आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.
प्रतिक्रिया
22 Sep 2016 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा
@ मी ज्या ज्या वास्तुशांतीच्या पूजनात सहभागी होतो (यजमान म्हणून, पुरोहित म्हणून नाही) त्या त्या सर्व समारंभात गुलाल घातलेला भात, उडीद वडे असले प्रकार नव्हते. ››› तुम्ही नीट पाहिलेलं नाही. किंवा थापा मारत आहात. वास्तुशांतीत क्षेत्रपाल बळीपूजा नाही , असं होऊच शकत नाही. किंवा ज्या पुरोहितानी वास्तुशांत केली तो अद्न्यानी असेल. पण हे शक्य नाही. नुसते सत्यनारायणसम्राटएजंटठेकेदार पुरोहित सुद्धा वास्तुशांत चालवायला 'सर्व विधी येणारा' पुरोहित बरोबर आणतात. व सर्व करवतात. किंवा स्वत: तेव्हढा तसा show उभा करतात. ज्यात बलिपूजा असतेच.
असो..
पुराव्यादाखल हा वास्तुशांतीतला बळीपूजेचा क्षेत्रपालाचा मुखवटा पहा.. (हा कोण वाटतो? नर की वानर? )

हा अजून एक पहा.

अता आज जिथे महालय श्राद्धाला मी जाणारे तिथला भोजन पात्राचा फोटो इथे टाकतो..
आणी पुढे किंवा जुना एखादा असला तर नवरात्रातल्या कूष्मांड बळी कोहोळ्याचा फोटो टाकतो..
मग बघू तुम्ही काय म्हणता?
======
@ श्राद्ध किंवा तेराव्या/चौदाव्याचा जेवणात वडे होतेच, पण इतरही अनेक पदार्थ होते आणि त्याचा मांसाशी संबंध आहे असे कोणीही सांगितलेले नाही. ››› ते बहुतांश पुरोहितांना माहितंही नसतं. तर ते तुम्हाला काय डोंबलं सांगणार? मी विरोधी मतांचा अभ्यास केला म्हणून मला माहित झालं.
@एक वास्तुशांत पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व वेदाभ्यासाचा अभ्यास असलेल्या पुण्यातील एका नामवंत पुरोहित घराण्यातील पुरोहितांनी केली होती. यातील एका पुरोहितांनी नंतर वेदाभ्यास पूर्ण करून काशीतून 'दशग्रंथी' हा सन्मान प्राप्त केला. ››› या सो कॉल्ड उच्चशिक्षित पुरोहितांबद्दल तर बोलूच नका. अगदी अपवाद सोडले, तर कथीत उच्चशिक्षणाच्या मुखवट्याचा वापर करून धंदेबाजी करण्यापलिकडे हे दशग्रंथी टनाटनी घनपाठी काहिही करत नाहीत.. हेच पहात आलोय. त्यातले जे नम्र आणी विनयशील आहेत ते अश्या गोष्टी सांगायच्या कक्षेतही येत नाहीत. आणी हे सेलिब्रिटी पुरोहितही त्यांना बरोबर नेलं तरी झाडूसारखे कोपय्रातच ठेवतात.. हे ही पाहिलेलं आहे. शिवाय या सॅलिब्रिटी दशग्रंथींनाही हे सगळं माहित असतं.. पण ते अॉन ड्यूटी \अॉफ ड्यूटिही कधी काही बोलत नाहित. उलट "बलीपूजा मंजे केवळ द्रुष्ट काढण्यासारखं" असं मुद्दाम दडपून चानचान अर्थ सांगतात.
@अजून एक वास्तुशांत दोन महिला पुरोहितांनी केली होती. त्यातही असले पदार्थ नव्हते. इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› तुमची द्रुष्टीच महान आहे मग! शिवाय तुम्ही श्राद्ध भोजनातले पदार्थ बळीपूजा या विषयात कसे शिताफिनी मिसळताय . ही पण तुमची विशेष द्रुष्टीच असावी. असो.
@इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› त्यांच्याही नावानी थापा का? उत्तम!
@घरी सत्यनारायणासाठी, सोळा सोमवारच्या व्रतासाठी, ग्रहयज्ञासाठी वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आलेल्या पुरोहितांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही चुकीची समजूत असल्याचे सांगितले आहे. ››› सत्यनारायणात बळीपूजा असते, असं इथे कोण म्हणालं हो? मग हा खुला सा का करत आहात?
सोळा सोमवारच्या व्रत व कोणत्याही व्रतात (म्हणजे त्या व्रताच्या उद्यापनाच्या होमाच्या विधीत). व ग्रहयद्न्यात बळीपूजा नसतेच. त्यामुऴे हा खुला सा तुमच्यासाठी निरूपयोगी आहे. असो.
शिवाय जे पुरोहित 'ही चुकीची समजूत आहे' असं सांगतात, त्यांना का हि ही माहित नाही. किंवा ते 'तिथे' सांगू शकत नाहित .. हेच खरं आहे.
22 Sep 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी
ही असली भयानक व हिडीस सजावट मी स्वतःच्या घरच्या वास्तुशांतीच्या पूजेत पाहिली नाही किंवा इतरांच्या वास्तुशांतीतही पाहिली नाही. वास्तुशांत हा आनंदाचा सोहळा असतो. स्वत:च्या नवीन घरात रहायला जाण्याचा आनंद, त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेले नातेवाईक व मित्रमंडळीं, पूजेच्या निमित्ताने व मंत्रपठणाने निर्माण झालेले पवित्र वातावरण अशा सोहळ्यात असली सजावट बघून कसं तरीच वाटलं. असले हिडीस प्रकार आम्ही केले नाहीत किंवा आमच्या पाहण्यात नाहीत.
मी ज्या दशग्रंथी विद्वान पुरोहितांबद्दल लिहिलंय त्यांनी अनेक वर्षे वेदांचा अभ्यास करून वाराणशी येथून हा पुरस्कार मिळविलेला आहे. त्यांचे घराणे अनेक पिढ्या पौरोहित्य करीत आहे. असे अभ्यासू विद्वान वेदांचा जो अर्थ सांगतात किंवा परंपरांच्या मागची विचारसरणी सांगतात ती अनेक वर्षांच्या अभ्यासातून आलेली असते आणि मी अशांच्या सांगणावरच विश्वास ठेवतो. अन्यथा सत्यनारायण, वास्तुशांत, श्राद्धाच्या पूजा सांगणारे कुडमुडे, पोटार्थी भटजी पैशाला पासरी सापडतील.
ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने अनेक स्त्रीपुरूषांना पौरोहित्य या विषयाचे शिक्षण दिले आहे. ज्ञानप्रबोधिनीचे प्रशिक्षित पुरोहित/पुरोहिता सत्यनारायण, वास्तुशांतीपासून श्राद्ध, दहावा/तेरावा/चौदावा अशासारख्या सर्व विधींचे पौरोहित्य करता व ते करताना सर्व विधींचा अर्थ व त्यामागची कारणमीमांसा उलगडून सांगतात. गतवर्षी माझी सख्खी मेव्हणी अचानक कर्करोगाने गेल्यावर ज्ञानप्रबोधिनीच्या एका प्रशिक्षित गुरूजींकडून पुढील विधी करून घेतले. पिंड, कावळा पिंडाला शिवणे, गुलाल घातलेला भात, वडे इ. विचित्र प्रकार न करता त्यांनी सर्व विधी व्यवस्थित करून घेतले व त्यामुळे ते करताना कोणतीही घृणा वाटली नाही.
आम्ही अशांनाच खरे व ज्ञानी पुरोहित मानतो.
22 Sep 2016 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा
@ही असली भयानक व हिडीस सजावट मी स्वतःच्या घरच्या वास्तुशांतीच्या पूजेत पाहिली नाही किंवा इतरांच्या वास्तुशांतीतही पाहिली नाही. ››› हे केवळ भितीदायक आहे. भयानक आणी खास करून हिडीस हा तुमच्या कथीत सू धारीत द्रुष्टीचा दोष आहे.
आता बाकिच्या प्रतिसादावर काहिही बोलायला नको. तुम्ही कसं सगळं चानचानच बघायचं ठरवून ठेवलेलं आहे. आणी तुमचं मन टनाटनी धर्म मुळातच चांगला आहे.. बाकिच्यांनी तो बिघडवला.. असली भूमीका घेऊन बसलेलं आहे. आंम्ही लोक धर्मात निरुपद्रवी बरी वाईट मूल्य असतात.. कारण शेवटी तो माणसांनीच तयार केलेला प्रकार आहे.. असं तसच असल्यामुळे तसं मानतो.
तरीही तुम्हाला ब्रम्हकर्म या कर्मकांडाच्या पोथीतल्या वास्तुशांती प्रयोगाच्या पानांचे प्रींट औट काढून इथे दाखवतो. ज्यात या बलीदानाचा विधी व संस्क्रुत मंत्र आहेत. ते इथे टाकतो, ज्याचा इथे कोणिही संस्कृत भाषा द्न्याता अर्थ सांगू शकेल. व केवळ मी म्हणतो , म्हणून हे असं आहे.. असं कुणाला वाटणार नाही. शिवाय तुमचे कोण ते येव्हढे महाविद्वान गुरुजी ज्यांनी सदर विधीच तुमच्याकडे टाळला.. तो का? याची कारण मिमांसा त्यांना विचारून इथे स्पष्ट करतो.. संदेशातून नंबर द्या त्यांचा.
आहे तयारी?
अता या ज्ञानप्रबोधिनीतल्या कथीत नवपुरोहितांविषयी- हे लोक जे विधी करतात.. ते मूळ जुनेच विधी त्याच विषमतावादी मूल्यांसह फक्त छान छान माहिती देत.. मराठीत काही मंत्र रुपांतरित करून विधी करतात. ज्याचा प्र-बोधनाशी का हि ही संबंध नाही. फक्त तथाकथीत नवसुशिक्षीत वर्गाला कर्मकांडातल्या ज्या गोष्टी बोजड अवजड नकोश्या वेळखाऊ खर्चीक वाटत होत्या त्या यांनी आवश्यक तश्या उडवून , अल्टर करून जरा नव्या मार्केटला सधन व कथीत मॉड वर्गाला विचारात घेऊन चानचान हव्याश्या वाटतील अश्या तैय्यार केलेल्या आहेत.. म्हणजे ते ही विकतात वडापावच.. फक्त त्याला विकताना ब्रेडवडा म्हणतात. खॉलरेस्टॉल वग्रे शब्द उच्चारतात. पण त्यातला टनाटनीपणा काढून आधुनिकता समता वगैरे आणत नाहीत. थोडक्यात जुनं प्रॉडक्ट नव्या सुसह्य रूपात ते विकत आहेत. हे आधुनिक वग्रे असते, तर विवाहविधीतले कन्या-दानासारखे टनाटनी विधी काढून त्या जागी नवमूल्यवादी समतेचा पुरस्कार करणारे विधी त्यांनी आणले असते. पण ते होणे नाही.
कारण मुळात जे जे टनाटनी
त्यांच्या कशी यावी आधुनिकता मनी?
...
असो.
22 Sep 2016 - 5:31 pm | संदीप डांगे
कडक!!! _/\_ _/\_
22 Sep 2016 - 7:19 pm | आजानुकर्ण
मस्त! मस्त!! मस्त!!!
22 Sep 2016 - 8:14 pm | श्रीगुरुजी
अपेक्षित प्रतिसाद! अशा प्रतिसादाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.
जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला तुमचा विरोध समजू शकतो.
सुदैवाने कर्मठांच्या विरोधाला न जुमानता हिंदू धर्म सुधारणा स्वीकारत राहिलेला आहे. जानवे परीधान करणे, शौचाला जाताना जानवे कानावर लावणे, दर वर्षी श्रावणात श्रावणी करून नवीन जानवे परीधान करणे, काही विशिष्ट प्रसंगी जानवे डाव्या खांद्यावरून न घालता उजव्या खांद्यावरून घालणे, आईवडील गेल्यानंतर क्षौर करणे, कावळा, पिंड . . . हे व अशासारखे असंख्य निरर्थक प्रकार कमी होत आहेत व ते कालांतराने पूर्णपणे नष्ट होणार आहेत. वास्तूशांतीची पूजा, श्राद्धाचा विधी, दहनापूर्वीचे व नंतरच्या दिवसातले विधी यातील निरर्थक आणि हिडीस प्रकार नष्ट होणारच. कर्मठ, कुडमुड्या भटजींनी कितीही विरोध केला आणि हे करणार्यांना कितीही नावे ठेवली तरी हे होणारच आहे.
22 Sep 2016 - 9:09 pm | आजानुकर्ण
मात्र कर्मठ प्रकाराला विरोध करणाऱ्यांना कायम नावे ठेवण्यात हिंदुत्त्ववादी नेहमीच पुढे राहिले आहेत. आता या धाग्यावरही तेच चाललंय.
23 Sep 2016 - 12:05 am | श्रीगुरुजी
हमीद दाभोलकर खरेखुरे हिंदुत्ववादी असणार कारण ईदला खरी बकरी कापण्याऐवजी मातीची बकरी कापण्याच्या सूचनेला प्रोत्साहन न देता त्यांनी ईदला बकरी कापण्यामागचा भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला आहे.
त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी समजणारे निधर्मी दिसतात कारण ते बुरखा, तोंडी तलाक, ईदला बकरी कापणे असल्या प्रकारांना विरोध करतात.
23 Sep 2016 - 12:15 am | आजानुकर्ण
गुरुजी
ईदला बकरी कापण्याची प्रथा हिंदूंमध्ये आहे आणि त्यामुळे हमीद दाभोलकर त्याला विरोध करताहेत ही नवीन माहिती तुमच्या प्रतिसादातून मिळाली. असेच ज्ञानकण आम्हा विद्यार्थ्यांना द्या.
इथल्या अनेक प्रतिसादात देवीला नवसाला बकरी कापणे वगैरे प्रथांना अंनिसने विरोध केला म्हणून ते दांभिक असल्याची आवई उठलीच आहे. इतरत्रही अंनिसच्या कामाबाबत 'आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणार' वगैरे भूमिका घेणारे लोक कोण आहेत ब्रे?
23 Sep 2016 - 12:28 am | श्रीगुरुजी
अच्छा, म्हणजे हिंदूसुद्धा ईद किंवा दिवाळीला बकरा कापत असले तर हे विरोध करणार, हिंदूंमध्ये अंधश्रद्धा असली तर दाभोलकर विरोध करणार, पण मुस्लिमातील अंधश्रद्धेला विरोध न करता त्यामागाचा भावार्थ समजून घ्या असे सल्ले देणार. वा!
अंनिस धर्म, जात वगैरे मानत/पाळत नाही असे ऐकून होतो. पण इथे अंधश्रद्धा बघताना आधी धर्म बघून त्यानुसार विरोध करायचा का भावार्थ शोधायचा असं सिलेक्टिव्ह अंधश्रद्धानिर्मूलन चालललं दिसतंय.
23 Sep 2016 - 12:36 am | आजानुकर्ण
हीच ती वृत्ती.
23 Sep 2016 - 2:29 pm | श्रीगुरुजी
तसं नाही ते. हिंदू व मुस्लिम दोघेही एकच कृती करतात. पण हिंदूंचा तो उकिरडा आणि मुस्लिमांचं ते पवित्र, निर्मळ देवस्थान अशी विसंगती दिसते. दोघांनाही विरोध करायला हवा. धर्मावर आधारीत सिलेक्टिव्ह पाठिंबा व सिलेक्टिव्ह विरोध नसावा. ज्या हिंदूंच्या कृतीला अंधश्रद्धा म्हणून विरोध केला जातो त्याच मुस्लिमांच्या कृतीला विरोध न करता त्यातील भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला जातो. एकतर दोघांनाही अंधश्रद्धा म्हणून विरोध करा किंवा दोघांच्याही कृतीमागील भावार्थ समजून घ्यायचा सल्ला द्या.
23 Sep 2016 - 2:44 pm | अनिरुद्ध.वैद्य
जराशी गल्लत. विरोध अंनिस मुसलमान मंडळींचे संबोधन का करत नाही ह्याला नहिये.
बळी देणं हे सगळीकडे सारखंच. पण जेव्हा कोणी हिंदुंनी बळी दिला की अंधस्रद्धा अन मुसलमानांनी बळी दिला तर धार्मिक भावना समजुन घ्या असे अंनिसचे पदाधिकारी सांगतात, तेव्हा त्यास विरोध चाललाय.
तुम्हास मुसलमानांचे प्रबोधन वगरे नसेल करायचे, त्यांचे उकिरडे साफ करायचे नाहियेत सगळ मान्यय हो. पण फक्त त्यांनी तिकडच्यांच्या उकिरड्यास उकिरडा म्हणावे, बगिचा म्हणु नये येवढीच अपेक्षा. जर ते नाहि, तिकडे बगिचाच आहे म्हणत असतील, तर आम्ही त्यांना दुटप्पी म्हणु.
23 Sep 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी
एक्झॅक्टली!
24 Sep 2016 - 12:42 am | आजानुकर्ण
अनिरुद्ध साहेब हिंदूंच्या अनेक सणांना घरी कोंबडे, बोकड वगैरे कापून मांसाचा नैवेद्य असतो. याला अंनिसने कधी विरोध केला आहे? गटारी अमावास्येला अंनिसने विरोध केलाय का? ज्या गोष्टींना विरोध केलाय त्या अंधश्रद्धाच आहेत. नवस म्हणून बळी देण्याची जी प्रथा आहे ती अंधश्रद्धा आहे. भगत बोलावणे आणि त्यासाठी कोंबडी कापणे ही अंधश्रद्धा आहे. बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही. मुसलमानांमध्ये जो उकीरडा आहे (तलाक पद्धत वगैरे) यावर मुसलमानातलेच दलवाई वगैरे सुधारक काम करतच आहेत की. पण हिंदूंचा आक्षेप आमचं घाणीतलं लोळणं आधी का बंद करता यावरच कायम का असतो. उलट हिंदूंची घाण साफ करण्याचं काम प्रायॉरिटीनं होतंय म्हटल्यावर हिंदूंनी अंनिसप्रती कृतज्ञ राहायला हवं.
24 Sep 2016 - 8:26 am | अनिरुद्ध.वैद्य
फरक नाही वाटत तुम्हाला तर विषय आटोपता घेतो माझ्याकडून.
तुम्ही तुमचे गुणगान करत रहा!
पण आता आम्हाला त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन प्रोजेक्ट्सबाबत कायमच संशय राहणार!
24 Sep 2016 - 2:45 pm | श्रीगुरुजी
गैरसमज आहे. प्राणी कापण्यासाठी फक्त नवसच असला पाहिजे असं नसतं. भूतकाळात कोणी एका मुस्लिमाने अल्लाच्या मागणीवरून मुलाचा बळी दिल्यावर अल्लाच्या आशिर्वादाने मुलाच्या जागी बकरी दिसली अशी कथा आहे. त्यामुळे मुस्लिम अल्लासाठी बकरी कापतात व कापताना कुराण किंवा इतर कोणत्यातरी धर्मग्रंथातील श्लोक वगैरे तोंडाने पुटपुटत असतात जेणेकरून कापण्याचे पाप लागणार नाही (हे एका मुस्लिमाकडून ऐकले आहे. नक्की काय श्लोक वगैरे पुटपुटतात याची कल्पना नाही). ईदला बकरी कापणे हे पूर्णपणे धार्मिक कृत्यच आहे व ते धार्मिक समजुतींवरच आधारीत आहे. या कृत्यात व हिंदूच्या नवसाचे कोंबडे कापण्यात फरक वाटत असेल तर मग बोलणंच खुंटलं.
25 Sep 2016 - 10:42 am | प्रदीप
मुसलमानांमध्ये जो उकीरडा आहे (तलाक पद्धत वगैरे) यावर मुसलमानातलेच दलवाई वगैरे सुधारक काम करतच आहेत की. कुठल्या दलवाईंच्या कार्याबद्दल वर्तमानात बोलत आहात आपण?
हमीद दलवाईंना जाऊन २५+ वर्षे लोटली आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नि मेहरून्निसा दलवाईंनी ते कार्य पुढे सुरू ठेवण्याचा नेटाने प्रयत्न केला, पण त्या समाजातील प्रमुखांच्या रेट्यासमोर त्यांचे काही चालले नाही. परिणामी त्यांना ते प्रयत्न थांबवावे लागले.
आता प्रकाश घाटपांड्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम सत्यशोधक मंडळीचे कार्य पुन्हा: सुरू झाले आहे, असे दिसते. आणि त्यांनीच एका प्रतिसादात अंनिसही त्यात सहभागी आहे असे म्हटले आहे. ही नक्कीच स्त्युत्य बाब आहे.
बाकी, धाग्याच्या मूळ विषयावरील (हमीद दाभोळकरांचे वक्तव्य) तुमचे काय मत आहे, हे निसःदिग्ध शब्दांत येथे सांगाल काय?
