भाषिक खेळ

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
21 Jun 2016 - 12:21 pm

सध्या आम्ही भाषेशी, खास करून उच्चारांशी संबंधित खेळ खेळतोय. मागे कधीतरी लेकीने आणि खेळायला घरी आलेल्या भाचे मंडळींनी “कंटाळा आला”चं पालुपद सुरू केलं. मग त्यांना म्हटलं, हे वाक्य सलग दहा वेळा म्हणून दाखवायचं... न चुकता... म्हणा... A good cook, could cook good.
हं. करा सुरूवात.
झालं. सगळ्यांनी उत्साहात सुरूवात केली आणि मग पहिल्या दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात सगळ्यांचं गुड-गुड-गुड ऐकू येऊ लागलं आणि खिदळायला सुरूवात...
आई/मावशी अजून सांग ना...
सांगते. पण आधी याचा सराव करा.
थोडा वेळ त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. मोठी भाची सातव्या इयत्तेत. भाचा आणि लेक, दोघंही दुसऱ्या इयत्तेत. मातृभाषा मराठी असली तरी शिक्षणाची भाषा इंग्रजी. घरात बोलणं प्रामुख्याने मराठीत.
अगदी दहा-पंधरा मिनिटात तिघांनाही जमलं. मग वेगळ्या ओळी...
A sailor went to sea, to see what he could see and all that he could see, was sea, sea and sea
हे मात्र लगेच जमलं.... आता..
आता मराठी...
काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले...
बच्चे मंडळी एकाच वेळी खुश झाली आणि गडबडली सुद्धा..
या ओळीने मात्र बराच वेळ घेतला...
त्यानंतरची ओळ, थोडी आणखी क्लिष्ट..
फडकं पण मळकं, मडकं पण मळकं, फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला...
झालं... आता आणखी धमाल...
अशा काही ओळी झाल्यानंतर बाराखडीच घेतली खेळायला. याचं बरचंसं श्रेय स्वरतज्ञ डॉ. अशोक रानडेंना..
क पासून सुरूवात.. क ला र जोडायचा. मग क्र ची बाराखडी...
प ला म जोडायचा. मग प्म ची बाराखडी...
वैविध्य आणि काठिण्यपातळी वाढवत न्यायची. खूप रमतात मुलं या खेळात, हा स्वानुभव. हे जमलं की च’कारी भाषा, प्म’कारी भाषा शिकणं आणखी सोपं होऊन जातं. असे आणखी काही भाषिक खेळ, वाक्य असतील तर नक्की सांगा... आमची बच्चे मंडळी उत्सुक आहेत असं आणखी काही शिकायला...

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2016 - 12:23 pm | टवाळ कार्टा

=))

चांदणे संदीप's picture

21 Jun 2016 - 1:05 pm | चांदणे संदीप

मजा!

आम्हीही लहाणपणी "पम" ची भाषा बोलायचो!
अपमजून खेपमेळाच्या आपमायड्या वापमाचण्यास उपमुत्सुक!

Sandy

आम्ही अजून ही एखाद्या समोर "पम" च्या आणि "रफ" च्या भाषेत बोलतो.

पद्मावति's picture

21 Jun 2016 - 1:52 pm | पद्मावति

:) खूपच मस्तं!
चमी चचि चशाभा चपखु चालायचीबो.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2016 - 2:00 pm | मुक्त विहारि

मस्त.

ह्याच चालीवर तुमच्या बाबतीत सांगायचे तर,

A good reader, could write good

अनिता ठाकूर's picture

21 Jun 2016 - 2:13 pm | अनिता ठाकूर

कच्चा पापड पक्का पापड .... हे तर फेमसच आहे.

वेल्लाभट's picture

21 Jun 2016 - 4:43 pm | वेल्लाभट

आणिक काही

चटईला टाचणी टोचली (लई मजा येते)
Blue blood bad blood
Red lorry yellow lorry

पद्मावति's picture

21 Jun 2016 - 4:46 pm | पद्मावति

काकुने काकाचे कामाचे कागद कात्रीने कचाकचा कापले,
काकाने काकुला कपाटात कोन्डले.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Jun 2016 - 6:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आम्ही मुंडा रुपयाच्या भाषेत बोलायचो

माधुरी विनायक's picture

22 Jun 2016 - 12:35 pm | माधुरी विनायक

ही भाषा कशी बोलतात..

पुंबा's picture

22 Jun 2016 - 12:36 pm | पुंबा

म्हणजे कसं?

शित्रेउमेश's picture

22 Jun 2016 - 11:20 am | शित्रेउमेश

१. चटई टाचणी टचकण टोचली

२. लोडरोलर

माधुरी विनायक's picture

22 Jun 2016 - 12:37 pm | माधुरी विनायक

दुसरा शब्द रोडरोलर आहे काय..
रोडरोलर - रस्ता सपाट करणारी वजनदार गाडी.
हा शब्द लंपन कथेत पहिल्यांदा वाचला होता, ते आठवलं...

उच्चाराचं माहित नाही..पण वेळ घालवायला, कविता पण आहेत मजेशीर--

ग्रीन ग्रास ग्रोज ऑल अराउंड ऑल अराउंड...

माधुरी विनायक's picture

22 Jun 2016 - 12:34 pm | माधुरी विनायक

ही भाषा कशी बोलतात..

माधुरी विनायक's picture

22 Jun 2016 - 12:40 pm | माधुरी विनायक

वरचा प्रतिसाद चुकून पडला इथे.
असं का यांस - पूर्ण कविता मिळेल काय...

असंका's picture

22 Jun 2016 - 1:53 pm | असंका

http://www.kididdles.com/lyrics/g012.html

यू ट्यूब वर सुद्धा आहेत...

मजेशीर आहेत.

जागु's picture

22 Jun 2016 - 12:41 pm | जागु

गमतीशीर आहे.

जागु's picture

22 Jun 2016 - 12:41 pm | जागु

गमतीशीर आहे.

जागु's picture

22 Jun 2016 - 12:41 pm | जागु

गमतीशीर आहे.