवीकडून थपडा खाणे. सेन्सॉरने मंजुरी दिली असताना एका राजकीय पक्षाच्या दंडेलीला भीक घातली म्हणून डावीकडून आणि देशभक्ती खंडणीखोरांच्या दावणीला बांधली म्हणून उजवीकडून.
#तोंडघशीफडणवीस

हि सगळी पवारसाह्यबांनी राज ठाक्रे, करन जोहर आदींकडून करवून आणलेली गेम आहे. फडनवीस बिचारे तोंडघशी पडले. आता त्यांनी जायला हरकत नाही. उगा मोर्चामुळे गेले असते तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. ;)
#सर्वकाहीसाहेबांमुळे

विशुमित's picture

25 Oct 2016 - 10:02 am | विशुमित

सकल महाराष्ट्राचा करता करविता फक्त साहेब...!!

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2016 - 3:15 pm | टवाळ कार्टा

आयला...तुम्हाला सगळीकडे नाखूनचाचाच दिसतात??? =))

विशुमित's picture

25 Oct 2016 - 3:27 pm | विशुमित

अयो...खरंच की..

नाखु साहेब नाही "अभ्या" नाना

आय माय सॉरी...

सोत्रि's picture

24 Oct 2016 - 10:04 pm | सोत्रि

१. मुंबई नगरपालिकेच्या २०१७ निवडणूकीची ही नांदी आहे
२. 'टायमिंग' साधून केलेली राजनिती आहे (आठवा टोल राड्याचे टायमिंग)
३. भाजपाने शिवसेनेला दाखवलेले 'मधले बोट' आहे
४. मनसे पार्टी फक्त पैसा छापण्याचे माॅडेल म्हणून कसा एस्टॅब्लिश झाला आहे त्याचे उदाहरण आहे
५. राजकारणातले निवडणूकपूर्व स्कोर सेटलिंग आहे
६. करण जोहरचा सिनेमा आणि पाक कलाकार हे निनीत्त आणि ह्या प्रकरणातले बळी आहेत
७. पाक कलाकारांना कधीच काम मिळणार नाही हा विजयी मुद्दा, मूळ मुद्द्याला झाकोळूना टाकण्याची तजवीज आहे

- (दिलसे) सोकाजी

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 10:16 pm | संदीप डांगे

गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा...

श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो,

भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

मृत्युन्जय's picture

24 Oct 2016 - 11:00 pm | मृत्युन्जय

आपल्या प्रतिसादातील भाषा अस्थायी आणि सौजन्यशील आहे असे खेदाने नमूद करतो. श्रीगुरुजींनी अजुनतरी पातळी सोडुन बोलल्याचे किमान या धाग्यावर दिसत नाही. ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यात त्यांची केविलवाणी धडपड दिसते पण जाणुनबुजुन एखाद्या व्यक्तीची, पक्षाची अथवा समुदायाची खोडी काढलेली दिसत नाही. अश्या परिस्थितीत त्यांची कानौघडणी करणारा प्रतिसाद रास्तच असावा पण " फालतू टिवटिव बंद करा" आणि "भाजपाचे दलाल नकोत इथे मिपावर" ही वाक्ये पुर्णतः अस्थायी आहेत.

मिपावर सर्वच पक्षांचे समर्थक आहेत. सर्वांचे विरोधक आहेत. आपण स्वतः भाजपाचे कट्टर विरोधक आहात. अश्या परिस्थितीत कोण्या एकाला "दलाल" वगैरे संबोधणे ही फारच वैयक्तिक टिप्पणी होते.

शिवाय एखाद्याच पक्षाचे समर्थक नकोच असे म्हणणे ही चुकीचे आहे. आम्ही तर मिपावर आप आणी राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो. त्यात काय एवढे?

मृत्युन्जय's picture

24 Oct 2016 - 11:01 pm | मृत्युन्जय

* सौजन्यहीन असे वाचावे. चुकुन सौजन्यशील लिहिले :)

संदीप डांगे's picture

24 Oct 2016 - 11:14 pm | संदीप डांगे

ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं.

धन्यवाद!

रच्याकने, मी कोणाचा कट्टर विरोधक आहे किंवा नाही हेही तुम्हीच ठरवा..

परत असो.

सुबोध खरे's picture

25 Oct 2016 - 10:21 am | सुबोध खरे

डांगे अण्णा
गुरुजींच्या मताशी मी पण सहमत नाही
परंतु आपली भाषा (दलाल इ शब्द) हि कमरेच्या खाली उतरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपल्याला गुरुजी दलाल आहेत हे सिद्ध करून दाखवता येईल काय? तुम्ही भक्त म्हणत होतात तोवर ठीक होते.
याबाबतीत मृत्युंजय यांच्याशी सहमत.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 10:31 am | संदीप डांगे

मी गुरुजींनाच दलाल बोललो हे सिद्ध करता येईल काय?

मिपावर भाजपचे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली आहे, ह्यात काय गैर?

आणि हो, 'भाजपचे नकोत तर इतरांचे चालतील का' असा बुद्धिमान प्रश्न कोणी विचारू नये, ;)

अनुप ढेरे's picture

25 Oct 2016 - 10:33 am | अनुप ढेरे

डांगे अण्णा.. कशाला वाद वाढवताय उगाच. जाऊ द्या ना. कोणाला इथे दलाल म्हणू नये हे ठीक आहे.

तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल सुटला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर गुरूजींना बोललेले शब्द मागे घ्या.

अशी शब्दांची कसरत करत तुम्ही पायर्‍या खाली उतरत जाण्यापेक्षा शब्द मागे घेणे सोपे आहे.

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 1:31 pm | शब्दबम्बाळ

दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत वगैरे सगळ्यांनी बोलून झालाय आणि ते बरोबर हि आहे.
पण एखाद्या आयडी ला (तो नावडता असल्याकारणाने) "चड्डीला हात घातला", "सुंता केला" असे दिले गेलेले प्रतिसाद हे कमरेच्या वरचे आहेत का?
कि आयडी च्या प्रसिद्धी आणि कंपू नुसार 'कमरेचे' माप बदलते?

मृत्युन्जय's picture

26 Oct 2016 - 1:36 pm | मृत्युन्जय

तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप घेतला आहे?

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 3:09 pm | शब्दबम्बाळ

मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा आक्षेप घेतला आहे! ;)
असाही माझ्या आक्षेपाला कोण विचारतो? आमची ना फॅन फॉलोविंग ना कंपू त्यामुळे ज्या धाग्यावर प्रतिक्रिया देत असतो तिथे ताळतंत्र सोडून प्रतिक्रिया दिल्याचे दिसले तर थोडं सांगायचं प्रयत्न करतो...
पण तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे कळलं तर नीट उत्तर देऊ शकेन...

मृत्युन्जय's picture

26 Oct 2016 - 4:48 pm | मृत्युन्जय

इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच विचारत नाही. मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. त्यामुळे इथे कंपुचा संबंध नाही. ताळतण्त्र सोडुन कुणी वागत असेल तर जरुर समज द्यावी. जिथे मला दिसते तिथे तशी समज मी देतोच. जर तसे करणे मला योग्य वाटले तर,. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळाले नाही हा मुख्य रोख आहे. शिवाय प्रतिसाद देताना मी प्रतिसाद अयोग्य का वाट्तो याची कारणेही दिलेली आहेतच.

असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 5:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते.

मिळत नाही.धन्यवाद.

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2016 - 5:17 pm | शब्दबम्बाळ

अहो ती प्रतिक्रिया खरे काकांच्या प्रतिसादाला दिलेली आहे.. बघा पुन्हा!
खरे काका काही वेळा मी त्या प्रतिक्रियेत लिहिल्या वाक्यांपैकी काहीतरी वापरतात(प्रसिद्ध आयडीला ) , त्या अनुषंगाने विचारले होते मी...
असो, दिवाळीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!

मृत्युन्जय's picture

26 Oct 2016 - 1:36 pm | मृत्युन्जय

अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा ठेका काय मिपा व्यवस्थापनाने तुम्हालाच दिलाय की काय?

तुम्ही नाही का श्री गुरुजींना " भक्त", ठरवुन टाकलेत? जर तुम्ही भाजपा विरोधक नसाल तर श्री गुर्जी आपचे खंदे कार्यकर्ते आहेत असे पण म्हणूयात की. हाकानाका.

असो. असोच. ....

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:21 pm | श्रीगुरुजी

यात काहीच नवीन नाही. माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद न करता आल्याने समोरच्याने चिरडीला येउन संदर्भहीन व व्यक्तिगत टिप्पणी करणे हे नेहमीचेच आहे.

फालतू टिवटिव आणि दलाल ह्या शब्दांत सौजन्यहीन असे काही आहे असे वाटत नाही. "श्री गुरुजी" असे सोज्वळ नाव धारण करणारी व्यक्ती खंडणीखोर वृत्तीची आणि अपली पदाची शपथ मोडणाऱ्या मुख्यमंत्र्याची बाजू मांडत आहे अन नेत्यासाठी "दलाल" हा शब्द १००% योग्य वाटतो. खुद्द मुख्यमंत्र्यानी जे काही केलं आहे त्याची बातमी इंग्रजी वर्तमान पत्रांनी "brokered" अशी दिली आहे.

गुरुजींचा युक्तिवाद "फालतू टिवटिव" ह्याच सदरांत मोडतो. प्रत्यक्षांत श्री गुरुजी हे फार चांगले व्यक्ती असतील ह्यांची शंका नाही पण पक्ष भक्तीने त्यांना आंधळे बनवले आहे.

विशुमित's picture

25 Oct 2016 - 10:06 am | विशुमित

<<<<< राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो>>>>
-- उपकारच झाले मायबाप आमच्यावर. कुठे ऋण फेडू हे. या जन्मात तर शक्यच नाही.

