किती मैत्रिणी? ताटावरती ...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
24 Jan 2009 - 9:11 pm

आज कार्यबाहुल्यातून थोडा वेळ झाल्यावर झकास पैकी चहा केला, संगणाकवर अरुण दातेंची एम्पी थ्री लावली आणि मिपावरील मागिल साहित्याचा माग काढायला सुरवात केली अन स्वरगंगेच्या काठावरती हे सुरेल गीत सुरु झाले.... आणि आम्ही आमच्या भुतकाळात गेलो

किती मैत्रिणी? ताटावरती प्रश्न सुचे हा हिला
अन पूर्वीची लफडी आठवून, घाम फुटे हा मला

वदलो नि मी सावित्री ती
शकुंतला अन, ती दमयंती
आणिक नावे घ्यायची किती
हा 'सत्याचा प्रयोग' अमुचा आम्हाला बाधला

घरात कसले आता जेवण
'दुवे' निखळता कोठून मीलन
कुणी मला हो द्या उपदेशन
जालामधूनी पिसाट फिरता, प्रश्न सुटे आजला

ज्ञान पुस्तकी थोडे वापर
गुरुजनांवर फोडा खापर
शेपूट सुटले बसता पाचर
पुन्हा कधी ना 'वाम' कुशीवर, हा "केश्या" झोपला

केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

रामोजी's picture

24 Jan 2009 - 9:56 pm | रामोजी

वाचायला छान आहे पण जेवणाच्या ताटा वर या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागू नये :S

सहज's picture

24 Jan 2009 - 10:30 pm | सहज

बरेच वाचन करताय तर कविवर्य जरा मराठी आंतरजाल पॉलीटीकल कविता येउ दे की.

संदीप चित्रे's picture

24 Jan 2009 - 11:44 pm | संदीप चित्रे

मजा आली वाचायला :)

लिखाळ's picture

24 Jan 2009 - 11:51 pm | लिखाळ

मस्त.. मस्त !
मजा आली... धन्य आहात ! :)
-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

25 Jan 2009 - 12:07 am | विसोबा खेचर

लै लै भारी!

(काठावरचा) तात्या.

घाटावरचे भट's picture

25 Jan 2009 - 12:26 am | घाटावरचे भट

मस्तच!!

आचरट कार्टा's picture

25 Jan 2009 - 12:39 am | आचरट कार्टा

धन्य जाहलो... :D

दशानन's picture

25 Jan 2009 - 9:46 am | दशानन

सब प्रभु की माया B)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विनायक प्रभू's picture

25 Jan 2009 - 5:17 pm | विनायक प्रभू

च्या मारी टोपी केसासना,
मी लेख लिहीला रे लिहीला की तु वस्त्र्हरणाला (विडंबन) तयार असतोस की रे. असो.लै भारी

केशवसुमार's picture

25 Jan 2009 - 5:26 pm | केशवसुमार

तुमच्या लिव्हण्यानं आमच्या जुन्या आठवणी जाग्या व्हत्यात त्याला आमी काय करनार?
(आठवणीतला)केशवसुमार

विनायक प्रभू's picture

25 Jan 2009 - 5:18 pm | विनायक प्रभू

बाहुल्या खुप आहेत असे दिसते.

सुहास..सदेव हसनार्..'s picture

25 Jan 2009 - 5:23 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

केशवराव...

आपण धन्य आहात...

सुहास
दुचाकीची मागची मळ्लेली सीट म्हणजे स्वछ: चारित्र्याच लक्षण..(मी मात्र पुसून ठेवतो..)

केशवसुमार's picture

26 Jan 2009 - 1:15 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार