मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 2:39 pm | ज्याक ऑफ ऑल
100% मान्य .... पण आजकाल बुलेट या पर सायकल 3000-4000 बनवल्या .... इतक्या विकल्या .... यावर दुर्दैवाने कंपनी भर देतेय. मी बुलेट ची स्वप्न पाहायचो तेव्हा "यु गॉट टू अर्न ईट !!" हा स्टेटस होता त्याचा. पण आता कित्त्येक होतकरू किंवा होतंय तितकं करू टाईप "प्रीन्स्भाऊ" रस्तोरस्ती मोकार झालेत .
येथेच क्वालिटीवाईज आणि मास वाईज बुलेट स्प्लेंडर झालीये. माझे जितके मित्र (बुलेटवाले) आहेत , त्यांच्याशी बोलताना ९९% वेळेस ही नाराजी बाहेर येते. ती क्वालिटी बद्दल असते ... सर्विस बद्दल असते , पार्टस बद्दल असते ... ई ई . मग एका महिन्यात चेन स्प्रोकेट खराब होणं असो .. वा लगेच रस्टीन्ग होणं ... असो वा खूप पैसे देऊन पण ट्यून मशीन नसणं.
मी २००७ पासून बुलेट वापरतोय. तेवापासून आतापर्यंत बुलेट ची क्वालिटी सेमच आहे असं म्हणण आहे का तुमचं ? उत्तर "नाही" अस असेल तर मग तुम्ही पण माझ्याच मार्गावरून प्रवास चालू केलायत हे खरं ... आणि "हो" असेल तर मग दोघांपैकी कोणीतरी अती आग्रही आहे .
जे आहे ते आहे .... बुलेट ईज बिकमिंग A Toy ऑफ Dudes and Duddettes ....
फक्त "While talking abt Bullet to Non-Bulleteers" अल्वेज एन ओनली प्रेज बुलेट ... हा "शिष्टाचार" पाळला जातो हे पटो वा ना पटो ... खरं आहे (परत - वैयक्तिक मत)
बादवे ... विंडशिल्ड - १००% खरं ... तो नोवेल्टी आयटम आहे. सिटी राईड पुरताच बरा.
3 Oct 2016 - 3:52 pm | अनिरुद्ध.वैद्य
चेन स्प्रॉकेट , ट्युनींग अन स्पेअर्सची क्वालीटीसुद्धा फार्फार वाईट आहेत. क्लच केबल अॅड करा ह्या लिस्टीत!
सर्व्हिसबाबत तर बोबच. त्यात तो लीकेजचा प्रॉब्लेम. इफ इट डजण्ट लीक देन इटस नॉट एन्फील्डपर्यंत म्हणुन झालंय कैक दशकांपासुन असलेला हा प्रॉब्लेम सुधरत नाहिये.
क्वालिटी संपलीय, क्वांटीटी वाढलीयं अन सगळे फाटके सायलेंसर वापरुन सगळीकड ध्वनीप्रदुषण वाढवत बसतात.
3 Oct 2016 - 4:37 pm | टवाळ कार्टा
क्वालिटी होतीच कधी?
आणि
तो गडगडाट करणार्या आवाजासाठीच घेतात ना बुलेट?
3 Oct 2016 - 4:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
क्वालिटी नसती तर इंडियन आर्मी (स्वातंत्र्यानंतर) किंवा ब्रिटिश फ्रेंच आर्मीज (द्वितीय विश्वयुद्धात) बुलेट वर भरोसा ठेवते झाले नसते, मास प्रॉडक्शन तेव्हाही झाले होतेच की, बाकी हल्ली थोडी घसरली आहे क्वालिटी ह्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, ती एक बुलेट प्रेमी म्हणून करायला मी तयार आहे, फक्त जर तू रेडिओवाणी फकस्त बोलणार ऐकणार नाय मोड ऑन करणार असलास तर त्या चर्चेत मजा काय उरणार? उलट मी निर्जीव रेडिओम्होरं बडबड करीत बसलोय म्हणून लोकं मलाच खुळ्यात काढतील, तेव्हा काय ते ठरव अन सांग. बाकी तू सातत्याने जर स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायलाच जर बुलेट किंवा बुलेट धागा धरत असलास तर तुझा मी शतशः आभारी आहे टक्या, कारण एट द एंड ऑफ द डे यु प्रुव्हड माय पॉईंट मेटीक्युलसली :) ;)
3 Oct 2016 - 5:12 pm | अनिरुद्ध.वैद्य
तुम्ही नव्याच बुलेटा पाहिल्या अस्तील भंगार स्पेअर्स क्वालिटीच्या तर इलाज नाही. आपल्या वयाच्या बुलेट गाड्या जेव्हा धडाल उडवत नेतात आजोबा अन काका लोक्स तेव्हा तोंडात बोट जातात भौ!
क्वालीटी चिल्लर पार्टचीच खराब होतेय आसं म्हणतुय आम्ही. कंफर्ट अन एफिशियेन्सी घ्याल तर सेगमेंटच्या सगळ्या गाड्यांना तोंडात मारेन अशी गुणी आहे बुलेट. धक्का नाय लागत अन वाटेल तेवढे खेचुन घेते बर्का गाडी अन भारतीय असल्याने भारतीयांचा कितना देती है प्रश्न पण सोल्व्ह करते. सदोदीत ४० - ४५ चा माय्लेज भेटतोय देवा. और क्या चैये?
3 Oct 2016 - 5:50 pm | ज्याक ऑफ ऑल
आमच्या इकडे लोक त्याला "ष्ट्रोक घेत चालणं" म्हणतात ...विशेषत: गवळी .. धनाढ्य शेतकरी ... पैलवान असे लोक.
(प्रिन्स क्याटेगीरी नाय)
१९८० वगैरे सालच्या बुलेट म्हणूनच आजपण २-२ ३-३ लाखाला घेतात न लोक ...
त्या "बुलेटी" अन त्या पर्स्नालीटी ... दोन्ही गेल्या ...
आता गेला बाजार .... पार्श्वभागा ऐवजी मानेवर शेपट्या वाढवणारे योयो अन बादशा गाड्या चालवतात ...
त्यांच्या साठी बुलेट ही बुलेट नसून "फक्त स्टाईल" आहे ...आणि म्हणून बुलेट नावाची स्प्लेंडर ...
बाकी कम्फर्ट म्हणाल तर थंडरबर्ड त्यातल्या त्यात प्रुवन मॉडेल ठरतंय आरई चं .... बाकी (सध्याचे) सगळे आनंद आहे ...
घारा असला की रणधीर ..
बारका असला की शशी अन
नाचरा असला की शम्मी ... मुळात सगळे कपूर कुलोत्पन्नच ...
या सारखं ....
निळी - लायटनिंग ब्लू
मातकट - डेझर्ट स्टार्म
चकचकीत - क्लासिक क्रोम ...
हे करकरून गाड्या "खपवायची" वेळ आलीये आता कंपनी वर ...
आधी कसं ... लीन बर्न ... माशिस्मो ... एलेक्त्रा ... सिटी बाईक .. टोरस ... एक झाका एक काढा ... सगळी लीजंड्स .. कास्ट आयरन इंजिन ... भल्या भल्याची बोबडी वळेल असलं वजन ... !!
असो ... माझा विरोध बुलेटच्या ग्रेटनेस ला नाहीच ... फक्त आता ती लेजंड वगैरे नक्कीच नाही राहिली असं म्हणणं मात्र नक्की आहे .
बुलेट वाला पण टीकाकार - ज्याक !!
3 Oct 2016 - 6:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
बऱ्याच अंशी सहमत आहे!. माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, आजकाल बुलेटचे स्पेयर पारच कंडम अन आधी कास्ट आयर्न लैच भारी असे असेलही, पण कास्ट आयर्नचे सुद्धा असंख्य प्रॉब्लेम असत, ते एक असो. मूळ मुद्दा माझा वेगळा आहे, तो म्हणजे आळस!!!. आजकाल पोरे होय पोरेच तुम्ही म्हणता तशी स्टाईल करता बुलेट घेतात पण बुलेटला जीव लावावा लागतो हे विसरतात, तिला निगुतीने पुसावे, आठवड्यात एकदा इंजिन बफिंग करावे, किमान सकाळी पहिली कीक मारताना नीट(च) गाडी पुसून मग कीक मारावी इतकेही होत नाही, परिणामी भाग खराब होणारच, इतर प्लॅस्टिक वापरणाऱ्या गाड्यांमध्ये रस्टिंगचा प्रश्नच नसतो! बुलेटचे फक्त घी पाहिले, निगुतीचा बडगा नाही असे केले की ऑल मेटल गाडी गंजणारच. असो.
3 Oct 2016 - 6:03 pm | अनिरुद्ध.वैद्य
निगुतीन कराव लागतयच बापु :) त्याशिवाय मजा नाय. ३ महिन्यात वाजायल लागंल गाडी :) :)
3 Oct 2016 - 7:55 pm | कपिलमुनी
कास्ट आयर्न इंजिन सीझ होणे हा भयानक अनुभव असतो .
मेंटनन्स जस्त असतो. व्हायब्रेशन जास्त होत्या.
बुलेटने इंजिनमधे चांगले बदल केले अहेत . क्वालीटी कंट्रोल वर भर दिला तर अजून चांगले वाटेल.
बाकी बटण स्टार्ट आल्यापासून कोणीही पोरटा , कार्टा बुलेटबद्दल बोलायला लागला आहे .
3 Oct 2016 - 4:25 pm | अमर विश्वास
क्वालिटी बाबत आपल्या विधनांशी पूर्णपणे सहमत...
बुलेटची क्वालिटी ... हे पुरतं काळापासून आपणासर्वांना न सुटलेले एक कोडे आहे..
मी स्वत: काही काळ एका ऑटोमोबाइल कंपनीत टूलरूम इंजिनेयर म्हणून काम केले आहे.. त्यमुळे या गोष्टीचे आश्चर्य वाटते की एवडी मोठी कंपनी हे साधे प्रॉब्लम्स का सोडवू शकत नाही ? इतक्या वर्षात एक ऑल अल्यूमिनियम ट्विन स्पार्क एंजिन सोडले तर कुठलिही मोठी सुधारणा नाही...
दोन वर्षापूर्वी माझ्या भावाने बजाज अवेंजर घेतली.. माझ्या बुलेटच्या आग्रहाला नाजुमनता..
त्या गाडीवर लॉंगड्राइव (अंदाजे 1500 KM) केल्यावर सोफिस्टिकेशन म्हणजे काय याची जणीव झाली.. तेंव्हा सहज विचार अल्ला होता.. या गाडीला बुलेट चे एंजिन बसवता येईल का? अर्थात असे करणे अवघड आहे.. पण आजही बुललेटचे गोडवे गाताना कुठेतरी मनात हे क्वालिटी इश्यूस खटकातात हे नक्की...
बुलेटशी एकनिष्ठ.... अ वि
3 Oct 2016 - 4:44 pm | ज्याक ऑफ ऑल
अमर विश्वास म्हणजे ते आपले बालीश्तर अमर विश्वास का काय सुशींचे ?
3 Oct 2016 - 5:07 pm | अमर विश्वास
होय... सुशिंचा जबरदस्त फॅन ....
3 Oct 2016 - 5:12 pm | अनिरुद्ध.वैद्य
ख्या ख्या ख्या!
3 Oct 2016 - 6:36 pm | जिन्क्स
इथे 'बुलेटची क्वालिटी' हा विषय वारंवार निघत आहे. पण बुलेटची खरी USP आहे तिचा लो एन्ड टॉर्क. बाकी देशी आणि वेदेशी गाड्या ४००-५०० सीसी मध्ये ४०-४५ बीएच्पी आरामात देतात. पण आपली बुलेट (होय!! आपली) मात्र २० (३५०सीसी) आणि २७ बीएच्पी (५०० सीसी) वरच समाधान मानते. पण पीक बीएच्पी जरी कमी असला तरी rpm vs torque हा ग्राफ जर पाहिला तर जगातल्या कोणत्याही गाडीला बुलेट आरामात मागे टाकेल. कारण आहे बुलेटच्या डीसायनर्सने जाणून बुजून जास्त ठेवलेला त्याचा इंजीन सिलींडरचा बोर लेन्थ. इथले अनुभवी बुलेट रायडर्स सांगू शकतील की वळणदार घाट रस्ता असो, खराब दगड धोंड्यांचा खच खळगेवाला (सच पास टाय्प) रस्ता असो, ओढे नाले पार करायचे असो, दिवसभर २००० rpm नी क्रुज करायचे असो, पाठीमागे ३०-४० किलो चे सामान लादून जगाच्या अंता पर्यंत प्रवास करायचा असो तेंव्हा हाच लो एन्ड टॉर्क कामी येतो जो बाकी गाड्यांमधे नाही.
मला वाटत ह्या आनंदाच्या बदल्यात थोडी reliability compromise करावी लागते. पण म्हणतात ना
"You can't have your cake and eat it"
3 Oct 2016 - 6:45 pm | मोदक
बरोबरे!!!
आजचा सुविचार :- बुलेट कडून अपेक्षिलेल्या परफेक्शनच्या 50% परफेक्शन स्वतः मध्ये आणावयाचा प्रयत्न करा, एखादे नोबेल नक्की मिळून जाईल ;)
3 Oct 2016 - 8:53 pm | अनिरुद्ध.वैद्य
नवीन ईंजीन्स भरपुर रिलाय्बल आहेत. जुन्या ईंजीनाचे सीझ होणे प्रकार जवळपास बंद झालेत.
पण टॉर्क अफाट! विथ पिलियन आणि लगेजसोबत घाटावाटातुन फिरायला मस्त. धाप न लागता गाडी पळत राहते.
3 Oct 2016 - 7:13 pm | अमर विश्वास
जिन्क्स भाउ
बुलेटचे फॅन तर आहोतच... सर्वा गुण दोषासकाट बुलेटला स्वीकारले आहे ...
जसे एखाद्या ठिकणी मिसळ चांगली मिळते म्हणुण इतर सर्व गैरसोईकडे दुर्लक्ष करून मिसळ खायला जातोच ना.. तसेच आहे हे..
अर्थात बुलेटच्या क्वालिटी प्रमणेच.. चांगली मिसळ ही बरेचदा गैरसोयीच्या (जसे अस्वच्छ, चिन्चोळ्य बोळात, बसायला पुरेशी जागा नसलेली,, इत्यादी इत्यादी.. ) जागी का असते हे न उलगडणारे कोडे आहे...
3 Oct 2016 - 8:07 pm | जिन्क्स
:) सहमत
बुलेट + मिसळ + अमर विश्वास (आम्ही सुशी फॅन) हे एकाच प्रतिसादात आल्यामुळे असहमती दर्शवून कसं चालेल.
19 Oct 2016 - 2:12 pm | भटकंती अनलिमिटेड
सायलेन्सर बदलावा म्हणतो. गोल्डस्टार विथ ग्लासवूल.
खरं तर बदलायच्या मनःस्थितीत नव्हतो, पण स्टॉक सायलेन्सरमधून आता बारीकसा चाळणीसारखा आवाज येऊ लागला आहे. एखादे बॅफल लूज झाले असावे. म्हणून आता बदलून बघावा म्हणतो.
19 Oct 2016 - 2:29 pm | अनिरुद्ध.वैद्य
बदलणार होते, त्यांनाही गोल्डस्टार विथ ग्लासवुल हवा होता. एक्झॅक्ट ते सांगु शकतील. माझं ईंदोर (छोटी ढोलकी) किंवा ग्लासवुल शॉर्ट बॉटल मध्ये कन्फ्युजन चाललंय.
19 Oct 2016 - 2:37 pm | भटकंती अनलिमिटेड
AEW गोल्डस्टार विथ ग्लासवूल बसवेन बहुतेक मी. उद्या ब्लॅक प्युमा घेऊन हंपीला जातोय. तेव्हा तिकडून आलो की या ब्लॅकबुलच्या सायलेन्सरचं बघतो.
19 Oct 2016 - 3:09 pm | अनिरुद्ध.वैद्य
http://torquexhausts.com/royal-enfield-goldstar-glasswool-silencer.html
माझं ह्याच कंपनीचा शॉर्ट बॉटल की ईंदोर ह्याम्ध्ये फाय्नलाझेशन व्हायचंय.
बाकी राईडला शुभेछा! फोटु टाकाल!
19 Oct 2016 - 3:13 pm | भटकंती अनलिमिटेड
torquexhausts म्हणजेच AEW . कोंढव्यात कंपनी आहे ही. एकाने थंडरबर्डवर लावले आहे आणि समाधानी आहे. थंडरबर्डच्या डिझाईन एलिमेंट्सना गोल्डस्टार सूट होतो (असं मला वाटतं).
आणि हो, हंपीला राईड नाही, ड्राइव्ह आहे. महिन्याच्या आतच दुसरी. ;-)
19 Oct 2016 - 3:16 pm | अनिरुद्ध.वैद्य
बढीया!
25 Oct 2016 - 9:06 am | भटकंती अनलिमिटेड
काल दोन्ही सायलेन्सर पाहिले/ऐकले.
AEW क्लासिक गोल्डस्टार ग्लासवूल आणि AEW गोल्डस्टार वाइल्डबोअर. आता दोन्हीचा आवाज आवडला असल्याने द्वंद्व सुरु झाले आहे. कदाचित क्लासिक ग्लासवूल जिंकेल कारण आवाज कमी आहे. वाइल्डबोअर थोडा लाऊड वाटला.
25 Oct 2016 - 10:42 am | अनिरुद्ध.वैद्य
आशु ईंजिनीअरींगवाले? येस, वाइल्डबोआर फार लाउड आहे, त्यामुळे तो आधीच चाळणीतुन वगळला होता.
19 Oct 2016 - 2:26 pm | अनिरुद्ध.वैद्य
हल्ली अधुन मधुन पुर्ण गाडी ब्रेक लावला तर व्हायब्रेट होते. चाक वगैरे काही जॅम नाहिये, २ दा चेक केलेय, पण हे व्हाय्ब्रेशन नेमका कुठुन येतोय कळत नाही. स्पीड कमी होतांना हे व्हायब्रेशन जाणवतात. फ्रंट फुटरेस्टपासुन हे सुरु होतात अन पुर्ण गाडी व्हाय्ब्रेट होते.
नेमकं काय बिघडलंय समजत नाहिये. कारण शोरुमला नेली तर हमखास व्हायब्रेट होत नाही!
19 Oct 2016 - 2:38 pm | भटकंती अनलिमिटेड
व्हायब्रेशनचा प्रकार नक्की समजला नाही. काही आवाज येतो का? किंवा घासल्यासारखं वाटतं का? किंवा एकदम थरथराट होतोय का? किंवा गाडीचे मागचे चाकच वॉबल होतेय?
19 Oct 2016 - 2:44 pm | अनिरुद्ध.वैद्य
घासल जाउन थरथराट होतोय, स्पीड कमी होतांनाच. स्पीड वाढवली किंवा कमी न करता चालवली तर काही जा़णवत नाही. पण कमी केली की फुटरेस्टपासुन थरथर जाणवते अन २ ३ सेकंदात नॉर्मल.
गीअर शीफ्टींग किंवा क्लच पॅड मध्ये काही प्रॉब्लेम असावा का?
19 Oct 2016 - 2:52 pm | भटकंती अनलिमिटेड
गियर शिफ्टिंगचा किंवा क्लचचा प्रॉब्लेम वाटत नाही तसा हा. स्पीड कमी करताना कुठल्या पद्धतीने करत आहात? म्हणजे एका वेळी गियर डाऊन, क्लच सावकाश रिलीज (इंजिन ब्रेकिंग) आणि शेवटी ब्रेक्स अशी पद्धत वापरता का? एका ठराविक आरपीएम रेंजला व्हायब्रेशन जाणवतात की फक्त स्पीड कमी होतानाच? व्हायब्रेशन जेव्हा येते तेव्हा RPM, गाडीचा स्पीड, कुठला गिअर हे नोट करुन ठेवल्यास सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम रिप्रोड्यूस करायला सोप्पे होईल.
एकदा बाहेरच्या मेकॅनिकला दाखवून बघा.
19 Oct 2016 - 3:05 pm | अनिरुद्ध.वैद्य
हे सगळं नीट नोट करुन ठेवतो. इंजीन ब्रेकींग वापरत नाही. ब्रेक्स वापरुन स्पीड कमी करतो, आणि गीअर डाऊनशीफ्ट करतो.
19 Oct 2016 - 7:17 pm | अमर विश्वास
वैद्यबुवा
हा low RPM vibration चा प्रकार वाटतोय. engine mountings चेक करा.
पण त्याआधी स्पीड कमी केल्यावर इंजिनच्या आवाजात काही फरक पडतोय का ते चेक करा.. chattering sound येत असेल तर नक्की इंजिनचाच प्रॉब्लेम आहे.
20 Oct 2016 - 5:50 pm | अनिरुद्ध.वैद्य
हे चेक करायला सांगतो आता वर्कशॉपवाल्याला.
20 Oct 2016 - 8:21 pm | अनिरुद्ध.वैद्य
साधारण १५०० आरपीएम असतांना जाणवताहेत हे व्हायब्रेश्न्स. आज बघितले. पण रॅण्डम आहेत.
25 Oct 2016 - 8:51 pm | भटकंती अनलिमिटेड
AEWगोल्डस्टार ग्लासवूल लावण्यात आलेला आहे. कुठलाही लाऊड आवाज न करता ओल्डस्कूल थंपचा अनुभव घेतो आहे. पॉवर डिलिव्हरी अधिक स्मूथ झाल्यासारखं वाटत आहे. सोबतच आधी लावलेले आरडी हँडलबार थोडे अजून रायडरच्या दिशेला घेतल्याने आता गाडीवर अधिक कंट्रोल आल्यासारखा वाटतोय. आता गर्दीतून मॅन्युवर करायला फार सोप्पे वाटतेय.
25 Oct 2016 - 9:58 pm | अनिरुद्ध.वैद्य
दोनेक वर्षांनी महिंद्रा जावा आणतय म्हणे ...
http://bikeadvice.in/legend-jawa-coming-back-to-india-guess-who-is-bring...
26 Oct 2016 - 8:48 am | भटकंती अनलिमिटेड
जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय? आजपावेतो तरी त्यांच्या टू व्हीलर डिव्हिजनला हवे तसे रुपडे लाभले नाहीये. कदाचित जावा आणि बीएसए हे दोन ब्रॅंड विकत घेऊन महिंद्रा ते करु शकेल. आनंंद महिंद्रा आणि त्यांच्या थिंकटॅंकने काहीतरी भारी प्लॅन नक्की आखला असावा.
(अवांतर: यासाठी एक नवाच धागा हवाय)
26 Oct 2016 - 9:57 am | सुबोध खरे
जावा किंवा येझदी या त्या काळात उपलब्ध असलेल्या बऱ्या गाड्या( दणकट) होत्या इतकंच.
दोन्ही गाड्या भरपूर चालवल्या आहेत आणि त्यात असणाऱ्या अगदी मूलभूत कमतरता या त्यांच्या नाशाला कारणीभूत होत्या.
उदा. पेट्रोल कॉक उघड राहिला तर कार्ब्युरेटर फ्लड होणे.
बॅटरी स्वतःहून चार्ज न होणे. त्या साठी एक चार्जरचा स्विच विकत आणून बसवावा लागत असे.
नीट किक मारली नाही तर उलटी किक येऊन आपला पाय दुखावणे.
गियर लिव्हर तीन इंच वर उचलल्यावर गियर पडत असे.
फाँल्स न्यूट्रल पडणे.
ब्रेक करकचून दाबावा लागत असे.
वळण्याचा गोल ( टर्निंग रेडियस) फार मोठा असल्याने छोट्या रस्त्यात पुढे मागे करून वळवावी लागत असे.
आणि एवढे करून ऍव्हरेज २५ मिळत असे.
जपानी गाड्या आल्या तेंव्हा लोकांना समजून आले कि तंत्रज्ञान आपल्याला काय सुखसोयी पुरवू शकते.
नुसती गेंड्यासारखा आकार आणि ताकद असून उपयोगी नाही तर चित्त्यासारखी चपळता आणि पटकन वळण्याची, थांबण्याची क्षमता या वाहतुकीत जास्त उपयुक्त गोष्टी आहेत.
बऱ्याच लोकांना केवळ रम्य आठवणी पायी त्या गाड्या आज आठवत आहेत. परंतु इंड सुझुकी आणि हिरो होंडा आल्यावर त्यांच्यातील कमतरता फार प्रकर्षाने पुढे आल्या.
असो.
26 Oct 2016 - 11:23 pm | जिन्क्स
रॉयल एन्फ़िल्डचे डेसर्ट स्टॉर्म आणि थंडरबर्ड हे मॉडेल्स मॅट फिनिश मधे पण येतात. मॅट फिनिश दिसतो छान पण मेंटेन करायला अवघड असतो का? मॅट वाले कोणी आहेत का इथे?
27 Oct 2016 - 11:07 am | भटकंती अनलिमिटेड
मॅट मेनटेन करायला थोडा अवघड आहे असे बर्याच फोरमवर वाचले आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही. ग्लॉस फिनिश आपले कारनौबा वॅक्स वापरुन चकाचक करायला १५ मिनिटे पुरेशी होतात.
(आपला व्यनि आणि हा प्रतिसाद एकदमच पाहिल्याने इथे उत्तर दिले).
27 Oct 2016 - 11:12 am | गणामास्तर
इतकं काही अवघड नाहीये मॅट फिनिश मेंटेन करायला. मी वापरतोय थंडरबर्ड मॅट ब्लॅक गेले वर्षभर.
रोज धुवायला माणूस आहे पण सुट्टीच्या दिवशी स्वतः नीट निगुतीनं स्वच्छ धुवून पुसून घेतो.
3M चे पॉलिश मिळते ऑल इन वन, ते महिन्याभरातुन एकदा लावून गाडी लख्ख चकचकीत करतो.
27 Oct 2016 - 11:11 am | कैलासवासी सोन्याबापु
आस्थेटिक जॉब (पेंट) केल्यास पासिंगचे लचांड होते का ? त्याची काय प्रक्रिया असते
27 Oct 2016 - 11:39 am | भटकंती अनलिमिटेड
मुख्य रंग तोच ठेवल्यास काहीच करावे लागत नाही. बाकी स्टिकरिंग किंवा ब्युटिशिअनच्या भाषेत थोडे हायलाईट्स काढणं चालून जाते. पण मुख्य रंगच बदलायचा असेल तर मात्र गाडीचा रंग आरसी बुकावर बदलून घ्यावा लागतो.
27 Oct 2016 - 2:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
कंपनी ब्लॅकचा मॅट ब्लॅक केल्यास कसे हो दादा ;)
27 Oct 2016 - 3:29 pm | भटकंती अनलिमिटेड
मग काहीच करावं लागणार नाही. असंही पोलिसमामाला ब्लॅकशी मतलब.
आता माझ्याकडं सॅटिन व्हाईट, पर्ल व्हाईट आणि एमराल्ड व्हाईट, आयव्हरी व्हाईट यापैकी कुठलाही असला तरी त्याला काय घंटा समजणार?
9 Nov 2016 - 4:20 pm | भटकंती अनलिमिटेड
रॉयल एन्फिल्ड ७५०सीसी पॅरलल ट्विन सिलिंडर बहुतेक थोड्या वेळातच EICMAमध्ये लॉंच करणार आहेत.
26 Dec 2016 - 12:53 pm | सतिश पाटील
स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट आणि हिमालय या दोघात जरा कनफुस झालोय.
अर्थात दोनही जरा वेगळ्या प्रकारात मोडतात, परन्तु ज्यांच्याकडे हिमालया आहे किंवा जाणकार जरा प्रकाश टाकतील का्य?
26 Dec 2016 - 1:15 pm | कपिलमुनी
स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट मधे बरेच फीचर्स कमी आहेत. ५०० सीसी कार्ब मॉडेल घ्या . किंवा क्लासिक एफ.इ. घ्या .
हिमालयनची टेस्ट राईड घ्या मगच ठरवा
26 Dec 2016 - 3:46 pm | सतिश पाटील
सॉरी मला क्लासिक ३५० चेस्टनट म्हनायच होत..
27 Dec 2016 - 12:19 pm | Hulk the devil
हिमालयन आहे माझ्या कडे आता पर्यंत ३५००KM चालवली.
नाशिक ते दमण
नाशिक ते महाबळेश्वर
नाशिक ते कसारा
अश्या काही Rides केल्या, एक हँडलबारची समस्या सोडली तर काही मोठी अडचण नाही उदभवली.
प्रति किलोमीटर सरासरी हा वेगळा आहे दोन्ही मॉडेल चा.
आपणस काय माहिती हवी आहे सांग मी जेवढं जमेल तेव्हढा विशद करायचा प्रयन्त करेन.
हिमालयन मधेय व्हायब्रेशनची समस्या कमी आहे हे मात्र नक्की सांगू इचछीतो.