भेंडी,आजची रात्र पण अशीच जाणार.
सालं, मागच्या वर्षी पर्यंत ठीक होते पण, आता ह्यापुढे दरवर्षी हा दिवस त्रासदायकच ठरणार.इतर लोक आपापले वाढदिवस साजरे करत असतांना, आपण मात्र दरवर्षी ह्या दिवशी असेच कुढत बसणार.
मागच्या वर्षी ह्याच रात्री, ती बिंधास्त पणे आपल्या बॉइज होस्टेल वर आली होती.येतांना पण एकटी नाही, फूल्ल तिच्या गँग समवेत.तिचा बाप तसा आमच्याकडे शेत मजूरच आणि गावच्या प्रथे प्रमाणे त्यांचे घर पण गावा बाहेरच.
जन्मापासुनच ती आणि मी एकत्रच.अगदी बालवाडी ते शाळे पर्यंत.सुरुवाती पासूनच ती एकदम बिंधास्त अगदी आमच्या जातीत शोभेल अशी.धमाल करता-करता, मी पटकन तिला प्रपोज केले.
आई शप्पथ कसली लाजली ती.साला तो क्षण अद्याप डोळ्यासमोर आहे.
आमच्या प्रेमातील पुढचे टप्पे फारच सोपे होते.
पण, मुख्यमंत्री एकदा आमच्या घरात आले आणि आमच्या आमदार वडीलांना कॅबेनेटची स्पप्ने पडायला लागली.शिवाय मुख्यमंत्री व्याही म्हणून मिळणार ते वेगळेच.
माझा त्यांच्या मताला नकार म्हणजे तिचा मृत्यू हे समीकरण ठरलेलेच होते.एकुलत्या एका मुलाला मारायला बापाचे मन नक्कीच तयार नसते झाले.तिच्या सामान्य आयुष्याला हे सोनेरी काटे पटले नसते आणि मानवले पण नसते.
मग मुद्दाम तिच्याशी फुसकट कारणावरून भांडून ब्रेक अप घेतला.
भेंडी, त्या दिवशी पण तिचे प्रेम दिसत होते, पण काय करणार?
त्या रात्री तिचा फोन येणार ही खात्री होतीच.ती अद्यापही मला विसरू शकलेली नाही, हे तिच्या मैत्रिणी मला सांगत होत्याच.झोपेत पण ती सारखे माझेच नांव घेत असते, हे पण त्यांच्याकडूनच समजले.
तीने मला विसरावे ह्यासाठी काही तरी करणे भाग होते.
तसा तिचा फोन आलाच.
मुद्दाम ७-८ रिंग वाजू दिल्या.
मी म्हणालो, "हॅलो."
ती चटकन म्हणाली, "हॅलो.हॅपी बर्थडे!"
मी ठरवल्या प्रमाणे म्हणालो,"थँक्स! बट हू इज धिस?"
२-३ क्षणांने तिचे अपेक्षित उत्तर, पुटपूटल्या सारखे आले.
सॉरी.राँग नंबर.
आज खूप दिवसांनी ती कदाचित शांत झोपेलही.उद्याच काय ते समजेल.
त्यादिवशी सारखाच, अद्याप ही तिचा मोबाईल नंबर माझ्या मोबाइल मध्ये प्रथम क्रमांकावर आणि तिच्या आवडत्या "पल पल दिल के साथ" ह्या स्पेशल ट्युनच्या साथीने आहेच.
प्रतिक्रिया
4 Jul 2016 - 9:43 pm | मुक्त विहारि
मूळ लेखाची लिंक द्यायला विसरलो.
राँग नंबर ----- http://www.misalpav.com/node/36091
4 Jul 2016 - 9:54 pm | टवाळ कार्टा
छोटा झालाय भाग...आजचा धागे काढायचा रेट बघता पुढचा भाग पण आजच येईल का? =))
4 Jul 2016 - 10:41 pm | दा विन्ची
बहुधा हर्मायनी हा तुमचा डू आयडी असावा.
30 Sep 2016 - 3:53 pm | हर्मायनी
नाही हो .. हा माझा id आहे ..
4 Jul 2016 - 10:42 pm | दा विन्ची
लेख आवडला हे सांगायला विसरलो
5 Jul 2016 - 2:19 am | खटपट्या
थोडे मोठे भाग पटापट येउद्यात...
5 Jul 2016 - 7:54 am | जेपी
चांगलीय दुसरी बाजु..
5 Jul 2016 - 12:46 pm | नाखु
चांगलीय दुसरी दुखरी बाजु..
नाखु फलकवाला
5 Jul 2016 - 1:45 pm | पद्मावति
सुंदर. नाण्याची ही दुसरी बाजूही खूप आवडली.
5 Jul 2016 - 7:46 pm | रातराणी
आवडली गोष्ट.
24 Jul 2016 - 2:55 am | निखिल निरगुडे
सही! दुसरी बाजू मस्त मांडली आहे...
24 Jul 2016 - 4:02 am | रुपी
छान!
दुसरी बाजू आवडली.. फक्त इतके अपशब्द जरा खटकले :)
30 Sep 2016 - 3:43 pm | हर्मायनी
गुड टू हियर द अदर साइड ऑफ स्टोरी ! :)
30 Sep 2016 - 4:03 pm | बापू नारू
मुक्त विहारि ,पुढचे पार्ट पण लिहा कि