25 Sep 2016 - 10:44 am | प्रदीप
आजानुकर्णांना उद्देशूनन होता, तो चुकीच्या ठिकाणी पडला आहे.
25 Sep 2016 - 11:07 am | अमितदादा
ती धार्मिक कारणासाठीच कापली जाते ना. एक परंपरा किंवा धार्मिक रीतिरिवाज अपेक्षित आहेत ना यातून, मग ती हिंदू धर्मातील बळी (नवस करू अथवा न करू) यापासून वेगळी कशी?
22 Sep 2016 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा
@ जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला "तुमचा विरोध" समजू शकतो. ---माझा विरोध??? मी या गोष्टी काढून टाकायला कधी विरोध केला? दाखवा बरं? लाज नाही का वाटत कपटी पणानी असले खोटारडे आरोप करायला? उलट मीच या गोष्टी काढून टाकायला लोकांना प्रव्रुत्त करणारा धर्मसुधारणावादी पुरोहित आहे... हे यापुढे नीट लक्षात ठेवा. असला बिनडोकपणे आरोप करण्याआधी.
@वास्तूशांतीची पूजा, श्राद्धाचा विधी, दहनापूर्वीचे व नंतरच्या दिवसातले विधी यातील निरर्थक आणि हिडीस प्रकार नष्ट होणारच. कर्मठ, कुडमुड्या भटजींनी कितीही विरोध केला आणि हे करणार्यांना कितीही नावे ठेवली तरी हे होणारच आहे. ››› अगदी बरोबर आहे.. आम्हीच आहोत ते. हे असले विधी यजमान इच्छेने उडवून धर्म सुधारणा करणारे. फक्त त्याचा व्यापक प्रसार तेंव्हाच नीट होईल. जेंव्हा तुमच्यासारखे दांभीक "मूळ धर्म चानचान आहे, रूढी परंपरांमुळे तो घाण झालाय" असं बोलायचं बंद होतील. आणी रूढी परंपरांच्या अंगावर सगऴे दोष ढकलून त्यांना शिव्या देऊन स्वत:ला आणी स्वत:च्या धर्माला हायली सोफेस्टिकेटेड वैगेरे समजायचे बंद होतील.
23 Sep 2016 - 12:07 am | श्रीगुरुजी
तुम्ही मागच्या पानावर जे २ फोटो टाकले ते तुम्ही सांगितलेल्या पूजेचे का अजून दुसर्या कोणत्यातरी भटजीबुवांनी सांगितलेल्या पूजेचे?
23 Sep 2016 - 7:44 am | अत्रुप्त आत्मा
ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे ? याला काही एक विशेष महत्व नाही . अनेक(पुरोहित)जण असल्या अनेक पुजांचे विविध फोटो अं. जा. वर टाकत असतात. भाताचा बळी कोणी मुखवटा करून करतात. कुणी नुसताच ढीग रचून त्यावर दिवा उदबत्ती ठेवतात. कुणी ढीग रचून कडेनी भाताचे ८, १० मुटके ठेवतात. तो कसा केला याला महत्व नाही. तो विधीत आहे!. . हे महत्त्वाच आहे. त्याबद्दल चं आव्हान स्विकारा. त्याच फोटो टाकलेल्या कमेंट मधे दिलेलं.
नुसता निर्रथक आत्मकुंथकपणा करू नका.
23 Sep 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी
महत्त्व आहे ना. स्वतःला धर्मसुधारक पुरोहित म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच असली पूजा करतात किंवा असल्या पूजेचे समर्थन करतात आणि असले विधी महत्त्वाचे समजतात तेव्हा नक्कीच गडबड दिसते.
23 Sep 2016 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा
@महत्त्व आहे ना. स्वतःला धर्मसुधारक पुरोहित म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच असली पूजा करतात किंवा असल्या पूजेचे समर्थन करतात. आणि असले विधी महत्त्वाचे समजतात तेव्हा नक्कीच गडबड दिसते. ››› ››› मी समर्थन केलय का ? ते विधी महत्त्वाचे आहेत असं म्हणलोय का? दाखव कुठे म्हणलोय? का परत परत मुद्दाम न केलेल्या गोष्टी माझ्यावर फेकता बरं? लाज नै का वाटत हेत्वारोप करताना? कपटी टनाटनी कुठचा.
आणी हे लक्षात घे .. की धर्म सुधारणा हि जो यजमान तो धर्म वापरतो.. तो अशी सुधारणा त्याला त्याच्यात करवून हवी की नाही? याचा कल पाहून करवायची असते. हे बळजबरीनी करायला कै ती तुमची कपटी टनाटनी मुळची धर्म व्यवस्था नव्हे. जे बदलू इच्छितात.. त्यांच्याकडे आंम्ही हे बदलतो. जे नको म्हणतात.. त्यांना जमेल तसे बदलाचे विनम्र आवाहन करून विषय सोडून देतो. सुधारणेचा दांडा घेऊन तुमच्यासारखे सगऴ्यांच्या पाठी 'सुटत' नाही.
22 Sep 2016 - 10:06 pm | अनिरुद्ध.वैद्य
__/\__
23 Sep 2016 - 2:06 pm | अप्पा जोगळेकर
तुस्सी ग्रेट हो
23 Sep 2016 - 7:56 am | साहना
> ही असली भयानक व हिडीस सजावट
मागच्या वेळी तुम्ही मुस्लिम, ख्रिस्ती म्हणजे हिंदूच असे मूर्खपणाचे विधान केले होते आता ह्या शुद्ध १००% हिंदू सजावटीस हिडीस ????? बहुतेक मंदिरात, किंवा आमच्या घरी गणेश चतुर्थी मध्ये गणपतीच्या मागे कीर्ती मुख लावलेले असते ( वर चित्रांत दाखवल्या प्रमाणे) ते हिडीस ? आमच्या ग्राम देवतेच्या संपूर्ण मंदिरांत ठीक ठिकाणी ह्या प्रकारच्या दैत्यांचा चेहेरा सजावटी साठी (किमान १०० वर्षे जुने) लावलेला असतो. तो हिडीस ?
दैत्य किंवा असुरी रूपांचा समावेश आमच्या अनेक प्रथांत, लोककलां मध्ये, पेहेरावा मध्ये आणि विशेषतः दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या जीवनात असतो ते सगळे हिडीस का ?
आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ?
23 Sep 2016 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा
@आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ? ››› ते तसं नाहिय्ये फक्त. आधुनिक विद्यांचे शिक्षण मिळायला लागल्यानंतर एक कथीत नवसुशिक्षित वर्ग भारतात तयार झाला. जो- कुणी घराबाहेर लाल कापडात बांधलेला नारऴ, कोहोळा, काळी बाहुली (उलटी टांगलेली. ) दिसली की त्याला घाण, हिडीस, अंध:श्रद्ध वगैरे म्हणतो. आणी स्वत:च्या घराबाहेर गणपतीचित्र , पिरॅमिड, फेंगशुई, तोरण इत्यादी लाऊन स्वत:ला सूधारीत म्हणवतो. हे महाशय त्यातलेच आहेत. विंग्रजी आमदानीत हे "सुरू" झालेले आहेत.. "रूढी परंपरांमुळे धर्म घाण, पण मुळात तो चानचान! " असं म्हणणारे. नव सू शिक्षित अट्टल टनाटनी!
23 Sep 2016 - 2:34 pm | श्रीगुरुजी
तो मी नाही. मी असले विधान आजतगायत कधीही केलेले नाही. विश्वास बसत नसल्यास असले विधान केलेले माझे प्रतिसाद दाखवा.
ते फोटो पुन्हा एकदा बघा. मुलाबाळांना, इतरांना दाखवा आणि बघा ते काय म्हणतात ते.
22 Sep 2016 - 3:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
>> हेच म्हणतोय मी. बळी पुजा.
तर वर गुर्जी म्हणाले की त्यांच्याकडं केली नाही म्हणे ही.
23 Sep 2016 - 12:13 am | श्रीगुरुजी
खरंच नव्हती केली.
23 Sep 2016 - 7:47 am | अत्रुप्त आत्मा
म्हणूनच तर म्हणतोय. द्या तुमच्या गुरुजिंचा नंबर. बघू दे विचारून एकदा.. नक्की कसल्या व कोणत्या कारणानं हे टाळलं त्यांनी?
23 Sep 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी
टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं.
बादवे, मालतीबाई जोशी नावाच्या रीतसर पौरोहित्याचे प्रशिक्षण घेतलेल्या एका महिलेने व त्यांच्याबरोबर अजून एका प्रशिक्षित महिलेने (या बाईंचं नाव विसरलो) आमच्या घरी व्यवस्थित वास्तुशांत केली होती. त्यांनी अगदी शांतपणे सुंदर पूजा सांगितली होती. असले विधी केलेले नव्हते. त्यांचा क्रमांक माझ्याकडे नाही. आता त्या असतील का नाही याची कल्पना नाही कारण वास्तुशांतीच्या वेळीच त्यांचे वय ६५ च्या पुढे होते. भिकारदास मारूती मंदीर किंवा नव्या विष्णुच्या देवळात जमणार्या पुरोहितांकडून तुम्हाला त्यांचा क्रमांक मिळू शकेल.
23 Sep 2016 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
@ टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं.››› वाटतं . आणी करतोही. फक्त ते का टाऴले? त्यांना का वाटलं टाळावसं? आमच्या सारखी धर्मदोष दूर करण्याची भूमीका की आणखी काही? (जे असतं तसं बरच काही. ) ते कळायला हवं. एव्हढं नामांकीत घराणं आहे ना? द्या की नंबर त्यांचा. कशाला भिता एव्हढे?
आणी महिला पुरोहितांचं सांगू नका. उगीच इकडची तिकडे फिरवाफिरवी. तुम्ही सदर घटने संबंधात ज्या दशग्रंथी पुरोहित घराण्यातल्यांचा उल्लेख केलाय.. त्यांच्याबद्दल बोला. त्यांच नाव सांगितलत संदेशातून.. तरिही ऒळखेन मी .
23 Sep 2016 - 5:20 pm | अभ्या..
गुर्जींच्या धंद्यात कॉम्पीटिशन टफ हाय राव.
इतकं करुन कामे मिळवून पार पाडणे म्हणजे हे साधे सोपे काम नाही. ;)
23 Sep 2016 - 10:45 pm | श्रीगुरुजी
एव्हाना हे दशग्रंथी पुरोहीत कोण ते लक्षात यायला हवं होतं. पुण्यात पिढीजात पुरोहितकृत्य करणारी किती घराणी आहेत आणि त्यांच्यापैकी कितीजणांनी अध्ययन करून दशग्रंथी हा पुरस्कार वाराणशीतून मिळविला आहे हे लक्षात घेतलं तर मी कोणाबद्दल बोलतोय ते सहज लक्षात येईल. इतर कोणाकडून माहिती हवी असेल तर मामा थत्ते यांनी प्रशिक्षित केलेल्या अनेक महिला पुरोहितांना विचारा किंवा ज्ञानप्रबोधिनीने प्रशिक्षित केलेल्या पुरोहितांना विचारा. वास्तुशांत, श्राद्ध इ. विधीतील कोणकोणते अनावश्यक भाग ते करीत नाही याची माहिती मिळेल. अर्थात महिला पुरोहित किंवा ज्ञानप्रोबिधिनीचे पुरोहित म्हणजे फिरवाफिरवी असा समज असेल तर माझा नाईलाजा आहे. जेव्हा जेव्हा धर्म, रुढी, परंपरा इ. मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तेव्हा तत्कालीन कर्मठांनी त्यांची हेटाळणी केली होती असा इतिहास आहे.
23 Sep 2016 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
लै आहेत तसे टनाटनी दशग्रंथी.
पण
स्वत:च्या तोंडानी नाहीच्च सांगणार नाव तुम्ही.
सांगा की. लय भिता राव!
मी मागे म्हणलेलोच होतो की टनाटनी भ्याड असतात. आव्हान न स्विकारता पळ काढणारे असतात. पुन: प्रत्यय आला आज.
23 Sep 2016 - 11:27 pm | श्रीगुरुजी
इतके क्ल्यू दिले की. अजून नाही का लक्षात आलं?
पुरोहितात सुद्धा अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक इ. गट पडलेले दिसतात. अॅलोपॅथीवाले काही जण होमिओपॅथीवाल्यांना भोंदू डॉकटर म्हणतात व ते औषध वगैरे न देता नुसत्या साखरेच्या गोळ्या देतात असा आरोप करतात. काही होमिओपॅथीवाले आम्ही रोग मुळापासून नष्ट करतो व इतर पॅथीवाले फक्त वरवरची औषधे देऊन रोग दाबून ठेवतात असे सांगतात. काही आयुर्वेदिकवाले वेदांपासून सुरू असलेली आमचीच उपचारपद्धती श्रेष्ठ असा दावा करतात. पुरोहितात सुद्धा कर्मठ पुरोहित आम्हीच तेवढे खरे व काळानुसार योग्य ते बदल करून सुधारीत स्वरूपात पूजा सांगणारे फिरवाफिरवी करतात असे सांगतात. चालायचंच.
24 Sep 2016 - 12:02 am | शलभ
तुम्ही नाव घ्यायला का लाजताय एवढे..
24 Sep 2016 - 10:09 am | विशुमित
<<<<<<<<तुम्ही नाव घ्यायला का लाजताय एवढे..>>>>>>>>
हे वाक्य लिहताना तुमच्या चेहऱ्यावर कसले भाव असतील, ह्याची कल्पना करून मनामध्ये "ठो" हसलो.
24 Sep 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी
टणटण भटजीबुवांना मी २-३ रेफरन्स दिले आहेत. त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यायची इच्छा नाही. ते फिरवाफिरवी करतात असे त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे. काय फायदा नाव देऊन? ते शेवटी टणटणाट करून त्यांची अक्कलच काढणार. आपणच फक्त सर्वज्ञानी आणि इतर सर्वजण फिरवाफिरवी करणारे अशी समजूत असल्यावर असेच होणार.
24 Sep 2016 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन!
कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते.
त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...!
24 Sep 2016 - 11:06 pm | श्रीगुरुजी
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
24 Sep 2016 - 11:07 pm | अभ्या..
बुवा, असे का करायलात तुम्ही?
एनी प्रॉब्लेम?
24 Sep 2016 - 6:20 am | अत्रुप्त आत्मा
अत्यंत अपेक्षित आत्मकुंथन!
भेकड... भ्याड... टनाटनी! असो..!
24 Sep 2016 - 2:49 pm | श्रीगुरुजी
सगळेच मुद्दे संपले. आता फक्त कुंथन आणि टणटणाटच शिल्लक आहे. हे अपेक्षितच होतं. चालू द्यात. आम्ही एंजॉय करीत आहोत.
24 Sep 2016 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन!
कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते.
त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...!
24 Sep 2016 - 11:06 pm | श्रीगुरुजी
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
23 Sep 2016 - 2:47 pm | बाळ सप्रे
एक अवांतर प्रश्न-
हे फोटो ज्यांना हिडीस वाटताहेत त्यांना बर्याचशा देवदेवतांचे याच्याशी साधर्म्य असणारे फोटो/मुखवटे/मूर्ती हिडिस भयंकर वाटतात का?
21 Sep 2016 - 12:46 am | साहना
आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. त्यांचे विधान कदाचित खोटे असेल पण आपला नक्की तर्क काय आहे हे समजत नाही. कोहळा म्हणजे माणूस असे आत्मबंद ह्यांना वाटून घरी कोहळा आणला असता त्याला खुर्चीवर बसवून ते चहा पाणी विचारतील असे वाटत नाही.
प्रतीकात्मक नरबळी साठी कोहळा फोडताना मी स्वतःच्या नजरेने पहिले आहे. पूजा वेताळ सारख्या जुन्या देवाची होती.
21 Sep 2016 - 12:51 am | ईश्वरसर्वसाक्षी
कोहळा म्हणजे काय?
खरच माहित नाहिय म्हणुन विचारतोय.
21 Sep 2016 - 8:23 am | संदीप डांगे
भोपळा..
21 Sep 2016 - 8:27 am | प्रचेतस
तांबडा भोपळा टू बी स्पेसिफिक.
21 Sep 2016 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा
हा घ्या कोहोळा.
फोटू- अं जा साभार.
21 Sep 2016 - 8:57 am | संदीप डांगे
येईच! धन्स!
21 Sep 2016 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोहळा (Benincasa hispida) वेगळा
आणि
तांबडा भोपळा (Cucurbita) वेगळा.
21 Sep 2016 - 11:34 pm | प्रचेतस
मला कोहळा म्हणजे तांबडा भोपळाच वाटायचं.
22 Sep 2016 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोहळ्याचे वडे भारी लागतात ! :)
22 Sep 2016 - 9:29 pm | प्रचेतस
=))
खाल्ले नाहित कधी.
22 Sep 2016 - 9:56 am | अभ्या..
ह्यापुढे हॉलोविनला हा लाल भोपळा भुताचे तोंड म्हनून वापरायचा नाही असा आदेश काढण्यास हरकत नाही.
.
अखिल हम्रिका, युरोप बिरोप टणाटणी मंडळ.
23 Sep 2016 - 2:12 pm | अप्पा जोगळेकर
ज्याच्यापासून पेठा बनवतात तो कोहळा. घारगे बनवतात तो भोपळा.
23 Sep 2016 - 2:42 pm | रुस्तम
http://www.misalpav.com/node/23562
21 Sep 2016 - 9:56 am | साहना
ash gourd
21 Sep 2016 - 12:23 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. ››› त्यांना ते समजलेलं आहे. किंबहुना माहितंही असतं असलं सगळं अश्यांना. पण मी वरती म्हटल्याप्रमाणे त्यांनी जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलेलं आहे. किंवा स्वखुषिनी अंधत्व पत्करलेलं आहे. त्यामुळे ते टनाटनीपणा करणार. सगळं सर्व बाजुनी नाकारत रहाणार.
म्हणूनच मी म्हटलं वरती. चालू द्या (आत्मकुंथक)टनाटनीपणा.
21 Sep 2016 - 1:07 pm | श्रीगुरुजी
ऐकीव समजूतीमागची माहिती देता येत नसल्याने आता प्रत्येक प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे. असो. हे अपेक्षितच आहे.
21 Sep 2016 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा
@ऐकीव समजूतीमागची माहिती ››› य्ये ब्बात! उद्या एखाद्या क्रिकेटरलाही तुम्ही सांगाल की "बॅटच्या जड वजनाचा स्ट्रोक बसण्याशी घनिष्ट संबंध असतो. " ही तुझी स्वानुभवाने आलेली माहीतीही ऐकीव आहे.
टनाटनीपणा तो हाच्च!
21 Sep 2016 - 1:03 pm | श्रीगुरुजी
कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे. सर्वात आधी घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले. त्याचा आधार विचारल्यावर एक विकिपिडियाची लिंक दिली त्यात काहीही स्पष्टीकरण नव्हते व नारळाचे इतर उपयोगच दिले होते.
एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?
21 Sep 2016 - 3:54 pm | प्रकाश घाटपांडे
मी नरबळी म्हटल नाही. नीट कॉमेट वाचा.http://misalpav.com/comment/881819#comment-881819
21 Sep 2016 - 4:02 pm | प्रचेतस
श्रीगुरूजी नरबळीविषयक विधाने जाणीवपूर्वक दुसऱ्यांच्या माथी मारत आहेत.
21 Sep 2016 - 5:22 pm | श्रीगुरुजी
Ok. Sorry. नारळाची शेंडी व नरबळीचा संबंध पूर्वी कानावर पडल्याने तेच प्रतिसादात आलं.
21 Sep 2016 - 5:24 pm | श्रीगुरुजी
हा प्रतिसाद घाटपांडे यांच्यासाठी सुद्धा आहे.
21 Sep 2016 - 6:27 pm | सुबोध खरे
मला शास्त्रार्थ वगैरे काही माहित नाही किंवा मी धर्मशास्त्र वाचलेलेही नाही
परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी हे अतिशयोक्त आहे असे वाटते.
आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी नवी मोटार किंवा मोटार सायकल विकत घेतली तेंव्हा त्याच्या समोर नारळ फोडला असेल.
एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नरबळी दिला जातो हे कोणत्याच संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात शक्य नाही.
मोठे धरण किंवा पूल बांधताना नरबळी द्यावा असे म्हणणारे मांत्रिक ऐकिवात आहेत. प्रत्यक्ष आजच्या काळात भारतात असे शक्य नाही. बाकी जारण मारण प्रक्रिया सारख्या थोतांडाबद्दल काय बोलावे.
