उंबरा

हर्षल_चव्हाण's picture
हर्षल_चव्हाण in जे न देखे रवी...
13 Jul 2016 - 11:49 am

सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे,
दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे?

मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले,
"नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे...

शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी,
(पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)...

अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी,
"पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे,

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही?
अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे...

कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे?
उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे...

- हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

कविता

प्रतिक्रिया

हरभरा....

सैल झाली नाडी आता, व्यर्थ आहे थांबणे,
दोन क्षणांची प्रतिक्षा, तो वरी का कुंथणे,

मी तुझ्या डब्यात माझे पाणी होते ओतले,
बोट त्यात बुडवु नको तू, व्यर्थ आहे चिवडणे,

शोध घेता मी डब्याचा, टिश्यु येतो सामोरी,
पण मनाला आसही की, स्वच्छ निर्मळ वाटणे,

अंत माळरानात वा शौचालयी आहे जरी,
"उद्या पुन्हा फिरुन येरे" आहे जगाचे सांगणे

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही?
*गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे...

कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे?
तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे...

(आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...)

तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब)

पैजारबुवा,

अगं अयायायायायाया ...मेलो...
थांबा....जरा कुंथुन येतो...

धन्य झाले !!!!

त्यांनी या धाग्यावर पायधूळ झाडलीच पाहिजे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2016 - 12:50 pm | अत्रुप्त आत्मा

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही?
*गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे...

कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे?
तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे...

(आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...)

तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब)

पैजारबुवा,

साष् टांग प्रणी पात! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

अभ्या..'s picture

13 Jul 2016 - 6:16 pm | अभ्या..

विडंबनमाऊली.
साष्टांग राह्यला होता नमस्कार.

घ्यावा.

सस्नेह's picture

14 Jul 2016 - 9:20 am | सस्नेह

पैजारबुवा __/\__

प्रमोद देर्देकर's picture

14 Jul 2016 - 9:34 am | प्रमोद देर्देकर

अरे अरे काय हे पैजार बुवा. अक्षरशः चहा सांडला ना अंगावर, ऑफिसमधले सगळे बघताहेत माझ्याकडे.
साष्टांग नमस्कार.

हर्षल तुमची कविताही चांगली आहे. आणि अंत देव्हा... ही ओळ क्लासच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2016 - 12:52 pm | अत्रुप्त आत्मा

मूळ काव्य मात्र अव्वल आहे.. एकच नंबर हो- हर्षल_चव्हाण.

रातराणी's picture

13 Jul 2016 - 1:55 pm | रातराणी

+१ सुरेख आहे कविता!

हर्षल_चव्हाण's picture

13 Jul 2016 - 1:36 pm | हर्षल_चव्हाण

ज्ञानोबा, धन्य आहात, तुम्ही विडंबन लिहून (की आणखी काही करून) मोकळे पण झालात ;) मला एवढ्या वेदना नव्ह्त्या झाल्या काही ... सपशेल आडवी केलीत कविता :D

आत्मबंध, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2016 - 3:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

ह. घेतल्याबद्दल धन्यवाद हर्षल,
कविता खरोखरच छान आहे.
पैजारबुवा,

हर्षल_चव्हाण's picture

13 Jul 2016 - 5:50 pm | हर्षल_चव्हाण

:)

सतिश गावडे's picture

13 Jul 2016 - 3:03 pm | सतिश गावडे

हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

ठिकाण राहीले की. आधी मला वाटले ही आजची हर्षलास्त किंवा हर्षलोदयाची वेळ असावी.

कविता छान आहे.

हर्षल_चव्हाण's picture

13 Jul 2016 - 5:53 pm | हर्षल_चव्हाण

कविता लिहून पूर्ण होण्याची वेळ टाकतो. कधीतरी एखादी सुचते, म्हणून... बाकी, कल्पना आवडली उदयास्ताची :D

आवडले रे लेखन हर्षल. अव्वल आहे अगदी.

