आज सकाळ सकाळी मिपावर आल्यावर बघितले तर सगळेच म्हणजे (म्हणजे)<म्हणजे...>(( म्हणजे )) करता आहेत..अस असताना आम्ही गप्प बसावे म्हणजे........
"ओढ" म्हणजे काय ते
दारू सोडल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
ड्राय डे असल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
लग्न केल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
विडंबनातून निवॄत्त झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
पुन्हा विडंबन करायला लागल्याशिवाय समजत नाही.
(सुखी)केशवसुमार
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 3:45 pm | भिडू
=)) =)) =))
3 Feb 2009 - 3:48 pm | मधु मलुष्टे ज्य...
मस्त ! :)
म्हणजे म्हणजे विडंबनकरांचे पंजे
आमचे कान आणि ओरीजनल कवीची मान....
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
3 Feb 2009 - 4:03 pm | लिखाळ
प्रतिसाद मस्त :)
विडंबन छान :)
-- लिखाळ.
3 Feb 2009 - 3:49 pm | मदनबाण
जोरात विडंबने चालु हाय सध्या.... :)
"प्रेम" म्हणजे काय ते
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही
सहमत !!!
विडंबनाचा ओरिजनल स्त्रोत पण मस्त आहे..
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
3 Feb 2009 - 6:17 pm | सखाराम_गटणे™
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही
>>कोणाच्या बापाचा??
हा. साधा प्रश्न आहे, गैरार्थ काडु नये.
3 Feb 2009 - 6:29 pm | लिखाळ
प्रेयसीच बाप असे गृहित धरले तर विनोद निर्मीती होऊन हसू येते.
आपलेच वडिल असे समजले तर 'कठोर पण प्रेमळ' असे (साहित्यिक भावूक) भाव निर्माण होऊन 'अंमळ हळवे' व्हायला होते.
तुम्ही हसलात की हळवे झालात? उत्तर मिळेल.
-- लिखाळ.
3 Feb 2009 - 4:35 pm | छोटा डॉन
तरी म्हटलेच की अजुन गुरुदेवांचा मास्टर स्ट्रोक कसा आला नाही ??
एकदम ज ह ब ह र्या ... खल्लास विडंबन ..!
क्या बात है ...!
एक तक्रार :
आख्ख्या विडंबनात एकदाही "केशवा, केश्या, केसु " हा शब्द आला नाही ?
शैली बदलली की काय ?
------
छोटा डॉन
3 Feb 2009 - 4:56 pm | केशवसुमार
"विडंबन संपले" म्हणजे काय ते
"केश्या" आल्याशिवाय समजत नाही.
3 Feb 2009 - 5:16 pm | कवटी
केसुशेठ,
आमच्यासाठी मात्र
"विडंबन" म्हणजे काय ते
"केश्याने" केल्याशिवाय समजत नाही.
असच आहे.
जबर्या विडंबना बद्दल धन्यवाद.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
3 Feb 2009 - 5:23 pm | बाकरवडी
>>>>>म्हणजे म्हणजे विडंबनकरांचे पंजे
आमचे कान आणि ओरीजनल कवीची मान..
मस्तच
आता किती विडंबने येणार आहेत ?
3 Feb 2009 - 8:13 pm | शितल
विडंबन आवडले. :)
3 Feb 2009 - 8:25 pm | प्राजु
दोन्ही छान आहे मूळ कविता आणि विडंबन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 10:00 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार