कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची
कुणाला काय भावतं अन कुणाला काय
कुणाला काय सलतं अन कुणाला काय
अन ज्याला जे भावतं, जे सलतं
त्याला तेच महत्वाचं वाटतं ….
कुठे 'गोली मार भेजे में'
कुठे 'जिस्म'
कुठे 'जय जय राम कृष्ण हरी'
कुठे 'जय हिंद'
कुठे 'गांधीगिरी'
कुठे 'नथ्थुराम'
कुठे काय नि कुठे काय
या ना त्या प्रकारे
घेतो प्रत्येकजण
जगणे मोल
कुठे सोनेरी
कुठे बिलोरी
कुठे बेगडी ….
पण
प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल -
रक्ताची
अश्रूंची
हृदयाची
आत्म्याची
प्रतिक्रिया
9 Sep 2016 - 12:43 pm | गणामास्तर
यापेक्षा भोंडल्याची गाणी परवडली असती.
9 Sep 2016 - 1:55 pm | पथिक
हो का...? :(
मी काही चांगल्या कविता पण टाकल्या आहेत. तिकडे पण आपली 'कृपादृष्टी' होऊ द्या :)
9 Sep 2016 - 2:06 pm | अनुप ढेरे
यावर आत्मुबुवा छान विडंबन पाडू शकतील. एकेकाचे जगणे
9 Sep 2016 - 6:04 pm | ज्योति अळवणी
भावना चांगली आहे... पण कविता नाही जमली....
12 Sep 2016 - 10:33 am | पथिक
हम्म. धन्यवाद ! अशी टीका अपेक्षित आहे. चूक सुधारायला मदत होते..
13 Sep 2016 - 1:17 am | निनाव
प्रिय पथिक, कविता छानच आहे. विषय अगदी वेगळा आहे, मा.ड्णि देखिल मुक्त आहे. प्रत्येक कविता मीटर मधेच असावी असा काही नियम नाही. लिहीत रहा. हे महत्वचे. मि.पा सर्वा.न्साठी आहे. मला देखिल मराठी टयपिन्ग नवीन आहे. वरील कवि / वाचक वर्गा.न्चे प्रतिसाद - केवळ सकारात्म्क घेणे. असे समजावे कि त्यअन्ना तुम्हा कडून अजून छान येणे अपेक्शित आहे. :) पुढिल लेखनास शुभेछा.
13 Sep 2016 - 1:09 pm | पथिक
धन्यवाद ! प्रतिसाद आवडला.
मी गुगल इनपुट टूल्स मध्ये टाईप करून मग इथे चिकटवतो. मलापण इथे टाईप करणे जमत नाही.