आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
चांगली उन्हाची सवय झाली होती ...
तो डबडबणारा घाम
ते काळवंडलेले शरीर
तो कोरडेपणा ... ती रखरख
यांना चांगली लय आली होती ...
कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा तो ओलावा
पुन्हा तो हिरवेपणा
पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर
उमटणार झर्यांच्या रेघा ...
बुजणार पुन्हा ...
पडलेल्या त्या सगळ्या भेगा ...
पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
पुन्हा एकट्याने भिजायचे
पुन्हा एकटेच वाळायचे ...
असेच नित्य नियमाने
स्वताला ओलेत्यानी जाळायचे ...
मग पावसाच्या पाण्यातूनच
हळूच डोळ्यातून रक्त ... गाळायचे ...
आता फ़क़्त पाणीच नाही ... तर रक्त पण गढूळ होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
या वर्षी ...
पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
- विश्वेश
===============================
पावसाचे अन माझे तसे काही वैर नाही !
पण, मनातल्या मेघांनी कधीतरी असे बरसणे गैर नाही !
===============================
प्रतिक्रिया
5 Aug 2016 - 4:50 pm | Bhagyashri sati...
मस्त:)
5 Aug 2016 - 4:52 pm | अभ्या..
अरे भारी लिहिलय की.
मस्त मस्त
5 Aug 2016 - 7:29 pm | स्पा
जबरदस्त
5 Aug 2016 - 11:08 pm | रातराणी
कविता आवडली.
5 Aug 2016 - 11:16 pm | किसन शिंदे
फार सुरेख लिहिलंय राव. लिहित रहा नेहमी
6 Aug 2016 - 4:22 am | धनावडे
सुंदर
6 Aug 2016 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा
छानच
7 Aug 2016 - 11:17 pm | ज्योति अळवणी
पुन्हा एकट्याने भिजायचे
पुन्हा एकटेच वाळायचे ...
असेच नित्य नियमाने
स्वताला ओलेत्यानी जाळायचे ...
ही कल्पना तर फारच छान