(हलके घ्या)

अभिदेश's picture

24 Oct 2016 - 11:56 pm | अभिदेश

आणि सौजन्यहीन प्रतिसाद .... हे अनेकवेळा झालेले आहे. तुमच्या इतर धाग्यावरच्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला पवार साहेबांचे दलाल असे म्हटले तर चालेल का ?

डांगेण्णा.. प्रतिसाद पटला नाही. तुमचा वाद घालण्याचा स्टॅमिना संपला असेल तर गुरूजींकडे दुर्लक्ष करा. सरकारचे चुकले आहे आणि गुरूजी लंगडी बाजू सावरत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे.

बादवे..

"आपण अशी भाषा वापरणे = आपल्या बाबतीत दुसर्‍याला अशीच भाषा वापरण्याची परवानगी देणे"

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 12:09 am | बोका-ए-आझम

भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

१. बाकी पक्षांचे दलाल चालतील का?
२. मिपावर काय चालेल आणि काय नाही हे नीलकांत आणि संपादक यांना ठरवू द्या की. तुम्ही नक्की कुठल्या अधिकाराने हे बोलताय?

अर्धवटराव's picture

24 Oct 2016 - 10:24 pm | अर्धवटराव

सरकारने दोन विरोधी पार्टींना आमने-सामने बसवुन वाद मिटवावे, आंदोलनं टाळावी यात काहिच वावगं नाहि, नवखं देखील नाहि. बाँबे पासुन ते झेंड्यापर्यंत, आणि क्रिकेट सामन्यांपासुन ते अमुक तमुक लवादापर्यंत हेच धोरण अनेकदा नौभवलं आहे महाराष्ट्राने.
यंदा फरक हाच, कि मनसेला एकदम सीएम लेव्हलची मध्यस्थी मिळायला नको होती. त्यामागे कदाचीत आगामी मुंबई इलेक्शनचे आराखडे असतील. दुसरी बाब म्हणजे ५ करोडच्या देणागीला खंडणीचा वास येणे. करण जोहर वगैरे मंडळींना काहिच तोशीक न लागता प्रकरण मिटु नये, व सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि.

या प्रकरणाची भारत-पाक व्यापारी संबंधांशी याचि तुलना करणे फारच हास्यास्पद आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, इतर व्यापार हे सर्व वाणिज्य, अर्थ, गृह, अगदी मिलट्री इंटलीजन्स आणि गुप्तहेर संघटनांच्या कॉर्डीनेशनचे उद्योग आहेत. आणि ते काय योग्य ते करतीलच. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे फारच झालं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 10:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि.

तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माहित नाही पण त्यातून आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!

तसा तो आहेच.
नुसतच इशारे वगैरे देऊन प्रकरण मिटवलं असतं तर ठाकरेंच्या हाति काहि लागलं नसतं. पक्षाला खंडणी मिळाली असती ( ति तशीही मिळाली असेल टेबलाखालुन) तर उरली-सुरली इज्जत गेली असती. नैसर्गीक आपत्ती, खेळ, पुतळे वगैरे करता पैसे घेऊन काहिच फायदा झाला नसता. सैन्याकरता पैसे घेऊन ठाकरे गंगेत बुडी मारायला गेले, पण ते प्रकरण अंगावर शेकलं दिसतय. खास करुन सैन्याधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यामुळे काहि उत्तर पण देत येणार नाहि मनसेला. हे थोडं हात दाखवुन अवलक्षण झालेलं आहे मात्रं :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 10:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

=)) आयजीच्या जीवावर चे हे इंटरप्रिटेशन उच्चं वाटले !

गामा पैलवान's picture

24 Oct 2016 - 10:28 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

मलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. फडणविसांनी नक्की काय करायला पाहिजे?

लांडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी करण जोहरला?

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 10:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

मांडवली घटनात्मक अन कायदेशीर कशी ती सांगा

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 11:16 pm | श्रीगुरुजी

मांडवली या शब्दाची घटनात्मक व कायदेशीर व्याख्या सांगा.

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 12:32 am | संदीप डांगे

मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम!

'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!

माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना!

कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो!

मनोरंजनाची हि पहिलीच वेळ नाही व शेवटचीही नसणार :) =))

ट्रेड मार्क's picture

25 Oct 2016 - 12:48 am | ट्रेड मार्क

मोगाखानशी बरोबरी?

कुछ कुछ होता है राहुल.. तुम नही समझोगे ;)

लैच करमणूक करायला लागलात की. भाजप = गुरूजी..?

मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम!

गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्‍या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा.

'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!

हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!!

माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना!

असो. यावर पास.

कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो!

यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते.

असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 1:33 am | बोका-ए-आझम

माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!

Joke of the day! इथं तुमच्या प्रतिसादांना अाक्षेप घेणाऱ्या किती जणांनी गुरुजींच्या युक्तिवादाला समर्थन दिलंय ते एकदा बघून घ्या आणि मग काय ते बोला. नेहमी भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या किती जणांनी इथे सरकारची बाजू घेतलीय ते नीट बघा. अगदी धागा काढणाऱ्या नाखुकाकांपासून सुरूवात करा.

मृत्युन्जय's picture

26 Oct 2016 - 4:52 pm | मृत्युन्जय

तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम आक्षेप मीच घेतला आहे. तरी वरील सर्व आक्षेप माझ्याबद्दल असतील तर ते आधी स्पष्ट करावे तर मी पुढील प्रतिसाद देतो. अन्यथा उगाच तुमच्याबद्द्दल गैरसमज करुन घेउन प्रतिसाद देण्यात हशील नाही.

कपिलमुनी's picture

25 Oct 2016 - 12:52 am | कपिलमुनी

श्रीगुरुजींना आदर्श गुरुजी पुरस्कार , भगवी शाल आणि कमलपुष्प देउन सत्कार करण्यात येत आहे .

कपिलमुनी's picture

25 Oct 2016 - 12:54 am | कपिलमुनी

इथे ५० जणांनी ५०० प्रतिसाद लिहीे तरी गुर्जीं काय ऐकणार नाहीत, फक्त लिहीणारांची चिकाटी या मुद्दयांवर टिकते का हे पहायचा आहे !

गामा पैलवान's picture

25 Oct 2016 - 3:17 am | गामा पैलवान

पैसाताई,

गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.

हाहाहा ! ज्योक ऑफ द डेकेड !! ऑगस्ट २०१२ चे आझाद मैदानातले दंगे विसरलात की काय? त्यानंतर पोलिसांचा मोर्चा निघाला होता. त्यातलं हे चित्रं खास तुमच्यासाठी डकवतोय :

http://static.dainiktribuneonline.com/wp-content/uploads/2012/08/PTI8_21_2012_000146B.jpg

पोलीस मनसेवर का हात उचलणार नाहीत हे वरील चित्रातून कळतं.

आ.न.,
-गा.पै.

राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. गोव्यासारख्या लहान राज्याचे पोलीस टोल बूथ मोडणाऱ्या नारायण राणेंच्या सुपुत्राला झोडून काढून आत टाकू शकतात तर महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.

१. सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.

देश स्वतंत्र असेल तर कायद्याने ज्या गोष्टीची मुभा दिली आहे ते करण्याची १००% मुभा सर्वानाच असून त्यांत बंदी इत्यादींची भाषा करणारे गुंड आहेत. मुलीची छेड कडणाऱ्याला काय करतात तेच त्यांचे करावे.

२. निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.

न्यायालयाला क्रिकेट नियामक मंडळ चालवण्याचे फार महत्वाचे काम असताना कायद्याचे रक्षण वगैरे करण्याचे फुटकळ काम करण्यासाठी काम नसावा. त्या शिवाय ह्यावर कायदेशीर निर्णय येई पर्यंत फवाद खान ला नातवंडे होतील. ह्या शिवाय न्यायालयाच्या निवडायचे पालन होईल ह्याची काय शाश्वती ? गुंड गिरीची भीती असेल तर तुम्ही आपल्या मुलांना चित्रपट गृहांत पाठवाल का ? इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.

३. महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?

इथे फक्त चित्रपटाच्या गल्ल्याचा आणि निर्मात्यांच्या फायद्याचा प्रश्न नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन मार्केटिंग साठी आधीपासूनच पैसे खर्च केलेला असतो. बहुतेक करून चित्रपटगृहांनी ऍडव्हान्स मध्ये प्रिंट्स आणि स्क्रिन्स बुक केलेल्या असतात. अनेक लोकांचे भवितव्याचा इथे प्रश्न आहे. करण जोहर चा चित्रपट लागला नाही तर पुढच्या वेळी त्याला ऍडव्हान्स डील्स बुक करणे मुश्किल होईल.

४. मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?

१००%. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मूर्खपणाचा होता. २०% आमदार असणाऱ्या पक्षाने धमकी दिली असती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाख घालून कायद्याचे रक्षण चित्रपटाला द्यायला पाहिजे होते. मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती.

५. आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?

खंडणीचा पैसे कुठे जातो ह्यावर काहीही अवलंबून राहत नाही. खंडणी ती खंडणी.

६. या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.

ह्या वादांत राज ठाकरे ह्यांच्या फायदा झाला आहे. फक्त १ आमदार असून सुद्धा आपण कोणी तरी मोठे नेते आहोत हे त्यांना दाखविण्याची संधी फडणवीसांनी विनाकारण उपलब्ध करून दिली आहे. आत रिपब्लिकन पक्ष, शेकाप, शिवसेना, AIIMB इत्यादी मंडळी सुद्धा त्यांच्या छाताडावर चढतील ह्यांत काहीही शंका नाही.

कायदा हि सोयीस्कर आहे तेव्हांच अंबलबजावणी करण्याची गोष्ट नाही. उलट जेव्हा कायदा बजावण्यात धोका असतो तेव्हांच देशाच्या कायद्याची खरी कसोटी लागते. देवेंद्र ह्याच्या वागणुकीतून महाराष्ट्रांत कायदा बजावण्याची धमक नाही हेच स्पष्ट झाले आहे.

इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.

"इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दर वाढवून वसूल केले असते."

इथे असे काही झालेले नाही असे छातीठोकपणे सांगता येईल? सैनिक फण्डला काही रक्कम उघडपणे देऊन उरलेले निम्मे निम्मे वाटून घेतलेले नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल? अशा बातम्या विकीवर किंवा पेपरमध्ये येत नसतात. लोकांना दाट संशय आहे हे खरे.

या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा. आपणच आरोप करायचे आणि पुरावे नसल्याने समोरच्यालाच निर्दोषत्व सिद्ध करायला सांगायचे ही केजरीवाली पद्धत जुनी झाली.

पत्रकारांना, सत्तेत नसलेल्यांना किंवा अगदी मराठी संस्थळावर आपल्या पक्षाचा अजेंडा रेटवणार्‍या खर्‍या खोट्या आयडींना हे सगळे करण्याबाबत काय काय मिळत असावेत याबाबत अनेकांना अनेक संशय आहेत. हे ही खरे.

राही's picture

25 Oct 2016 - 11:00 am | राही

एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच. आणि पक्षाचा अजेंडा संतप्त भक्तिभावाने कोण रेटते ते वेगळे लिहायला नको.
आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे..
आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.

एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.

आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..?

आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात

पैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो.

माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे.

तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच

तुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही.

आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे..

या वाक्याचा संदर्भ कळाला नाही.

आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.

मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 1:46 pm | बोका-ए-आझम

डाव्या लोकांचे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असतात, माहित आहे ना तुम्हाला? एकदा डावी विचारसरणी म्हटल्यावर दुर्लक्ष करावं.

सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ.

याबाबत मी क्लिंटन ला आदर्श मानतो, डावे दिसले की त्यांच्या विचारांमधील दांभीकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे पळवाटा तयार असतातच पण "इथे विरोध होतो आहे" इतकी साधी गोष्टही त्यांना पळ काढायला पुरेशी असते.

दुर्लक्ष केले की "समोरच्याने उत्तर दिले नाही म्हणजे माझेच बरोबर" आणि उत्तर दिले की "बघा बघा किती असहिष्णुता वाढली आहे किंवा "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" वगैरे अपेक्षित रूळावरून गाडी जाईलच त्यामुळे आजिबात दुर्लक्ष करू नये.

राही's picture

25 Oct 2016 - 5:40 pm | राही

पळ वगैरे काढण्याचा प्रश्नच नाही. पण तेच तेच मुद्दे उगाळले जाऊ लागले आणि तर्कहीन आर्ग्युमेंट होऊ लागले की प्रतिसाद लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग गप्प राहावेसे वाटते इतकेच. मला इथे काही युद्धबिद्ध खेळण्यासाठी यायचे नसते. म्हणून तर कमीत कमी वावर असतो. पैशाच्या लोभाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे (तुम्हाला/सगळ्यांना) माहीत होते पण इथे (माझ्या प्रतिसादात) सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे (तुम्हाला) वाटले नव्हते, हा तुम्ही काढलेला अर्थ वा तुम्ही व्यक्त केलेले मत माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या वाक्यावरून होऊ शकते? आणि या माझ्या प्रतिसादात तुम्हाला दांभिकता कुठे दिसली? 'बघा बघा किती असहिष्णुता....' वगैरे टाइपचे प्रतिसाद मी कधी दिले?
आणि 'डावे दिसले की त्यांच्या विचारातली दांभिकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा' हा तुमचा अजेंडा असेल तर (असू शकतो, माझे त्याबाबत काहीही मत नाही) तुमचा वरील प्रतिसाद त्यानुसार नाही कारण त्यातून कोणतीही दांभिकता उघड झालेली नाही.
म्हणून टंकाळा येतो.

सर्वप्रथम - तुम्हाला डावी विचारसरणी पटते का..?

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 10:17 am | हतोळकरांचा प्रसाद

इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.

मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.

मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती

आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? आता या घडीला तरी रस्त्यावर सगळ्यात जास्त पाठिंबा असलेले नेते राज ठाकरे नाहीयेत का? मला असं वाटतंय कि तथाकथित खंडणीचा पैसा सैनिक कल्याण निधीला नको हे मुळी दुखणंच नसून मनसे हे दुखणं आहे.

अवांतर : सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.

इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.

व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!

साहना's picture

25 Oct 2016 - 11:43 am | साहना

> मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.

1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा.

> आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय?

१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ?

> सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.

खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ?

> व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!

१ आमदार असलेल्या पक्षाचे काहीही दुखणे नाही. देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याने ज्याच्या कडून अनेक अपेक्षा होत्या त्यानी फुटकळ गुंडा पुढे सपशेल शरणागती पत्करून दलाली करावी हे पटले नाही. मूळ दुखणे हेच आहे. मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Oct 2016 - 3:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

>>1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा.

परत तेच, फक्त द्वेष. माझ्या माहितीनुसार मनसे चित्रपट सेना हि सभासदांच्या संख्येनुसार सर्वात मोठी चित्रपट संघटना आहे!

>>१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ?
फक्त तुम्ही म्हणाल म्हणून सगळे खरे असे नसते! गुंडगिरीची प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय?

>>खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ?

हि तुलना योग्य वाटते तुम्हाला? मनसे ने तसे केले तर तो नक्कीच गुन्हा आहे आणि कोर्ट आहे त्यासाठी! तुमचा द्वेष व्यक्त करण्यासाठीचा हा कपोलकल्पित मुद्दा लागू होत नाही इथे.

>>मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.

हाहाहा! परत परत फुटकळ गुंड म्हणालात तरी तुम्ही परिस्थिती जाणतच असाल असे गृहीत धरतो! तुम्ही हा राग व्यक्त करत आहात कारण फक्त तुमचं मनसे बद्दलचं फुटकळ असं मत आणि मुख्यमंत्रांचं परिस्थितीचा आढावा घेऊन महत्व देण्याचं मत जुळत नाही. खरंतर तुमच्या या वाक्यावरूनच कळतंय कि तुमच्या खिजगणतीत कोण आहे आणि कोण नाही.

सुबोध खरे's picture

25 Oct 2016 - 10:48 am | सुबोध खरे

पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू द्यावे हे तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या वाचून यांचे का आणि काय अडते?
इतर परदेशी कलाकारांबाबत भारतीय नागरिकांची आत्यंतिक भूमिका नाही तर "फक्त पाकिस्तानी" कलाकारांबाबत आहे याचे कारण प्रत्येकाला माहीत आहे.
हे "बाहेरून" येणारा पैसे बोलतो आणि "फिल्मी" लोकांचा पैसा हाच देव आहे. जसे जिहादी धर्मासाठी काहीही करायला तयार असतात तसेच हे फिल्मी लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात.
मुळात मी सिनेमे कमीच पाहतो परंतु सलमान खान आणि शाहरुख खान यांचे "कर्तृत्व" पाहिल्यावर मी आणि माझे कुटुंब यांनी त्यांच्या सिनेमावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्नच येत नाही. मी याच कारणासाठी "हिना" सुद्धा पहिला नाही.
यांचे सिनेमे किंवा पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे पाहिले नाही तर काही जीव जात नाही.
प्रत्येक गोष्ट कायदेशीर असली तरीही नैतिक दृष्ट्या बरोबर असतेच असे नाही.
सरकार कायद्यावर बोट ठेवून चालते त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही हे म्हणणे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कठीण जात असावे. ( मला नक्की माहिती नाही हे मी आत्ताच नमूद करू इच्छितो). अगोदर झाले ते झाले.
परंतु आपले इतके सैनिक( आणि आपले सीमेलगतच्या नागरिक आणि त्यांची गुरे/ पाळीव प्राणी) पाकिस्तान कडून मारले गेल्यावर जर श्री शाम बेनेगल याना बेशरम पणे परत पाकिस्तानी कलाकारांना घ्यावेसे वाटत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मी पाठिंबाच देईन.
माझी देशभक्तीची व्याख्या चूक असेल एकांगी असेल तरीही ती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत आहे.

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 11:51 am | सुज्ञ

मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे संडास झ्हाली आहे . त्यामानाने टीवटीव हा सौम्यच शब्द म्हणावा लागेल .

असेच आवांतर : आपण कुठल्या पार्टी ला समर्थन करतो त्यावरून आपली वैचारिक पात्रता कळते काय ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Oct 2016 - 11:57 am | कैलासवासी सोन्याबापु

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय, इथे तुमचा निरक्षीर विवेक दिसलेला नाही असे सखेद आश्चर्याने नमूद करावे वाटते आहे.

गणामास्तर's picture

25 Oct 2016 - 12:26 pm | गणामास्तर

बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. पाच सात मिनिटांत लगेचं सगळे प्रतिक्रिया देतील असे कसे होईल?

+१११

थोडा वेळ देत जावा बापू.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Oct 2016 - 1:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरेच्या! असा वेळ देतात होय! पूर्वानुभवावरून तरी तसे वाटले नव्हते, डांगेंच्याच एका प्रतिसादाला आम्ही ५ मिनिटात रिप्लाय दिला नाही म्हणून आम्हाला मानसिक क्लेश होऊस्तोवर शेलकी विशेषणे बहाल केली गेली होती, ह्याच मिपावर, खास त्या कामाकरता एक डू आयडी डेप्युट करून, त्यावरून आमचा ग्रह झाला की बोवा हीच जनरीत असेल, असो तशी जनरीत नसल्यास आम्ही समस्तांची जाहीर माफी मागतो अन "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" इतकेच म्हणतो, वरती आमचे लेखन दैवत बोक्याभाऊ , किंवा इतर भद्रजन "आम्ही इतर पक्षीय भक्त सहन करतो वगैरे" बोलले आहेत तेव्हा "तुम्ही सरळ ऐसी अक्षरेवर जा" वगैरे कोण कोणाला बोलले होते त्याचा गोंधळ उडतो बघा बाकी काही नाही.

बापू, नक्की मुद्दा काय आहे..?

मी माझ्यापुरते बोलतो. मी जसा डांगेंचा विरोध केला आहे तसाच गुरूजींचाही विरोध केला आहे. आणि असा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध करावा अशी अपेक्षा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यासाठी "डुआयडींची पिलावळ किंवा नैतीकतेचा कंपास हरवून खुशाल आरोप करणारे" आणि "डांगे व श्रीगुरूजी" यांना एकाच रांगेत बसवावे लागेल.

बाकी प्रतिसादाबद्दल "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" हे इथे कसे लागू आहे सांगा.

मोदक's picture

25 Oct 2016 - 1:18 pm | मोदक

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय

बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का?

नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..?

सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..?

मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे.

आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Oct 2016 - 2:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

डिस्क्लेमर :- डांगेंची माझी मैत्री जुळणे, किंवा मी त्यांच्यावतीने प्रतिवाद करणे, आम्ही एकाच गावचे (नियतीच्या कृपेने) असणे ह्याचा कोणी अर्थाअर्थी संबंध जोडत असल्यास खाली लिहिलेले सगळेच तुम्हाला आवडेल असे नाही, आपापल्या जबाबदारीवर वाचा

बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का?

हे सुस्पष्ट नाहीये का? असला घाण श्लेष केल्याबद्दलच मागे एक डु आयडी बॅन झाल्याचे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो

नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..?

तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही

सुज्ञ's picture

25 Oct 2016 - 2:37 pm | सुज्ञ

मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

सुज्ञ यांनी मान्य केले असेल तर ठीक अन्यथा "संडास" हा शब्द संदीप डांगेंच्य नावावरचा श्लेष आहे हे पटणे थोडे अवघड आहे.

नीरक्षीरविवेकाची गाडी जर विखारी डुआयडी या स्टेशनाला लागत असेल तर माझा पास. कितीही लॉजीकल लिहून वाद घातला तरी एका क्षणानंतर ती पिलावळ मूळपदावर येते असा स्वानुभव असल्याने अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. असे मी माझ्यापुरते ठरवले आहे.

मोगाखान आणि डांगे ही तुलना पटली नाही. डांगे बहुतेकदा लॉजीकल लिहिण्यचा प्रयत्न करतात असे मी येथेच एक दोन ठिकाणी लिहिलेले सापडेल.

मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ??

अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील.

मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा

बापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही.
मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2016 - 11:49 pm | श्रीगुरुजी

तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही

मुद्द्याला मुद्द्द्याने प्रतिवाद करावा असे आपले वरील वाक्य वाचून अंमळ आश्चर्य वाटले. मला भाजपकडून पैसे मिळतात अशा अर्थाचे आरोप तुम्हीच माझ्यावर दोन वेळा केले आहेत. पहिल्या आरोपाला मी काहीच उत्तर न देता फक्त "अवघड आहे" एवढाच प्रतिसाद दिल्यानंतर, "सॉरी. गंमत केली." अशा अर्थाचे लिहून तुम्ही तो विषय संपविला होता. या धाग्यात पुन्हा एकदा तोच आरोप आहे. मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करण्याचे हे उदाहरण समजावे का?

याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता.

वरील उदाहरणात आपण पातळी सोडली नाही का?

याच मोगाने आपल्या एका पूर्वातरात स्वतःच एक धागा काढून आपली बायको अनेक वर्षे आपल्याला सोडून माहेरी रहात होती असे लिहिले होते. आपले सासूसासरे, मेव्ह्णे, मेव्हणी यांच्याविषयी त्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती. "आपले स्वतःचे स्पर्म संपले म्हणून सासरा मला पोरं काढायला सांगतोय" अशा अर्थाची वाक्ये त्यात होती. इतका गलिच्छ धागा संपादकांनी लगेच उडवून टाकला होता. याच मोगाने आपल्या असंख्य अवतारांपैकी अनेक अवतारांमध्ये मोदी व त्यांची बायको, वाजपेयींचे ब्रह्मचर्य यावर अत्यंत असभ्य प्रतिसाद दिले आहेत. "मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो," असे आपण आज तावातावाने सांगत आहात. परंतु मोगाचे मागील असंख्य असभ्य प्रतिसाद आपण सोयिस्कररित्या विसरलेला दिसता. आता नीलकांतभाऊंना सांगून आपण आपला आयडी सरेंडर करणार का? मी मोगाच्या जवळपास सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. अगदी क्वचितच त्याच्या प्रतिसादाला मला उत्तर द्यावे लागते. मी मोगावर जी काँमेट केली ती नक्की कोणत्या धाग्यात केली हे आता आठवत नाही. परंतु त्या काँमेंटमागे काहीतरी असभ्य संदर्भ होता व तो कोणता होता ते आठवत नाही. मोगाच्या १०% प्रतिसादांवर विचार करणे म्हणजे तुमच्या लेखी नीरक्षीरविवेक असेल. तुम्हाला त्याच्या १०% प्रतिसादांचे कौतुक असेल, पण मोगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा माझ्या लेखी नीरक्षीरविवेक आहे. असो.

