आयुष्य

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
14 Aug 2016 - 9:05 am

आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट
गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट
कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती
कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती
आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं
फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं
निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं
सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं

- अभिषेक पांचाळ

कविता

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

14 Aug 2016 - 10:02 am | सतिश गावडे

जीवनावर धीरगंभीर भाष्य करणारी कविता आवडली.
पुलेशु. वाखुसाआ.