आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.
प्रतिक्रिया
22 Sep 2016 - 3:57 pm | नाखु
मान्यवर मी फक्त नारळाच्याच बाजूने आहे (कारण माझ्या घरी नारळाचे झाड आहे) आणि मुख्य म्हणजे त्याला नारळही आहेत.
नारळीयन नाखु
22 Sep 2016 - 7:53 pm | आनंदयात्री
आहे असे सिद्ध झाले तर समस्त नारळप्रेमींची अडचण नाही होणार का? फोडला नारळ कि लगेच वाढला काउंट ब्रह्महत्येचा चित्रगुप्ताच्या चोपडीत! समस्त नारळप्रेमी जनता नरकात जाईल अश्याने आणि नरकात प्रचण्ड लॉजिस्टिकल अडचणी निर्माण होतील. स्वर्ग मोकळा पडेल. विश्वाचे संतुलनच बिघडेलना हो अश्याने. तस्मात असे सिद्ध न होणे किंवा कबूल न करणे हेच विश्वाच्या हिताचे आहे.
-आनंदयात्री
(चिन्ता करितो विश्वाची)
22 Sep 2016 - 10:04 pm | बोका-ए-आझम
अमक्यातमक्याला नारळ दिला वगैरे म्हणायची पण सोय राहणार नाही! ;)
22 Sep 2016 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
हो ना ! अँटिस्लेव्हरी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग कायद्याखाली आत जायला लागेल =))
23 Sep 2016 - 10:53 am | विशुमित
हा हा हा ..!!
23 Sep 2016 - 3:00 pm | श्रीगुरुजी
पटत नसताना तसं केलं तर कर्मठ ढुढ्ढाचार्य सोकावतील.
22 Sep 2016 - 10:08 pm | अजया
=))))
हा संपूर्ण धागा प्रतिसादासह एकदम वाचला तर काही बक्षीस वगैरे आहे का?
22 Sep 2016 - 10:19 pm | संदीप डांगे
एक बकरा व एक नारळ
22 Sep 2016 - 10:31 pm | पैसा
बकर्याचे काय करू? त्याला पाला खायला घालत रस्त्याने नेला तर फोंड्यात माझी मिरवणूक निघेल.
23 Sep 2016 - 8:52 am | सतिश गावडे
बकर्याला पाला घातलेला फोंड्याच्या लोकांना आवडत नाही का?
23 Sep 2016 - 10:25 am | पैसा
बकर्याला आवडेल न लोकांना पण आवडेल. =))
23 Sep 2016 - 2:21 pm | नाखु
यांनी पाला खायला(तरी) बकरा शिल्लक ठेवला यावर कुण्ण्णी(सुद्धा) विश्वास ठेवणार नाही असा पक्का समज आहे !
बकरा, पाला, पैसाताई ,गावडे मास्तर,नारळ्,आणि कोहळा सर्वांनी हलके घ्यावे.
ता.क. लगेच घरावर मोर्चा काढू नये. गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरवाल्याकडे ज्याम थोराड व चावके कुत्रे आहे.
सूचना संपली.
23 Sep 2016 - 5:18 pm | पैसा
=)) =)) =)) कुत्र्याच्या चाव्यासाठी अँटी रेबीज इंजेक्षणे गेल्याच महिन्यात घेतली आहेत. घाबरते की काय! =)) =)) आमचा ढेल्या भूभू आहे मिपावर. त्याला पण आणू.
अवांतरः कोहळा मिळवण्यासाठी आवळा घेऊन येऊ. कोहाळ्याचे सांडगे करायचेत.
24 Sep 2016 - 11:33 am | यशोधरा
सांडगे पार्सल करा. कित्ती वर्षे खाल्ले नाहीत :(
24 Sep 2016 - 2:52 pm | पैसा
नेक्ष्ट टैम पुण्यां येतना कुवाळ्याच्यो वड्यो हाडतांच!
24 Sep 2016 - 3:01 pm | यशोधरा
हय, हय. घेवन यो. प्लीजच!
23 Sep 2016 - 2:07 pm | अजया
ओला नारळ म्हणजे कसा मनुष्य समजायचा पण? ओल्या नारळाच्या करंज्या कराव्या म्हणते.
बकरा कोणाला हवा असेल तर घेऊन जावा.
23 Sep 2016 - 2:38 pm | एस
नुसताच बकरा घेऊन काय करू? आख्खा नारळ घातल्याशिवाय चव नाही यायची. तेव्हा बकरापण हवा आणि नारळपण. ;-)
22 Sep 2016 - 10:45 pm | खटपट्या
एक नारळ देण्यात येइल.
(सद्या नारळ देणे म्हणजे = कामावरुन काढून टाकणे कींवा "आता या" म्हणणे) यातील काही नाही...
24 Sep 2016 - 1:02 pm | टवाळ कार्टा
नारळाचा अज्जून एक अर्थ आहे, त्या अर्थाने टेंडर कोकोनट म्हणजे लय भारी
23 Sep 2016 - 1:44 pm | प्रकाश घाटपांडे
जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके मान्य मुस्लिमांना झुकत माप दिल. पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे हे वर एका प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे. तडजोड ही लबाडी नसते. मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का?
खर तर हमीद दलवाईंनी या पेक्षा कठोर भुमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. अर्थात सर्व प्रतिसाद हे विचारमंथनच आहे.सुधारकांमधे जहाल मवाळ तेव्हाही होते आताही आहेत. आपला समाज एकाच वेळी तीन शतकात वावरतो आहे. बदल कुर्मगतीने का होईना होताहेत. आपापल्या परीने गति देण्याचा प्रयत्न करु यात!
23 Sep 2016 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा
@पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. ››› +++१११.
@ तडजोड ही लबाडी नसते. ››› प्रचंड सहमत.
@मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! ››› येस . यालाही सहमती.
@हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का? ››› याच्याशी तर सर्वात जास्त सहमत. टनाटनी कपटी लोक.. ते करतात तर आम्हांलाही करू द्या अज्जून टनाटनीपणा.. असं आग्रहानी म्हणतात. तिथे त्यांना नेहमीच्या राष्ट्रहिताच्या गप्पा आठवत नाहीत.
23 Sep 2016 - 2:28 pm | प्रदीप
प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद अतिशय सौम्य, संतुलित व समजूतदार आहेत (जसे ते नेहमीच पूर्वीही असत). खरे तर मला वाटते, तुमच्यासारखी सौम्य, प्रांजळ व तडजोड स्वीकारणारी व्यक्ति अनिसच्या प्रमुखपदी असती तर आज अनिसचे कार्य बर्यापैकी पुढे गेले असते. (हे सर्व मी अतिशय प्रामाणिकपणे लिहीतोय, ह्यात सर्कॅझम अजिबात नाही, गैरसमज नसावा).
मुस्लिम सत्यशोधक मंडळ अजून कार्यरत आहे व त्याचे मुस्लिम समाजात काही प्रभोधनाचे कार्य सुरू आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. ह्याविषयी अधिक माहिती कुठे मिळेल?
23 Sep 2016 - 3:26 pm | प्रकाश घाटपांडे
मुस्लिम सत्यशोधक मंडळाची वेबसाईट याच वर्षी तयार झाली आहे http://www.muslimsatyashodhak.org/
तलाकपिडित मुस्लिम स्त्रियांना हिंदु स्त्रियांचा हेवा वाटतो.
23 Sep 2016 - 3:30 pm | शलभ
+1
23 Sep 2016 - 2:41 pm | एस
आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद भारी आहेत. अभिनंदन!
23 Sep 2016 - 3:32 pm | शलभ
सहमत.
24 Sep 2016 - 6:23 am | निशाचर
+१
24 Sep 2016 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद.
जे लोक धर्माभिमानाची टिमकी वाजवून टनाटनीपणा करतात.. पण धर्मातल्या मूलभूत चुकांवर स्वत: कधिही भाष्य अथवा क्रुती करत नाहित.. फक्त दुसय्रानी कुणीतरी केलेल्या कथीत सुधारणेवरून स्वत:चकाहितरी केल्याच्या थाटात फलक घेऊन हिंडतात.. . त्याच पैकी हे एक महाशय आहेत. मी मांडलेल्या मुद्यांचा तितकाच मुद्देसुद प्रतिवाद न करता. आव्हान न स्विकारता फक्त फिरवा फीरवीची उत्तरं देत हे बसले. म्हणून त्यांना खोलंलं जरा.
24 Sep 2016 - 8:43 am | प्रचेतस
बाकी तुम्ही देखील नंतर नंतर मुद्दे न मांडता तुमच्या नेहमीच्याच टनाटनी, आत्मकुंथन असे नेहमीचे शब्द वापरून वैयक्तिक हल्ले सुरु केले हे रोचक आहे. :)
तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा.
श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.
24 Sep 2016 - 8:55 am | बोका-ए-आझम
आत्मुगुर्जींनी विचारांवर शरसंधान करता करता विचार मांडणाऱ्यांवर शरसंधान केले. पण तरी त्यांनी मांडलेले मुद्दे आणि प्रतिवाद यातून जी माहिती मिळाली ती खूपच सखोल आणि काही गैरसमज दूर करणारी होती. त्याबद्दल आत्मुगुर्जी आणि श्रीगुर्जी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. Dogmatic attitude is necessary for the development of rational thought because without that, no initial conjectures can be made - हेच यातून सिद्ध झालं आहे.
तर आता दोघांनाही - चला, हवा येऊ द्या अशी णम्र विनंती!
24 Sep 2016 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा
@तर आता दोघांनाही - चला, हवा येऊ द्या अशी णम्र विनंती! ››› ठिक. धन्यवाद.
24 Sep 2016 - 9:55 am | अत्रुप्त आत्मा
@तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. ››› हर हर महादेव.
@श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› क्या ब्बात ! व्वाह!
24 Sep 2016 - 10:27 am | अत्रुप्त आत्मा
@श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› शांत राहिल्यामुळे स्टॅटेजिकली ते पुढे राहिले. आंम्ही नाही. (ह्ही ह्ही! )
असो.. चालावयाचेच. कुणी तत्वात जिंकतं, कुणी व्यवहारात.
24 Sep 2016 - 12:08 pm | विशुमित
"""कुणी तत्वात जिंकतं, कुणी व्यवहारात"""
वाह क्या बात है..!!
24 Sep 2016 - 3:00 pm | श्रीगुरुजी
!
_________________________
प्रचेतस,
एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. उत्तर द्यायचे का नाही हा तुमचा निर्णय असेल.
श्रीरामरक्षा हे संस्कृतमधील स्तोत्र माझे अत्यंत आवडते स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री बुधकौशिक ऋषींनी रचले असा स्त्रोत्रात उल्लेख आहे. हे बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी असे वाचण्यात आले होते. हे स्तोत्र नक्की कधी रचण्यात आले असावे व बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी हे बरोबर असावे का?
24 Sep 2016 - 3:30 pm | प्रचेतस
बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि नक्की नाही.
अर्थात हा कोण ह्याचा उलगडा नीट होत नाही तरी हे स्तोत्र इसवी सनाच्या दहाव्या बाराव्या शतकानंतर रचले गेले असावे असा माझा अंदाज आहे. निदान ५ व्या शतकानंतरच असे मात्र ठामपणे म्हणता येईल कारण स्तोत्राचा बराचसा भाग पद्मपुराणात आढळतो व त्यात बुधकौशिकाचा उल्लेख नाही.
दहाव्या बाराव्या शतकानंतरच का असा अंदाज केला ह्याचे कारण म्हणजे स्तोत्राची श्री गणेशायनम: अशी सुरुवात. गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव किंवा गणेशाला प्रथम मान द्यायचे श्लोक किंवा गणेशपट्टीकांचा प्रसार त्या काळानंतरच झाला.
24 Sep 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी
माहितीबद्दल आभार!
27 Sep 2016 - 12:39 am | अर्धवटराव
.
