गोदो आला गोदो आला

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
10 Aug 2016 - 8:07 am

गोदो आला गोदो आला
खेळखेळणी घेउन आला
गोदो आला गोदो आला
अहा हर्ष तो मनी दाटला!

गोदो आला गोदो आला
कसा दरबार पाहा सजला
स्वागत करण्या एक गलबला
हरहर गोदो निनाद झाला

गोदो आला गोदो आला
ओवाळावे पटकन त्याला
भेटवस्तु द्या माणिकमोती
त्रिशुलतलवार बरछ्याभाला

गोदो आला गोदो आला
जो जो बोले कुजबुजवाला
कोल्ह्यांची ती ऐकून कुई
हरिण बोलले सिंहच आला

गोदो आला गोदो आला
हिरवी राने हिरवा पाला
दुधात न्हाले गोकुळ सगळे
आनंदी त्या गोकुळबाला

गोदो आला गोदो आला
जलौघ वाहे अरण्यातला
तूतीवरचा रेशमकीड़ा
खुशीत आला अन् वळवळला!

गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला

गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?

गोदो आला गोदो आला
कोण रडला नि कोण हासला?
रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते
हसणाऱ्यांचा झिंगालाला!

गोदो आला गोदो आला
उन्मादाचा नाद टिपेला
गोदो आला जगणे झाले
देवकिनन्दन जय गोपाला

- स्वामी संकेतानंद

कविता

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 8:38 am | कैलासवासी सोन्याबापु

म्हातारबाबांना प्रचंड जास्त आवडेल अशी कविता

स्वामी संकेतानंद's picture

10 Aug 2016 - 8:57 am | स्वामी संकेतानंद

म्हाताऱ्याचे आठवत नाही, पण मागच्या वर्षी फेसबुकवर ही कविता टाकली होती तेव्हा त्याच्या समविचारी दाढीवाल्या कवींनी ही कविता शेअर केली होती! :D :D

प्रमोद देर्देकर's picture

10 Aug 2016 - 9:00 am | प्रमोद देर्देकर

वेटींग फॉर गोदो नाटकाची आठवण झाली.

काहीच कळले नाही, हुच्च असावे

नावातकायआहे's picture

10 Aug 2016 - 11:03 am | नावातकायआहे

झेपले नाही...
असो.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Aug 2016 - 4:48 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू पांडुब्बा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Aug 2016 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू पांडुब्बा.

मुक्त विहारि's picture

10 Aug 2016 - 7:29 pm | मुक्त विहारि

स्पा.

मन१'s picture

10 Aug 2016 - 9:10 am | मन१

झकास. मस्त गेयता आहे. पण अ‍ॅब्सर्डिस्ट हा प्रकार नाटक पाहिलं तेव्हाही झेपला नव्हता, अजूनही समजत नाही.

यशोधरा's picture

10 Aug 2016 - 9:14 am | यशोधरा

गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला

गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?

गोदो आला गोदो आला
कोण रडला नि कोण हासला?
रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते
हसणाऱ्यांचा झिंगालाला!

गोदो आला गोदो आला
उन्मादाचा नाद टिपेला
गोदो आला जगणे झाले
देवकिनन्दन जय गोपाला

आवडले.

पैसा's picture

10 Aug 2016 - 9:21 am | पैसा

आला का एकदाचा! अच्छे दिन आले तर!

पिशी अबोली's picture

10 Aug 2016 - 9:23 am | पिशी अबोली

=))

स्वामी संकेतानंद's picture

10 Aug 2016 - 9:32 am | स्वामी संकेतानंद

गोदो आला गोदो आला
अच्छे दिन घेऊनी आला

पगला गजोधर's picture

10 Aug 2016 - 7:22 pm | पगला गजोधर

godo

प्रचंड आवडली. आला का एकदाचा असा प्रश्न शीर्षक वाचून मलाही पडला ;-)

उडन खटोला's picture

10 Aug 2016 - 10:32 am | उडन खटोला

गोदो चं स्पेलिंग चुकलंय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 10:43 am | कैलासवासी सोन्याबापु

स्वाम्या नवं काही लिहिलंय का? किती दिवस ह्यो स्टॉक क्लियरन्स सेल चालू ठेवणार?? :P

स्वामी संकेतानंद's picture

10 Aug 2016 - 10:49 am | स्वामी संकेतानंद

नवनिर्माण सध्या बंद आहे.कारण तुला माहीत आहे.

पैसा's picture

10 Aug 2016 - 11:26 am | पैसा

आमच्या मरतुकड्या बीएसेनेल ब्रॉडबँडमधून असं बरंच काही वाचायचं चुकलेलं असतं. येऊ दे इथे. काही लिखाण पुन्हा वाचायलाही छान असतं. स्वाम्याचा त्यात नक्कीच नंबर आहे!

सतिश गावडे's picture

10 Aug 2016 - 11:10 am | सतिश गावडे

हे गोदो काय आहे?

लालगरूड's picture

10 Aug 2016 - 11:44 am | लालगरूड

गोदो म्हणजे मो दी ????

यशोधरा's picture

10 Aug 2016 - 11:49 am | यशोधरा

होप, नॉट. मोदी हा संदर्भही आला नाही डोक्यात कविता वाचताना पण काही प्रतिसाद वाचताना मात्र आला होता.

विप्लव's picture

10 Aug 2016 - 11:47 am | विप्लव

गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला

गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?

विप्लव's picture

10 Aug 2016 - 11:48 am | विप्लव

मस्तच

पगला गजोधर's picture

10 Aug 2016 - 12:06 pm | पगला गजोधर

सायोनारा सायोनारा ची चाल लावायची का ? (रेफ- लव इन टोकियो )

आदूबाळ's picture

10 Aug 2016 - 3:33 pm | आदूबाळ

नाही. "ये रे घना"ची.

____________
गोदो आला गोदो आला
पोकल बांबू पला पला

मुले त्याची कुतांगलू, मास्तर बघे मुरगालू
बोलावतो त्या सोट्याला, शालेमागे गच्पानाला
गोदो आला...

(सॉरी!)

पैसा's picture

10 Aug 2016 - 3:39 pm | पैसा

ळॉळ!

अजया's picture

10 Aug 2016 - 4:00 pm | अजया

=))))

गणामास्तर's picture

10 Aug 2016 - 12:32 pm | गणामास्तर

दुर्बोध वगैरे काय तरी म्हणतात तशी कविता.

विशाखा पाटील's picture

10 Aug 2016 - 8:04 pm | विशाखा पाटील

कविता आवडली.

संदीप डांगे's picture

10 Aug 2016 - 9:10 pm | संदीप डांगे

मज्जा आली स्वामी!!!