21 Sep 2016 - 11:54 pm | श्रीगुरुजी
ही अतिशयोक्तीच आहे. नारळ म्हणजे माणसाचे मस्तक व नारळाची शेंडी म्हणजे मस्तकावरील शेंडी आणि नारळ फोडणे म्हणजे नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप अशा कहाण्या काहीजणांकडून ऐकल्या आहेत. त्यांनाही यामागचे लॉजिक माहित नव्हते. त्यांनीही अशाच कोणाकडून तरी हे ऐकले होते आणि या ऐकीव माहितीवर विचार न करता ते विश्वास ठेवत होते. जर नारळाची शेंडी म्हणजे माणसाची शेंडी मानली तर याचा अर्थ भूतकाळात शेंडीवाली माणसे म्हणजे ब्राह्मण बळी दिले जात होते असा अर्थ निघू शकतो. परंतु बळी महारांचा दिला जात असे असेही दावे वाचले आहेत. संत श्रीचोखामेळा यांना बळी दिले गेले असेही दावे वाचले आहेत. हे दोन्ही दावे एकत्र केले तर महार शेंडी ठेवत असत किंवा ब्राह्मणांना बळी दिले जात असे हे दोन वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील.
नारळ फोडण्याआधी नारळाला मध्यभागी गोलाकार पाणी लावले जाते. ते का लावले जाते याविषयीही कोणालाच माहिती नाही. याचाही संबंध कदाचित बळीशी जोडला जाईल. लिंबू उभे कापणे असेच अशुभ समजले जाते. एकंदरीत सगळाच गोंधळ आहे व अनेक ऐकीव गोष्टी पसरल्या आहेत.
22 Sep 2016 - 3:27 pm | अनिरुद्ध.वैद्य
हे बघा क्सले क्सली यज्ञ अन बळी देत होते त्याची सविस्तर माहिती:
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-04-39/2012-10-01-06-0...
ह्यात उल्लेख आहे बळी साठी ब्राह्म्ण वगैरे आणण्याचा अन इतरही. आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीत त्याला सोडुन दिले, पण इतर ठिकाणी देतही असतील!
23 Sep 2016 - 2:20 pm | अप्पा जोगळेकर
साहेब,
एकेकाळीच्या नर्/पशु बळींच्या प्रथा जैन बौद्ध काळात शाकाहारात रुपांतरित झाल्या यावर आक्षेप आहे की
इतके दिवस पूजेमध्ये, वास्तुशांतीत वगैरे जे नारळ फोडले त्यांना अचानक कोणी ब्रम्हहत्या म्हणू लागले म्हणून मनाला त्रास होतो आहे ?
आत्मबंध यांनी पुरावे दिल्यानंतर सुद्धा मान्य का करत नाही ?
23 Sep 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी
नर/पशु बळींच्या प्रथा शाकाहारात रूपांतरीत झाल्या असतील तर ती अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. मी शाकाहाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे व कोणत्याही प्रकारच्या हत्यांना माझा पूर्ण विरोध आहे.
नारळ फोडणे या प्रकाराला ब्रह्महत्या म्हणल्याने मनाला त्रासबिस होत नसून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर व्हावा अशी इच्छा आहे.
मूळ प्रतिसाद नारळ फोडणे म्हणजे बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप आहे अशी काहीजणांची असलेली गैरसमजूत यावर होता. नारळ फोडण्याला बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे या भ्रामक समजूतीच्या पुष्ट्यर्थ अजूनपर्यंत कोणीच पुरावे दिलेले नाहीत. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही फक्त ऐकीव माहिती असल्याचे सांगितले आहे.
22 Sep 2016 - 3:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
नारळ स्वस्त! पण पुण्य तेवढच! पुण्य लाभाव म्हणुन आता जिकंड तिकंड देत असतील नारळ बळी!
आता कुशावर्तावर स्नान केल्यावर सप्तगंगांच स्नान केल्याच पुण्य लाभत तर ह्याचही तसलंच लॉजीक असेल.
21 Sep 2016 - 10:20 pm | साहना
हे स्वमतीमंदत्व आहे असे आता मला सुद्धा वाटायला लागलेय. इतकेच म्हणू शकते

21 Sep 2016 - 10:45 pm | खटपट्या
थोडेसे अवांतर - माहीते असावी म्हणून विचारतो. गावी काही घरांत आडाला कोहळा बांधून ठेवलेले पाहीले आहे. ते का करतात ?
21 Sep 2016 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
आजच्या भाषेत सांगायचं तर तो निगेटिव्ह पॉवर्स स्वत:कडे खेचून घेतो .. म्हणून तो दर्शनी लावावा.. इसं आहे.
22 Sep 2016 - 7:51 pm | बोका-ए-आझम
हे काय असतं? पाॅवर म्हणजे कार्य करण्याचा दर. तो धन किंवा ऋण कसा काय असू शकतो?
22 Sep 2016 - 8:03 pm | संदीप डांगे
पावर मंजे शक्ती हो रावसाहेब! निगेटीव पावर मंजे दुष्ट शक्ती. इति सनातनप्रभात =))
23 Sep 2016 - 2:45 am | ट्रेड मार्क
त्यांना एनर्जी म्हणायचं असावं बहुतेक.
22 Sep 2016 - 8:19 pm | श्रीगुरुजी
हहपुवा
22 Sep 2016 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा
वर सांगितलेला अर्थ ही एक प्रचलीत धर्म श्रद्धा आहे. माझं मत किंवा विचार नव्हे. अर्थात तुम्ही आत्मकुंथक पणे ते जणू काही मीच आत्म मतीनी बोल्लोय असं समजून हसून घेणार.. . आणी स्वत:चा क्षणीक /लाक्षणीक विजय झाल्याचा उन्माद बालीशपणे मनात घोळवणार .. हे उघड आहे.
तेंव्हा चालू द्या स्वार्थक आत्मरंजन!
23 Sep 2016 - 12:10 am | श्रीगुरुजी
या भोपळ्याची पॉवर विधानावरून तुम्हाला नाही हसलो हो. त्या मूळच्या विनोदी विधानाला हसलो. तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका. तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की.
23 Sep 2016 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा
@तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका.›››
कशाला धरू मी चांदणे मनी?
तू तर मुळचाच चंद्र टनाटनी!
@ तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की. ››› ते तुमचं तुम्ही पाहिजे तेव्हढं स्वार्थक आत्मकुंथन करू शकता. त्यानी फरक असा काहीही पडत नाही. पण तुमच्यावर हसण्या इतकीही कारणं उपलब्ध नाहित, कारण~ हास्यापद व्हायलाही काही लायकता लागते. तुमची तीही नाही.
23 Sep 2016 - 12:55 pm | बोका-ए-आझम
ते राहू दे. तुम्हाला स्वतःला हे निगेटिव्ह पाॅवर वगैरे पटतं का?माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत.
23 Sep 2016 - 1:17 pm | अत्रुप्त आत्मा
मनाचेच खेळ सगळे.
पण त्याच्या इनपुटची भेळ आपण जो पर्यंत बाधीत व्यक्तीच्या मनातून काढायचे उपाय योजत नाही.. किंवा किमान तशी इच्छा व्यक्तवत नाही.. तोपर्यंत त्याची निंदा करू नये.
23 Sep 2016 - 3:47 pm | बोका-ए-आझम
दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?
23 Sep 2016 - 4:25 pm | संदीप डांगे
बोकशेठ, हे समजलं नाही? दोष दाखवणं आणि निंदा करणं दोन वेगळया गोष्टी!
23 Sep 2016 - 4:58 pm | अत्रुप्त आत्मा
@का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत? ››› ते कोणती व्यक्ती काय हेतूनं शब्द रचना वापरेल? त्यावरून कळणार. त्यामुळे अत्ता कसं सांगता येईल? भाषा समजावणुकीचा सूर घेऊन असली तर ऐकणाराही ऐकतो.. असंच काहिसं अपेक्षित आहे.
23 Sep 2016 - 5:00 pm | बोका-ए-आझम
दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?
23 Sep 2016 - 2:29 pm | अप्पा जोगळेकर
माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत.
अहो, त्यांच्या धंद्यावरच पाय कशाला आणताय ? तस तर हे वास्तुशांत वगैरे बी मनाचा खेळच की.
बिअरच्या झाकणाचा ट्टॉक असा आवाज झाला तरीही वातावरण प्रसन्न वगैरे होतच की. तरीसुद्धा वास्तुशांतीच दुकान चालायच ते चालतच ना.
23 Sep 2016 - 2:44 pm | सुबोध खरे
ती दारुची दुकानं वास्तू फेंगशुई किंवा वास्तू शांत शिवायच जोरदार चालताना दिसतातच की
23 Sep 2016 - 2:47 pm | प्रसाद_१९८२
=))
23 Sep 2016 - 2:48 pm | श्रीगुरुजी
हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.
23 Sep 2016 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा
@हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.››› तन्निमित्तानी तुमचीही लायकी त्यापलीकडे नाही.. हे ही सिद्ध करून दिलत टुम्ही आपोआप! =))
हो की नाही?
टन्ना टन्नी?
हास्यास्पदच आणी हास्यास्पदही (मी वापरलेला शब्द) या दोन शब्दातला फरक कुणालाही कळेल.. फक्त तो कपटी टनाटनी श्रीखुर्जी नसला पाहिजे.
23 Sep 2016 - 10:53 pm | श्रीगुरुजी
पुन्हा एकदा हसायला आलं. तुमचे सगळेच प्रतिसाद हास्यास्पद आहेत. विशेषतः दर २-३ वाक्यांमागे टणटण, टनाटन असलं काही तरी वाचून, पूजा करताना दर २-३ मिनिटांनी पुरोहित यजमानांना पळीभर पाणी सोडा किंवा आचमन करा असे सांगतात, त्याची आठवण झाली. पूर्वी लक्ष्मी रस्त्यावर एक माणूस एका हातात एक फलक उंच धरून दुसर्या हातात उदबत्त्यांचे पुडे धरून उदबत्त्या विकायचा. त्याच्या हातातल्या फलकावर टनाटन अगरबत्ती असं लिहिलेलं होतं. तुमच्या प्रत्येक प्रतिसादातील प्रत्येक २-३ वाक्यांमागे जो टणटणाट असतो ते वाचून त्या उदबत्तीविक्याची आठवण झाली.
24 Sep 2016 - 6:22 am | अत्रुप्त आत्मा
अपेक्षित आत्मकुंथन!
भ्याड आत्मकुंथनाचा निषेध असो!