25 Sep 2016 - 5:10 pm | अनुप ढेरे
पूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
24 Sep 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी
तुमच्या सर्व प्रतिसादात वैयक्तिक टीका, टणटणाट, आपणच तेवढे ज्ञानी आणि इतर सर्वजण फिरवाफिरवी करणारे इ. गोष्टींपलिकडे दुसरे काहीही नाही.
24 Sep 2016 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा
ते तूम्मी काहिही म्हणा. तुम्ही
कपटी पलायनवादी भेकड टनाटनी आहात.. हे
कळलंय सगळ्यांना..
त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...!
24 Sep 2016 - 11:09 pm | श्रीगुरुजी
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
24 Sep 2016 - 11:28 pm | श्रीगुरुजी
यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन भटजीबुवा पूजा सांगत आहेत.
टनाटन भटजीबुवा: हं. ताम्हणात टनाटनी आचमन करा आणि म्हणा मम.
यजमान (ताम्हणात आचमन करून हळूवार आवाजात): मम.
टनाटन भटजीबुवा: आत्मकुंथनात मग्न असल्यासारखे इतक्या हळू आवाजात नको. एकदम टनाटनी आवाज काढा.
यजमान (मोठ्यांदा): मम.
टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा आत्मनः.
यजमान (ताम्हणात पळीभर पाणी सोडून): आत्मकुंथन.
टनाटन भटजीबुवा (संतापून): भेकड, भ्याड, कपटी कुठले. आत्मकुंथन नाही हो. आत्मनः.
यजमान(खजील होऊन): आत्मन:
टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा श्रुती स्मृती.
यजमान (ताम्हनात पळीभर पाणी सोडून) श्रूती स्मृती.
टनाटन भटजीबुवा: हं. संपली पूजा. आता लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती लावा.
यजमान (बुचकळ्यात पडून): एवढ्यातच कशी संपली?
टनाटन भटजीबुवा (संतापून): एवढ्यातच म्हणजे? पाताळयंत्री कुठले. ही पूजा म्हणजे महिनाभर चालणारा अश्वमेध यज्ञ वाटला की काय?
यजमान ओशाळवाणे होऊन लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती पेटवितात.
टनाटन भटजीबुवा: हं. चला आता घंटा वाजवून टनाटन आरती करा.
यजमानः पण घंटा नाहीय्ये आमच्याकडे.
टनाटन भटजीबुवा: मग एका रिकाम्या डब्यात दगड टाकून डबा हलवा. रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना.
यजमान एका रिकाम्या डब्यात खडे टाकून झाकण लावून हलवत हलवत आरती करतात. रिकाम्या डब्याचा खूप मोठा आवाज येत असतो.
टनाटन भटजीबुवा: चला. काढा आमची दक्षिणा. आता तुम्ही बसा आत्मकुंथन करत आणि आम्ही चाललो पुढच्या टनाटनी पूजेला.
अशा तर्हेन पूजा पार पडते.
24 Sep 2016 - 11:33 pm | अभ्या..
ल्लूल्लूऊऊऊऊऊऊ राहिले.
त्याशिवाय पूजा अधुरी आहे. पूजा हेगडे पण आहे. ;)
24 Sep 2016 - 11:43 pm | श्रीगुरुजी
लोल
24 Sep 2016 - 11:50 pm | प्रचेतस
=))
लोलच लोल.
कहर आहे.
25 Sep 2016 - 9:41 am | यशोधरा
=))) अरे काये हे!!
25 Sep 2016 - 10:31 am | प्रसाद_१९८२
=)) =))
25 Sep 2016 - 11:26 am | अत्रुप्त आत्मा
@रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना.››› स्वत:च स्वत: विरूद्ध पुरावा दिला श्रीखुर्जींनी. एव्हढा मोठ्ठा खडखडाट करून.
=))
25 Sep 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी
अवघड आहे!
24 Sep 2016 - 10:37 am | गॅरी ट्रुमन
बरं मग काय ठरले?
१. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही?
२. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही?
आणि सर्वात महत्वाचे--
नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही?
24 Sep 2016 - 12:48 pm | अनिरुद्ध.वैद्य
१. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही? नाही.
२. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? आहे.
हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही? योग्य नाही.
आणि सर्वात महत्वाचे--
नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही? आहे. ऐकिवात आलेल्या माहितीनुसार १८३० मध्ये कोणतातरी इंग्रज सरकारने कायदा केला अन त्याद्वारे नरबळीवर बंदी घातली. तेव्हां नारळ उपयोगात येऊ लागले ;)
24 Sep 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी
म्हणजे नारळ फोडणे हे बळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप ही ऐकीव माहिती आहे. मी सुरवातीपासूनच हेच म्हणत आहे.
24 Sep 2016 - 3:09 pm | अनिरुद्ध.वैद्य
आपल्या ज्या श्रुतीस्मृती म्हणतो त्या ऐकिव माहितीच नाही का?
मुळात सगळी कर्मकांडे ऐकीवच ;)
24 Sep 2016 - 11:05 am | सतिश गावडे
खरा सुधारक कर्मकांडातील फोलपणा लोकांना समजावून सांगेल. एखाद्या कर्मकांडाला पर्यायी आधुनिक कर्मकांड तयार करुन किंवा असलेल्या कर्मकांडाला आधुनिकतेचा गिलावा देऊन स्वतःच्या नावाने "सुधारक" असा डंका पिटणार नाही. :)
24 Sep 2016 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा
समाजसुधारकांना सदर गोष्ट अत्यंत चपखलपणे लागू पडते.
24 Sep 2016 - 1:15 pm | प्रकाश घाटपांडे
मला तसे वाटत नाही. अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो. दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे ही समूह जीवनातील कर्मकांडच आहेत. अनेक प्रथांच कर्मकांडात रुपांतर होते.कर्मकांडच नको ही गोष्ट मानवी स्वास्थ्यासाठी मानवणारी नाही.नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात
24 Sep 2016 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा
@अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो. ››› +++१११ धर्मसुधारणा आणी धर्मनिर्मूलन यातला फरक त्यातल्या उपयोगितेसह जोपर्यंत जांच्या लक्षात येणार नाही. तोपर्यंत वरील मत त्यांच्याकडून स्विकारलच जाणार नाही.
24 Sep 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी
प्रत्येक वेळी निरर्थक किंवा हानीकारक कर्मकांडांना पर्याय द्यावा लागतोच असे नाही. अशी कर्मकांडे पर्याय न देताही नष्ट होऊ शकतात.
उदा. जानवे परीधान करणे, कानावर जानवे अडकविणे इ. निरर्थक कर्मांना कोणताही पर्याय न देता सुद्धा ही कर्मे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूजेतील अनावश्यक, निरर्थक भाग अशाच तर्हेने कोणताही पर्याय न देतासुद्धा हळूहळू नष्ट होणार आहे.
24 Sep 2016 - 3:41 pm | संदीप डांगे
गुरुजी,
पूजेत आवश्यक व अनावश्यक, सार्थक व निरर्थक कसे ठरवावे?
24 Sep 2016 - 3:53 pm | श्रीगुरुजी
मी तारतम्याने ठरवितो. इतरांचं माहिती नाही.
24 Sep 2016 - 4:05 pm | संदीप डांगे
एग्झॅक्टली!!
तर, पूजा-पाठ-कर्मकांड ह्याप्रकारात "संपूर्ण फालतूगिरी ते संपूर्ण कर्मठपणे आवश्यकच" ह्या दोन प्रचंड दूर अंतरावर असणार्या टोकांच्या मधे बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात. प्रत्येकाला त्याचे वागणे तारतम्याला धरुनच आहे असे वाटते. त्यामुळे आवश्यक-अनावश्यक प्रत्येक व्यक्तिच्या स्वत:च्या तारतम्यानुसार ठरते. अशा परिस्थितीत धर्मसुधारणा म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा कराव्या ह्याबद्दल दोन व्यक्तिंमधे मतभेद असणे शक्य आहे ना?
24 Sep 2016 - 4:18 pm | सतिश गावडे
तुम्ही दिलेल्या दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे या गोष्टींना पैसे पडत नाहीत तसेच विशेष वेळ वाया जात नाही.
मुळात ज्याच्याकडे वेळ आणि पैसा असेल त्याने इतरांना त्रास होणार नसेल अशा पद्धतीने व्यक्तिगत आणि सामाजिक हितास बाधा न आणणारी कर्मकांडे करण्यास कुणाचाच आक्षेप नसावा. ती त्या व्यक्तीची व्यक्तिगत बाब म्हणता येईल.
मात्र काही व्यक्ती जेव्हा जुन्या कर्मकांडांना आधुनिक "सुधारणांचा" गिलावा चढवून व्यवसाय करतात आणि वरुन स्वतःस "धर्मसुधारक" म्हणवून घेतात ते खटकते.
24 Sep 2016 - 1:22 pm | प्रसाद_१९८२
नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात
खर आहे तुमचे.
पण नरबळी द्यायच्या ऐवजी, नारळाचा बळी दिला तर तो त्या 'नारळा'वर अन्याय नाही का होत?
24 Sep 2016 - 1:27 pm | प्रकाश घाटपांडे
तुलनेने कमी. तसे शेवटी जीवो जीवस्य जीवनम चक्र हे निसर्गचक्रच आहे. सांगायचा मुद्दा असा की लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत.
24 Sep 2016 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
@लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत. › +१ . रैट्ट. हाच अनुभव आहे.. त्यासाठी धर्मसुधारणावादीच रहावं लागतं. मग ते कुणाला कित्तीही गिलावेकार का वाटे ना? त्यांच्याही आकलनाची मर्यादा लक्षात ठेवायला हवी मला!
24 Sep 2016 - 3:29 pm | संदीप डांगे
ह्यालाही पाचशेपार पोचवायचे का??
24 Sep 2016 - 4:05 pm | पैसा
कोणाशी तरी भांडण उकरून काढ. मग आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसतोच!
24 Sep 2016 - 4:09 pm | संदीप डांगे
म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला?? मी भांडणं उकरुन काढतो मिपावर?? आणि तुम्ही कंपूबाजी करता ते काय असतं मग...?? कोणालाही काही बोलतांना जरा जपून बोलावे माणसाने. लक्षात येईल लवकर ते बरं.
(-जमलं काय? ;))
24 Sep 2016 - 4:12 pm | पैसा
जमतंय, जमतंय!
आता भांडायला बकरा शोध. आणि ५०० झाल्यावरच थांब. मी चालले वॉशिंग मशिन लावायला. लोकांची धुणी धुण्यापेक्षा आपल्या घरची धुते! =))
24 Sep 2016 - 4:19 pm | विशुमित
वंटास...!!!!!!!
24 Sep 2016 - 4:26 pm | विशुमित
सहज बोलले तरी दम दिल्या सारखे वाटतं.
(कृपया "हा घ्या" )
24 Sep 2016 - 4:35 pm | संदीप डांगे
पैसातै, बकरा गावतंय बघ...!!!
=)) =))
24 Sep 2016 - 4:39 pm | सतिश गावडे
त्या पाल्याची सोय करायला गेल्या असतील. ;)
24 Sep 2016 - 5:32 pm | पैसा
हा, आले. बोल, कुठे आणि कोणाला पाला घालायचाय?
26 Sep 2016 - 11:35 am | नाखु
(नाही तरी कूम्पणाबाहेरून आलेल्या पाल्याचे काय करायचे हा प्र्शन्च होता.)
बकरा ज्याचा त्याने आणावा ( पक्षी शोधावा).
पाला निवडून मिळणार नाही,आहे तसा आहे त्या स्थीतीत स्वीकारावा,नारळाची चौकशी करू नये,काही भाज्यांची रोपे आहेत त्यांचा पाला/भाजी मागू नये,पिशवी आपली आपण आणावी,प्लास्तीक पिशवी मिळणार नाही
बाकी सूचना नंतर.
नाखु पाचशेची सुपारीवाला संघाचा सभासद
26 Sep 2016 - 12:08 pm | पैसा
बकरा पळाला
25 Sep 2016 - 3:42 pm | पिशी अबोली
खरा बकरा की मातीचा बकरा? आणि मशीन आणल्यावर त्याच्यासमोर नारळ फोडला होता का?
25 Sep 2016 - 4:29 pm | यशोधरा
अभ्यासू आहे मुलगी =))
25 Sep 2016 - 4:34 pm | पैसा
आता कळलं. मशिनसमोर नारळ फोडला नव्हता. म्हणून मेलं बंद पडतंय सारखं.
24 Sep 2016 - 5:45 pm | मारवा
"पुरुषमेध" प्राचीन भारतात होता. व सरळ नरबळी त्यात होत असे.
यात पण इतकं आश्चर्य वाटण्यासारख काय आहे ?
प्रत्येक प्राचीन संस्कृतीत नरबळी होताच.
रोमनांमध्ये होता ग्रीक मध्ये होता सर्वत्र जगात सर्वत्र होता.
आपण वेगळे व श्रेष्ठ आहोत हा गंड असेल तरच अडचण आहे.
भारतरत्न पांडुरंग वामन काणें च्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रात सर्व सखोल विश्लेषणासहीत मुळ श्लोकासहीत उपलब्ध
आहे.
त्या पुरुषमेध चा संबंध नारळ फोडण्याच्या प्रतिकाशी आहे की नाही हे मात्र माहीत नाही.
24 Sep 2016 - 8:16 pm | मारवा
अमुक एक नियम जर काही कारणाने पाळणे वा अमुक एक विधी थांबवायची वा बदलायची असेल तर.
(पुर्वीच्या काळी हे अस्तित्वात होते हे मान्य करुन कारण त्याशिवाय पर्याय नव्हता ) तर पुर्वी हा नियम योग्य होता यज्ञ विधी इ. योग्य होते. मात्र सध्या कलियुग आहे व कलियुगात हे वर्ज्य आहे. अशी एक थीम वापरुन कलिवर्ज्याच्या आधारावर पुर्वीच्या कायद्यात "अॅमेन्डमेंट्स" केल्या जात असत. वरील पुरुषमेध अश्वमेध इ. अडचणीचे यज्ञ आता कलियुगात वर्ज्य आहेत. असे प्रतिपादन नंतरच्या धर्मग्रंथांनी केले. वरील संदर्भ असा आहे.
जुने नियम-
अतिप्राचीन तैत्तीरीय ब्राह्मण एका विशिष्ट यज्ञात पुरुषाचा बळी कसा द्यावा कोणत्या लक्षणांचा पुरुष निवडावा इ.चे या प्रोसीजरचे विस्ताराने विवरण करते. वाजसनेयी संहीतेत तैत्तिरीय प्रमाणेच याचे उल्लेख येतात. त्यानुसार वैश्याचा बळी मारुत ला, ब्राह्मण पुरुषाचा बळी ब्रह्मा या देवतेला इ. यात अकरा बलीवेंदींवर अकरा प्राणी बळी दिले जात इ. इ.. या यज्ञाच्या समाप्तीनंतर यजमान वनात संन्यासी बनुन निघुन जात असे. हा एक भाग. तसेच दुसरा एक मोठा महत्वपुर्ण यज्ञ होता अश्वमेध, हा एक अनेक गुंतागुंतीच्या विधींचा समावेश असलेला. अतीविचीत्र विधी रीती समाविष्ट असलेला अतीप्राचीन यज्ञ होता .इ.पु. २ ते अगदी १८ व्या शतकातल्या जयसिंग अशा अनेक ऐतिहासीक राजांनीही हा यज्ञ केल्याची नोंद आहे असे काणे म्हणतात. आणि एक असाच राजसुय नावाचा यज्ञ होता हा अतीदीर्घकाळ दोन वर्षांपर्यंतही चालत असे. कलिंग सम्राट खारवेला तसेच नयनिका राणीने हा यज्ञ केल्याची नोंद असलेले ऐतिहासिक शिलालेख आढळतात.
कलिवर्ज्य-
याने वरील तीनही प्रकारच्या यज्ञांवर बंदी घातली. व पुरुषबळीचा, अश्वमेध आणि राजसुय हे यज्ञ कलियुगात करण्यास मनाई केली. या तिघांचा एकेक कलिवर्ज्य नियम आहे.
कलिवर्ज्याचा उल्लेख असलेले सर्व ग्रंथ ऐतिहासिक दृष्ट्या अलीकडच्या काळातीलच आहेत.
24 Sep 2016 - 8:25 pm | प्रचेतस
ही नयनिका म्हणजे नागनिका. ही प्रथम सातकर्णीची राणी. सिमुख सातवाहनाची सून.
ह्यांनी केलेल्या अनेक यज्ञांची नोंद नाणेघाटातील प्रतिमालेखात आहेत. हयात एक राजसूय आणि दोन अश्वमेधांची नोंद आहे.
खारवेलाचा हाथीगुंफ़ेतील प्रस्तरलेख बराचकाळ पावेतो अज्ञात होता. ह्यानेच दक्षिणपथाधिपतीला (सातवाहन) ह्यांना सीमेवर रोखल्याची नोंद मिळते.
25 Sep 2016 - 1:50 am | गामा पैलवान
संदीप डांगे,
अगदी बरोबर बोललात बघा. म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही.
कर्मकांड हे श्रद्धा व/वा भक्तिपूर्वक करायचं असतं. अन्यथा नुसती कसरत होते.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2016 - 10:16 am | प्रचेतस
हे धर्मशास्त्र म्हणजे काय?
धर्मशास्त्राचा प्रमाण ग्रंथ कुठला मानावा?
25 Sep 2016 - 12:13 pm | गामा पैलवान
प्रचेतस,
वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या उपसानांसाठी वेगवेगळी शास्त्रे लिहिण्यात आली. त्यास ढोबळमानाने स्मृती म्हणता येईल. उपासक जी उपासनापूजाप्रार्थना करता तिला स्मृतीचा आधार असावा अशी कल्पना आहे. ते जमंत नसल्यास सरळ उपासना टाळावी. उगीच मनमानी करू नये अशी कल्पना आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2016 - 12:17 pm | प्रचेतस
स्मृतीही अनेक आहेत मग कोणती स्मृती प्रमाण मानावी?
25 Sep 2016 - 12:19 pm | गामा पैलवान
प्रचेतस,
तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता. जर माहित नसेल तर तत्ज्ञांना विचारावे.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2016 - 12:24 pm | प्रचेतस
जे पाहिजे तेच योग्य मानायचे असेल तर मग धर्माशास्त्राला काय अर्थ राहिला?
25 Sep 2016 - 1:28 pm | अत्रुप्त आत्मा
जबरा प्रश्न!
25 Sep 2016 - 4:50 pm | मारवा
तुम्ही म्हणताय
पैलवान म्हणताय ते असे.
तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता.
तुम्ही पाहीजे ती स्मृती म्हणजे एका विषयावर दोन वेगवेगळी असलेल्या दोन स्मृती असतील वा तीन वेगवेगळी मते असलेल्या
तीन स्मृती असतील तर तुम्ही त्या दोन वा तीन पैकी कुठलीही एक योग्य मानुन चालु शकता असे ते म्हणत आहेत.
पण स्मृतीच मानायची आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर जायला त्यांनी धर्माने परवानगी दिलेली नाही.
आता त्या दोन स्मृतीच्याच दोन तरतुदी परस्परविरोधी असतील तर तुम्ही काहीही घ्या निवडा चालेल. ते धर्मसंमतच असेल. आता हेच इंटरेस्टींग आहे. सध्याच्या गायीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात मुळ नियमांना पाळल तरी चालेल गायीचा बळी द्या उत्तरकालीन कलिवर्ज्याचे धर्मग्रंथ आधारभुत मानले तरी चालेल गायीचा बळी देऊ नका.
आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे.
व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे.
शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच.
गंमतच आहे.
25 Sep 2016 - 8:42 pm | अत्रुप्त आत्मा
@आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे.
व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे.
शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच.
गंमतच आहे. ››› हिच तर मजा आहे शास्त्रा~धार संमंत धर्मसुधारणेची. उदा~ @चोरी करावी@ यालाही शास्त्रात आधार. @चोरी करू नये. @ यालाही! मग ते शास्त्र न रहाता फक्त परस्पर विरोधी विचारांचा संग्रह होऊन बसतं. सावकर शास्त्राधाराला एरंडाचं गुह्राळ म्हणत असत, ते उगीच नाही!
म्हणूनच माझ्यासारखा माणूस धर्मातल्या चूकिच्या गोष्टी काढताना/बदलताना/त्यागताना , त्या गोष्टी चूक, अन्याय्य आहेत, असं म्हणून त्या आंम्ही स्वबुद्धीनी आणी केवळ नितिमत्तेच्या आधारावर बदलतो आहोत. असं म्हणून बदलल्या, काढल्या पाहिजेत. आणी त्यालाच खरीखुरी धर्मसुधारणा म्हटलं पाहिजे असा आग्रह धरतो.
आणी म्हणूनच मला, शास्त्राचा आधार देऊन महिलांनाही धर्मातले कोणतेही आधिकार देणारा, किंवा अन्य कोणतिही सुधारणा आणणारा मला दांभिक वाटतो. (संदर्भ-महिलांना अंत्येष्टी क्रियेचा दिला जाणारा कथीत शास्त्राधार! व असे अनेक. ) मग त्या पुरोहिताच्या मनातली तसं करण्याची इच्छा किति का निर्मळ असे ना!
या पद्धतिनी केलेल्या सुधारणेला व्यवहारात काहिही अर्थ उरत नाही.. कारण , आज शास्त्राचा आधार देऊन जी सुधारणा घडवली जाते, तीच उद्या गरज पडल्यावर परत विरूद्ध बाजुनी आधार देऊन काढूनंही घेतली जाऊ शकते. आणी पुन्हा २पावलं पुढं आलेला समाज परतीच्या वाटेला मागे जाऊ शकतो.
यापेक्षा स्वबुद्धिनी (म्हणजेच धर्माद्न्या न जुमानता) केलेला बदल हा जास्तीत जास्त शाश्वत रहाण्याची शक्यता असते. म्हणून मला तीच वाट वंद्य आणी आचरणीय वाटते.
कारण , कथीत धर्मशास्त्र मागे राहिलं तरी हरकत नाही, पण समाज पुढे गेलाच पाहीजे.
25 Sep 2016 - 8:59 pm | सचु कुळकर्णी
काऊ बॉइज
जबरा शब्द ;)
26 Sep 2016 - 12:21 pm | मारवा
आत्मबंधजी
मी तुम्हाला समजु शकलेलो नाही. तुम्ही एकीकडे इतके भेदक विश्लेषण एखाद्या कडव्या धर्मसुधारकासारखे करता. दुसरीकडे (माफ करा कृपया व्यक्तिगत घेऊ नये ) तुम्ही स्वतः माझ्या माहीतीप्रमाणे पुरोहीत आहात. तर हा अंतर्विरोध तुम्ही कसा मॅनेज करता. मी खरच तुम्हाला ओऴखु शकलेलो नाही.
जर तुम्ही खरेच असे विचार बाळगता तर तुम्ही एकीकडे त्याच शोषण व्यवस्थेचा एक भाग म्हणुन एक सक्रीय घटक म्हणुन काम का करता ? हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही प्रच्छ्न बौध्द्द सारखे प्रच्छन्न सुधारक वगैरे आहात का ?
एक गावठी उदाहरण घेतो समजा एका गावात नविन ऑफसेट मशीन्स आल्यानंतर खिळाप्रेस चे जुने ३ छापखाने राहीलेत. बाकी सर्व ऑफसेट मध्ये कनव्हर्ट झाले. पण गावातील माधवराव हे जुने गृहस्थ ( आठवतय का ग मालती ? आपल्या लग्नाची पत्रिका बाबांनी तो पत्रिकेचा गठ्ठा आणायला मलाच " आर्यभुषण" मध्ये पाठवलेल होत. त्यातली एक ठेऊन घेतली होती व मी तुला पोस्टाने पाठव्लेली) तर असे काही जे माधवराव शिल्लक आहेत शेवटचे थोडेफार त्यांची एक खिळाप्रेस ची गर ज आहे त्यांना खिळाप्रेस शी एक इमोशनल अॅटेचमेंट आहे. तर तुम्ही ती पुर्तता करणारे खिळाप्रेस चे शेवटचे शिलेदार आहात का ?
म्हणजे माझा एक आपला अंदाज तुम्ही का सक्रीय सहभाग देताय मग ? तुमच अस तर लॉजिक नाही ना की मी थांबलो तर काय फरक पडेल लोक दुसरा पुरोहीत बघतील. ते दारुबंदी वेळेस हा युक्तीवाद असतो. तर तुम्ही एक गुढ आणि कॉम्प्लेक्स व्यक्ती आहात माझ्यापुरते तरी. मला तुम्हाला समजुन घेण्यात मदत करावी.
अजुन एक स्पेसीफीक प्रश्न एकुण समजा ४० रुढी आहेत तर त्यापैकी जरी ३३ वाइट असल्या तरी उरलेल्या ७ फार चांगल्या आहेत व त्या ७ चे जतन च नव्हे संवर्धनही होणे अगत्याचे आहे असे तर तुमचे मत नाही ? म्हणजे तुम्ही उरलेल्या ७ आवश्यक चांगल्या योग्य न्याय्य रुढींच्या संवर्धनासाठी हे काम करत आहात ?
काय आहे तुमची भुमिका नेमकी ?
आपला विनम्र मारवा
26 Sep 2016 - 12:28 pm | अभ्या..
आत्मबंधबुवांविषयी एवढा विचार नका करु मारवाजी,
त्यांनी त्यांच्या खिळाप्रेसचे रुपांतर डायकट आणि क्रेझिंग मशीनमध्ये केलेय. चांगला चालुय धंदा त्यांचा. कधी कधी ऑफसेट वाल्यापेक्षा कमी रिस्क आणि भांडवलावर जास्त नफा कमवतात ते.
.
(गुर्जी, हे अगम्य शब्द वाटले तरी तुमच्या विषयी काही वाईट साईट नाहीये बरका. तुमच्या फ्लेक्सिबिलिटीचे कौतुकच आहे. नायतर येताल दुदुदुदुदुद ल्लुल्लुल्लुलु करत)
25 Sep 2016 - 12:29 pm | मारवा
उदाहरणार्थ हा स्त्रीच्या पुनर्विवाहा संदर्भातील घोळ बघा.
स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती.
तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती.
इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार.
कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.
आता नेमके काय करावे ?
मूळात अजुन एक मुद्दा याहुन महत्वाचा आहे तो असा की समजा वरील प्रमाणे विसंगती नाही हे मान्यही केले वा कालानुक्रमे बदल नाहीत हे ही मान्य केले. एक धर्मशास्त्रांतर्गतच एक सुसंगती ही दाखवुन दिली तरीही
त्यांचा जर निकाल हा असेल की पुनर्विवाहाचा अधिकार अमान्यच आहे पति कसाही असला तरीही. तर मुळात हा नियम केवळ धर्मग्रंथात आहे व सुसंगत आहे म्हणुन तो योग्य व न्याय्य आहेच असे का मानावे ?
म्हणजे असे असेलच असे धरुन कुठल्या नैतिकतेच्या कसोटीवर मान्य करावे.
अजुन एक सध्या खाण्यापिण्याचे नियम फारच कडक आहेत या संदर्भात हा एक नियम बघा
जुना नियम- गौतम व विष्णुधर्मसुत्र व याज्ञवल्क्य आणि पाराशर स्मृती नुसार ब्राह्मण चार प्रकारच्या शुद्रांच्या घरी अन्न ग्रहण करु शकत असे. ते असे होते एक त्याचा दास, त्याचा गुराखी, त्याचा कुलमित्र ( हेरीडिशीयरी फ़ॅमिली फ़्रेंड हा शब्द काणे वापरतात) आणि ब्राह्मणाचे शेत बटाईने राखणारा सालदार (हिस्सा घेऊन हा मुद्दा महत्वाचा मराठी प्रतिशब्द कोणताही असो) जरी यापैकी हे चारी शुद्रवर्णीय असले तरी यानुसार ब्राह्मणाला यांच्या केवळ यांच्या घरी यांच्या हातचे अन्न खाण्याची परवानगी दिलेली होती. शिवाय यात पाचवा ब्राह्मणाचा न्हावी जो असेल त्यालाही काही धर्मग्रंथ यात घेत. म्हणजे त्याच्या शुद्र न्हाव्याकडेही ब्राह्मण जेऊ शकत असे.
कलिवर्ज्य- वरील चारही व पाचव्या प्रकारच्या शुद्रा कडे ब्राह्मणाने भोजन करण्याच्या परवानगीला पुर्णपणे नाकारतो. कुठल्याही परीस्थीतीत शुद्राकडे भोजन करु नये असा प्रतिबंध घालतो.
आता केवळ धर्मग्रंथात आहे म्हणुन शुद्राकडे जेवु नये वा ज्याला शुद्र मानतो तो त्या साठी पात्र नाही हे कुठल्या नैतिक निकषावर ठरवावे ?
सुसंगती नाही त्यामागील न्यायिक संकल्पना मला अधिक महत्वाची वाटते. सुसंगति तर मिळुनही जाईल. त्यात काही विशेष नाही.
25 Sep 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी
असल्य स्मृती, ग्रंथात काय लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करून विधवा/घटस्फोटित महिलेने तारतम्य वापरून आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. असल्या ग्रंथांवर आधारीत निर्णय घ्यायचा असेल तर कुराणावर आधारीत वर्तणूक ठेवणार्या मुस्लिमांमध्ये व आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही.
तद्दन मूर्खपणा
25 Sep 2016 - 3:15 pm | मारवा
मात्र जी व्यक्ती हिंदु आहे धार्मिक आहे. व धर्मग्रंथांवर व त्यांच्या अधिकारावर श्रद्धा ठेवणारी आहे.
व आपल्या दैनंदिन कृत्यांचा नैतिक आधार म्हणुन या ग्रंथांवर व त्यातील शिकवणीवर गायडन्स वर अवलंबुन आहे.
त्याचे आग्रहाने जमेल तितके आचरण करण्याबाबत आग्रही आहे. जिथे पुर्ण आचरण जमत नाही तिथे गिल्टी फिल करणारी आहे.
अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती जर म्हणेल की मी हे असे असे वागतो याचे कारण माझा धर्म व त्याचा ग्रंथ मला असे वागण्याची परवानगी देतो वा त्यात अशी तरतुद आहे. मग हे केवळ तुम्ही म्हणता तद्द्दन मुर्खपणा म्हणून त्याने का मानावे ?
तो जर या वागण्याला वरील धर्मग्रंथांचे समर्थन देत असेल तर मग काय करावे ?
हे इतर धर्माविषयीही अर्थातच लागु आहे.
25 Sep 2016 - 3:27 pm | श्रीगुरुजी
'तद्दन मूर्खपणा' हे माझे वैयक्तिक मत आहे. परदेशात माझ्या बरोबर अपार्टमेंटमध्ये एक हैद्राबादचा मुस्लिम मुलगा होता. तो फक्त शुक्रवारीच डोक्यावरून स्नान करायचा. इतर दिवशी फक्त खांद्यावरून. ६ दिवस डोक्याला पाणी नसल्याने शेवटचे २-३ दिवस डोक्याला वाईट वास यायचा. त्याला एकदा यासंबंधी कारण विचारले असताना त्याने सांगितले की त्याचा धर्म वाळवंटात जन्माला आला व तिथे पाण्याचे खूप दुर्भिक्ष असल्याने अशी पद्धत पडली. मला ते लॉजिक पटले. परंतु मी त्याला सांगितले की त्या काळात तसे करणे लॉजिकल होते, परंतु २० व्या शतकात या देशात २४ तास स्वच्छ पाणी घरी उपलब्ध असताना ६ व्या शताकासारखेच वागण्याची गरज आहे का? त्याला हा मुद्दा पटला, परंतु त्याने आपल्यात बदल केला नाही. तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.
25 Sep 2016 - 4:24 pm | मारवा
तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.
या मतात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. फक्त जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण पारंपारीक अर्थाने धर्म मानत नाही हे व आपल्या सोयीनुसार वा बुद्धीनुसार वा स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावतो याची जाणीव असु दिली म्हणजे झाले. दुसर धर्मात वा धार्मिक ग्रंथात लिहीलेली प्रत्येक बाब ही सनातन सत्य नसुन, ईश्वरी नसुन मानवीच आहे व हितसंबंधाची प्रेरणा त्यामागे अर्थातच आहे. उदाहरणार्थ
धर्मग्रंथांचा एक जुना नियम असा होता.
गोसव नावाच्या जुन्या यज्ञात "अनुबंध्या" गायीचा बळी ("बॅरन काऊ" असा अर्थ काणे सांगतात) अग्निस्तोमाच्या शेवटी एका विशीष्ट विधीनंतर दिला जात असे. मान्यवर पाहुण्याला देण्यासाठी बनवलेल्या मधुपर्क या विशेष पदार्थातही मुख्य घटक म्हणुन गायीचे मास वापरण्यात येत असे. गोभिल गृह्यसुत्रानुसार अष्टकश्राध्द्दातही गायीचा बळी दिला जात असे.. आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे.
कलिवर्ज्य
वरील सर्व जुने नियम रद्द करत कुठल्याही कारणासाठी कुठल्याही यज्ञात गायीच्या बळीचा निषेध करतो. गोवध कलिवर्ज्य ठरवतो.
खर म्हणजे माझा मूळ प्रश्न गामा पैलवान यांना होता ते जे म्हणत होते तंतोतंत शास्त्रात जे आहे ते पाळावे नाही तर ती कसरत ठरते त्यावरुन तो विचारलेला होता.
तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?
25 Sep 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी
श्राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते. कदाचित प्राणीहत्या करताना मनात अपराधी भावना असावी व त्या हत्येचे संपूर्ण पातक आपल्यावर न येता त्यातला काही भाग देवाकडे/पितरांकडे जावा अशी मनात इच्छा असावी. जर हे प्राणी सेवनासाठी न मारता फक्त नवस/श्राद्ध इ. साठीच मारले गेले असते तर मारल्यानंतर त्या प्राण्यांची प्रेते सेवन न करता जाळून किंवा पुरून टाकली असती. मुस्लिमसुद्धा कोंबड्या/बकर्या सेवनासाठी कापतात. परंतु त्यांना मारताना अल्लाला भागीदार करून घेतात. त्यामागे हीच भावना असावी.
मुळात पितरांचे अस्तित्व हे अमूर्त/अदृश्य अस्तित्व आहे. असे अस्तित्व मूर्त्/दृश्य वस्तूंनी कसे काय तृप्त राहू शकेल?
अवांतर - आमच्या घराण्याच्या ज्ञात पूर्वजांपैकी सर्वजण शाकाहारी होते. त्यांच्या श्राद्धाला गायीचे मांस भोजनात ठेवले तर ते तृप्त राहण्याऐवजी शाप देतील.
मी शाकाहारी आहे. मला जे पटत नाही ते बंद करताना किंवा जे पटते ते स्वीकारताना मी धर्माची याला मान्यता आहे का, याविषयी धर्मग्रंथात काय लिहिले आहे, आपण हे करताना धर्मपालन करीत आहोत का, ही परंपरा योग्य की अयोग्य इ. गोष्टींचा विचार करीत नाही. मी फक्त माझ्या मनाचा कौल स्वीकारतो. निव्वळ गोहत्याच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांच्या हत्या बंद व्हाव्यात असे माझे मत आहे
26 Sep 2016 - 1:13 pm | मारवा
तुमची मते छान स्पष्टपणे मांडलीत ती आवडली. विशेषतः हे
श्
राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते.
आदी शंकराचार्य यज्ञातील पशु हिंसेचे तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच उघड दांभिक समर्थन करतात तेव्हा त्याचे आश्चर्य व मौज नेहमीच वाटते.
25 Sep 2016 - 8:59 am | संदीप डांगे
म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही.
^^^^
अगदी इस्लामी धर्मगुरुसारखं आहे हे विधान..
25 Sep 2016 - 12:17 pm | गामा पैलवान
.... पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो.
-गा.पै.
25 Sep 2016 - 8:45 pm | संदीप डांगे
पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो.
>> अय्या हो!? मग ही मनमानी आहे की नाही????? =)) =))
26 Sep 2016 - 2:12 am | गामा पैलवान
मारवा,
परस्परविरोधी धर्मशास्त्रे असतील तर काय करावे असा तुमचा प्रश्न आहे.
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल.
आता स्मृतीविपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्यानुसार आचरण करू नये या मताचा मी आहे. उदाहरणार्थ द्विभार्या प्रतिबंधक कायदा ही प्रचलित स्मृती आहे. त्यामुळे शक्य असलं तरी दोन बायका करू नयेत (मात्र हा कायदा धाब्यावर बसवून अनेक लोकं अतिरिक्त विवाह करतात ते वेगळं).
अर्थात, हिंदुंचं कुठलंही धर्मशास्त्र आवाहन, सूचना वा सल्ला देतं. आदेश देत नाही. आदेश देण्याचं काम स्मृतीचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 12:08 pm | मारवा
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल.
अत्यंत विनम्रतेने आपणांस सुचवु इच्छितो आपणांस असे म्हणावयाचे असेल की धर्मसुत्रे धर्मशास्त्रे एकीकडे व स्मृति दुसरीकडे असे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे कायदा नियम या अर्थाने केवळ स्मृतीतच आहे व धर्मशास्त्रे केवळ पुजापाठ उपासने संदर्भातील विवेचन करतात.
तर आपले म्हणणे कृपया आपल्या आवडीच्या कुठल्याही अधिकृत म्हणजे धार्मिक अधिकृतच ग्रंथातुन केवळ एकवार तपासुन घेतले तर बरे होइल. कारण धर्मसुत्रे धर्मशास्त्रे व स्मृती तिनही विविध आचरणाचे नियम व कायदे यांनी भरलेले आहेत व या बाबतीत स्मृती वेगळी धर्मसुत्र वेगळे असा भेद नाहीच. सर्वात मुळात श्रुती त्यानंतर स्मृती त्यानंतर पुराणे हा क्रम सर्वमान्य आहे. त्यात भाष्यकार हा वेगळा भाग आहे उदा. याज्ञवल्क्यस्मृतीवरील " मिताक्षरा" ही विज्ञानेश्वराने लिहीलेली टीका/भाष्य आहे. तो उत्तरकालीन इंटरप्रीटर आहे. मनुमृती चे भाष्यकार मेधातिथी आहे कुल्लुक आहे मेधातिथी ११ व्या कुल्लुक तर अगदी अलीकडचा आहे. हा एक भाग. काही स्मृतीतर अगदी अलीकडच्या काळातील आहेत उदा. देवल स्मृती व त्याहुन अनेक धर्मसुत्रे अती प्राचीन आहेत. काही तर इ.स.पुर्व ७ व्या शतकापर्यंत मागे जातात. धर्मसुत्रातला व स्मृतीतला कायदा हा नुसता प्रोव्हीजन्स नाहीतर शिक्षेच्या तरतुदींसहीत दिलेला आहे. त्याचे अॅक्च्युअल इम्प्लीमेंटेशन हा वेगळा विषया आहे. पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही.
वरील सर्व विवेचनही एका बाजुला ठेवा या व्यतिरीक्त दोन स्मृतीच घेतल्या तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तरी त्यात परस्परविरोधी नियम कायदे मोठ्या प्रमाणावर आहेतच. त्यावर आक्षेप एक भाग. दुसरा परंपरेनेही त्यावर सॉर्ट आउट ची जी सोय केलेली आहे ती आपणास माहीत असेलच. शिवाय हा कलिवर्ज्य चे अॅमेंडमेंट.
तर पहीला आक्षेप इनकसिस्टंसीचा आहेच पण तो फारच बेसीक त्यानंतर हितसंबंधाचा त्यानंतर मानवीय असण्याचा व त्याहुन महत्वाचा त्यातील अन्न्याय्य भेदभावयुक्त शोषक विषम तरतुदींचा ज्या कुठल्याच स्वाभाविक न्यायाच्या कसोटीवर कधीही टीकत नाहीत. ते बंधन का मानावे स्वतंत्र चिकीत्सा करुन स्वतंत्र धर्मनिरपेक्षनीतीने का आचरण करु नये या संदर्भातील आक्षेप आहेत. त्यामागील शोषणावर आक्षेप आहे.
तर वरील स्मृतींच फक्त साठी खालील एक मुद्दा पहा. यात सध्या कात्यायन या एकाच स्मृतीचा उल्लेख असला तरी त्यातील परस्परविरोध एकदा तपासुन घ्या दुसरी स्मृतीचे उदाहरण शोधुन देतो. अजुन एखादे काँक्रीट दोन स्मृतीभेद असलेले उदाहरणही देतो सध्यापुरते हे बघा.
"आततायिन " व्यक्तीने (डेस्परेट/व्हायोलंट) युद्धाच्या पवित्र्यात जर हल्ला केला तर आणि त्याला स्वत:चा बचाव करण्याच्या हेतुने मारले तर त्यात काहीही गैर नाही असे अनेक जुन्या धर्मशास्त्रांचे मत होते. आततायिन च्या व्याख्येत हिंसक पुरुष जो शस्त्रसज्ज आहे/दरोडेखोर आहे/आग लावण्याच्या हेतुने/ एखाद्याची पत्नी पळवण्याच्या हेतुने / जर आक्रमण करत आहे अशांचा समावेश होता. तर अशा "आततायिन" व्यक्तीवर प्रतिहल्ला करुन त्याला ठार मारणे धर्मसंमत होते. मात्र यात असा "आततायिन" ब्राह्मण असेल तर मात्र त्याला मारावे की नाही याविषयी अनेक धर्मसुत्रांत अगोदरपासुनच मतभेद होते. प्रातिनिधीक म्हणुन वसिष्ठ धर्मसुत्र म्हणतो जर ब्राह्मण हा आततायिन म्हणुन हल्ला करण्यास आला व इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जरी तो वेदाधिकारी असला तरी त्याच्या प्रतिकारात केलेल्या हत्येने ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. दुसरीकडे कात्यायन स्मृती म्हणते ब्राह्मण हा जरी आततायिन असेल व हल्ला करत असेल तरी त्याला (स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी देखील मारु नये) भृगु म्हणतो आततयिन शुद्र असेल तर मारायला हरकत नाही मात्र ब्राह्मणाला मारु नये
26 Sep 2016 - 2:21 am | गामा पैलवान
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार!
तुम्ही म्हणालात की :
ठीक आहे. वादापुरती ही भूमिका मान्य करूया. पुढे तुम्ही म्हणालात की :
आता गम्मत बघा की, नेमका हाच युक्तिवाद तुमच्या बुद्धीलाही लागू पडतो. आज तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीचा हवाला देताहात. उद्या कशावरून ती बदलणार नाही?
समजा जरी बदलली नाही तरी, भावी पिढ्यांचा काय भरोसा? तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना?
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 5:16 am | अत्रुप्त आत्मा
@तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना? ››› नाही . अजून तरी कुणी आजपर्यंत घडलेल्या सुधारणा बुद्धीच्या आधारे फिरवून उलट मागे नेलेल्या दिसत नाहित. जेव्हढे बदल झालेत ते भरपूर टिकलेत. उलट धार्मिक संघटनाच धर्माद्न्या काढून ते पुसायचा प्रयत्न करतायत.
26 Sep 2016 - 12:43 pm | गामा पैलवान
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार!
स्त्रियांचे सबलीकरण ही एक सुधारणा आहे. मात्र त्याकरिता ४९८ अ सारखा अन्यायी कायदा बनवणे ही कुधारणा आहे. ही कुधारणा बुद्धीच्या सहाय्याने केलेली आहे.
तुमच्या वैयक्तिक बुद्धी व नीतीच्या आधारे केलेल्या धर्मसुधारणा देखील शास्त्रबद्ध केल्या नाहीत तर पुढे त्यांची गती ४९८ अ सारखी होणार नाही हे कशावरून?
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा
चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात.
पण चिपाड बंद हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे.
तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही.
मी थांबतो.
तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!
26 Sep 2016 - 1:24 pm | अत्रुप्त आत्मा
चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात.
पण चिपाड बंद धर्म हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे.
तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही.
मी थांबतो.
तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!
26 Sep 2016 - 1:52 pm | मारवा
धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे.
धर्मात बदलाची सोय दिलेली आहे. तीचे स्वरुप थोडे वेगळे आहे इतकेच. कलिवर्ज्य ही बदलाचीच सोय आहे. व धर्माअंतर्गत आहे. पांडुरंग वामन काणे अत्यंत अभिमानाने पाश्चात्यांना संबोधुन म्हणतात की आमच्याकडे ही धार्मिक कायदे स्टॅटीक नव्हते त्यात बदल होत असे व "कलिवर्ज्य" सारक्या व भाष्यकारांची भाष्ये या बदलांना कायद्यातील बदलांना धर्मांतर्गतच बदलाची सुविधा उपलब्ध करुन देत. कलिवर्ज्य ने काही चांगले बदलही केले काही व्यावहारीक उपयोगाचे बदलही केले. तर ती ही सोय होती म्हणुनच केले. उदा. एक बदल पहा
जुना मुळ नियम
याज्ञवल्क्यस्मृती १-७२ नुसार एखाद्या स्त्रीने व्याभिचार केला असेल तर आणि त्यानंतर तिला मासिक पाळी आली तर अशी स्त्री व्याभिचाराच्या कलंकातुन सहज मुक्त होते. मात्र अशी स्त्री जर या व्याभिचाराच्या योगाने गर्भवती झाली तर मात्र अशा स्त्रीच्या पुत्राने (मातेचा) वा भावाने (बहीणीचा) त्याग केला पाहीजे. त्यांना टाकुन दिले पाहीजे. वसिष्ठ धर्मसुत्रही असाच आदेश तिन वरीष्ठ वर्णीय स्त्रीयांनी शुद्र पुरुषाशी केलेल्या व्याभिचारासंदर्भात देतो. तिथेही नियम गर्भवती होणे न होणेवर अवलंबुन आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकेत याचा अर्थनिर्णय करतांना विज्ञानेश्वर म्हणतो त्यागाचा अर्थ घराबाहेर काढणे असा नसुन अशा स्त्रीला धार्मिक कार्यक्रम व लैगिंक संबंध नाकारणे इतकाच आहे. वसिष्ठ पुन्हा चारच स्त्रीयांचा त्याग करावा असे म्हणतो त्यात पतीच्या गुरु वा शिष्याशी व्याभिचार करणारी, पतीच्या हत्येचा प्रयत्न, वा खालच्या वर्णाच्या पुरुषाशी व्याभिचार करणारी.
कलिवर्ज्य- नविन नियम कुठल्याही परीस्थीतीत मातेचा वा भगिनीचा त्यांनी जरी व्याभिचार केला असेल व त्यायोगे त्या गर्भवती झाल्या असल्या तरी त्यांचा त्याग करण्यास प्रतिबंध लावतो.
आता धर्मांतर्गतच वरील मुळ नियमात बदल करुन "कलिवर्ज्य" चा वापर करुन पुर्वीपेक्षा उदार भुमिका घेतलेली दिसत आहे. असेच आणखी काही नियम आहे जसे सत्रांवर ज्यात मोठ्या प्रमाणावर पशुबली होत असेल नियोगावर बंदी इत्यादी आहेत. आता यात वेगळी एक बाब अशी आहे की एकुण संख्या कलिवर्ज्याची ६० ते ६५ एक्झॅट नाही सांगता येत ती बघितली तर शोषण अजुन तीव्र करणारे स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे वर्नव्यवस्था अधिक घट्ट करणारे च बदल तुलनेने जास्त आहेत हे कटु वास्तव आहे.
आणि पांडुरंग वामन काणे सारखे थोर अभ्यासकही त्यात कधी कधी वाईट बदलांचीही भलामण करतात ते फारच खेदजनक व उद्वेगजनक आहे. एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे.
26 Sep 2016 - 2:14 pm | प्रचेतस
काणे ह्यांचे हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे का? असल्यास कुठे मिळेल?
26 Sep 2016 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा
@एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे. ››› यातच सर्व आलं.
27 Sep 2016 - 12:27 am | गामा पैलवान
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार!
सार्वजनिक गणेशोत्सव देखील नकारात्मक रीत्या बदलला आहे. काय करावं मग? तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीच्या सहाय्याने सुचवलेल्या सुधारणाही नकारात्मक मार्गाने जाणार नाहीत याची शाश्वती काय?
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 12:52 pm | गामा पैलवान
मारवा,
१.
माझं भेदवर्णन ढोबळ (कॅज्युअल) आहे हे मान्य. मात्र हेच अचूक व्हावं असा माझा आग्रह आहे. स्मृती म्हणजे राजाज्ञा मानली जावी. तिची व्याप्ती सार्वजनिक म्हणूनंच अतिशय मर्यादित असावी. आजच्या भाषेत किमान पण प्रभावी कायदे आणि बळकट अंमलबजावणी असावी.
यासोबत खाजगीतले नियम पाळणे हे स्वयंप्रेरित असावे. या स्वयंप्रेरणेस दिग्दर्शन धर्मशास्त्राद्वारे व्हावं अशी अपेक्षा आहे.
आता आततायी ब्राह्मणाकडे वळूया. जर कोणी ब्राह्मण आततायीपणे वागंत असेल तर तो ब्राह्मणंच नव्हे. म्हणजे जर कोणी आततायीपणा केला तर धर्मशास्त्रे वाचत न बसता सरळ त्याचा कोथळा बाहेर काढावा. हा मथितार्थ आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 12:57 pm | अभ्या..
कोथळा काढायचा अधिकार धर्मशास्त्राने कुणाला दिलाय? इतकी अराजकता असेल असे वाटत नाही.
26 Sep 2016 - 1:02 pm | प्रचेतस
गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी आहेत त्यामुळे त्यांना हा अधिकार असू शकतो.
26 Sep 2016 - 1:14 pm | अभ्या..
असेल असेल.
नम्रपणे कसा कोथळा काढतात तेच बघायचेय मला. ;)
.
आपला अतिविनम्र
अर्थातच अभ्या.. (दुसरा कोण?)
26 Sep 2016 - 5:28 pm | गामा पैलवान
प्रचेतस,
तुमचा नेम पार चुकलाय. सनातन संस्था अधिकारांपेक्षा कर्तव्यावर अधिक भर देते. त्यामुळे आक्रमण करणाऱ्याचा कोथळा काढणे हे अधिकार नसून कर्तव्य आहे. ते बजावायचं नसेल तर आपली मर्जी. शिवाजीमहाराज आणि अफझलखान यांच्या उदाहरणावरून हेच दिसंत नाही काय?
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2016 - 11:09 pm | संदीप डांगे
तर अशा रितीने गापैमहाराजांनी इतिहासाचा कोथळा काढून आपले कर्तव्य बजावले आहे. =))
26 Sep 2016 - 1:32 pm | मारवा
वरील प्रतिसादात आपणच स्मृतीवर भर देत विपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्या नुसार आचरण करु नये. शिवाय त्या आदेश देतात हेही तुम्हास मान्य आहे. तर इतकी स्पष्ट भुमिका तुमची स्मृतीचा आदेश पाळण्या संदर्भात आहे.
आता वरील उदाहरणात धर्मसुत्रेही सोडुन देऊ " कात्यायनस्मृती"चेच उदाहरण घेउ ही स्मृतीच आहे व हीचा स्पष्ट आदेशच आहे की "आततायिन" व्यक्ती ब्राह्मण असेल तर आणि त्याने हल्ला केला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठीदेखील बचावासाठीदेखील त्याच्यावर प्रतिहल्ला करणे योग्य नाही चुक आहे. मात्र शुद्र असेल याच्या जागी तर त्याला अशा शुद्र आततायिन च्या व्याख्येत बसणारा शुद्र असेल तर स्व-बचावासाठी त्याला मारण्यात सर्वच झाडुन सर्वच धर्मसुत्राचे एकमत आहे.
तुम्ही म्हणता
पण असा ब्राह्मण असु शकतो व त्याने असे केले तर त्यावर प्रतिहल्ला करु नये असा नियम जेव्हा कात्यायनस्मृती देते तेव्हा ती अशा ब्राह्मणाचे
१- अस्तित्व पुर्णपणे मान्य करते असे समाजात असु शकतात आहेत होते हे ती मान्य करते
२- त्यानंतर त्यांचे रक्षण व्हावे या दिशेने क्लीअर प्रोव्हीजनही करते. व त्यांना ब्राह्मणच मानते.
मग तुम्ही कात्यायन स्मृती च्या पुर्णपने विरोधी भुमिका घेत आहात असे आपणास वाटत नाही का आपण आदेश भंग करत आहात आपण धर्मादेश झुगारत आहात स्वतःच आग्रहाने प्रतिपादलेला.
शिवाय जेव्हा आपण जेव्हा असा आततायिन ब्राह्मण असुच शकत नाही अशी स्वतःची गामा पैलवान यांची व्यक्तीगत मत असलेली व्याख्या आग्रहाने मांडता तेव्हा. आपल्याच वरील एका प्रतिसादातील
की शास्त्रात जे आहे तेच पाळावे तंतोतंत पाळावे अन्यथा ती एक कसरत निरर्थक कसरत ठरते असे म्हणता.
यात उघड विसंगती आहे असे मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो.
शेवटी असा इतका टोकाचा कोथळा काढणे अशी भुमिका "अतिरेकी " आहे असे आपणास वाटत नाही का ?
26 Sep 2016 - 2:49 pm | धर्मराजमुटके
एवढी चर्चा झाली पण श्री हमीद दाभोलकर ह्यांचे अंधश्रद्धा निर्मुलन झाले की नाही अखेरीस ?
26 Sep 2016 - 3:10 pm | श्रीगुरुजी
छे छे! ते तर अजिबात झालेले दिसत नाही. ते आहे तसेच आहे.
26 Sep 2016 - 3:23 pm | अनंत छंदी
जनाब हमीद यांचे वडील पशुहत्या थांबावी म्हणून त्यांच्या अं.नि.स. या संघटनेमार्फत अनेक देवस्थानांजवळ आंदोलने करीत होते. नेमका याचाच विसर हमीद याना पडलेला दिसतो. की हिंदूंच्या देवळाबाहेरील पशुहत्या नापाक आणि ईदीची पशुहत्या पाक असे त्यांना वाटते.
26 Sep 2016 - 5:15 pm | गामा पैलवान
मारवा,
शास्त्राज्ञा तंतोतंत पाळण्याचा आग्रह वैयक्तिक उपासनेसाठी आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक प्रसंगी राजाज्ञा पाळणे इष्ट.
आ.न.,
-गा.पै.
3 Sep 2017 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे
इथे राजाज्ञा म्हणजे राज्यघटना पाळावी असे म्हणायचे आहे ना? बादवे कालच बकर ईद होती.
3 Sep 2017 - 12:13 pm | गामा पैलवान
प्रकाश घाटपांडे,
होय तर!
राजाज्ञा = राज्यघटना!
आ.न.,
-गा.पै.
12 Aug 2019 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे
अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ही अगदी ’शास्त्रा’ पुरती साजरी करुन गोळा झालेला चंदा हा पूरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. हे सकारात्मक पाउल आहे. मातीची बकरी हा सिंबॉलिक या अर्थाने वापरलेला शब्द आता हळू ह्ळू त्याकडे वाटचाल करीत आहे..रुढींचा मागसलेपणा हा हळू हळूच कमी होत असतो.
12 Aug 2019 - 12:13 pm | बाप्पू
हमीद दाभोळकर आणि इतर फुरोगामी आणि फेक्युलर जमात इस्लाम म्हणाले कि निष्पक्षपणे काम करते ते माहिती पाहिलेय त्यामुळे त्यांच्याबद्दल no कॉमेंट...
पण मित्रहो हार्दिक समाज देखील हळू हळू बदलत आहे.
बरेच मुस्लिम लोक यंदा ईद साजरी न करता सर्व रक्कम पूरग्रस्तांसाठी देत आहेत. तसेच कालच पेपर मध्ये वाचले कि श्रावण सोमवार आणि ईद दोन्ही एकच दिवशी आल्यामुळे काही मुस्लिम लोकांनी ईदची कुर्बानी सोमवारी न देता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देण्याचे ठरवले आहे.
आता ह्या बदलाला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते माहिती नाही पण मुस्लिम समाज कट्टरते कडून सामाजिक सौदार्ह्याकडे पावले टाकत आहे त्यामुळे एरवी विरोधात बोलत असलो तरी त्यांच्या या अटीट्युड ची प्रशंसा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
12 Aug 2019 - 10:36 pm | गामा पैलवान
बाप्पू,
तुमच्याशी शंभर टक्के सहमत. हिंदू व मुस्लिम समाजांना एकमेकांच्या सदिच्छा प्राप्त होत असतील तर त्यांचं भरभरून स्वागतंच आहे.
आ.न.,
-गा.पै.
14 Aug 2019 - 9:17 pm | डॉ.नितीन अण्णा
देव तेथेचि जाणावा... हमीद दाभोलकर
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 Aug 2019, 09:57 AM
महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले...
महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले. याचे स्वागत करायला हवे...
कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसला. एका बाजूला ह्या आपत्तीच्या मानवनिर्मित अनेक बाजू समोर येत असतानाच स्वत:च्या पलीकडे जावून मदत करण्याची असंख्य उदाहरणे ह्या दोन आठवड्यात दिसली. त्या मधील कोल्हापूरच्या मुसलमान बांधवानी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी आर्थिक कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आणि सांगली, सातारा भागातील मुसलमान समाजातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला, ही मोलाची घटना आहे. देव आणि धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे त्याला विधायक पर्याय सुचवणे हे केवळ अवघडच नाही तर अनेक प्रसंगी जीवघेणे ठरते आहे. अशा कालखंडात धर्माचे मानवतावादी रूप समोर आणणारी ही घटना आहे. म्हणूनच तिचे विवेचन आवश्यक आहे.
जगभर ईदला मोठ्या प्रमाणात बोकडाची कुर्बानी दिली जाते. महाराष्ट्रातील मुसलमानही ही प्रथा पाळतात. कुर्बानीच्या एका बोकडाची किंमत जवळ जवळ वीस हजार असते. ज्यांना ती परवडत नाही, ते यात पाच हजार रुपयाचा वाटा कुर्बानी म्हणून देतात. इस्लामच्या मूळ रुपात बोकडाची कुर्बानी देण्याची प्रथा आहे का नाही, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. इस्लामच्या एका कालखंडात नरबळीला पर्याय म्हणून कुर्बानी देणे चालू झाले असे दाखले दिले जातात. कुर्बानीचा अधिक व्यापक अर्थ सांगणारे काही इस्लामचे तज्ज्ञ आहेत. ह्या प्रवाहाच्या मते, कुर्बानी ह्या गोष्टीचा अर्थ हा आपल्यामधील चांगले काही तरी दुसऱ्याला देणे.
