एक नव्हतो आपण कधीच ,
तरीही आजपर्यंत दोघंही एकचं .... !
तू तुझी कारणं शोधत राहिलीस ,
अन मी माझ्या पळवाटा .... !
पीळ नको देऊस विचारांना ,
नियतीच्या खेळातले आपण खेळणं ' !
'रानटी' भविष्याच्या ' रानात ' ,
कल्पनेच्या स्वप्नांला , अस्तित्वाच 'मरणं ! '
'घाण' तू ही नव्हती , मीं ही नाही ......
मी सूर्य बघत राहिलो , तू आकाशगंगा !
खरं ते खरंच असत , जस तू अन मी ....
पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याचा !
जसा मी होतो , मस्त होतो ,
तुही 'मस्तच' होती , मृगजळ दिसण्याआधी !
तक्रार नाही नियतीची ,
पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याआधी !
प्रतिक्रिया
16 Sep 2016 - 10:23 pm | निनाव
Mastay.
17 Sep 2016 - 12:26 am | अविनाश लोंढे.
धन्यवाद...
मला माझीच ह्या कवितेबद्दल शंका होती ;)
पण माझ्या काळजाच्या एकदम जवळची !