सल्ला हवा आहे

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in जनातलं, मनातलं
5 Sep 2016 - 2:27 pm

ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
(MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

तंत्रसल्ला

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

5 Sep 2016 - 2:40 pm | पाटीलभाऊ

MCM वाल्याना IT क्षेत्रात संधी आहे...पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही. IT मध्ये पगार जास्त असला तरी मानसिक तणाव जास्त असतो.
अजून एक, MCM होऊन ८-९ वर्ष झाली असली तरी IT मध्ये आल्यावर फ्रेशर म्हणूनच संधी मिळेल..जिथे सुरुवातीला पगार कमी असेल आणि स्ट्रगल फार करावं लागेल.

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2016 - 2:46 pm | मराठी कथालेखक

MCM ला करीअर संधी कमी आहेत हे खरेच. इतकं की आता course अनेक ठिकाणी बंद पडला आहे.
त्यामुळे पुर्वी ज्यांनी MCM करुन कमी पगाराची का होईना पण software क्षेत्रातली नोकरि मिळवण्याची धडपड केली ते यथावकाश गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात स्थिरावले. पण या मुलाने ८-९ वर्षे BPO मध्ये काम केलय. तिथून आता त्याला IT मध्ये संधी मिळणं कठीण आहे. शिवाय IT मधील अद्ययावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी त्याला पुन्हा काही कोर्सेस करावे लागतील. इतकं करुन त्याला IT मध्ये संधी मिळाली तरी पुन्हा पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी लागण्याचीच शक्यता खूप जास्त.
त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

गॅरी ट्रुमन's picture

5 Sep 2016 - 8:13 pm | गॅरी ट्रुमन

त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

८-९ वर्षांचा BPO मधील अनुभव म्हणजे वय ३० च्या आसपास असेल. या वयात MBA करण्यापूर्वी दोनदा विचार करावा असे सुचवेन. जर MBA चे कॉलेज चांगले मिळाले तर ठिक आहे अन्यथा दोन वर्षे पूर्णवेळ शिक्षण घेणे (म्हणजे त्या काळात नोकरी सोडावी लागणे) आणि MBA साठीची अवाच्या सव्वा फी भरणे तितक्या प्रमाणावर किफायतशीर राहिल की नाही ही शंका नक्कीच आहे. MBA पूर्ण होतान प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर काही लाखांचे कर्ज असते. हा विचार करता आणि मधली दोन वर्षे नोकरी नसणार हा विचार करता २० वरून किमान ५०-५५ पर्यंत उडी मारता येईल अशा MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला हवा. ८-९ वर्षे BPO मध्ये नोकरी केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये MBA ला प्रवेश मिळायची शक्यताही कमी होईल. आणि दुसरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर कोर्स पूर्ण होईपर्यंत ३२ वर्षे वय झाले असेल. जर कॉलेजमधील इतर विद्यार्थी २२-२३ वर्षांचे असतील तर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात आणि त्यामानाने अधिक वय असलेल्यांना मात्र निराशा येऊ शकते.

(वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजात गेलेला आणि ३२ व्या वर्षी MBA पूर्ण केलेला) गॅरी ट्रुमन

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2016 - 5:28 pm | मराठी कथालेखक

MBA part time करावं.
अर्थात MBA करुन मिळणारं ज्ञान महत्वाचं, part time MBA च्या certificate कडे बघून लगेच कुणी नोकरी / पदोन्नती देणार नाहीच.
शेवटी ज्ञान , आत्मविश्वास, skills (technical आणि soft) आणि हे सगळं प्रत्यक्ष कामात उतरवून परिणाम साधणे महत्वाचे, नुसत्या पदव्यांच्या कागदांनी करिअर घडत नाही

.

पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही..

सध्या काही कारणास्तव त्याला अधिक उत्पन्नाची आवश्यकता आहे,सध्या फक्त २० हजार पगार आहे त्याला , त्याने आता जर IT मधे प्रयत्न केले तर सध्या काय संधी मिळतील आणि आहे तीच नोकरी कंटिन्यू ठेवली तर पुढे फ्युचर मध्ये काही चांगल्या संधी मिळतील का ?
सॉरी मी फार प्रश्न विचारतेय पण मी आर्टस् ची असल्यामुळे मला IT क्षेत्रातली अक्षरशः शून्य माहिती आहे

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2016 - 3:17 pm | मराठी कथालेखक

वीस हजार आहे असे म्हणता तर , IT क्षेत्रात अगदी तितक्याच पगाराची जरी नोकरी मिळाली तरी त्याने ती संधी सोडू नये असं म्हणेन. IT मध्ये लवकरच चांगली प्रगती होवू शकते
फक्त त्याला स्वतःला आपल्या कौशल्यांबद्दल आत्मविश्वास असावा

कपिलमुनी's picture

5 Sep 2016 - 5:55 pm | कपिलमुनी

MCM या कोर्स चा मोठा झोल आहे .
या नंतर तुम्हाला मोठ्या कंपन्या घेत नाहीत .
शिक्षकी पेशात या नंतर नेट सेट , पी एच डी करता येत नाही त्यामुळे तिथेही वाट बंदच होते .

छोट्या कंपनीत नोकरी करून अनुभव आला की पुढे डीग्रीचा फार फरक पडत नाही .

माफ करा पण एक गोष्ट स्पष्ट विचारतो... तो मुलगा MCM झाल्याझाल्या BPO मध्ये नोकरी करू लागला का..?

उत्तर हो असे असल्यास - इतकी वर्षे BPO मध्ये नोकरी करून ९ वर्षांच्या अनुभववावरती एकच प्रमोशन (सिनीयर असोसिएट) आणि २० हजार रूपये पगार म्हणजे अगदीच अविश्वसनीय वाटत आहे. वेगळे काहीही न करता फक्त नोकरी टिकवूनही याहून जास्त प्रगती होणे अपेक्षीत आहे. नसल्यास कंपनी बदलणे अत्यावश्यक आहे. (यासाठीच धागा आहे याची जाणीव आहे)

उत्तर हो नसल्यास त्याने मध्ये आणखी वेगळ्या क्षेत्रात हातपाय मारले असल्यास तेही आवर्जुन लिहा.

९ वर्षांनंतर MCM च्या रेफरन्सने जॉब शोधणे थोडे अवघड आहे कारण ती टेक्नॉलॉजी आणि स्किल्स आज कितपत उपयोगी असतील याची कल्पना नाही... पण उपयोगी असल्यास त्या टेक्नॉलॉजीचे आजच्या काळात लागू असलेले एखादे सर्टिफिकेशन करणे गरजेचे आहे.

त्याचे आत्ताचे जॉब प्रोफाईल जर कळवलेत तर कोर्स सुचवायला आणखी मदत होईल.

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:46 pm | वाल्मिक

आता अवघड आहे
8-9 वर्षे झालीत
bpo मधेच सॉफ्टरे चे काम बघा

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2016 - 5:46 pm | मराठी कथालेखक

त्याला त्याच्या सद्यस्थितीचा असा विचार करता येईल.
१) मला पगार कमी का आहे ?
२) माझं काम अपेक्षित गुणवत्तेच नाही का ?
३) फक्त मलाच कमी आहे की माझ्या सोबत काम करणार्‍या साधारणपणे सारखेच काम करणार्‍या /अनुभव असणार्‍या व्यक्तीला माझ्याच कंपनीतल्या सहकार्‍याला माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ?
४) ३ चे उत्तर हो असे असेल तर त्याचा अर्थ माझे या कामात मन लागत नाही, किंवा मला या कामात गती नाही.
५) मी दुसरे कोणते काम केले तर त्यात माझे मन रमेल ?
६) असं दुसरं काम करण्याची संधी मला माझ्याच कंपनीत मिळवता येईल का ?
७) ६ चे उत्तर होकारार्थी असेल तर त्याने स्वतःच्या कंपनीत लगेच त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करावेत
८) ६ चे उत्तर नकारार्थी असेल तर त्याला दुसर्‍या कंपनीत नोकरी शोधावी लागेल पण कंपनी बदलताना कामाचे स्वरुप बदलणे कठीण असते. दुसरी कंपनी तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या कामाकरिता तुमच्यावर विश्वास दाखवू शकते पण पुर्णतः नवीन प्रकारच्या कामाकरिता (जे तुम्ही आधी केलेले नाही) तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवणे त्या कंपनीला शक्य नसते. मग अशा वेळी अधिक शिक्षणाची जोड देणे किंवा योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा आपल्याला हवी तशी संधी चालून येईल याची वाट बघणे हेच पर्याय राहतात
९) जर ३ चे उत्तर नकारार्थी असेल तर : याच क्षेत्रात , याच प्रकारचे पण दुसर्‍या कंपनीत काम करणार्‍यांना माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ?
१०) जर ९ चे उत्तर होकारार्थी असेल तर फक्त कंपनी बदलणे पुरेसे आहे. पण हे उत्तर होकारार्थी अस्ण्याची शक्य्रता तशी कमीच. जर हे उत्तर होकारार्थी असेल तर माझे अनेक सहकारी जॉब बदलत असतील, बदलल्ला असेल. ते कुठे जात आहेत ते कळालं की मी पण तिथे प्रयत्न करु शकतो.
११) माझ्या सध्याच्या जॉबमध्ये प्रगतीच्या काय संधी आहेत ? माझ्या मॅनेजरला किती पगार मिळतो ? तो काय काम करतो ? मला मॅनेजर बनायला किती काळ लागेल ? त्याकरिता काय कौशल्ये शिकावी लागतील ?

