न्युरोलॉजी हॉस्पिटल
एक जागा जेथे
क्षणाक्षणात परिस्थिती बदलते
पेशंटची आणि साहजिकच नातेवाईकांची.
वेटिंग रूम, एक अनोळखी लोकांचा परिवार
एक जागा जेथे होत असते,
ईमोशन्सची, परिस्थितिची देवाणघेवाण.
चार वर्ष बेड वर असलेल्या ओंकार ची आई,
वाट बघतेय, त्याच्या तोंडून एक शब्द ऐकण्याची.
बाविशीतल्या तिवारीचे वडिल
सर्वांसोबत आनंद व्यक्त करताहेत, त्याने तीन महिन्यांनी दिलेल्या थोड्याशा प्रतिसादाची.
गावाकडचा नाले, देव नामाचा जप करतोय, आई कोमातून बाहेर येण्यासाठी.
केअरटेकर विठ्ठल, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आणि चांगली कालजी घेतोय एका बाबांची.
काय चूक त्या माऊलीची, जिला सांगितले होते की, तिच्या लेकराला फक्त खरचटलंय, पण त्याचा निर्जिव देह पडला होता आय सी यु त डॉक्टरांच्या शेवटच्या प्रयत्नांच्या गराड्यात.
मानाचा मुजरा, हॉस्पिटल च्या स्टाफ ला, जे वागताहेत प्रत्येक नातेवाईकाशी हसतमुखाने, फक्त त्यांचं दु: ख हलकं होण्यासाठी....
बरेच खिन्न चेहरे, बरेच दु: ख लपवत हसणारे चेहरे,
एकमेकांना धीर देत, वाट बघताहेत वेटिंग रूम मधील वेटिंग संपण्याची...आणि आपलं माणूस बरा होण्याची......
वेटिंग आणि फक्त वेटिंग....
..निल्स्पंदन
प्रतिक्रिया
19 Oct 2016 - 2:53 pm | बाजीप्रभू
छान! आवडली.
19 Oct 2016 - 3:34 pm | निल्स्पंदन
धन्यवाद बाजीप्रभू !