असभ्य, वैयक्तिक प्रतिसादांचं म्हणाल तर माझ्याबाबतीत अनेकांनी, अनेकवेळा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत (तुमच्यासहीत). एका ऋषीतुल्य सदस्याने लागोपाठ १०-१२ प्रतिसादात माझा "खोटारडे" असा उल्लेख करून मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे शोध लावले होते. एका उंदीरमामांनी तर मी ऑफिसमधील नेट फुकट वापरतो व मिपावर मी लिहिलेल्या प्रत्येक प्रतिसादाला, प्रतिसादातील प्रत्येक परिच्छेदाला, परिच्छेदातील प्रत्येक वाक्याला व वाक्यातील प्रत्येक शब्दाला मला भाजपकडून पैसे मिळतात असे बिनदिक्क्त ठोकून दिले होते. ऑफिसमधील नेट फुकट वापरून मी भाजपची भलामण करून पैसे कमावतो असा त्यांचा शोध होता. मी कोण आहे, मी काय करतो इ. ची कणभरदेखील माहिती नसताना बिनदिक्कतपणे असा शोध लावणे कौतुकास्पद होते. अजून एका भटजीबुवांनी तर अनेक प्रतिसादातून माझा एकेरी उल्लेख करून माझी भ्याड, कपटी, पाताळयंत्री, खोटारडा, टनाटनी असे शब्द वापरून माझी संभावना केली होती. एका अभ्यासू समजल्या जाणार्‍या सदस्याने एका प्रतिसादात "मला भरपूर रिकामा वेळ असतो, म्हणून मी वेगवेगळ्या लिंका देतो" असा शोध लावला होता. एनीवे, सवयीने मी अशा वैयक्तिक हल्ल्यांना फार गांभिर्याने न घेता त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2016 - 8:41 am | कैलासवासी सोन्याबापु

सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला नाही मोदकभाऊला होता, तरी तुमचा उल्लेख असल्यामुळे तुम्ही बोललात हे रास्तच आहे.

याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता.

होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे

दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय

तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा, मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Oct 2016 - 10:14 am | हतोळकरांचा प्रसाद

वरील तीनचार प्रतिसाद अतिशय अवांतर आणि विषयाला सोडून/वैयक्तिक आहेत असं वाटत नाहीये का? संदिपजी, सोन्याबापू, श्रीगुरुजी, मोदकभाऊ घ्या सांभाळून झालं!

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2016 - 1:38 pm | श्रीगुरुजी

होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे

तुमची दानत, तुमचा दम तुम्हालाच लखलाभ होवो. मला तुमची दानत, दम दाखविण्याची गरज नाही.

दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय

म्हणजे तुम्हाला भ्रम झालेला नसून तुमची माझ्याबद्दल खात्री झालेली दिसतेय. माझ्याबद्दल कणभरही माहिती नसताना आपले भ्रम हेच अंतिम सत्य आहे अशा समजूत करून घेण्यात व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यात नक्कीच "दम" असावा लागतो.

तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा,

तुम्ही राहिलात किंवा गेलात मला शष्प फरक पडत नाही. तुम्ही असल्याचे आनंद किंवा दु:ख मला नसल्याने तुम्ही गेल्याने मला दु:ख किंवा आनंद होण्याची सुतराम शक्यता नाही. मी नीलकांतभाऊंना सांगून आयडी सरेंडर करेन हे तुमचेच शब्द होते.

मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.

म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. आपण एकदा तोल जाऊन बोललो असे काहीतरी स्वतःचे समर्थन करताय. दुसर्‍या एकाने लिहिलेल्या "संडास" या शब्दाचा संबंध तुम्ही संदीप डांगेंशी जोडून राग व्यक्त केला तो कशासाठी? तो आयडी काही तुमच्याबद्दल बोलत नव्हता. आणि आपण स्वतःच चंपाबाई या आयडीचा "चंपी" असा एकेरी उल्लेख केला होता याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. माझ्याविरूद्ध एकदा सोडून दोन वेळा वैयक्तिक कामेंट केलीत. काही दिवसांपूर्वीच अजून एका सदस्याला आपण धमकीवजा इशारा दिलेला आहे. तुमचा तोल गेल्याची बघताबघता ४ उदाहरणे सापडली. थोडी खोदाखोद केली अजून बरीच उदाहरणे निघतील. आणि याला तुम्ही फक्त एकदा तोल जाऊन बोललो असे म्हणून समर्थन करता! बाकी कायद्याचं म्हणाल तर तुम्ही ज्या कायद्याने मोगाला किंवा मला किंवा इतरांना झोडपता तोच कायदा मी वापरतो असे म्हणता येईल.