हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920
हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944
हरवलेलं विश्व (भाग ५): http://www.misalpav.com/node/36968
भाग ६
वातावरणातला गारवा आणि रात्र होत आल्यामुळे असेल पण गावतली थांबलेली वर्दळ यामुळे एकुण परिसर गूढ़ वाटत होता. मंदिर दिसायला लागल. योगानने राजेशला गाडी मंदिराच्या मुख्य द्वारापासून दहा-बारां फुट लांब थांबवायला सांगितली. वातावरणाच्या परिणामामुळे असेल पण राजेशनेही शांत झाला होता; त्यामुळे कुठलाही वाद न घालता त्याने योगानने सांगितल्या प्रमाणे गाडी थांबवाली. त्या परिसरात कमालीची शांतता होती. जयूला बोचऱ्या थंडीबरोबरच अंधारातली ही बोचरी शांतता देखील क्षणभर अस्वस्थ करून गेली. योगान गाडीतून उतरला आणि त्याने जयुला देखील गाडीतून उतरण्याची विनंती खुणेनेच केली. जयु उतरली आणि तिच्या मागोमाग राजेशदेखिल. पुढे योगान त्याच्या मागून जयु आणि थोड़ अंतर राखून आजु-बाजुचा अंदाज घेत राजेश असे चालत मंदिराच्या आवारात पोहोचले.
आवार अत्यंत स्वछ होते. वाळवंटी भाग असल्याने झाड़ा-रोपट्यांचा प्रश्नच नव्हता. पण रेती-वाळू इतकी होती आजू-बाजूला की खर तर हे मंदिर अर्ध वाळूत बुडालेलं असायला हव होत. पण मंदिराचा हा तटबंदीच्या आतला भाग मुद्दाम काळजी घेतल्या सारखा स्वछ होता. जयूने काही विचारायच्या आतच योगान म्हणाला,"कमाल आहे? इथे कधी कोणाला येताना मी पाहिलेल नाही. तरीही हे आवार कायमच इतके स्वछ कसे कोण जाणे?" जयु मग काहीच बोलली नाही. राजेश फ़क्त एक एक कोपरा निरखत होता. त्याने शब्द दिल्याप्रमाणे आपले तोंड बंद ठेवले होते. योगान आता अगदी हलक्या आवाजात जयुला मंदिराच्या आवारातल्या मूर्तिंची आणि त्यात चितारलेल्या मोहफिसा गावाची माहिती देत होता. जयु योगानच बोलण एकत होती आणि एक एक sculpture बघत पुढे जात होती. हळूहळू आवाराच्या भिंतीपासून सरकत ते दोघे मंदिराच्या पाय-यांपाशी पोहोचले.
जयुला मंदिर आणि त्याचा गाभारा बघायची उर्मि थांबू देईना. योगान आणि राजेशच्या लक्षात यायच्या आत भराभर पायऱ्या चढून तिने मंदिराच्या मंडपात प्रवेश देखील केला. तिची घाई बघुन योगान थोड़ा मंदावला; पण राजेशमात्र सावली सारखा तिच्या मागे धावला. राजेश मंडपात पोहोचला तेव्हा जयु मंडपाच्या मध्यावर असणाऱ्या मोठ्या दगडी समईपाशी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होत. जणुकाही ती कोणाचतरी बोलण मन लाउन एकत होती. राजेशने तिच्या दिशेने पाऊल उचलले. पण जयु मात्र एखाद्या तंद्रीत असल्याप्रमाणे गाभारा ज्या दिशेने होता त्याच्या एका कोप-याकडे निघाली. तिची चाल बदलली होती. अगोदरच मोहक आणि तरीही भारदस्त असलेली तिची चाल आता एखाद्या सिहिणीसारखी वाटत होती. ती ज्या कोप-याच्या दिशेने निघाली ते पाहुन राजेशला आश्चर्य वाटले. तोहि तिच्या मागून निघाला. आता योगान मात्र थोड़ा पाठीच थांबला होता. जवळ जवळ मंडपाच्या पायऱ्याजवळच म्हणाना!
राजेशच्या अचानक लक्षात आल की जयु ट्रांसमधे गेली होती. ती त्या कोप-यातही कोणाशी तरी बोलत होती. आणि मग तिचे निळे डोळे चमकू लागले. ती धिम्या गतीने गाभाऱ्याच्या दिशेने निघाली. आता मात्र राजेश तिला अडवण्यासाठी पुढे झाला; पण मागून योगानने त्याला अडवले.
त्याने कुजबुजत्या आवाजात राजेशला म्हंटले;"मी तुला ओळखले आहे राजेश. मात्र आता तिला थांबवू नकोस. मला वाटलं होत की तुला बघून तिला काहीतरी आठवेल. पण मी पूर्ण कथा सांगितली तरी तिची अलिप्तता कमी झाली नव्हती. अर्थात मला खात्री होती की मंदिरात आल्यानंतर मात्र तिला सर्व आठवेल. आपण दोघेही युगांतरां मागून युगांतर थांबलो आहोत. मला हे कळत नाही की तिची मुख्य भूमिका असूनही ती कशी या फेऱ्यातून सुटली? आता मात्र मला सुटका हवी आहे. सर्वात महत्वाच् म्हणजे यावेळी तिला आठवण करुन द्यायची गरज पडलेली नाही.... मागील एका जन्मात तिला इथपर्यंत आणूनही तिला काही आठवले नव्हते; आणि कशी कोण जाणे ती इथून निघूनही गेली होती. पण आता नाही......" योगानच्या हातातला हात सोडवत राजेश म्हणाला;"तू चुकतो आहेस. ती जेसा नाही जयश्री आहे..." आणि तो तिला थांबवायला पुढे झेपावला.
त्याला एका झेपेत धरून मागे खेचत योगान मोठ्याने म्हणाला;"रियो.... अस करू नकोस. नासरा... माझी आई.... गेली अनेक युग सुटकेसाठी तड़पते आहे. मला तिने दिलेल्या जन्माच कर्ज उतरवायची ही शेवटची संधि आहे."
योगानच्या मोठ्याने बोलण्याचा परिणाम जयुवर होईल या आशेने राजेशने योगानच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत जयुकडे बघितले.
पण जयु आपल्याच तंद्रित चालत गाभाऱ्याच्या दारापर्यंत पोहोचली होती. तिने दाराला स्पर्श केला मात्र दार आपोआप सत्ताड उघडले.
आता मात्र न राहून राजेश मोठ्याने ओरडला,"जेसा नको जाऊस आत. अस मला एकट्याला सोडून परत कायमच दूर नको जाउस."
जयूने मागे वळून बघितले. तिच्या चेहे-यावर मंद स्मित होते. ती म्हणाली;"रियो काळजी करू नकोस. मला सर्व आठवलं आहे आणि यावेळी मी नक्की बाहेर येणार आहे. तुला काय वाटल मी गुंगीत आहे? अह! नाही केरोहच्या मुला मी तुला ओळखल होत तुझ्या घरी असतानाच. मी झोपले होते त्यावेळी स्वप्नात येऊन केरोहने.... माझ्या प्रिय भावाने.... मला सर्व सांगितल. रियो तू केरोहच्या मुलाचा चांगला सांभाळ केलास. त्याला राज्यकारभार सुपुर्द करताना त्याच्या आईची गोष्टसुद्धा सांगितलिस. तुझी इच्छा होती की त्याने त्याच्या आईचा द्वैष करावा. पण रियो मातेचा द्वेष कधी कोणी करू शकल आहे का? मला नासरावर खूप राग होता. तो तिने माझ्या भावाला धोका दिला म्हणून. पण आता आज मी आत गाभाऱ्यात जाते आहे ते वेगळ्या भावनेने. नासराने तिच्या वाटणीची शिक्षा भोगली आहे... कदाचित माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच! त्यामुळे आता मला तिच्याबद्दल काहीच भावना मनात नाही. रियो...... त्यामुळे मला खात्री आहे की मी नक्की बाहेर येणार आहे. माझी वाट बघ..." आणि एक क्षण थांबून तिने हसत विचारले;"थांबशील न माझ्यासाठी?"
डोळ्यातून वाहणा-या पाण्याची पर्वा न करता रियो म्हणाला;"जगाच्या अंतापर्यंत आणि त्यानंतरही जेसा." आणि जमिनीवर कोसळला.
जेसाने त्या दोघांकड़े पाठ केली आणि गाभाऱ्यात पाऊल ठेवले. ती आत जाताच दार आपोआप बंद झाले.
दरवाजा मागे बंद झाला आणि अचानक आतले पलिते आग ओकु लागले. जेसा एक एक पाऊल पुढे सरकत होती. अचानक आतून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. जेसा क्षणभर थबकली आणि तिने पुढे जाण्यासाठी परत पाऊल उचलले.
त्याक्षणी समोरून तिच्या दिशेने आगीचा एक गोळा जोरात आला. जेसाने तो चुकवला. मात्र ती जागीच उभी राहिली. काही क्षण वाट बघुन तिने मोठ्याने हाक मारली;"नासरा! लपून काय वार करतेस? हिम्मत असेल तर समोर ये. ही पहा मी जेसा... केरोहची बहिण.... तुझ्यासाठी इथे आले आहे."
त्यावर पुन्हा एक हिंस्त्र हास्याची लेकर आसमंतात घुमली आणि एक रखरखित पण स्त्रिचाच वाटेल असा आवाज गाभाऱ्यात घुमला;"माझी हिम्मत विचारतेस तू? विसरलीस मी तुला माझ्याबरोबरीने तूच रचलेल्या सापळ्यात कसे अडकवले आहे?"
"नासरा तू ज्या सापळ्याची वल्गना करते आहेस ती घटना अनेक युगांपूर्वी घडून गेली आहे." जेसाच्या या वक्तव्याचा योग्य तोच परिणाम झाला.
एक दुष्ट सन्नाटा पसरला. पलित्यांचा उजेड मंदावला आणि आतून कोणीतरी चालत येत आहे हे जेसाच्या लक्षात आले; आणि हळूहळू चालत संपूर्ण काळ्या वेशातील नासरा जेसाच्या समोर येऊन उभी राहिली.
नासरा आजही अप्रतिम लावण्याती प्रमाणे दिसत होती. तिचा कमनीय बांधा त्या काळ्या वस्त्रांमधून देखील जाणवत होता. मात्र जेसाला प्रत्यक्ष बघताच नासराच्या मस्तकात तिड़ीक गेली. तिने अचानक जेसावर हल्ला केला. तिने जेसाला जमिनीवर पाडले आणि तिच्या अंगावर बसून तिला मारण्यासाठी नासराने कपडयाच्या घोळात लपवलेला खंजीर बाहेर काढला. परंतु जेसा सावध होती. तिने नासराला जोरात ढकलुन दिले. नासराला हे अनपेक्षित होते. तिचा तिच्या शक्तिवर चांगलाच विश्वास होता. ती अचानक दूर जाऊन एका रिंगणात पडली. जेसाने चपळपणे त्या रिंगणाच्या चारही बाजूने पालित्याच्या सहाय्याने अग्नि प्रज्वलित केला. नासरा त्या रिंगणात अडकली. ती एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे फुत्कारत आत गोल गोल फिरू लागली. नासरा जणुकाही डोळ्यातून आग ओकत होती.
जेसा आता नासराच्या समोर शांतपणे हाताची घडी घालून उभी राहिली. "नासरा... या अग्नी रिंगणात तुला अडकवायची इच्छा मला तेव्हाच होती. मात्र ते करण मला आज जमलं. मात्र तू तेव्हाही चुकीची होतिस आणि आजही चूक करते आहेस. त्यावेळी केवळ आणि केवळ राज्याच्या हव्यसापाई तू अनेक आयुष्य उध्वस्त केलीस. काय मिळवलस तू अस करुन?" जेसाने तिला अधिकार वाणीने विचारले.
