कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन
कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान
कोनाले काही व्हाचं आहे त कोनाले काही
पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच
मानूस व्हाले भेतात सगळे
काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाही
जाती धर्माच्या मांडीवर बिनधोक बसून दूध पिन्यासारखं
मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून
सोतालेच जनम देनं आहे.
सांगा आता - होता का मानूस ?
प्रतिक्रिया
23 Sep 2016 - 5:54 pm | पैसा
कविता आवडली!
23 Sep 2016 - 8:24 pm | संदीप डांगे
ज ब र्रा!!!! तुमाले आप्ल्याकून येक रोडगा पार्टी वारी हनुमानाले!
3 Oct 2016 - 4:43 pm | पथिक
वा संदीपभाऊ ! वारी हनुमान अन रोडगे पार्टी आयकून भलकसं चांगलं वाटलं राजेहो !
24 Sep 2016 - 9:06 am | चाणक्य
आवडली. विशेषतः शेवटच्या ओळी.
27 Sep 2016 - 7:12 pm | प्रभास
सहमत... छानच कविता...
24 Sep 2016 - 9:16 am | यशोधरा
क्या बात!
24 Sep 2016 - 9:29 am | अंतरा आनंद
मार्मिक कविता. खूप आवडली
3 Oct 2016 - 4:44 pm | पथिक
सर्वांना धन्यवाद ! हि या कवितेची सुधारित आवृत्ती:
कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन
कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान
कोनाले काई व्हाचं आहे त कोनाले काई
पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच
मानूस व्हाले भेतात सगळे !
काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाई
जाती धर्माच्या मांडीवर बसून बोळ्यानं दूद पेन्यासारखं
मानूस होनं म्हंजे एका बाईवानी जोखीम घेऊन तरास सहन करून
सोतालेच जनम देनं आहे
आपलंच रगत देऊन पोसनं आहे
त मंग सांगा आता - होता का मानूस?