ब्लॉग लेखन सुरु करताना सुरवातीला लिहिलेली या कवितेची आठवण झाली. काही कवींसाठी कविता सुद्धा एक व्यवसाय आहे 'बाजारात कवितेला चांगला भाव मिळाला पाहिजे'.
कोळया सारखे जाळे विणुनी
करितो शब्दांची फेकाफेकी.
गाफिल श्रोत्यांना त्यात बुडवुनी
घेतो दाद मनाजोगति.
कधी सांगतो सिने नट्यांच्या
लफड्यांची स्टोरी.
कधी रंगवितो वासनामयी.
रंगील्या राती.
कधी चालवितो व्यंगास्त्रांचे बाण
राजनेत्यांवर्ती.
कधी उडवितो रक्तांकित
वीरश्रीची गाणी.
उजवी डावी वेडी वाकडी
नुसती शब्दांची खेळी.
लक्ष्य त्याचे सदैव असते
कोठी, गाडी आणि बिदागी.
प्रतिक्रिया
25 Jul 2016 - 8:37 pm | कविता१९७८
मस्त
25 Jul 2016 - 10:08 pm | गंगाधर मुटे
सुरेख कविता
अवांतर :
बाजारात कवितेला चांगला भाव मिळाला पाहिजे
आणि
विडंबन मातीमोल भावे? असे का बरे?
26 Jul 2016 - 2:54 pm | विवेकपटाईत
मुटे साहेब , मूळ कवीची कविता वाचून मनात असूया निर्माण होते, मग जे काही जळत असेल ते बाहेर पडते, त्यालाच विडंबन असे म्हणतात. आता जळणार्या वस्तू कोण विकत घेणार?
26 Jul 2016 - 9:32 pm | गंगाधर मुटे
आता तुमचा "मुटे" होणार हे नक्की.
अहो. मिसळपाववर काही झुंडीच्या टीकास्त्राचे भक्ष व्हायचे नसेल तर असं मनातलं बोलू नका.
त्यांना काय आवडते, याचा विचार करून लिहावे, हाच सौदा फ़ायद्याचा राहू शकतो.