"केवळ राज्य हव्यास? नाही जेसा. केरोहवर मी प्रेम कधीच केल नाही हे खर आहे; पण मी हृदयशून्य नाही. मी प्रेम केल.... अगदी मनापासून! रियोवर माझा जीव होता. मी अनेकदा त्याच्याकडे माझ प्रेम व्यक्त केल होत. पण त्याने कधीच माझी दखल घेतली नाही. केवळ रियोच्या जवळ राहाता याव म्हणून मी केरोहशी विवाह केला. त्यानंतर मी रियोला भेटले; परंतु तो म्हणाला की मी दुसऱ्याची पत्नी आहे. त्यामुळे तो माझा विचारही करणार नाही. म्हणून मी केरोहला आमच्या दोघांच्या मधून दूर केल. हो.... तुझ्या भावाला मी थोड़ थोड़ विष देऊन मारल. केरोह मेला तरीही रियो माझ्याकडे बघायला तयार नव्हता. मग मात्र अचानक त्याने माझ्या विवाह प्रस्तावाला होकार दिला. माझी पक्की खात्री होती की रियोला राज्यकारभाराचा मोह नाही. मग त्याने माझा प्रस्ताव कसा काय मान्य केला; हा प्रश्न मला सारखा भेड़सावत होता. आणि मग माझ्या लक्षात आल की रियो तुझ्या इशाऱ्यांवर नाचतो आहे; तेव्हा मात्र माझ्या मनात तुझ्याबद्दल द्वेष निर्माण झाला. तू असल्यानेच तो माझा होत नव्हता. म्हणून मग मी या मंदिरात येण्याचे मान्य केले. मला खात्री होती की मी घाबरते आहे आणि गाभाऱ्यात जाण्याचे टाळते आहे हे लक्षात आल की तू नक्की मला काही काळ सोबत करशील. मी ठरवले होते की तेव्हाच मी तुझा काटा काढिन. मग मात्र माझा रियो फ़क्त माझाच राहिला असता. ठरल्याप्रमाणे मी तुझ्याबरोबर गाभाऱ्यात प्रवेश केला. मी येतानाच् तो खंजीर लपवून आणला होता. त्यामुळे तू सावध होण्याच्या आत मी मागून तुला धरले आणि खंजीर तुझ्या मानेत खुपसणार होते; तेवढ्यात तू स्वतःची सुटका करुन घेतलीस आणि आत पळालीस्. मी तुला शोधायचा प्रयत्न केला पण हे मंदिर तूच बांधल असल्याने तुला इथली खडानखड़ा माहिती होती. त्यामुळे तू माझ्या हातात आली नाहीस. म्हणून मग मी या दाराजवळच ठिय्या दिला. कारण बाहेर जायचे तर तुला इथे येणे गरजेचे होते याची मला जाणीव होती." रागाने फुत्कारत नासरा बोलली.
जेसा आश्चर्यचकित होऊन नासराची कहाणी एकत होती. केवळ एका पुरुषाला प्राप्त करण्यासाठी नासराने हा प्रयत्न केला आहे हे समजल्यावर तर तिला नासराची घृणा वाटू लागली.
पण मग तिने स्वतःला सावरले. शांत होत तिने केरोहने स्वप्नात येऊन काय सांगितले ते आठवले.
......केरोह जयूच्या स्वप्नात आला होता. त्यानेच जयूला आठवण करून दिली होती की ती पूर्व काळातली जेसा आहे. मग तिचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि तिला म्हणाला होता की फक्त नासरा मोह्फिसाच्या मंदिरात आणि रियो मंदिरा बाहेर नाही तर... त्याचा मुलगा देखील गेले अनेक जन्म या प्रेम-द्वेष भावनांच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांची सुटका फ़क्त आणि फ़क्त जेसा.... म्हणजे आताची जयु करू शकते.
केरोह म्हणाला होता;"जेसा.... तू माझ्या मृत्युचा बदला घेण्यासाठी नासराला अद्दल घडवणार होतीस. पण त्यावेळी तू नासरापासून सुटलीस. तू आतल्या दिशेने पळालीस. तू एका कामगाराला विश्वासात घेऊन गाभाऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी एक सुरुंग बनवला होतास. तू पळालीस् ते थेट त्या गुप्त सुरुंगात शिरलिस.तू त्या कामगाराला तो सुरुंग राजवाड्याच्या कोठगारात उघडायला सांगितले होतेस. परंतु त्या कामगाराला ते काम करणे जमले नव्हते. तू शिक्षा करशील या भितीने त्याने तुला हे सांगितले देखील नव्हते. हा सुरुंग कोणालाही कळू नये म्हणून तू त्याची कल्पना देखील कोणालाही दिली नव्हतीस. अगैद रियोला देखील नाही. त्यामुळे मग तू आतच हरवून गेलीस. त्यातच तुझा अंत झाला. अर्थात तुला नासरावर माझ्या मृत्यूचा सूड उगवायचा होता. तू जरी आत अडकलीस तरी नासरादेखील आत अडकली आहे; हे समाधान तुझ्या मनात होत. त्यामुळे तुझ्या अंत समई तुझ्या मनातला नासराबद्दलचा राग, द्वेष निघुन गेला होता. त्यामुळे तुला मुक्ति मिळाली.
मात्र रियो आणि माझा मुलगा या भावनांच्या जाळ्यातून सुटू शकले नाहीत. त्यामुळेच ते प्रत्येक जन्मात मागिल जन्माच्या आठवणी घेऊन येत आहेत. नासरा तर आत मंदिराच्या गाभाऱ्याच्या द्वारापाशी तुझी वाट बघत युगानुयुग बसलीच आहे.या अगोदरच्या काही जन्मांमद्धे योगान किंवा राजेश यांनी तुला या मंदिरात आणण्याचा प्रयत्न केला होता. पण ओसिरिसने................. मृत्यूच्या देवतेने.... नासरासाठी ठरवलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या प्रयत्नाना यश येणे शक्य नव्हते. आता मात्र नासराच्या मुक्तिची वेळ आली आहे. तेव्हा तिला तू माफ़ कर आणि यातून मुक्त कर." केरोह एवढे सांगून नाहीसा झाला होता आणि जयू स्वप्नातून जागी झाली होती.
.............. आता परत जेसाने नासराच्या त्या अस्वस्थ आत्म्याकडे एकदा पाहिले आणि मग तिने डोळे बंद करुन ओसिरिसची प्रार्थना सुरु केली. नासराचे फुत्कार वाढले; तिचा अस्वास्थपणा देखील वाढला. वातावरण तप्त होऊ लागले. त्यात नासराचा आत्मा अस्वस्थ झाला.
परंतु जेसा शांतपणे डोळे मिटुन प्रार्थना करत होती. आणि एक क्षण असा आला की नासराला मुक्तीचे द्वार उघडले. आता नासरापुढे दोन पर्याय होते. मुक्तीच्या द्वाराचा स्वीकार करावा किंवा परत जेसाचा द्वेष मनात जागा ठेऊन जेसाला युद्धाचे आमंत्रण द्यावे.नास्राने मनोमन निर्णय घेतला आणि तिने मुक्तीच्या द्वाराच्या दिशेने धाव घेतली................ जयूने डोळे उघडले होते. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते.
जाता जाता नासराने मागे वळून पाहिले आणि तिने जयुला एकच विनंती केली. "माझ्या मुलाने अनेक जन्म केवळ मला मुक्ति मिळावी म्हणून त्रास सहन केला आहे. त्याला कृपा करुन कधी कळू देऊ नकोस की मी माझ्या प्रेमापुढे त्याचाहि विचार केला नव्हता. तो पुरुष आहे... एकवेळ राज्याच्या हव्यासापाई मी हे सर्व केलं हे तो स्वीकारेल परंतु प्रेमासाठी मी हे आततायी पाउल उचलले या विचाराने तो माझा द्वेष करेल. आता मुक्ति मिळत असताना मला हे दु:ख नाही बरोबर न्यायचं."
जयूने हसून होकारार्थी मान डोलावली आणि नासराची आकृति धूसर होत नाहीशी झाली. जयु वळून दाराच्या दिशेने आली आणि अगदी सहज नेहेमीच्या सवयिच असल्याप्रमाणे तिने उजव्या बाजूची एक कळ दाबली. दार उघडले गेले आणि जयूने बाहेरच्या मंडपात पाऊल टाकले.
योगानला डुलकी लागली होती. मात्र राजेश गाभाऱ्याच्या दाराकडे डोळे लावून बसला होता. तो पटकन उठून जयुकडे आला.
"जेसा... माझी जेसा!" तिचे दोन्ही हात हातात घेत राजेश म्हणाला.
त्याच्या हातातून हात सोडवून घेत जयु म्हणाली;"नाही रियो.... जेसा कधीच पंचत्वात् विलीन झाली आहे युग झाली त्याला. मी जयश्री आहे. माझ्या विजयची आणि माझ्या दोन लाहानग्या बाळांची."
वास्तवाच भान येऊन राजेशने तिचा हात सोडला आणि तो पटकन चेहेरा फिरवून गाडीच्या दिशेने वळला.
जयूने योगानला हाक मारली. तो दचकुन जागा झाला. गाभाऱ्याच्या उघड्या दाराकडे पहाताच त्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. त्याने जयु समोर हात जोडले.
त्याला उठावून हसत हसत जयु गाडीच्या दिशेने निघाली.
प्रतिक्रिया
15 Aug 2016 - 6:49 pm | एस
वा. अप्रतिम! प्रचंड आवडली कथा. जियो!
15 Aug 2016 - 7:54 pm | रातराणी
कथा आवडली.
15 Aug 2016 - 9:52 pm | अमितदादा
शेवटचा भाग अप्रतिम...
15 Aug 2016 - 10:28 pm | पैसा
कथा खूप आवडली!
15 Aug 2016 - 11:37 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद
16 Aug 2016 - 12:09 am | अनन्त अवधुत
कथा खूप आवडली!
16 Aug 2016 - 12:16 am | राघवेंद्र
कथा खूप आवडली!!
16 Aug 2016 - 8:39 am | योगेश कोकरे
कथेच्या सुरवातीला पुनर्जन्मांचा थोडं विचार आला होता. खूप छान जमलीय कथा लिहायला .शेवट पण मस्त झालाय.
16 Aug 2016 - 8:43 am | असंका
सुरेख!!
धन्यवाद...!!
16 Aug 2016 - 9:01 am | स्मिता_१३
छान कथा !!
16 Aug 2016 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम... ह्या भागाने तर अक्षरशः खिळवुन ठेवले.
पैजारबुवा,
16 Aug 2016 - 9:55 am | संत घोडेकर
सुंदर कथामालिका.
16 Aug 2016 - 11:57 am | सुमेधा पिट्कर
अप्रतिम लिखाण, ह्या भागाने तर अक्षरशः खिळवुन ठेवले.
16 Aug 2016 - 12:11 pm | नीलमोहर
कथा छानच जमलीय. पुलेशु.
16 Aug 2016 - 1:59 pm | ज्योति अळवणी
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
16 Aug 2016 - 5:50 pm | Jayanti
जबरीच.. आज सलग सगळे भाग वाचून काढले
16 Aug 2016 - 6:20 pm | पद्मावति
अप्रतिम जमलीय कथा. सुंदर.
16 Aug 2016 - 6:28 pm | जगप्रवासी
अप्रतिम
16 Aug 2016 - 7:02 pm | अभ्या..
छान जमलीय. एकदम आवडली.
16 Aug 2016 - 9:23 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद.... पुढील कथा थोडी वेगळी असेल. आपण सर्व जरूर वाचा आणि आपले मत कळवा.
16 Aug 2016 - 10:36 pm | आनन्दा
मस्त जमली आहे कथा.
पुलेशु.
16 Aug 2016 - 11:23 pm | फुंटी
वरचा दर्जा
17 Aug 2016 - 12:02 am | ५० फक्त
सगळे भाग एकदमच वाचले, खुप सुसंगत लिहिलंय, छान एकदम.
18 Aug 2016 - 3:52 pm | राजाभाउ
सगळे भाग एकदमच वाचले. अतिशय सुंदर कथानक. मस्त खिळवून टाकणार. मस्त शैली आहे.
पुलेशु.
19 Aug 2016 - 8:56 am | नाखु
सहमत..
चांगला विषय आणि रोमांचक मांडणी...
18 Aug 2016 - 10:34 pm | टवाळ कार्टा
भारी :)
19 Aug 2016 - 7:51 pm | डश
छान जमलीय कथा
23 Aug 2016 - 5:55 am | रुपी
मस्त.. कथा छान गुंफली आहे. खूप आवडली.
24 Aug 2016 - 12:21 pm | सपे-पुणे-३०
छान ! कथा आवडली.
24 Aug 2016 - 1:08 pm | gogglya
बदलतोय.
इथे भुयार हा शब्द चपखल बसेल. हिंदी मध्ये सुरंग असे म्हणतात. सुरुंग म्हणजे स्फोटक जे विहिर खणताना वगैरे वापरतात.
24 Aug 2016 - 2:28 pm | क्षमस्व
फर्स्ट क्लास।
नारायण धारपांची आठवण झाली।।
9 Sep 2016 - 11:16 am | टर्मीनेटर
खूप छान गूढकथा... सुहास शिरवळकरांच्या 'सनसनाटी' कादंबरी ची आठवण झाली....