या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?
लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.
पाहुणं म्हणे, ऐका राव
मान मोठा मिळे ज्या गावात
चरायला मिळते सारे रान
तोची आहे आमुचा गाव.
सरडा आमचा गुरु भाई
त्याच्या सवे रंग बदलतो.
शिकारीच्या गावी
मुक्काम ठोकतो.
या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?
टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.
प्रतिक्रिया
20 Jul 2016 - 8:18 pm | मुक्त विहारि
झक्कास...
"सरडा आमचा गुरु भाई
त्याच्या सवे रंग बदलतो.
शिकारीच्या गावी
मुक्काम ठोकतो."
हे तर खासच.
23 Jul 2016 - 8:56 am | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत धन्यवाद. कमीत कमी कुणालातरी कविता कळली.
24 Jul 2016 - 1:25 pm | गंगाधर मुटे
थोडक्यात गोड
जबरी
आवडली कविता.