गेल्या २-३ महिन्यात बर्फ आणि थंडिमुळे आमचे पळायला जाणे बंद झाले.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा ह्या न्यायाने आमच्या सर्व तुमानी आम्हाला घट्ट व्हायला लागल्या. याच सुमारास आमच्या बिनतारी मित्राचा आमी कापड का घाल्तो ह्या गहन विषयावरचा आत्मपरिक्षणात्मक लेख वाचनात आला. तेव्हापासून पी. सावळाराम यांचे घट डोईवर घट कमरेवर,हे गाणे आम्ही काही केल्या सरळ म्हणू शकलो तर शप्पथ....
घट पोटावर घट कमरेवर,
तुमान सार्या , केशवाला, केशवाला रे
नवीन मी घेईल लुज बी होईल
कोण त्यावर बेल्ट हा लाविल,
वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे
उठता बसता, बटन निखळता
पोष्ट हपिस अन उघडे पडता
ओढून घेई सदर्याला, सदर्याला रे
केलीस खोडी, नको एवढी
जोवर हसते मनात गोडी
कुणीतरी सांगा ह्या मेल्याला, ह्या "केश्या"ला रे
केशवसुमार
प्रतिक्रिया
1 Feb 2009 - 10:07 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
- (कर्गुट्यावाला) टिंग्या
1 Feb 2009 - 10:08 pm | प्राजु
तुमचा हा उपक्रम मात्र आवडला मला. करंट इश्यूज वर धडाधड... फटाके फोडायचे काम .. मस्तच!
काव्य आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Feb 2009 - 10:19 pm | आनंदयात्री
वेगळा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन !!
सॉरी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
1 Feb 2009 - 10:22 pm | केशवसुमार
आणि शेम टू यू..
(शेमटूशेम्)केशवसुमार
1 Feb 2009 - 10:24 pm | ब्रिटिश टिंग्या
तुझ्यासाठी हा वेगळा विषय आहे का ;)
- टिंग्या
1 Feb 2009 - 10:27 pm | आनंदयात्री
हा प्रतिसाद व्यक्तिगत टिका करणारा आहे याची कृपया संपादकांनी नोंद घ्यावी !!
;)
1 Feb 2009 - 10:35 pm | टारझन
आणंदयात्री यांणी हा प्रतिसाद आणंदयात्रींकडूणच ढापलेला आहे .. ह्या चौर्यकर्माबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि जाहिर णिशेद ..
आणंदयात्री यांनी ह्या चोरीविशयी एखादा जाहीर लेख पाडावा . .. . . .
अवांतर : केसूभाऊ ... २ महिण्यात प्यांटा (पँटी णव्हे .. ) फिट व्हायला लागल्या ? आहो कसला रेट आहे जबरदस्त .. झबरा इडंबण
- माशीराम आग्रवाल
आम्हाला दागिणे घालण्यात णव्हे .. उतरवण्यार इंटरेस्ट आहे
1 Feb 2009 - 10:39 pm | आनंदयात्री
>>- माशीराम आग्रवाल
=)) =)) =))
2 Feb 2009 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झ्याक विडंबन आणि एक लंबर प्रतिसाद! =))
केशवसुमार, या विडंबनाबद्दल आपले नाव 'सा. पिवळाराम' ठेवावे का?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
2 Feb 2009 - 12:27 pm | आनंदयात्री
धो. पिवळाराम जास्त शोभुन दिसेल :)
2 Feb 2009 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे
सा
रे
ग
म
प
ध
.
पिवळाराम
हॅ ह हॅ आपन काय बोल्लो नाय हां
प्रकाश घाटपांडे
1 Feb 2009 - 10:19 pm | अवलिया
केसुशेठ...
लै भारी .... आवडले.
--अवलिया
1 Feb 2009 - 11:29 pm | चतुरंग
नवीन मी घेईल लुज बी होईल
कोण त्यावर बेल्ट हा लाविल,
वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे
हे जबराच!
(खुद के साथ बातां : रंग्या, केश्याच्या मापाचे कर्गुटे मिळणं कधी बरं बंद झालं असेल? :? )
चतुरंग
2 Feb 2009 - 12:20 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
अजून बंद नाही झाले..अता एक हात/वार हे माप कमी पडते ती गोष्ट सोडा.. अता रीळ आणावा लागतो..
केशवसुमार
1 Feb 2009 - 11:41 pm | लिखाळ
मस्त विडंबन :)
इलॅस्टिक वापरा इस्त्री करु नका :)
-- लिखाळ.
2 Feb 2009 - 5:35 pm | केशवसुमार
प्रतिसाद, अवांतर प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार
5 Jan 2011 - 6:46 pm | सूड
हे ही छानच !!