कधी असे ...

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
6 Feb 2009 - 2:55 pm

कधी असे मलाही
वाटले होते
नभ हे मेघांनी
दाटले होते |

शिशिरात कसे
फूल उमलले होते
ओलावा शोधीत
मूळ पसरले होते |

भासले वळणावरती
कुणी थांबले होते
हात घेण्या हाती
मी ही चालले होते |

र्‍हुदयी या मायेने
गारुड घातले होते
सर्वस्वसही माझे
पणास लावले होते |

आत्म्यास मोहाने
असे जखडले होते
मार्गावरी माझ्या
काटे पसरले होते |

भय, लोभ, द्वेषा चे
रण पेटले होते
अंध अहंकाराने
चित्त गोठले होते |

कोलाहलात सार्‍या
गाणे हरवले होते
गर्दीने माणसाला
पुन्हा फसवले होते |

कविता

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

6 Feb 2009 - 2:59 pm | बेसनलाडू

कोलाहलात सार्‍या
गाणे हरवले होते
गर्दीने माणसाला
पुन्हा फसवले होते |

हे सगळ्यात जास्त आवडले.
काही कडव्यांमध्ये ओळींची वीण आणखी घट्ट बसली असती, तर मजा वाढली असती, असे वाटले. चू. भू. द्या. घ्या.
(सूचक)बेसनलाडू

सर्किट's picture

7 Feb 2009 - 1:13 pm | सर्किट (not verified)

प्रकाशनापूर्वी जाणत्या लोकांकडून तपासून घेतल्यास अधिक उत्तम.

बाकी कविता ठीक.

-- सर्किट

मनीषा's picture

9 Feb 2009 - 11:39 am | मनीषा

त्यासाठीच तर इथे प्रकाशित केली ...

अनिल हटेला's picture

6 Feb 2009 - 3:02 pm | अनिल हटेला

सुंदर कविता !!!
अजुनही वाचायला आवडतील !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सहज's picture

6 Feb 2009 - 3:14 pm | सहज

शेवटचे कडवे खास!

मीनल's picture

6 Feb 2009 - 9:02 pm | मीनल

आवडली कविता
मीनल.

संदीप चित्रे's picture

6 Feb 2009 - 9:07 pm | संदीप चित्रे

विशेष आवडले...

प्राजु's picture

7 Feb 2009 - 8:44 am | प्राजु

शेवटचे कडवे खूप आवडले. सुंदर..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

7 Feb 2009 - 1:06 pm | मदनबाण

कोलाहलात सार्‍या
गाणे हरवले होते
गर्दीने माणसाला
पुन्हा फसवले होते |

व्वा...

मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

मनीषा's picture

9 Feb 2009 - 11:36 am | मनीषा

मनःपूर्वक आभार !