24 Sep 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी
सगळेच मुद्दे संपलेले दिसतात. आता फक्त कुंथन आणि टणटणाटच शिल्लक आहे. हे अपेक्षितच होतं. चालू द्यात. आम्ही एंजॉय करीत आहोत. यापुढे पूजेत लक्ष्मी रस्त्यावर मिळणारी टनाटन अगरबत्ती वापरत जा.
24 Sep 2016 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन!
कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते.
त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...!
23 Sep 2016 - 10:54 am | साहना
> कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे.
> कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली
कर्मकांडांत हे सहभागी होतात त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने, देवालयांत प्रथांचा इतिहास त्यांच्या मागच्या कथा इत्यादी लिहिलेले असते. ज्या प्रथेत मी सहभागी होते तिथे बांध बांधण्यासाठी कधी कधी नरबळी दिले जायचे आणि त्यांच्या नावाने उत्सव केला जायचा. आज फक्त खरे मानवी रक्त सांडले जाते, कोहळा फोडला जातो.
ह्यापेक्षा आणखीन काय आधार आपणास अपेक्षित आहे हे मी समजू शकत नाही.
> एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?
हा विषय समजणे आपणास जड का जात आहे हे मी अजून पर्यंत समजले नाही. कुठे तरी एका प्रथेत कोहळा नरबळीच्या स्वरूपांत फोडला जातो म्हणून माझी वडे करण्यासाठी कोहळा फोडते तेंव्हा नरबळी च्या भावनेनें फोडत असेल असे आपणाला म्हणायचे आहे काय ? विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून आम्ही वाटतो तर कधी आपट्याची फांदी पेरली तर दररोज सोने मिळावे ह्या भावनेने आम्ही ती पेरली आहे असे समजावे का ? मारणाऱ्या माणसाच्या दोनदांत गंगाजल घालतात म्हणून गंगाजल पिणारा प्रत्येक माणूस स्वतःचे मरण अपेक्षित करतो असे समजायचे का ?
नारळ लोक खाण्यासाठी फोडत असतील आणि काही ठिकाणी इतर कुठल्या तरी प्रतीकात्मक दृष्टीतून फोडत असतील दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा काहीही संबंध नाही.
हा तर्क म्हणजे तर्कशास्त्रांतील Implication हा तर्क आहे. बाबू मुतला तर अंगण ओले होते, पण अंगण ओले आहे ह्याचा अर्थ बाबू मुतलाच असावा असे नाही पाऊस सुद्धा पडला असेल कदाचित (हि आमच्या गणित सरांची भाषा आहे). बहुतेक मानवांना हा तर्क स्वतःहून समजतो.
आपण फक्त वाद घालावा ह्या हेतूने घालत आहात असे वाटते.
23 Sep 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी
तुम्ही इथे लिहिलेल्या ४-५ ओळी हाच आधार का?
या दोन्ही गोष्टी एकच आहेत. नारळ फक्त खाण्यासाठीच फोडला जातो. त्याला बळी/नरबळीचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे मूर्खपणा आहे.
या गणितात मूळ सिद्धांत व त्याचा कॉन्व्हर्स असे म्हणतात. याचा इथे काय संबंध आहे? काही वेळा दोन्ही सिद्ध करता येतात तर काही वेळा फक्त मूळ सिद्धांतच सिद्ध करता येतो, पण कॉन्व्हर्स सिद्ध न होणारी एक किंवा अनेक काऊंटर उदाहरणे देता येतात.
20 Sep 2016 - 6:21 pm | गामा पैलवान
सतिश गावडे,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
हिंदू जनजागृती समितीने तक्रार दाखल केली आहे. मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना. या प्रकरणाचा स्रोत म्हणून एक ३९ पानांची ५१ एमबीची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...
तिच्यातल्या सोळाव्या पानाचं पटचित्रं :

२.
सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय?
३.
शिंतोडे? काहीही हं सगा! मी तर पार चिखलराड्यात घुसळतोय दाभोलकरांना! बरं ते जाऊदे.
दिवंगत दाभोलकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. असं वाटणं चुकीचं नाही. आता असं बघा की, आज चालू घडीला डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या आरोपाखाली अटक करून चुकीची औषधं देऊन ठार मारण्यात येतंय. तुम्हाला जसं दाभोलकरांविषयी वाटतं अगदी तस्संच आम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी वाटतं. डॉक्टर तावड्यांचा जीव जाऊ नये म्हणून दाभोलकरांचा फ्रॉड उघडा पाडला तर त्यात गैर ते काय?
डॉक्टर तावड्यांना केलेली मारहाण कोणत्या कायद्याखाली समर्थनीय आहे?
आ.न.,
-गा.पै.
21 Sep 2016 - 12:31 am | सतिश गावडे
=))
विचारसरणी हास्यास्पद असली तरी कृती तशी नाही म्हणून.
डॉ. तावडेंबद्दल काही विशेष माहिती नाही.
21 Sep 2016 - 12:52 am | साहना
वरील कागदपत्रे घाईत वाचली. हे कार्य जबर आहे. खूप शुभेच्छा. असे कार्य हिंदू हितरक्षक म्हणणाऱ्या सर्वच `संघ`टनांनी केले पाहिजे.
ह्याच प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन जर आणि कोणी केले असते तर एव्हाना सरकार हात धुवून मागे लागले असते.
22 Sep 2016 - 1:50 am | गामा पैलवान
धन्यवाद साहना!
आ.न.,
-गा.पै.
21 Sep 2016 - 10:37 am | आनन्दा
जाताजाता
कोल्हापूरच्या देवळातील जमीनीचा घोटाळा देखील याच विधिज्ञ परिषदेने बाहेर काढला असे ऐकून आहे. आणि वीरेंद्रसिंह तावडेच्या विरोधात साक्ष देणारे काही हिंदुत्ववादी या घोटाळ्याचे लाभार्थी आहेत असेही ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे.
22 Sep 2016 - 1:54 am | गामा पैलवान
आनन्दा,
तुमची माहिती बरोबर आहे. संजय साडविलकर याने अंबाबाईच्या देवस्थानाची चांदी चोरली. हा चांदीचोर आता तावड्यांच्या विरुद्ध प्रमुख साक्षीदार आहे. सौ चूहे खाके बिल्ली चली हाज.
आ.न.,
-गा.पै.
21 Sep 2016 - 8:27 am | संदीप डांगे
बळी देणे हा प्रकार 'तांत्रिक' पुजांमधून आला आहे, कालांतराने तो अहिंसक होत गेला आहे. जिवंत प्राण्याऐवजी प्रतिकात्मक वस्तू वापरल्या जातात, एखाद्या क्षेत्राबद्दल आपण अनभिज्ञ असलो म्हणजे तसे काही नसतेच हा अनाठायी आत्मविश्वास योग्य नाही.
21 Sep 2016 - 1:05 pm | श्रीगुरुजी
मी नारळ फोडण्यामागे जी समजूत आहे त्याबद्दलच माहिती विचारत आहे. माहिती विचारणे हा गुन्हा नसावा. जोपर्यंत विश्वासार्ह माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यामागची समजूत चुकीची आहे असे समजण्यात चूक नसावी.
21 Sep 2016 - 6:10 pm | sagarpdy
हे सर्व तर्क झाले, पुरावा कुठेय ?
उदा. मधले बोट दाखवणे याचा प्रतीकात्मक अर्थ काय ? तो तसा वापरण्यास सुरुवात कधी झाली, कोणी केली ?
पहा : http://english.stackexchange.com/questions/64916/whats-the-origin-of-fli...
काही विश्वासार्ह पुरावा आहे का? कायपण माहित नाही इतिहास ह्या वल्लीना (प्रक्षिप्त म्हणे) आणि धार्मिक कार्य या अ.आ. ना (प्रतीकात्मक म्हणे) आणि काहीतरी तर्क लावताहेत.
:P
21 Sep 2016 - 7:04 pm | संदीप डांगे
गुरुजी आणि सागर,
'विश्वासार्ह पुरावा' ह्याचा तुमच्यालेखी काय अर्थ आहे तेवढा कळवा. म्हणजे त्यात बसणारं काही आहे काय हे बघून सांगता येईल.
'आज'च्या काळात ज्याही पुजा आपण करतो त्यांचे सर्वांचे 'मूळ अर्थ' पूजा करणार्याला माहित नसतात, अनेक विधी तर तशी परिस्थिती उपलब्ध होत नसल्याने टाळले गेले आणि आता लुप्त झाले आहेत.
किंवा, तुम्हाला नसेल मानायचे की नारळ फोडण्यामागे नरबळी आहे तर तेही तुम्ही मानू शकता, कोणतीही मनाई नाही. आपल्यापैकी कोणीही भूतकाळात टाइममशीन घेऊन जाऊन तपासू शकत नाही. तेव्हा खरंच या विषयावर वाद तरी किती घालावा हा प्रश्न पडलाय. पण आपण 'आज' जी करतोय ती विधी आधी 'हिंसक व चीड आणणारी' होती हा 'आज' झालेला उलगडा त्रास देणारा असेल तर तुम्ही ह्याचा पाठपुरावा करणे योग्यच आहे.
डॉक्टरसाहेब,
>> असे आपल्याला (तुम्हा-आम्हाला) वाटते कारण आपले संस्कार तसे आहेत. अन्यथा जगात अनेक ठिकाणी अनेक अघोरी प्रथा परंपरा असतात ज्या कल्पनेतही आपण आणू शकत नाही. आत्ता ताबडतोब आठवणारी एक प्रथा आहे, सौम्यच आहे तशी, भारतातल्याच एका जमातीतः तिकडे आलेल्या पाहुण्याला दारू देणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले जाते. जन्म असो वा मरण कोणत्याही प्रसंगी दारू पाहिजेच. अगदी माणूस मेल्यावर त्याच्या अंतिम कार्याची सोय लावण्याआधी दारूची सोय लावायला घरचा माणूस बाहेर पडतो. आलेले लोक आधी मनसोक्त दारू ढोसतात, मग मढ्याकडे बघितले जाते.
नवी मोटार, किंवा काही घेतल्यावर आपण 'आज' ज्या भावनेनी नारळ फोडतो ती भावना 'नरबळी देणे' ही नाही. पण नारळ फोडणे ही जुन्या काळातल्या नरबळी-पशुबळीची प्रतिकात्मक क्रिया आहे. ह्याचा अर्थ आपण नविन वस्तूच्या स्वागतासाठी आपल्याला ही कृती करावीशी वाटते, त्यामागे 'कुणाचा जीव घेणे' हा हिंस्र विचार नसतो, किंवा त्याकाळात नरबळी देण्यामागे फक्त 'कुणाचा जीव घ्यावा, घेता यावा' म्हणून पूजा-विधी करत नव्हते. पिढ्यांपिढ्यांमागे सामाजिक कृतींचे बदल होतात हे तरी मान्य आहे की नाही? प्रत्येक विधीचे शास्त्रिय अर्थ प्रत्येकालाच ठावूक असलेच पाहिजेत असेही होत नाही.
