कळलेच नाही मन
गेले हळूच गुंतुन
साध्यासुध्या डोळ्यांनीही
नेले कधी भुलावून
तुझ्या श्यामल रंगाचे
झाले डोळ्यात आभाळ
आणि तुझ्या नावानेच
ओठ विलगे सकाळ
तुझ्या पाहण्याने फ़ुले
येती अंगांगी फ़ुलुन
तुझ्यासाठी नजरेत
मीही बहर तोलून
असे मोकळे हसुन
जाशी सहज निघोन
ईथे काळ्जाच्या माझ्या
ठोका जातो ना चुकून
३१.०१.०९
प्रतिक्रिया
31 Jan 2009 - 2:46 pm | दशानन
छान छान !
**
मिपावर काय नवकवींनी हल्ला बोल चालू केला आहे काय :? पाच मिनिटात चार कविता ... बापरे !
नाय नाय तुमचं चालू द्या.. आमचं हे असंच असंत कधी मधी धडपडतो आम्ही ! आम्ही आहोत प्रतिसाद देण्यासाठी, चालू द्या.
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -