निरोप

परिधी's picture
परिधी in जे न देखे रवी...
6 Oct 2016 - 7:07 am

बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात
तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात
तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच
एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच

इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव
मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव
चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी
विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी

खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा
कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता
एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला
डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

कविता

प्रतिक्रिया

कविता आवडली. इंजेक्शनची उपमा फारच वेगळी.

यशोधरा's picture

6 Oct 2016 - 8:10 am | यशोधरा

आवडली कविता.

पथिक's picture

6 Oct 2016 - 9:59 am | पथिक

बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात

छानच...!

रातराणी's picture

6 Oct 2016 - 10:03 am | रातराणी

जाम टोचली कविता. लिहित रहा!

परिधी's picture

6 Oct 2016 - 11:35 am | परिधी

धन्यवाद सर्वाना

प्रसाद_कुलकर्णी's picture

6 Oct 2016 - 3:27 pm | प्रसाद_कुलकर्णी

डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...

बाजीप्रभू's picture

6 Oct 2016 - 3:47 pm | बाजीप्रभू

आवडली कविता.

धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू

दिनु गवळी's picture

9 Oct 2016 - 5:36 am | दिनु गवळी

वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार

Jabberwocky's picture

9 Oct 2016 - 9:54 am | Jabberwocky

छान आहे कविता.....

पद्मावति's picture

9 Oct 2016 - 6:33 pm | पद्मावति

सुरेख!