'बळी देणे' हि संकल्पनाच मुळात तांत्रिक जगतातली आहे. कायद्याने असे करणे, उघड उघड करणे शक्य नाही म्हणून होतच नाही असे मानणे योग्य नव्हे. नरबळी दिल्याच्या अनेक घटना स्थानिक वृत्तपत्रांतून नित्य येत असतात. अर्थात त्यातून देणार्यास फायदा झाला की तुरुंग झाला हा वेगळा विषय.
मंत्र-तंत्र-सिद्धी हा एक वेगळा विषय आहे. अंनिसच्या धाग्यावर 'योग्य' चर्चा सुरु होईल अशाने... त्यामुळे थांबतो. =))
21 Sep 2016 - 7:08 pm | सुबोध खरे
आपण म्हणता ते तर्कशुद्ध आहे. परंतु पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा विचार मनात नक्की येईल.
तसाही मी फारसा धार्मिक नाहीच. पूजाविधी कर्म कांड इ. काहीच करत नाही. त्यामुळे फार काही अडणार नाही.
21 Sep 2016 - 7:30 pm | संदीप डांगे
खरं आहे डॉक्टरसाहेब, त्यामुळेच हे वाचणार्या अनेकांना त्रासदायक वाटलं असेलच. पण मी त्यांना म्हणेन, तुमची स्वत्:ची भावना महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा, क्रियेमागे काय प्राचिन अर्थ आहे तो जौद्या उडत. मी कर्मकांड-पुजाविधींपासून दूर जाण्याला हेच 'मागचं खोदकाम' कारणीभूत आहे, ज्या कोण्या प्रतिकांची आपण मनोभावे पूजा करतो, त्यांना पवित्र मानतो ती प्रतिके आपल्या मनातल्या प्रतिमांशी सुसंगत नाहीत ही माहिती आतून हलवणारी असते. किंवा आपल्या मिश्र संस्कृतीमुळे दुसर्या लोकांच्या देवांना, चालिरितींना, मान्यतांना आपण आपल्या देवघरात, कर्मकांडांत 'काहीही ठोस कारण' नसतांना स्थान दिले हे भावनाही विचलित करुन जाते. आणि कधीकधी त्या देवांची सत्य किंवा प्राचिन प्रतिमा ही आपल्या भावनांशी विसंगत ठरते तेव्हाही सॉल्लिड धक्का बसतो.
21 Sep 2016 - 7:39 pm | सुबोध खरे
बऱ्याच वेळेस पूजा करताना त्यांचा अर्थ समजून घेतला तेंव्हा त्यात रुढीशिवाय फार काही आढळले नाही त्यामुळे मी रोज पूजा करीत नाही किंवा कोणतेही कर्मकांड करीत नाही. देवाला नमस्कार करतो तो केवळ एक जगनियंत्याचे प्रतीक म्हणून. मग देव कोणताही असो. आजतागायत शिरडीलाच काय ( जेथे लष्करी ओळख पत्र दाखवले असता थेट प्रवेश होता) सिद्धिविनायकालाही गेलो नाही. कोणत्याही देवळाच्याच काय हॉटेलच्याही रांगेत उभे राहणे पटत नाही. स्वतःपुरती तत्वे पाळतो आहे. दुसर्यांनी पाळावी असा आग्रहही नाही म्हणून कदाचित आनंदी आहे.
21 Sep 2016 - 7:45 pm | संदीप डांगे
हमरा भी कुछ ऐसाही है.. ;))
22 Sep 2016 - 2:29 pm | बोका-ए-आझम
हा ultimate फालतूपणा आहे असं स्पष्ट मत आहे. नवस बोलणे हा दुसरा, देवाच्या दर्शनासाठी रांग लावून उभं राहणे हा तिसरा आणि अमुकतमुक पदार्थ या देवाला वर्ज्य हा चौथा.
21 Sep 2016 - 7:32 pm | अनुप ढेरे
अश्वमेध यज्ञामागे असच विचित्र काहीतरी आहे. पहिल्यांदा कळालं तेव्हा एकदम घृणा आलेली.
21 Sep 2016 - 7:38 pm | sagarpdy
ह घ्या असं नेहमी टाकलाच पाहिजे का?
21 Sep 2016 - 7:39 pm | संदीप डांगे
सॉरी हो, ते नंतर लक्षात आलं, =))
21 Sep 2016 - 11:52 pm | ईश्वरसर्वसाक्षी
ओके. धन्यवाद
आमच्या घरी ह्याला गंगाफल म्हणतात. :)
22 Sep 2016 - 2:21 am | गामा पैलवान
सतिश गावडे,
तुम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी फारशी माहिती नाही. तर तेच सूत्र पकडून थोडी माहिती देईन म्हणतो. काही प्रश्न पडलेत म्हणून हा खटाटोप करतोय.
पोलीस डॉक्टर तावड्यांचा अमानुष छळ करताहेत. त्यांना रात्रभर मारहाण करून दुसरे दिवशी सहदिवाणी न्यायालयासमोर उभं केलं. पायावर बुटाचा वळ स्पष्ट उमटलेला दिसंत असतांनाही न्यायाधीशांनी परत पोलीस कोठडीच मंजूर केली. डॉक्टर तावड्यांना रक्तदाबाचा त्रास असतांना व ते निर्दोष असतांना ही मारहाण कशासाठी? आज तावडे जात्यात आहेत आणि तुम्ही आम्ही सुपात आहोत. उद्या कशावरून आपण जात्यात भरडले जाणार नाही?
यानंतर गेल्याच आठवड्यात डॉक्टर तावड्यांना चुकीची औषधे देऊन जीवे मारायचा प्रयत्नही झाला. हा काय प्रकार चाललाय? शेवटी तावड्यांनी जिवाचं भय आहे म्हणून स्वतंत्र कोठडी मिळावी म्हणून अर्ज केला.
मारहाण सहन करीत डॉक्टर तावडे कोठडीत शांतपणे नामजप करीत बसले होते. तर त्यांच्या हातातून जपमाळही काढून घेतली. कित्ती शूरवीर आहेत नाही ते पोलीस! आता जर कोण्या गणेशोत्सव कार्यकर्त्याला वाटलं की पोलिसास खाडीत बुडवून ठार मारावं, तर दोष कुणाचा असेल बरं?
डॉक्टर तावड्यांना न्यायालयात आणतांना अनेक पत्रकार खुलेआम त्यांच्या जवळ येत होते. हा सुरक्षाभंग आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अपमानदेखील आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवण्याइतके पोलीस का माजले आहेत? साध्वी आणि प्रसाद पुरोहितांच्या वेळेस जर चाप लावला असता तर ही हिम्मत झाली असती का पोलिसांची?
गेले तीन वर्षं कुठलाही पुरावा गोळा करू न शकलेले पोलीस निरपराध्यांवर अत्याचार का करताहेत? दाभोलकरांच्या मृत्यूचा हा गैरफायदा घेतला जातोय ना?
गावडे साहेब, दाभोलकरांना विवेकवादी म्हणता तुम्ही, बरोबर? मग त्यांच्या मृत्यूचं निमित्त करून कसलाही संबंध नसलेल्या निरपराध्याचा अमानुष छळ होतांना तथाकथित विवेकवाद्यांचा विवेक कुठे शेण खायला गेलेला असतो? सनातन संस्थेसाठी नव्हे तर दाभोलकरांची मृत्यूपश्चात विटंबना होऊ नये म्हणून तरी आवाज उठवणार का तुम्ही?
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2016 - 10:22 am | साहना
ह्यांत खूपसे तथ्य आहे असे मला वाटते. कुठल्याही तथाकथित विवेकवाद्याने खरे तर ह्या विषयावर तावडे ह्यांची बाजू घ्यायला हवी होती. संपूर्ण प्रकरणाकडे पहिले असता पोलीस लोक सामान्य आणि पापभिरू लोकांना जास्त दंडेली दाखवत आहेत असे वाटते. साध्वी प्राची काहीही आरोप नसताना उगाच जेल मध्ये आहे.
आसाराम बापूवर "बलात्काराचा आरोप" असे म्हटले जाते पण प्रत्यक्षांत आरोप थोडे वेगळे आहेत. आसाराम बापुना दोषी मानले तरी ५ वर्षांची सजा होईल आणि त्यांनी आधीच ३ वर्षे जेल मध्ये व्यतीत केली आहेत.
तावडे ह्यांच्या विरदोहांत नक्की काय पुरावे आहेत हे अजून पोलिसांनी स्पष्ट केले नाही उलट ज्या दिवशी दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवसापासून सनातनवर आरोप सुरु झाले होते.
22 Sep 2016 - 3:40 pm | बोका-ए-आझम
साध्वी प्राची तुरुंगात नाहीयेत.
22 Sep 2016 - 11:31 pm | साहना
प्रज्ञा चूक झाली
22 Sep 2016 - 8:37 am | नाखु
दोन नवीन म्हणी मिपा वाचकचरणी अर्पण.
संकलक नाखु (वाचकांची) पत्रेवाला
22 Sep 2016 - 2:26 pm | बोका-ए-आझम
तुमचे वरचे प्रतिसाद वाचले.मला एक शंका आहे. एवढं जर असेल तर आपल्याकडे पूजेत सरळसरळ मांस का वापरत नाहीत? अमुकतमुक पदार्थ मांसाचं प्रतीक हा फालतूपणा कशासाठी? माझ्यासारख्या कट्टर मांसाहारी लोकांची घरी पूजा वगैरे असेल त्यावेळी प्रचंड अडचण होते. ते तरी दूर होईल जर सरळसरळ मांस वापरायला सुरुवात केली तर. कृपया अज्ञान दूर करावे.
22 Sep 2016 - 2:34 pm | श्रीगुरुजी
सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा थांबविण्याऐवजी त्याचे सरळसरळ समर्थन सुरू आहे.
ज्यांना मांसाहाराचे वावडे नाही त्यांनी असले प्रतीकात्मक पदार्थ वापरण्याऐवजी खरेखुरे मांसाचे पदार्थ वापरावेत. उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत आणि नारळ फोडण्याऐवजी एखादी कोंबडी, बकरी कापावी. मांसाचे वडे म्हणून नैवेद्यात उडीद वडे ठेवणे म्हणजे देवाला फसविण्यासारखे आहे. अशाने देव प्रसन्न होण्याऐवजी कोपायचा.
22 Sep 2016 - 2:57 pm | प्रचेतस
ह्याचे समर्थन कोणीही करत नाही. ह्या क्रूर प्रथाच होत्या हे निर्विवाद. मी स्वत: कट्टर शाकाहारी आहे पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
22 Sep 2016 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा
@
››› +++++++१११११११.
ह्याच मताला टनाटनी लोक सहमती दर्शवित नाहीत .
23 Sep 2016 - 2:37 pm | अप्पा जोगळेकर
उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत
कोंबडीवडे शाकाहारी असतात. ते कोंबडीसोबत खातात म्हणून कोंबडीवडे. बाकी सर्व मान्य आहे.
23 Sep 2016 - 2:44 pm | विशुमित
हा हा हा...
मला पण सुरवातीला माहित नव्हतं कोंबडीवडे काय असतात ते... भीमथडी जत्रेच्या वेळेस कळले..
22 Sep 2016 - 2:53 pm | प्रचेतस
मी वर म्हटल्याप्रमाणे शाकाहारी परंपरा ह्या केवळ बौद्ध धर्माच्या यज्ञहिंसेला विरोध आणि जैनांची सम्पूर्ण अहिंसा ह्यातून उगम पावलेल्या आहेत. केवळ त्याचमुळे पूजेतही मांसान्नाला हळूहळू विरोध होत गेला. शिवाय नंतर वैदिक देवता मागे पडून भक्ती पंथावर चाललेल्या भागवत धर्माचाही प्रसार होत गेला.
रामायण महाभारत ह्या ग्रंथात मांसान्नाचे (नैवेद्य/श्राद्ध म्हणून) कित्येक उल्लेख सापडतील. रंतीदेवाची कथा तर प्रसिद्धच आहे. खुद्द विश्वामित्राने कुत्र्याची तंगडी खाल्ल्याचे उदाहरण आहे.
अगदी अलीकडच्या काळात बघावे तरी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर विजयादशमीला आणि (बहुधा चैत्री पौर्णिमेला) रेडा बळी द्यायची प्रथा होती जी अगदी पंतप्रतिनिधींच्याही काळातही चालू होती.
अगदी आजही कोकणातील कित्येक घरात गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवला जातो तर विजयादशमीला बळी दिला जातो. चैत्रात तर कित्येक बोकडांचा, कोंबड्यांचा बळी चालू असतो.
केवळ ह्या धर्मांच्या शाकाहाराच्या प्रसारामुळे हे प्रमाण बरेचसे कमी झाले मात्र त्याचे ट्रेसेस आजही ह्या प्रतिकांच्या रुपाने अस्तित्वात आहेत.
22 Sep 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी
निदान आजच्या काळात तरी प्रतीकात्मक रूपाने सुद्धा या प्रथा नसाव्यात. म्हणजे नारळ हा नारळ म्हणून फोडावा, बळी देण्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून नको किंवा वडे हे वडे म्हणूनच असावेत, मांसवड्यांचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून नको. गुलालबिलाल टाकलेला भात असले प्रकार बंद व्हावेत.
22 Sep 2016 - 3:05 pm | प्रचेतस
सहमत.
केवळ प्रथा म्हणूनच ह्या चालू आहेत. प्रथेमागचं कारणही आज कित्येकांना माहीत नाही.
22 Sep 2016 - 5:40 pm | संदीप डांगे
कसंय ना गुरुजी, हा एक विचित्र प्रकार आहे बघा. शॉर्टकट मारलेले हे आजचे सर्व विधीच हुकलेले आहेत. 'शास्त्र' म्हणून ह्याच्या ठिकाणी ते वापरा, हे नाही मिळत का तर त्याच्याऐवजी दर्भ, सुपारी, अमुक-तमुक वापरा. हे जे शॉर्टकट मारलेत त्याने पुजेपासूनचा लाभ मिळत नाही फक्त 'काहीतरी केल्याचं समाधान' यजमानाला मिळतं. यजमान विचार करतो की आपण शास्त्रोक्त पुजाविधी करत आहे, पण प्रत्यक्षात ही नकळत फसवणूक आहे. कोणत्याही अस्सल तांत्रिक पुजेत विशिष्ट तीच वस्तू, त्याच स्पेसिफिकेशनची मिळाली नाही तर पूजा केलीच जात नाही. आपल्या सामान्य लोकांच्या घरी ज्या पूजा केल्या जातात त्या शास्त्रार्थ पूजा नव्हेतच. फक्त एक फस्टक्लास गोंधळ आहे. जस्ट अ रिचुअल फॉर द सेक ऑफ दॅट.
22 Sep 2016 - 9:32 pm | बोका-ए-आझम
जर देव चराचरांत आहे, तर डोळे मिटून ध्यान करण्याने किंवा नामस्मरणानेही तेच व्हायला हवं, जे पूजेने होतं. पुरोहित वर्गाने स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी ज्या अनेक फर्मास गोष्टी केल्या, त्यातली एक पूजा असणार. वर प्रचेतसभौंनी १४ व्या शतकाचा उल्लेख केलाय. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळात. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात पूजाअर्चा हे प्रकार होत नव्हते का?
22 Sep 2016 - 9:59 pm | प्रचेतस
पूर्वीही पूजाअर्चा व्हायच्याच की. मात्र त्यांचे स्वरूप कालानुक्रमने बदलत गेल्याचे दिसते..आजचे पूजेचे स्वरुप पाहिले तर ऋग्वेदादी वेदांचे फ्यूजन अलिकडच्या काळातील स्तोत्रांसह होऊन नवीनच श्लोक तयार झालेले दिसतात शिवाय संतरचित आरत्यांचा वापर तर खुपच मोठ्या प्रमाणावर आहे.
वैदिक यज्ञातील हवन ही देवताना तृप्त करण्यासाठी केलेली पुजाच, चालुक्य -शिलाहारांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला नित्योपचारांसाठी दिलेली दाने ही देखील पूजाच, आणि आजच्या काळात आरत्या म्हणत घालीन लोटांगण म्हणत फेर धरणे ही देखील पूजाच.
24 Sep 2016 - 6:05 am | निशाचर
बौद्ध किंवा जैनांच्या प्रभावाबद्दल जास्त माहिती नाही. पण मांसाहारी नैवेद्याबद्दल खूपच सहमत.
माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रात बहुधा खांडेनवमीला बळी दिला जातो. महाराष्ट्रासह इतरही राज्यांतही प्रथा आहे. कोकणात (विशेषतः रत्नागिरी जिल्हयात) चैत्रात (भैरीभवानी सारख्या) ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हाही बर्याच घरी कोंबड्याचा वा मटणाचा नैवेद्य असतो. त्याशिवाय देवीचा गोंधळ (बहुतेक एक बोकड अधिक पाच कोंबडे, नक्की आठवत नाही. शिवाय दारू); कुळाचार, घरात लग्न झाल्यास पाचपरतावणे, तिखट जेवण किंवा गोतांबीर वगैरे असल्यास मांसाहारी नैवेद्य असतोच.
ज्यांना लहानपणापासून हे बघायची सवय असते त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. बोकड नाही, पण कोंबडी घरी कापणे ही नॉर्मल गोष्ट असू शकते. गावठी कोंबडी अगदी ठाण्यामुंबईतही बरीच लोकं (जिवंत) घरी आणून स्वतः कापत, कारण कापून मिळत नाही.
कोकणात (रत्नागिरी जिल्हयात) गौरीगणपतीत खूप घरांत गौरीआवाहनाच्या संध्याकाळी नैवेद्याला मच्छी असते आणि दुसर्या दिवशी गौरीपूजनाला कोंबडा किंवा मटण आणि वडे असतात. गणपतीसाठी मात्र शाकाहारी गोडाचा नैवेद्य असतो. गंमत म्हणजे गणपतीला गौरीचा नैवेद्य वर्ज्य म्हणून गौरीला नैवेद्य दाखविताना तो गणपतीला दिसू नये यासाठी त्याच्या गौरीकडील बाजूला केळीचं पान लावतात!
पण बहुधा या घरांमध्येही इतरत्र उल्लेख झालेल्या पूजाविधींच्या वेळी शाकाहारी प्रतिकांचा आधार घेतला जातो.
26 Sep 2016 - 9:52 pm | हिमु
कोकणात आअम्च्या घरि गौरीला मट्ण वडे हाच नैवेद्य असतो
22 Sep 2016 - 3:43 pm | अनिरुद्ध.वैद्य
यज्ञातुन मुर्तीपुजेकडे वळल्यावरचे अवशेष म्हणजे सध्याचे होम हवन. जैन बुद्ध धर्मांच्या वाढत्या प्रभावाखाली अन अर्थात आर्थिक दृष्ट्या सारखे ब्ळी देण प्रकार कठीण होत गेले. तेव्हा मग रीप्लेसमेंट म्हणुन धान्याचा वापर सुरु झाला.
22 Sep 2016 - 3:03 pm | बोका-ए-आझम
हा प्रकार साधारणपणे कधी चालू झाला असेल?
22 Sep 2016 - 3:09 pm | प्रचेतस
नाही सांगता येत.
कदाचित इस्लामिक राजवटीत. पण हा केवळ तर्क. कारण बऱ्याशच्या पोथ्या ह्या १४ व्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत.
22 Sep 2016 - 3:27 pm | नाखु
शोधा तुम्हाला एखादा शीलालेख सापडेल तरी तसा उल्लेख असलेला.
सोबत अत्मुदांनाही घ्या म्हणजे तिथलया तिथे (शीलालेखाचीच) कुंडली मांडून नक्की कधी चालू झाले हे प्रतिकात्मक पूजन ते आम्हाला समजेल.
अज्ञानी बालक नाखु
23 Sep 2016 - 2:35 pm | एस
'पूजा' हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही. उपनिषदांमध्येही बहुधा पूजा हा शब्द नाहीच. प्रचेतस म्हणताहेत तसे आज जे पूजेचं स्वरूप आपल्याला दिसतेय ते त्यामानाने फार अर्वाचीन आहे हे निःसंशय.
22 Sep 2016 - 3:23 pm | गॅरी ट्रुमन
नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे एक बाजूने कबूल केले किंवा नारळाचा नरबळीशी संबंध नाही असे दुसर्या बाजूने कबूल केले तर जीभ झडेल का कुणाची?????
22 Sep 2016 - 3:45 pm | संदीप डांगे
मी केलं ना!!! ;)