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 2:46 am | अभिजीत अवलिया

MCM होऊन ८-९ वर्ष झालीत म्हणजे आता त्यांना काही संधी मिळेल आय.टी. मधे असे मला वाटत नाही.

फक्त नोकरीच करायची आहे का दुसरे काही करायची तयारी आहे ?

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 3:59 am | पिलीयन रायडर

ताजा कलमः-

मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.

आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!

बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

Modak

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 4:00 am | पिलीयन रायडर

अरे हे इथे कुठुन आलं!!!!

प्लिझ हे उडवा!

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी

ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
(MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

त्याला संगणक क्षेत्रातील नक्की कोणत्या विषयांचा अनुभव आहे/होता हे स्पष्ट नाही. त्याला जावा, सी++, एचटीएमएल इ. भाषांचे ज्ञान/अनुभव आहे का? डाटाबेसचा अनुभव आहे का?

खालील पर्यायांवर विचार करता येईल.

१) मोठ्या आयटी कंपनीत संधी मिळणे खूप अवघड आहे. त्याऐवजी अगदी लहान कंपनीत संधी मिळू शकते. त्यासाठी एखाद्या प्लेसमेंट कंपनीकडून प्रयत्न करावा.

२) तो बीपीओ मध्ये कोणत्या बिझनेस डोमेन मध्ये काम करीत आहे (फायनान्स, एअरलाईन, इन्शुरन्स इ.)? या डोमेनमध्ये त्याला इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासारख्या संस्थातून बहि:स्थ एमबीए करून नंतर बिझनेस अ‍ॅनालिस्ट होता येऊ शकेल.

३) सीड किंवा एखाद्या तत्सम प्रशिक्षण संस्थेतून वेबसाईट तयार करणे, वेबपेज डिझाईन इ. शिकून त्याच क्षेत्रात पुढे काही तरी करता येईल.

४) एखाद्या प्रशिक्षण संस्थेतून सर्टीफाईड क्वालिटी अ‍ॅडव्हायझरची परीक्षा पास करून क्वालिटी ऑडीट या क्षेत्रात प्रवेश करता येईल. सर्व आयटी व बीपीओ कंपन्यांना नियमित क्वालिटी ऑडीट करणे हे सक्तीचे असते. त्यामुळे या क्षेत्राला मरण नाही.

५) बीपीओतील अनुभवाचा फायदा घेऊन या क्षेत्रात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या नवोदितांना या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू करता येईल.

चंपाबाई's picture

10 Sep 2016 - 10:52 pm | चंपाबाई

तो बीपीओत असला तरी प्रोफाइल कस्टमर केअरचा आहे... म्हणजे त्याचे मूलभूत क्षेत्र कस्टमर केअर आहे.... बीपीओच्या टेक्निकल वर्कशी प्रत्यक्ष सहभाग नसेल असे वाटते... मग बीपीओत पुढची पोस्त कशी मिळेल ?