पाखरे उडता आकाशी या
घरटे सुने सुनेच उरते..
परतीची ही ओढ लागता
तसे पाऊल मागे वळते..
कानोसा घेऊ राञ निघाली..
कात टाकुनी पहाट ही आली..
रानपाखरे घरट्यातुन या
उंच भरारी घेऊ लागली...
उन्हे दाटता डोक्यावरती
घरटे आतुर रडु लागले...
डोळे शिणले वाट पाहुनी
काळजीचे मग बांध ही फुटले...
तु असा गेलास कुठे की
हरवलास या वाटेवरती...
शोधलास तु मार्ग नवा की
विसरलास ही माझी प्रिती.....
प्रतिक्रिया
16 Oct 2016 - 11:39 pm | चांदणे संदीप
कविता उत्तमच पण शीर्षक कवितेबरोबर मेळ खात नाहीये माहीराज!
बाकी, हेच शीर्षक उलट करून इथेच मी एक कविता प्रकाशीत केली होती. व्हाट ए कोॲक्सिडेंट! ;)
Sandy
17 Oct 2016 - 1:21 pm | कवि मानव
उन्हे दाटता डोक्यावरती
घरटे आतुर रडु लागले...
डोळे शिणले वाट पाहुनी
काळजीचे मग बांध ही फुटले...
तु असा गेलास कुठे की
हरवलास या वाटेवरती.. ------------- खूप छान सांगत विचारांची आणि शब्दांची !!