हर्षल_चव्हाण's picture

14 Jul 2016 - 6:57 am | हर्षल_चव्हाण

धन्यवाद :)

चांदणे संदीप's picture

13 Jul 2016 - 11:53 pm | चांदणे संदीप

विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____

मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे
दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे?

मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या,
चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे...

शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी,
(अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)...

अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी,
पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,

का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली?
अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे?

कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे?
उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे...

हर्षलराव, कविता लै आवडलीये! :)

Sandy

चांदणे संदीप's picture

13 Jul 2016 - 11:54 pm | चांदणे संदीप

विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____

मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे
दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे?

मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या,
चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे...

शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी,
(अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)...

अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी,
पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,

का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली?
अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे?

कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे?
उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे...

हर्षलराव, कविता लै आवडलीये! :)

Sandy

हर्षल_चव्हाण's picture

14 Jul 2016 - 6:59 am | हर्षल_चव्हाण

:)

सतिश गावडे's picture

14 Jul 2016 - 10:02 am | सतिश गावडे

छान कविता आहे संदिप.

अभ्या..'s picture

14 Jul 2016 - 10:08 am | अभ्या..

Sandybaba, tuzi kavita aawadali.

चांदणे संदीप's picture

14 Jul 2016 - 10:45 am | चांदणे संदीप

कविता आवडल्याचे सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार... पण खरे श्रेय मूळ कवीला... श्री हर्षल चव्हाण यांचा झिंदाबाद! :)

Sandy

प्रचेतस's picture

14 Jul 2016 - 6:59 am | प्रचेतस

कविता आणि त्यांची दोन्ही विडंबने लै भारी.

माहितगार's picture

14 Jul 2016 - 9:58 am | माहितगार

+१

प्रीत-मोहर's picture

14 Jul 2016 - 8:29 am | प्रीत-मोहर

सुंदर!! आवडलीच

नाखु's picture

14 Jul 2016 - 8:57 am | नाखु

अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी,
पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,

आम्हाला बुवांचा अजरामर फलक धागा आठवला.

संदीपा बेष्ट लेका.

नित्वाचक नाखु

पैसा's picture

14 Jul 2016 - 9:14 am | पैसा

सुरेख कविता!

मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले,
"नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे...

वाह्ह...

विडंबन सुद्धा लयं भारी हायेत... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan

सस्नेह's picture

14 Jul 2016 - 9:21 am | सस्नेह

कवितेचा आशय आवडला.
मीटर जरा गंडलंय.

एस's picture

14 Jul 2016 - 10:15 am | एस

हेच म्हणायला आलो होतो.

हर्षल_चव्हाण's picture

14 Jul 2016 - 4:38 pm | हर्षल_चव्हाण

धन्यवाद :) कुठे माशी शिंकलीय, जरा लक्षात आणून द्याल का? सुधारेन तसं...

पेशवा भट's picture

14 Jul 2016 - 9:27 am | पेशवा भट

मस्तंय कविता आवडली.

कविता छान विडंबन महान ;)

अनिरुद्ध प्रभू's picture

14 Jul 2016 - 9:55 am | अनिरुद्ध प्रभू

तिनही कविता उत्तम....

पैजारबुवा,........
सासाटांग नमस्कार हो!!!!

(नतमस्तक)
अनिरुद्ध

धनंजय माने's picture

14 Jul 2016 - 10:17 am | धनंजय माने

व्हर्जिनल कविता, एक 'शि'डंबन आणि एक सुडंबन सगळं आवडलं.

किसन शिंदे's picture

14 Jul 2016 - 10:53 am | किसन शिंदे

मुळ कविता अतिशय आवडली.

चाणक्य's picture

14 Jul 2016 - 11:20 am | चाणक्य

मस्त आहे कविता.

चाणक्य's picture

14 Jul 2016 - 11:45 am | चाणक्य

मस्त आहे कविता.