जन्मभर

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 11:44 am

नेसत्या वस्त्रानिशी मी
हा असा आता निघालो
ना कळे जन्मामध्ये या
काय मी कमवुन गेलो?

झाकण्या लाखो उणिवा
केवढी केली शिकस्त
दाटले आभाळ होते
मी दिखाव्यात व्यस्त

ल्यायलो रेशीम वस्त्रे
घ्यावया सन्मान खोटा
भाळलो का मी कळेणा
पाहता त्या चोरवाटा

जे मुळी नव्हतेच माझे
वाहिले आयुष्य त्यांना
वंदिले समजुन सूर्य
त्या भ्रमाच्या काजव्यांना

जाहला सूर्यास्त जेव्हा
पांगले सारे घरोघर
मग जणू मिटताच डोळे
जाणिला गुंता खरोखर

जन्मभर केला दिखावा
मानुनी आयुष्य त्याला
खेळ सारा जीवनाचा
तो चितेवर ज्ञात झाला

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Oct 2016 - 11:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फार सुंदर... वृत्तबद्ध रचनांची गेयता मला फार आवडते..
तश्या रचना बाधंण आम्हाला जमत नाही याच वाईट वाटत...

शार्दुल_हातोळकर's picture

23 Oct 2016 - 12:07 pm | शार्दुल_हातोळकर

तुमचा मनमोकळा आणि दिलखुलास प्रतिसाद आवडला ! प्रत्येक कवी हा आपापल्या पद्धतीने कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक प्रा. राम शेवाळकरांनी म्हटले होते "प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो !"

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Oct 2016 - 12:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो !

वाह!!

चांदणे संदीप's picture

23 Oct 2016 - 1:03 pm | चांदणे संदीप

आवडली!

तुमची कविता वाचून हिन्दीतले सुप्रसिद्ध कवि हरिशंकर परसाई यांची एक कविता मला आठवली.

क्या किया आज तक क्या पाया?

मैं सोच रहा, सिर पर अपार
दिन, मास, वर्ष का धरे भार
पल, प्रतिपल का अंबार लगा
आखिर पाया तो क्या पाया?

जब तान छिड़ी, मैं बोल उठा
जब थाप पड़ी, पग डोल उठा
औरों के स्वर में स्वर भर कर
अब तक गाया तो क्या गाया?
सब लुटा विश्व को रंक हुआ
रीता तब मेरा अंक हुआ
दाता से फिर याचक बनकर
कण-कण पाया तो क्या पाया?
जिस ओर उठी अंगुली जग की
उस ओर मुड़ी गति भी पग की
जग के अंचल से बंधा हुआ
खिंचता आया तो क्या आया?
जो वर्तमान ने उगल दिया
उसको भविष्य ने निगल लिया
है ज्ञान, सत्य ही श्रेष्ठ किंतु
जूठन खाया तो क्या खाया?

- हरिशंकर परसाई

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2016 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

@जे मुळी नव्हतेच माझे
वाहिले आयुष्य त्यांना
वंदिले समजुन सूर्य
त्या भ्रमाच्या काजव्यांना››› सुंदर.!

@जाहला सूर्यास्त जेव्हा
पांगले सारे घरोघर
मग जणू मिटताच डोळे
जाणिला गुंता खरोखर››› लाजव्वाब!

@जन्मभर केला दिखावा
मानुनी आयुष्य त्याला
खेळ सारा जीवनाचा
तो चितेवर ज्ञात झाला››› कळस! __/\__

गौरी कुलकर्णी २३'s picture

23 Oct 2016 - 5:35 pm | गौरी कुलकर्णी २३

खुप सुंदर काव्य ! कवी तूम्ही इथे ह्रदय स्पर्शून बोलून जाता अन् आम्ही निःशब्द होतो...स्तब्ध होतो !!

शार्दुल_हातोळकर's picture

23 Oct 2016 - 6:16 pm | शार्दुल_हातोळकर

संदीपजी, आत्मबंध, गौरीजी मनापासुन धन्यवाद.

@संदीपजी - खुपच छान हिंदी कविता....
@आत्मबंध - अतोनात उर्जा देणारा प्रतिसाद....
@गौरीजी - कवितेचा सच्चा गौरव....

राजेंद्र देवी's picture

25 Oct 2016 - 2:17 pm | राजेंद्र देवी

अप्रतीम...आवडली..

वैभव पवार's picture

25 Oct 2016 - 2:22 pm | वैभव पवार

खुप छन!

वैभव पवार's picture

25 Oct 2016 - 2:22 pm | वैभव पवार

खुप छान!

सस्नेह's picture

25 Oct 2016 - 3:27 pm | सस्नेह

अर्थगर्भ आशय भिडून गेला.

शार्दुल_हातोळकर's picture

25 Oct 2016 - 11:28 pm | शार्दुल_हातोळकर

मनापासुन धन्यवाद मंडळी !