हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920
हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944
भाग ५
"मॅडम आपण पोहोचलो आहोत." अचानक करकचुन ब्रेक मारत राजेश म्हणाला.
जयु योगानच्या त्या गोष्टीत; किंबहुना रियोच्या दुःखात इतकी गुंतली होती की लागलेल्या ब्रेकमुळे ती एकदम धड़पडली. ती मागच्या सीटवर मांडी घालून बसली होती; त्यामुळे तिचा थोड़ा तोल गेला.
"अरे राजेश किती जोरात ब्रेक मारलास. पडले असते ना मी दोन सीट्सच्या मधे." तिने वैतागुन राजेशला झापले. आणि अस बोलत असतानाच तिचे लक्ष समोर गेले. आता संध्याकाळ व्हायची वेळ झाली होती. त्यामुळे उन्ह उतरायला लागली होती; आणि सूर्य किरणांचा लालसर सोनेरी वर्ख ल्यायलेली चून्याने रंगवलेली पांढरीशुभ्र टुमदार घरं समोरच्या लहानशा दरीत खूप सुंदर दिसत होती. जणूकाही एक शिल्प उभं होत तिच्या डोळ्यांसमोर. जयु गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आली आणि तो नयनरम्य देखावा अनामिश नेत्रानी पाहू लागली. एक अनामिक ओढ वाटायला लागली तिला त्या गावाबद्दल. त्यामुळे तिची काही मिनिट तशीच समाधी लागलेल्या अवस्थेत गेली. आणि मग तिच्या लक्षात आले की गाडीत योगान आणि राजेशची परत जूंपली आहे. ती वळून परत गाड़ीकडे आली.
"आता तर आपण पोहोचलो न? मग आता काय वाद चालु आहे?" तिने आवाज थोड़ा चढवत दोघांनाही विचारले.
"जयश्री आपण अजुन गावात नाही पोहोचलो. त्यापुढे ओसिरिसच मंदिर आहे. किमान अजुन अर्ध्या तासाचा प्रवास. तरी याने गाडी इथेच थांबवाली. वर म्हणतो माझ एकणार नाही. तुम्हीच बघा काय ते." योगान वैतागत म्हणाला.
जयुला आश्चर्य वाटल. "अजुन पुढे जायच आहे का? अरे राजेश मग इथे का थांबवालीस गाडी?" तिने राजेशला विचारल.
"मॅडम अहो आता आपण दरीत उतरणार. मग गाव आणि मग मंदिर. म्हणजे आपल्याला उशीर होणार. कदाचित् आज परत नाही फिरणार आपण. जर तुमचा contact तुमच्या आपल्या माणसांशी नाही झाला तर तुमच्या घरचे काळजी नाही का करणार? मला माहित आहे आपलं माणूस आपल्या संपर्कात नसण किती त्रासदायक असत." अस म्हणून तो क्षणभर शांत झाला आणि मग पुढे म्हणाला,"गाव दरीत आहे. तिथे range नाही mobileची. म्हणून म्हंटल तुम्ही एकदा तुमच्या घरच्यांशी बोलून घ्या मग जाऊ पुढे. आणि त्यात तुमचा विचार बदलला आणि जायचं नाही अस तुम्ही ठरवलत तर इथूनच मागे फिरुया...." अस म्हणून त्याने जायुकडे बघितलं. तिची वैतागलेली नजर पाहून मात्र तो म्हणाला, तसही जर रहायचच् आहे तर अजुन काही मिनिटे उशीर झाला तर काय फरक पडतो. शिवाय इथून गावाचा परिसर खूप सुंदर दिसतो. तुम्हाला जर फोटो काढायचे असतील तर इतका छान spot नाही म्हणून मी गाडी थांबवली. पण माझ ऐकून न घेता हा योगान माझ्यावरच ओरडायला लागला. म्हणून मी वाद घालत होतो. याला तरी काय घाई आहे त्या पछाडलेल्या मंदिरात जायची कोण जाणे?" राजेश चिडून बोलत होता.
जयुला राजेशचा मुद्दा पटला. ती योगानला म्हणाली,"ख़रच काही घाई नाही आपल्याला योगान. मला हा spot खरच खूप आवडला आहे. थोड़े photos काढिन आणि मग पुढे जाऊ आपण." अस म्हणून ती तिचा कॅमेरा घेऊन वळली. तिच्याही मनात आल की खाली दरी आहे. म्हणजे range नसणार. राजेश म्हणतो ते खर आहे. जर विजयने फ़ोन ट्राय केला आणि लागला नाही त्याला तर तो उगाच काळजीत पडेल. हा विचार मनात येताच जयूने विजयला फोन लावला.
"हॅलो. कशी आहेस ग जयु? तुला खूप miss करतो आहे ग. मला तुझ्या माझ्या आयुष्यातल्या अस्तित्वाची आणि गरजेची जाणिव तू गेल्यापासून जाणवते आहे. तू मला आणि मुलांना खूप खूप हवी आहेस ग जयू. उगाच तुला एकटीला पाठवल. मी यायला हव होत तुझ्याबरोबर." तिचा फोन उचलताच विजय म्हणाला.
