अंधार्या राती, तुझा हात हाती,
निर्मळ ही प्रिती, तुजवरी..
फुलासंगे फुलशी, वार्यासंगे झुलशी,
कळीसंगे खुलशी, स्वप्नपरी..
माझा प्रत्येक श्वास, धरुनी तुझाच ध्यास,
करितो हृदयी प्रवास, घेउनी गती..
तुच माझी दिशा, माझी वेडी आशा,
माझ्या प्रेमाची भाषा, माझी प्रिती....
प्रतिक्रिया
24 Oct 2016 - 5:22 pm | चांदणे संदीप
आडनाव काय आहे?
Sandy
24 Oct 2016 - 11:42 pm | शार्दुल_हातोळकर
छान....
25 Oct 2016 - 12:09 am | चित्रगुप्त
व्वा. आधी प्रेम म्हणजे काय, आता प्रिती. मस्तच.
आता प्रणय, प्यार, इश्क, मोहोब्बत ... वगैरेंवरही लिहावे ही विनंती.
25 Oct 2016 - 2:37 am | चित्रगुप्त
ही कविता खालील सिनेमावरून सुचली असावी, असे पहिली ओळ वाचून वाटले.
25 Oct 2016 - 12:12 pm | सोहम कामत
धन्यवाद..
25 Oct 2016 - 2:15 pm | राजेंद्र देवी
आवडली..