[[पण होत नाही ना!]]

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
18 Sep 2016 - 10:21 pm

प्रेरणा

पण होत नाही ना!

आपण जावं,
अंगणात जरा सुखानं पाणी भरुन घ्यावं
फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकत,
मऊशार गवतावर बसून राहावं,
डोळे मिटून.

पण होत नाही ना!

आधी कसं,
जमिनीतच सगळं अदृश्य व्हायचं
कुठेतरी एखाद्या कोंब यायचा
पण तोवर माजलेलं तण
आपणच नकळत काढून टाकावं

तरीही होत नाही ना!

आपण नुसतं बसावं,
करण्यासारखं आहे काय?
शिंपडू थोडा ओलावा
तेवढीच मनाला शांतता

च्यामारी आज होत का नाही?

फसवणुक झाल्यासारखं निष्ठुर बसायचं
धुमसत राहिलेल्या वेदनेला आतल्याआत संपवून टाकायचं?
उद्या येईल ना येईल
पण आजची चंदेरी झालर विणल्याशिवाय कसं उठायचं?

न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर?

विडंबन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2016 - 11:55 pm | टवाळ कार्टा

आयाया, अता तांब्या तुम्ही घेतला

अस्वस्थामा's picture

19 Sep 2016 - 12:46 am | अस्वस्थामा

टका, तांब्याधिपतींना नवे दणदणीत शिष्य लाभले हो. जिलबी जबराच आहे जव्हेर भौ.. :D

निनाव's picture

19 Sep 2016 - 1:23 am | निनाव

जव्हेर भाई, एकदम मस्त!
वर्गात मास्तर आले कि कसं जाणवते ;)

रातराणी's picture

19 Sep 2016 - 9:56 am | रातराणी

देवा! किती शिष्य आहेत नेमके तांब्याधिपतींचे? जमलय विडंबन :)

माहीराज's picture

25 Sep 2016 - 10:56 am | माहीराज

भारीच. ..

जुदा होके भी
तु मुझमे कही बाकी है.....
कलियुग सिनमातल.