सोबतीला पाव आहे

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
3 Feb 2009 - 7:16 pm

आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे) वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाहीसोबतीला पाव आहे, भात नाहीभोवती अंधार आहे, रात नाहीचुंबिला तो पाय आहे, हात नाहीवाटतो हा  खेळ पण ना फार सोपाराहिले तोंडात बाकी दात नाहीघासतो  मी स्वखुषीने रोज भांडीसांगतो, पण मी तुझ्या धाकात नाहीका बरे त्यांची घरे ही साफ दिसती?गावभर करती उकिर्डा, आत नाही ;)सोडल्यावर तो म्हणाला, काल वायूफक्ता हा आवाज आहे, वात नाही.हा विडंबन पाडण्या  तैयार असतोखोड "केश्या" ची कशी ही जात नाही(केशवसुमार)

विडंबन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

3 Feb 2009 - 7:24 pm | लिखाळ

वाहवा .. फार मस्त :) विडंबन आवडले..

का बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही

सोडल्यावर तो म्हणाला, काल वायू
फक्ता हा आवाज आहे, वात नाही.
हे विशेष !
मूळ कवितेतला 'आत नाही 'हा शेर सुद्धा मस्तच आहे..
-- लिखाळ.

फक्त हा आवाज आहे, वास नाही.

असे म्हणायचे आहे का ?

लवंगी's picture

3 Feb 2009 - 7:30 pm | लवंगी

विडंबन म्हणावे का काय हे!! आज हसून हसून पोटात दुखायला लागले आहे..

शंकरराव's picture

3 Feb 2009 - 7:50 pm | शंकरराव

व्वा !! दर्जेदार विडंबण

आवडले

का बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही

विशेष आवडले

विनायक प्रभू's picture

3 Feb 2009 - 7:51 pm | विनायक प्रभू

पायानंतर हात आला.

केशवसुमार's picture

3 Feb 2009 - 7:58 pm | केशवसुमार

पुढचे आणि मागचे
मधे गडबड आहे.. बाकी चोराच्या मनात ...
केशवसुमार
(स्वगतः :W अरे हा माणूस समोपदेशन करतो ना मग ह्याला ...... जाउ दे ..चालायचं :B )

शितल's picture

3 Feb 2009 - 8:10 pm | शितल

फक्कड विडंबन :)

खरा डॉन's picture

3 Feb 2009 - 10:34 pm | खरा डॉन

केशवभाय पायाचा फोटू अर्जंट!!

प्राजु's picture

3 Feb 2009 - 11:00 pm | प्राजु

अतिशय दर्जेदार विडंबन.
गुर्जी..... आपण खरंच धन्य आहात. प्रत्येक शेरावर... हसू येतं. मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

3 Feb 2009 - 11:05 pm | सर्किट (not verified)

बोर्थ म्हणजे काय ?

बाकी विडंबन छान.

-- सर्किट

प्राजु's picture

3 Feb 2009 - 11:08 pm | प्राजु

मलाही प्रश्न पडला आहे हा. बोर्थ म्हणजे काय?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

4 Feb 2009 - 2:48 am | केशवसुमार

मिशटेक हुवा.. #o ते 'ब्रॉथ' आहे :B
(सुपातला)केशवसुमार

अविनाशकुलकर्णी's picture

4 Feb 2009 - 12:51 am | अविनाशकुलकर्णी

केशवसुमार..छे..हे तर अस्सल केशवकुमार

बेसनलाडू's picture

4 Feb 2009 - 1:18 am | बेसनलाडू

घासतो मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही

हाहाहाहा
(धाकातला)बेसनलाडू

चतुरंग's picture

4 Feb 2009 - 3:01 am | चतुरंग

झक्कास विडंबन!!

(पाववाला) चतुरंग

आंबोळी's picture

4 Feb 2009 - 1:22 pm | आंबोळी

गुरूदेव
साष्टांग दंडवत!

(
धारी)आंबोळी

केशवसुमार's picture

4 Feb 2009 - 8:37 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार