केली कल्पना स्त्री विना जगताची, आदराने शिष झुके.
निसर्गाची मोठी किमया, ती नसती तर संसार मुके,
घेउनी बीज तिज पोटाशी, नेण्या मानवतेचे वेल पुढे,
स्त्री न असती या पृथ्वीवर, सकल अस्तित्वाचा प्रश्न पडे ? !!१!
कधी तू माता, कधी भार्या, कधी बहिण वा मुलगी असे,
सदैव जगशी दुसऱ्यांसाठी, तुझे समर्पण नाव असे,
कर्तुत्वाचे गाठून शिखरे, आम्ही (पुरुष) मिरवतो राव तसे,
स्त्री नसती या यात्रेमध्ये, एकही पाऊल शक्य नसे !!२!!
होऊनी माता शिवरायांची, बीज रोवले स्वराज्याचे,
बहिष्काराचे विष प्राशुनी, वरद दिले तू आम्हा शिक्षेचे,
प्रारब्धाला मात देऊनी, प्राण आणले तव स्वामीचे,
स्वयें अर्पीले धरणी मातेला, देण्या परीक्षा पावित्र्याचे !!३!!
करुणा, ममता, गोड लाजणे, असले जरी हे भूषण त्यांचे,
काली, दुर्गा अवतार घेऊनी, संहार केले त्यांनी असुरांचे,
अनंत यादी उपकारांची, उगम स्त्रोत अवघ्या विश्वाचे,
पुढच्या जन्मी स्त्री होऊनी, पांग फेडु या उपकारांचे !!४!!
टीप: तिसरे कडवे उदा: जिजाबाई, सावित्री फुले, सावित्री, सीता
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 4:13 pm | माहीराज
वाह.. क्या बात
10 Oct 2016 - 4:33 pm | कवि मानव
धन्यवाद माहिराज !! _/\_