तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस..
प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस...
तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी
स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते..
गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या
हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो..
तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
धोधो कोसळणाऱ्या पावसात एकटं भिजताना
तुला माझी आठवण नक्कीच येईल..
अशी काही अपूर्ण स्वप्न जाता जाता
तुझ्या ओजंळीत मी देऊन जाईल..
माझ्या प्रेमाची भव्यता कदाचित तेव्हाच तुला समझेल..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
प्रतिक्रिया
22 Sep 2016 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेतील भावना पोहचल्या. छान लिहिलंय.
'' धोधो कोसळणाऱ्या पावसात एकटं भिजताना
तुला माझी आठवण नक्कीच येईल..''
खरंय.... पाऊस माणसाला वेडं करतो.
आणि आठवणींचं विचारु नका. पाऊस आणि
आठवण आली की डोळ्यातलं पाणी अन
पावसाचं पाणी हातात हात
घालून धोधो वाहतात, तो क्षण भन्नाट असतो.
(असं म्हणतात)
अब हिचकियाँ आती हैं तो पानी पी लेते है...
ये वहम छोड़ दिया है की कोई हमे याद करता है...!
-दिलीप बिरुटे
(एक दिवाना )
22 Sep 2016 - 5:18 pm | bhavana kale
खरंच...जितका पाऊस पडतोय त्याच वेगाने कविता लिहितेय...
आणि ह्या पावसात फक्त आणि फक्त प्रेमवरच लिहावसं वाटत..
-एक पाऊसवेडी
22 Sep 2016 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> जितका पाऊस पडतोय त्याच वेगाने कविता लिहितेय...
आणि ह्या पावसात फक्त आणि फक्त प्रेमवरच लिहावसं वाटत..
प्रेमावर लिहा, पावसावर लिहा, पण लिहा. होऊ दे, मोकळं आकाश.
हाय काय, अन नाय काय, पुलेशु.
-दिलीप बिरुटे
22 Sep 2016 - 4:53 pm | पाटीलभाऊ
मस्त लिहिलंय...!
22 Sep 2016 - 11:53 pm | किरण
बोल दो ना जरा,????????
23 Sep 2016 - 11:41 am | bhavana kale
बरोबर ओळखलंत..पण ह्या काव्यप्रकाराला काय नाव द्यावे ते मला कळलं नाही..हे विडंबन पण नाहीये..
23 Sep 2016 - 12:29 pm | पथिक
सुंदर ओळी ...
21 Jun 2017 - 12:27 pm | सच६४८६
अब हिचकियाँ आती हैं तो पानी पी लेते है...
ये वहम छोड़ दिया है की कोई हमे याद करता है...!
>>>
खूपच भारी लिहिलंय