७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.

मोदक's picture
मोदक in भटकंती
8 Jul 2016 - 7:41 pm

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.

पानिपत.. आपल्या सर्वांचा एक हळवा कोपरा.
"२ मोत्ये गळाली, २७ मोहरा हरपल्या, सव्वा लाख बांगडी फुटली" त्या ठिकाणी जाण्याचे कितीतरी वर्षांपासून ठरवले होते. ते आज जमले होते.

पानिपत युद्धस्मारकाचे प्रवेशद्वार

.

प्रवेशद्वाराच्या आत दुचाकींसाठी मुबलक जागा होती

.

तेथेच असलेले हे दोन फलक

.

अधिक माहिती देणारा आणखी एक..

.

यातली अधिसूचना संख्या म्हणजे सर्क्युलर नंबर असावा पण तारीख..??

.

स्मारकाकडे जाणारा रस्ता..

.

हे स्मारक म्हणजे एक मोठे उद्यान आहे..

.

उद्यानाचा आणखी एक व्ह्यू..

.

कालच्या वादळाचा तडाखा येथेही बसला होता, जागोजागी पाणी साठले होते. त्यातून वाट काढतानाच अचानक स्मारकाने दर्शन दिले.

.

स्मारकाच्या जवळ भरपूर पाणी साठले होते. एका ठिकाणी बुट काढून ठेवले व अनवाणीच त्या पाण्यातून स्मारकाकडे गेलो.

.

.

स्मारक..

.

तेथेच हा एक माहिती फलक होता.

.

__/\__

.

तेथेच शेजारी एका ठिकाणी ही दोन भित्तीचित्रे कोरली होती

.

.

स्मारकाच्या आवारात एके ठिकाणी दोन मिनीटे बसलो. पुन्हा स्मारकासमोर जावून डोके टेकवले व बाहेर पडलो.

बाहेर पडून कर्नालच्या रस्त्याकडे गाड्या वळवल्या व कर्नाल मार्गे चंदीगडला पोहोचलो. येथे विजयच्या गाडीचे सर्विसींग करावयाचे होते.

आयुष्यात केंव्हा ना केंव्हा भेट द्यायच्या ठिकाणांमधले एक महत्वाचे ठिकाण आज सर केले होते. __/\__

(क्रमशः)

*******************

(हा भाग छोटा आहे याची कल्पना आहे. मात्र पानिपत स्मारकाच्या भेटीसोबत आणखी काही जोडणे शक्य झाले नाही.)

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 7:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

पानपतास गेले की असेच होते!,.......

पिलीयन रायडर's picture

8 Jul 2016 - 8:17 pm | पिलीयन रायडर

__/\__

मलाही जायचे आहे एकदा इथे...

Vidyadhar1974's picture

8 Jul 2016 - 8:24 pm | Vidyadhar1974

छान चाललाय प्रवास.

१४ जानेवारी आली की पानिपतची जखम अधिकच भळभळते.
छान केलंस तिथे जाऊन.

सत्याचे प्रयोग's picture

8 Jul 2016 - 8:41 pm | सत्याचे प्रयोग

फोटो आणि वर्णन वाचून पुन्हा पानिपत वाचायला हवे असे वाटतेय.

सत्याचे प्रयोग's picture

8 Jul 2016 - 8:41 pm | सत्याचे प्रयोग

फोटो आणि वर्णन वाचून पुन्हा पानिपत वाचायला हवे असे वाटतेय.

अरिंजय's picture

8 Jul 2016 - 11:21 pm | अरिंजय

__/|\__ __/|\__

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 10:42 am | संजय पाटिल

कॉलेजात असताना एकदा जाऊन आलोय पण आता परत एकदा जायचे आहे..

आदूबाळ's picture

9 Jul 2016 - 11:04 am | आदूबाळ

एक नंबर!

असंका's picture

9 Jul 2016 - 11:25 am | असंका

_/\_

धन्यवाद...

मार्गी's picture

9 Jul 2016 - 12:06 pm | मार्गी

वा! मस्त!

वटवट's picture

9 Jul 2016 - 3:43 pm | वटवट

_/\_

बरं वाटलं पानिपताला आवर्जून जाउन आलास.

पानिपतची काढावी तितकी आठवण कमीच आहे! _/\_

खटपट्या's picture

10 Jul 2016 - 2:26 am | खटपट्या

abcd

गेल्या वर्षी गेलो होतो तेव्हा. पण लिहिण्यासारखे त्यात काही नव्हते. किंबहुना त्या विचारांना शब्दांत मांडणं शक्य झालं नाही. आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद! _/\_

पैसा's picture

29 Aug 2016 - 10:03 pm | पैसा

पानिपत!