मानवी समूहांच्या विकसित होत जाणाऱ्या टप्प्यांच्या मध्ये कोणत्याही धर्मातील त्या काळाला सुसंगत नसलेल्या प्रथा परंपरा बदलून त्या अधिक कालसुसंगत प्रकारे आचरणात आणणे हे मानवी मन विकसित होण्याचे एक लक्षण असते. मानवी सुधारणेचा इतिहास हा प्रामुख्याने धर्म सुधारणेचा इतिहास आहे असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे एक वाक्य आहे. हिंदू धर्माच्या मध्ये विधायक धर्मचिकित्सा करणाऱ्या संत आणि समाज सुधारकांची पाच हजार वर्षांची परंपरा आहे. पण इस्लाममध्ये मात्र त्या तुलनेत हा प्रवाह खूपच क्षीण राहिलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजात सती प्रथा निर्मूलनापासून ते अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण अशा अनेक सुधारणा धर्माच्या आतून झालेल्या दिसतात. त्या तुलनेत इस्लाममध्ये मात्र हे काम अतिशय संथ गतीने होत आलेले आहे. या पार्श्वभूमीवर ईदची कुर्बानी ही आर्थिक स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आपण समजून घेतला पाहिजे.
हमीद दलवाई यांनी सुरू केलेले मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली सहा वर्षे महाराष्ट्रात रक्तदान करून ईद साजरी करते. यामागे आपले रक्त हे गरजू व्यक्तीला कुर्बानी म्हणून देणे, हा उन्नत भाव आहे. त्याला गेल्या सहा वर्षांत वाढता प्रतिसाद असला तरी तीन जिल्ह्यातील बहुतांश समाजाने मोठ्या प्रमाणात कुर्बानीचा अर्थ हा अधिक उन्नत भावनेने घेणे हे महत्त्वाचे ठरते.
नोंद करण्यासारखा भाग म्हणजे ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विसर्जित गणपतीदान ही पर्यवरण पूरक गणेश उत्सवाची मोहीम सुरू केली त्याच कोल्हापूरमधून आर्थिक कुर्बानी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शाहू महाराजांच्या विचाराने झालेली कोल्हापूर जिल्ह्याची मशागतदेखील ह्याच्या पार्श्वभूमीला आहे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा के. डी. खुर्द ह्यांच्या पुढाकाराने विसर्जित गणपती दान मोहीम कोल्हापुरात राबवली गेली, तेव्हा त्याला खूप विरोध झाला होता. पण आज मात्र पर्यावरण पूरक गणपतीला समाजमान्यते बरोबर शासन मान्यताही मिळालेली आहे.
एका धर्मातील धर्मांधता दुसऱ्या धर्मातील धर्मांधतेला बळ देते, असा आपल्याकडे सार्वत्रिक अनुभव आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारे पक्ष आणि मुस्लिम धर्माचे राजकारण करणारे पक्ष हे बाहेरून एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत असले तरी प्रत्यक्षात हे पक्ष हे दोन्ही धर्मातील विचार करू इच्छिणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात, ही आता लपून राहिलेली बाब नाही. पण संविधानाच्या चौकटीत राहून रूढी व परंपरांची कालसुसंगत चिकित्सा करणाऱ्या लोकांमध्ये मात्र अनेकदा अशी परस्परपूरकता दिसत नाही. पर्यावरण पूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी तसेच अनेक ठिकाणी यात्रेतील पशुहत्यादेखील थांबविण्याचे जे यशस्वी प्रयत्न सध्याच्या कालखंडात आपल्या समाजात झाले आहेत, त्यापासून एक मोठा दिलासा आर्थिक कुर्बानीसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या मोहिमेला मिळू शकतो. अशाच पद्धतीने आर्थिक पातळीवर कुर्बानी देण्याचा कोल्हापूरमधून चालू झालेला हा उपक्रम केवळ आपत्कालीन प्रतिसाद न राहता त्याचे एका विधायक जनचळवळीत रूपांतर होऊ शकते.
भारतातच नाही तर जगभरात धार्मिक कट्टरपंथी विचार वाढीला लागलेला असताना धर्माला अधिक मानवी रूप देण्याचे वरील प्रयत्न हे निश्चितच उठून दिसतात.
कोल्हापूरच्या घटना ही एक छोटी सुरूवात असली तरी अशी एक छोटी सुरूवात समाजाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत किती बदल करू शकते, हे समजून घेण्यासाठी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी यंदा पुणे महापालिकेला केलेले आवाहन समजून घेतले पाहिजे. ज्या पद्धतीने पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी आर्थिक स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रकारे चार वर्षांपूर्वी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पर्यवरणपूरक विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. ह्या वर्षी ह्याच गणेश उत्सव मंडळानी पुणे महापालिकेला आम्ही पर्यवरण पूरक गणेश उत्सव करून पर्यावरणाची काळजी घेतली, आता तुम्ही पुढाकार घेवून पुण्यातील नदीपात्र स्वच्छ आणि सुशोभित करा, असे आवाहन केले आहे.
माणसाचे मन एकदा विधायक कृतिशील चिकित्सा करू लागले की ते केवळ रूढी आणि परंपरांच्या चिकित्सेपाशी थांबत नाही तर ते नागरी प्रश्नांच्या बाजूने आपल्या चिकित्सेचा परीघ वाढवते असा आशावाद यामधून मिळतो.
"माझी लढाई हि काही दशकांची नाही तर काही शतकांची आहे, ह्याची नम्र जाणीव मला आहे," असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत. २० ऑगस्टला त्यांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी पकडले असले तरी अजून त्यामागचे सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. असे असले तरी जो विचार समाजमनात रुजावा, यासाठी डॉ. दाभोलकरांचे बलिदान झाले तो ह्या देशातील संत आणि सुधारकांनी सांगितलेला 'विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा विचार' हा अतिशय प्रतिकूल सामाजिक परिस्थितीमध्येही एका पातळीवर समाजमन स्वीकारते आहे, हे वास्तव आश्वासक आहे.
(लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)
15 Aug 2019 - 11:33 pm | गामा पैलवान
डॉक्टर नितीन अण्णा,
प्रागतिक विचार अंमलात आणल्याबद्दल मराठी मुस्लिम समाजाचं अभिनंदन. इस्लाम म्हणजे अरबांच्या चालरीती कॉपीपेस्ट करणे नव्हे. इतका जरी बोध घेतला तरी तूर्तास पुरे. पुढे इस्लाम म्हणजे काय आहे व काय नाही याच्या चिंतनाची जोड देता येईल.
आ.न.,
-गा.पै.
16 Aug 2019 - 10:41 am | राघव
त्यांना कुणीतरी नीट आठवण करून द्यायला हवी की, "बाब्बौ, तुमचे नाव 'केत'कर आहे, 'कट'कर नाही म्हणून.."
अर्थात् त्यांच्या नावातच "मार" आहे आता तर ते तरी काय करणार [मार] खाण्याशिवाय म्हणा...
बाकी तुमचा लेख वाचून एक प्रश्न पडलाय.. ते ***ची कातडी सोलणे म्हणजे यालाच म्हणतात काय हो? _/\_
16 Aug 2019 - 10:44 am | राघव
@संपादक, चुकून या धाग्यावर प्रसिद्ध झालेली ही प्रतिक्रीया काढून ताकावी अशी विनंती.
23 Aug 2019 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे
गामापै यांचा अन्यत्र असलेला हा विषयावरचा धागा अप्रकाशित झालेला दिसतोय. त्यात या धाग्याचा संदर्भ मी दिला होता.
23 Aug 2019 - 12:57 pm | वामन देशमुख
मलाही हेच म्हणायचं आहे, गामा पैलवानांचा लेख कशामुळे अप्रकाशित झाला?
28 Aug 2019 - 7:02 pm | चौकस२१२
अंधश्रद्धा विनाशाय
अनिस च्या कार्याची माझी पहिली ओळख झाली जेव्हा माझे वडील त्यांच्या कार्याला हात भार म्हणून सोबतच्या इंजिनीरिंग प्राध्यापकांबरोबर काही शिबीर आयोजित कार्याचे त्यात विविध शास्त्रीय प्रयोगातून बुवाबाजी कशी असते ते दाखवून द्यायचे...
पुढे "अंधश्रद्धा विनाशाय" हे पुस्तक वाचले आणि भारतीय समाजात अंधश्रद्धा किती आहे ते वाचून थकक झालो...
परंतु पुढे पुढे जसा काळ गेला आणि अनिस आणि समविचारी लोकांच्या विविध विधाने ऐकून अनिस बद्दल चा आदर कमीच होत गेला
खास करून आता तर मत पक्के बनले आहे कि जरी हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महत्वाचे असले तरी या लोकांना एकाच धर्मात ते का दिसते? त्यांना इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाही का? ती उघडकीला का आणीत नाही किंवा पुरेश्या जोमाने त्याबद्दल काही पाठपुरावा का करीत नाहीत? आपलं चार्ली हबदू होईल अशी भीती वाटते कि काय अनिस ला? अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते.
जीवनात थोडी पापभिरू श्रद्धा असली तर फार काही बिघडत नाही पण अंधश्रद्धा नक्कीच नसावी दुसरे असे कि काही प्रथा ( धार्मिक आणि सामाजिक) या कालबाह्य होऊ शकतात हे जसे श्रधुळु लोकांनी विचारात घेतले पाहिजे तसेच अनिस वाल्यांनी उगाच लोकांना त्रास दिल्यासारखे पण वागू नये
अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये ... इत्यादी
28 Aug 2019 - 8:24 pm | प्रकाश घाटपांडे
अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये >>>>>> हे सर्वामान्यच आहे.
अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते.>>>>>> असे वाटणे याचे कारण अनिस त विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत हे असावे.
28 Aug 2019 - 10:43 pm | सर टोबी
अंनिसच्या कामाच्या उपयुक्ततेबद्दल फारसा कुणाला आक्षेप सहसा दिसत नाही. थोडीशी श्रद्धा असू द्यावी, तिचा फार बाऊ करू नये असे बऱ्याच वेळेला वाचायला मिळते. माझ्या आकलनानुसार अंनिस पण हे जाणून आहे. त्यांचा भर आहे तो फसवणूक टाळणे आणि पर्यावरणपूरक उत्सव असावे यावर. फसवणुकीच्या नावाखाली सहसा अशिक्षित आणि गरीब लोकांची होणारी फसवणूक जसे भानामती, आजार आणि प्राणीदंश यावर होणारे उतारा, मंत्रोपचार, बळी देणे यासारखे उपचार, आणि आपले दणदणाटी उत्सव हे त्यांचे प्रमुख आक्षेप असावेत. याखेरीज, वास्तुशास्त्र, ज्योतिष, आणि सत्यनारायण यावरही त्यांची टिप्पणी असायची पण ती जाहीर व्याख्यानांमधून विचार व्यक्त करणे या पुरतीच मर्यादित होती असे वाटते.
आता वळूया आपल्या ठसठसणाऱ्या वेदनेकडे. फक्त प्रबोधन 'आमचेच' का म्हणून? यावर माझी मते खालील प्रमाणे:
सर्वप्रथम सुरुवात होते ती बकरीदच्या प्रथेपासून. 'त्यांची' हि प्रथा कशी चालते, त्यावर बरे कोणी बोलत नाही. तर वाचकांनो, या वर्षी, आषाढीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळचा अंक वाचायला घेतला तर तर जवळपास एक सबंध पानभरून आखाडाचा बेत असणाऱ्या हॉटेलांच्या जाहिराती! भागवत संप्रदाय, वैष्णवांचा मेळावा, सावळा विठ्ठलु वगैरे सर्व आपण एका रात्रीत गुंडाळून ठेवले! वर तर वर, हि सर्व छपाई तर आषाढी एकादशीच्याच दिवशी होत होती! आणि कडी म्हणजे दीपअमावसेला जेवढे बोकड, कोंबड्या आणि समुद्र जीव प्राण सोडतात त्या पुढे बकरीदच्या दिवशी होणाऱ्या कुर्बानी तर काहीच नाही. लक्षात घ्या, इथे आक्षेप प्राणिहत्येला नाहीये. एवढा मोठा विरोधाभास बाळगून वर दुसर्यांकडे बोट दाखवायचे म्हणजे एक तर हिमतीचे काम असावे नाही तर अट्टल निर्लज्जपणा असावा.
अजुनहि काही मुद्दे आहेत पण त्यांचा परामर्श नंतर कधी तरी.
29 Aug 2019 - 7:12 am | मारवा
हे आत्मपरीक्षण करणारे करुन घेतील
पण हमीद दाभोळकर आणि अनिस कधी आत्मपरीक्षण करणार ?
म्हणजे समजा जैन समाजातील कुठल्याही एका सर्वसाधारण जैन माणसाने हा प्रश्न हमीद यांना विचारला
( जैन समाज सर्वसाधारणतः जनरली स्ट्रीक्टली शाकाहारीच असतो )
आता हा प्रश्न समजा डॉ. कल्याण गंगवाल यांनी ( हे जैन आहेत बहुधा व शाकाहार प्रचारक आहेत ) हमीद दाभोळकर यांना जैन समाजातर्फे विचारला तर तुम्हाला वरीलप्रमाणे " तुम पहले अपने गिरेबान मे झाक के देखो " हा लोकप्रिय संवाद इथे वापरता येणार नाही
कारण सर्वसाधारण जैन माणसाचं गिरेबान यात वरील प्रमाणे अडकत नाही इतके ते शाकाहारी जनरली असतात
तर हमीद दाभोळकर किंवा तुम्ही अस समजा की हा प्रश्न हिंदु कडुन नाही जैनांकडुन आलेला आहे
तर त्याचे उत्तर तुम्ही किंवा दाभोळकर काय देणार ?
29 Aug 2019 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
खर तर तुम्हाला नेमक काय म्हणायच आहे हे समजल नाहीये.
29 Aug 2019 - 10:01 am | सर टोबी
अशा व्यवस्थित उंची दिलेल्या आणि मंदगती चेंडूवर एक सिक्स तो बनती है. माझे विवेचन थोडे तुकड्या तुकड्यांमध्ये आहे.
पहिला मुद्दा हा आहे कि आपण सर्व जण एकमेकांशी संबंधित असतोच. अगदी तिरीमिरीत देखील 'तुझा आणि माझा काय संबंध?' असे विचारले तरी आपण संबंधित असतोच. आता हे बघाना. पुणेकर मनमुराद कचरा करतात आणि तिकडे फुरसुंगीच्या मुलांची लग्न होत नाहीत. आहे कि नाही संबंध? हा संबंध अनेक पातळ्यांवर असतो. काश्मिरात बर्फ पडले कि उर्वरित भारतात थंडीची लाट येते. उजव्यांनी 'सर्व कायदे फक्त हिंदूंनीच पाळायचे का' असे म्हटले कि शहरं गुदमरवून टाकणारे उत्सव सुरु होतात. म्हणजे भौतिक आणि आत्मिक पातळीवर देखील आपण एकमेकांचे संबंधित असतो.
आता वळूया नाकाने कांदे सोलणाऱ्या जैनांकडे. यातील काही जैन आपल्या मराठी बांधवांना हिणवतात. साले तुमचे लग्न समारंभ म्हणजे काय असतात रे. एक जिलेबी एवढाच गोडाचा पदार्थ. आमच्याकडे बघा. चार चार मिठाया. तो शुध्ध तुपाने थबथबणारा मूग हलवा, ते शुध्ध तुपात तळलेले गुलाबजाम आणि वरती घट्ट रबडी. आता कल्पना करा कि अशा प्रकारच्या दुधाच्या वापरासाठी कोणीतरी कपिला गायीची व्यापारी पैदास करतो. आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर भाकड जनावरांची पण बेगमी करतो. काही ठिकाणी भाजी बाजारात होणारा कचरा भाकड जनावरांकडून जिरवला जातो. पण भाकड जनावरांची निर्मिती आपल्या क्षमतेहूनही जास्त वेगाने होत असते.
दोन तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल दर्डा यांनी संपूर्ण ग्रँड ट्रंक रोडवरून प्रवास केला असता त्यांना शेतकऱ्यांनी सोडून दिलेली भाकड जनावरं संपूर्ण प्रवासभर दिसली. मुद्दा निव्वळ वाहतूक मंदावण्याचा नाहीए. जनावरांना मरणाहूनही अमानुष अशा परिस्थितीत ढकलण्याचा आहे. तेंव्हा शाकाहारी भलेही मांस भक्षण करीत नाही या आनंदात असतील लेकिन गिरबान तो उनकाभी सांफ नाही है मेरे दोस्त!
30 Aug 2019 - 8:39 am | मारवा
सरजी
तुम्ही मुळ प्रश्नाला न भिडता प्रश्नकर्त्याला भिडु शकता पण त्यातुन मुळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो. इथे अजुन स्पष्ट करतो
हमीद यांना दुर्गापुजेतील पशु बळी ही जर अंधश्रद्धा वाटत असेल आणि बकरी इद मधील पशु बळी ही अंधश्रद्धा वाटत नसेल तर प्रश्नच मिटला विषयच संपला. पण
आता मी जे गृहीत धरतो आहे की हमीद यांच्या व अनिस यांच्या मते दोन्ही अंधश्रद्धाच आहेत मी चुकत असेल माझ्या गृहीतकात तर कृपया दुरुस्त करा
जर दोन्ही मध्ये अंधश्रद्धा आहेत व दोन्ही ना विधायक पर्याय म्हणुन माती ची बनवुन बळी द्या असा पर्याय अंनिस वा अजुन कोणी सुचवत असेल तर त्यात ही गैर काय ?
आता हा विधायक पर्याय जर गणेशमुर्ती मातीच्या वगैरे विसर्जन ( गणेशमुर्ती विसर्जन हा सर्वस्वी वेगळा पर्यावरण वगैरे च्या रीलेटेड मुद्दा आहे पशु बळी चा नाही हे जाणुन आहे ) इथे फक्त पर्यायाची तुलना म्हणून म्हणतोय
कोणी हा विधायक पर्याय मुस्लिम समाजाला द्या त्यांच्यात प्रबोधन करायला काय हरकत आहे ? हा प्रश्न हमीद व अनिस ला विचारला तर त्याचे उत्तर जे त्यांनी दिलेले इथे
वाचले आहे ते पटले नाही.
म्हणजे हमीद म्हणतात खोडसाळपणा व विरोधासाठी विरोध या प्रश्नात आहे हे दोन्ही मुद्दे एकवेळ मान्य करु की हमीद बरोबर आहेत तरी सर्वात मोठा आक्षेप हा त्यांच्य
भावार्थ समजुन घ्या या अत्यंत दांभिक टिप्पणी मध्ये आहे
उद्या सतीचा ही भावार्थ समजुन घ्या दुर्गापुजेतील बळीचा ही भावार्थ समजुन ग्या अश्वमेघ चा भावार्थ समजुन घ्या
आणि गप्प बसा असे चालेल का ?
मी जैन उदाहरण तुमचा Ad hominem बंद व्हावा यासाठी दिले पण तुम्ही त्यातच रस घेतलेला दिसतोय.
एकदम गावठी उदाहरण गावच्या चावडीवर चोर पकडुन आणला तर रमेश नावाचा चोर म्हणतो अगोदर याला बघा आता पहीला झाला दुसरा झाला तिसरा झाला
सर्वांची चौकशी झाली चोर ही झाले सिद्ध ही झाल शिक्षा सुद्धा झाली त्याने ज्या ज्या कडे बोट दाखवलं ते सर्व झाले
आता रमेश ची पाळी आहे
आता रमेश चा खिसा तपासायचा आहे
आता रमेश ला जबाब द्यावा लागेल
आता रमेश ला बोट दाखव्ण्यास कोणी उरल नाही
हमीद आता कोणाकडे बोट दाखवतील
( हमीद चोर आहे असे म्हणणे नाही हे उदाहरण आहे मला अनिस च्या कार्याविषयी आदर आहे पण वरील हमीद च्या विधानातील दांभिकता बघुन मला धक्का बसलेला आहे म्हणुन हे सर्व म्हणतोय )
याउलट पेटा संघटना मला तुलनेने प्रामाणिक वाटते बकरीद च्या अगोदर च त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी प्राणी हिंसा च चुकीची आहे धर्म कुठलाही असो
तात्विक दृष्य्ट्या पेटा मला भडक जाहीराती करत असली तरी किमान भुमिकेत प्रामाणिक वाटते.
https://www.petaindia.com/blog/bakrid-peta-india-asks-prohibiting-animal...
29 Aug 2019 - 10:14 am | सुबोध खरे
टोबी महाराज
लोकांचा आक्षेप प्राण्यांच्या कत्तलीला नसून सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याला आहे. उगाच सेक्युलर पणाचा आव आणू नका.
दिव्याच्या अवसेला कोणीही प्राणी घरात/ घराबाहेर मारून घाण करत नाही. पण अशी स्थिती बक्र ईद ची नाही
यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाला Because home isn't a slaughter house: Bombay HC prohibits slaying of animals in houses for Bakrid असा सज्जड दम द्यावा लागला
https://www.dailyo.in/lifestyle/bakri-eid-goat-slaughter-on-bakri-eid-bo...
हीच स्थिती बहुसंख्य हिंदूंची( यात मी पण आलो) अंनिस बद्दल आहे.
उगाच सेक्युलर पणाचा आव आणायचा आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा बद्दल तोंड बंद ठेवायचे या दुटप्पीपणाबद्दल लोकांना राग आहे.
गणपती उत्सवातील ढोल ताशे आवाज प्रदूषण करतात पण मशिदीवरील भोंग्याबद्दल/ मोहर्रमच्या ताजिया बद्दल तोंड बंद ठेवायचे असला दुटप्पीपणा आम्हाला भावत नाही. कोणत्याही धर्माच्या माणसाला सार्वजनिक शांतता भंग करण्यास सक्त मनाई केली पाहिजे यात गणेशोत्सवातील डीजे ढोल ताशे पण आलेच.
दिव्याच्या अवसेला बक्र ईद पेक्षा जास्त प्राण्यांची कत्तल होते हे दाखवणारा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का?
अल्पसंख्याक म्हणून बोम्ब मारणारे मुसलमान भारतात १५ % आहेत म्हणजेच २० कोटी याना अल्पसंख्याक म्हणणे हा विरोधाभास आता थांबवला पाहिजे.
29 Aug 2019 - 10:48 am | प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत आहे. 'आमच' बंद करा काही हरकत नाहि पण 'त्यांचही' बंद करा अस म्हणणारे दिसतात. फक्त अस आहे कि हिंदू धर्मात उदंड सण उत्सव आहेत. आन त्याच स्वरुप उन्मादी होत चाललय. इतर धर्मांचही उन्मादी होतच आहे.झुंड आली कि उन्माद आलाच.
नक्कीच हो पण अस का आहे यावर वरती एके ठिकाणी थोडस भाष्य केले आहे.
29 Aug 2019 - 10:50 am | प्रकाश घाटपांडे
http://www.misalpav.com/comment/883190#comment-883190
29 Aug 2019 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे
http://www.misalpav.com/comment/881303#comment-881303
बर्याच दिवसांनी पुन्हा धागा व प्रतिक्रिया वाचल्या