त्याचा आवाज आणि बोलण ऐकून जयूच्या डोळ्यात पाणी उभ राहील. पण मग ती स्वतःशीच् हसली. म्हणाली;"एवढं वाटत तर याव एखाद्याने. आम्हालाही आवडेल." आणि दोघेही मनापासून हसले.
"कशी आहेस?" विजयने विचारले.
"मी मस्त आहे. एक छोटस गाव बघायला आले आहे. बहुतेक इथेच राहीन रात्रि. गाव दरीत आहे. त्यामुळे मोबाइलला range नसेल म्हणून आत्ता तुम्हाला फोन लावला. तुम्ही सगळे कसे आहात? आणि माझी बछडी?" जयू म्हणाली.
"आम्ही मस्त आहोत. जयु तू अनोळखी देशात आहेस. सांभाळून रहा ह. अस पहिल्याच दिवशी हॉटेल सोडून कुठेतरी का जाते आहेस राहायला?" विजय काळजी वाटून म्हणाला.
"तुम्ही चिंता करू नका. माझा गाईड योगान चांगला आहे. आणि ड्रायवर पण भारतीय अगदी मराठीच आहे. चांगले आहेत दोघे. बर ठेवते फोन. अजुन गावात पोहोचायच आहे. अच्छा." जयूने अस म्हणून फोन ठेवला आणि गाडीत येऊन बसली.
गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात आल की गाडीत थोड़ा तणाव निर्माण झाला आहे. बहुतेक योगान आणि राजेशमद्धे परत वाद झाला असावा असा विचार करुन तिने तिथे दुर्लक्ष केले. ती गाडीत बसताच राजेशने गाडी सुरु केली आणि मोहफिसा गावाच्या दिशेने दामटली.
गावात गाडी शिरली तोवर सूर्य पार अस्ताला गेला होता. योगानने मौन सोडून जयुला म्हंटले,"जयश्रीजी आपण थकला असाल. माझ घर या गावातच आहे. हव तर थोड़ा आराम करा. आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि मग मंदिर बघायला जाऊ."
"मॅडम लहान तोंडी मोठा घास होईल. पण आपण अगोदर मंदिर बघुन घेऊ. नंतर आरामच आहे न!" राजेशने स्वतःचे मत नोंदवले.
योगान राजेशकडे बघत पण जयुला म्हणाला;"आज पूर्ण चंद्रमा आहे. आज मंदिराचे सौंदर्य रात्रित खुलणार."
जयुला आतापावेतो हे लक्षात आले होते की राजेश त्या मंदिरात जायला नाखुश आहे. योगानला मात्र ते मंदिर तिला दाखवायचेच आहे, आणि तेही पूर्ण सौंदर्यात.... बहुतेक. तिला योगानच मत पटल आणि तिने विचार केला थोड़ा आराम करुन गेल तर बर. म्हणजे निट फिरून बघता येईल मंदिर. त्यात योगान म्हणतो तस चंद्राच्या प्रकाशात खरच जास्त सुंदर दिसेल ते मंदिर. जसं ते गाव उतरत्या सूर्यप्रकाशात दिसत होत. परत ते दृश्य मनात उभं राहील आणि जयू परत भारावून गेली.
तिने थोडा विचार करून तिचा निर्णय सांगितला. "आपण थोड़ा आराम करुन आणि थोड़ खाऊन मग मंदिर बघायला जाणार आहोत. राजेश तुला काही मंदिरात इंटरेस्ट नाही. तू हव तर थांब गावातच."
"मॅडम मला आणि मंदिरात इंटरेस्ट नाही? अहो माझा जीव आहे त्या मंदिरात. मी तुमच्यासाठी म्हणत होतो आज नको म्हणून. मुख्य म्हणजे मी तुमच्या बरोबर येणार आणि फ़क्त तिथेच नाही तर तुम्ही ते मंदिर बघताना जसे फिराल तसा तुमच्या बरोबर फिरणार. तुमची सावली बनून... हा योगान काहीही म्हणाला तरी." राजेश एकदम बोलून गेला. योगानने एक चिडका कटाक्ष राजेशकडे टाकण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.
तो केवळ योगानला चिथवायला आणि चिदवायला अस बोलतो आहे अस वाटून जयूने विषय बदलला. तिला आता वाद नको होता.
तिघेही गावातल्या योगानच्या घरी पोहोचले. तो एकटाच राहातो आहे हे जयूच्या लक्षात आल. राजेशने येताना sandwhich, juices, आणि काही pestries आणल्या होत्या. तिघांनी त्यातून थोड़ खाल्ल्. जयुच अंग प्रवासामुळे अवघडल होत. त्यामुळे तिने थोडावेळ आराम करायच ठरवल. योगानने दाखवून दिलेल्या खोलीत पलंगावर ती जाऊन पडली.
जयुला जाग आली. ती क्षणभर गोंधळली. आपण कुठे आहोत याचा तिला उलगड़ा होईना. जाग कशी आली हे पण उमजत नव्हतं.
पण मग तिला कोणीतरी हाक मारत आहे हे लक्षात आल. ती उठून बसली. योगान रूमच्या दाराजवळून तिला हाक मारत होता. पण जयुच लक्ष खिड़की बाहेर गेल. बाहेर अंधार पडला होता. ती खिड़कीजवळ आली. अंधार असूनही चंद्र आणि टिपुर चाँदण्याच्या उजेडात संपूर्ण आसमंत नाहुन गेला होता. जयू खिड़की जवळ जाताच बाहेरच्या थंडगार वा-याची झुळुक जयूच्या अंगावर आली आणि तिच्या अंगावर काटा उभा राहिला.
ती खिड़कीपासून लांब झाली आणि दाराकडे येत म्हणाली;"किती वाजले रे योगान?"
"निघायची वेळ झाली जयश्री. चंद्र आकाशात पूर्ण कांतिने चमकतो आहे. हीच योग्य वेळ आहे. चला." योगान दाराशीच् उभा होता. तो जयुकडे एकटक बघत होता. त्याच्या निळसर डोळ्यात एक वेगळीच् झाक होती. त्याचे सोनेरी केस एखाद्या मुगुटासारखे चमकत होते. जयु मंतरल्यासारखी त्याच्या मागून निघाली. घराच्या मुख्य दरवाजाकडे न जाता योगान जयुला मागिल दाराकडे नेत होता. इतक्यात राजेश मुख्य दारात येऊन उभा राहिला.
"मॅडम गाडी तयार आहे. निघु या का?" त्याने मोठ्या आवाजात विचारले. जयूची तंद्रि मोडली. ती मंतरल्यासारखी योगानच्या मागे चालली होती पण तिने राजेशकडे वळून बघितले. "हो निघु या." ती राजेशला म्हणाली. मग तिच्या लक्षात आल की ती घराच्या आतल्या बाजूला चालली होती योगानबरोबर. त्यामुळे तिने योगानकडे वळून त्याला विचारलं,"अरे योगान चला म्हणालास आणि मला घराच्या आतल्या दिशेने काय घेऊन जातो आहेस.?"
योगानने एक तीव्र कटाक्ष राजेशकडे टाकला आणि म्हणाला;"मी याला टाळून तुम्हाला मागच्या दाराने नेणार होतो. हा खूप जाड बोलतो. त्या मंदिराची शांतता हा भंग करुन टाकेल. त्यांना त्रास होईल याचा."
त्यावर आता राजेश काहीतरी वाद घालेल अस जयूला वाटल पण अगदी शांतपणे राजेश जयुला म्हणाला,"मी अजिबात बोलणार नाही मॅडम. फ़क्त तुमच्या बरोबर चालिन. पण मी येणारच."
जयु बर म्हणाली आणि अजुन चर्चा न करता गाडीत जाऊन बसली. तिला आता एक जाणवल होत की योगान आणि राजेश यांच्यात एक गाईड आणि एक ड्राईवर असा वाद नाही. हे काहीतरी वेगळ आहे. पण मग तिने तो विचार तिथेच सोडून दिला. ते दोघे एकमेकांना बरेच आधिपासून ओळखत आहेत; तर कदाचित् त्यांच्यात काही दुस-या विषयावरुन वाद असावा; असे तिचे मत झाले.
योगान थोड़ा अनिच्छेनेच गाडीत बसला. राजेशने गाडी सुरु केली आणि मंदिराच्या दिशेने वळवली.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Aug 2016 - 6:21 pm | एस
गुड. थोडंसं आक्मुरान का काय तसं वाटतंय. पुभाप्र.
13 Aug 2016 - 7:55 pm | योगेश कोकरे
ज्योती या भागात काहितरी रहस्यमय घडेल अशी अपेक्षा hoti . तरीही उत्सुकता वाढवणार लिखाण . पुढील भाग लवकरातलवकर यावा हि अपेक्षा.
13 Aug 2016 - 7:57 pm | स्रुजा
सहीच !! आता पुढचा भाग..
13 Aug 2016 - 10:26 pm | ज्योति अळवणी
इजिप्तच्या मामीज् चा बराच अभ्यास करून कथेत ट्विस्ट्स तयार केले आहेत. मला लिहिताना खूपच मजा आली... तुम्हा सगळ्या वाचकांना माझी कथा आवडते आहे हे वाचून खरच खूप आनंद होतो आहे.@ योगेश...जी माहिती मिळवली तिचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे तुम्हाला शेवटासाठी थांबावं लागलं आहे. पण लवकरच पुढचा भाग टाकीन
13 Aug 2016 - 11:51 pm | किंबहुना
कथा आवडते आहे. पण या भाअगात थरार सुरू होईल अशी आशा होती. त्यामुळे थोडा अपेक्षाभंग झाला. पण असो. पुभाप्र.
14 Aug 2016 - 2:24 am | अमितदादा
आवडेश..पुभाप्र.