सत्यवान्/सावित्री

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Jun 2016 - 10:00 am

माधव न्याशनलाईझ ब्यांकेत कामाला होता...
वडलोपार्जित ब्लॉक..वडील देवाघरी गेलेले होते..
घरात फक्त आई अन तोच राहायचा..
माधव चे लग्नाचे वय झालेच होते..१-२ मुली पण पाहिल्या होत्या पण त्याला पसंत नाही पडल्या...
*
दुपारच्या वेळी शेजारच्या जोशी काकू गप्पा मारायला आलेल्या होत्या..
गप्पा गप्पात जोशी काकूने सुचवले..म्हणाल्या की.."माझी दूरची साठे नावाची आते बहीण आहे तिची माधवी नावाची मुलगी लग्नाची आहे...चांगले लोक आहेत...मुलगी बी कॉम झाली असून आता कॉम्प्युटरचा कोर्स करत आहे..नाकी डोळी नीटस आहे.. आपल्या माधव साठी स्थळ बघायचे का?"
हरकत नाही..मुलगी व परीवर तुमच्या नात्यातला व पाहण्यातला आहे .." आई म्हणाल्या...
*
रात्री आई ने माधवाजवळ विषय काढला माधवाने पण मुलगी बघण्यास संमती दर्शवली...
*
साठ्यांच्या घरी "कांदे पोहे" प्रोग्राम झाला..माधवी दिसायला सुंदर होती..शिवाय संस्कारी परिवार होता...
माधवाला माधवी आवडली..व त्याने आपला होकार कळवला
*
माधवी ला पण माधव पसंत होता..माधवचा होकार येताच साठे परिवाराचे मन "गार्डन गार्डन" झाले.
योग्य मुहूर्त पाहून माधव व माधवी विवाह बंधनात अडकले व संसार रथ मार्गक्रमण करू लागला..
*
वटपौर्णिमेचा दिवस होता..माधवी ची पहिली वटपौर्णिमा...माधवी फार आधुनिक पण नव्हती वा फार पारंपरिक..तिने लहान पणा पासून आईस वड पुजताना पाहिले होते कथा पण ऐकल्या होत्या..पण आज तिला पुजा करायची होती..
माधवी नटली होती..नाकात नथ व अंगावरील अलंकाराने तिचे उपजत सौंदर्य खुलले होते..
माधव ने तिला पाहिले व या रूपांत पहाताच माधव चकित झाला..
"खूप छान दिसते आहेस"..माधव म्हणाला..ति गोड हसली..
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...माधव हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खुपा आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझ्या कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."माधवी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " माधव हसत म्हणाल...
बोलायला तू अस्सा आहेस ना? चल सोसायटीतल्या बायका माझी खाली वाट बघत असतील...पूजेसाठी" असे म्हणत माधवी गेली.
*
सायंकाळी ऑफिस मधून माधव आला..गरमागरम चहाचा कप माधवी न माधवला दिला..ती जवळ येताच त्याला "अमृतांजन"चा उग्र वास दरवळल्याचे जाणवले...."का गं?? बर नाही का? डोके दुखते का?
नाही रे थोडं दुखत आहे सकाळापासून..गोळी घेतलीय.....माधवी म्हणाली..
*
सकाळी उठल्यावर माधवने विचारले कसे आहे डोके???
नाही रे अजून दुखतेच आहे...माधवी..
काळजी घे आराम कर...
*
१-२ दिवस गेले पण डोके थांबण्याचे नाव घेईना..
आता मी तुझं ऐकणार नाही अजिबात गेली ३-४ दिवस बघतोय..चल आधी दवाखान्यात जाऊ...माधव म्हणाला
अहो किरकोळ आहे थांबेल...माधवी...अजिबात नाही तयार हो आपण दवाखान्यात जातोय...माधव निर्वाणीचा आदेश दिला अन माधवी तयार झाली....
*
माधव तिला घेऊन नेहमीच्या डॉक्टर कडे गेला.त्यांनी तपासले व चिठ्ठी लिहितं म्हणाले मला वाटते तुम्हाला काही टेस्ट कराव्या लागतील ..अस करा तुम्ही "दीनानाथ" मध्ये जा..व या डॉ. ना भेटा...."
डॉक्टर काही काळजीचे कारण तर नाही ना? माधवाने विचारले..
तुम्ही रिपोर्ट आणले मी सांगू शकेन...वा तिकडचे डॉक्टर सांगतील.
*
माधव माधवी ला घेऊन दीनानाथ मध्ये गेला...
डॉक्टरने सा-या टेस्ट्स केल्या...रिपोर्ट आले..त्यांनी माधवला एकट्याला आत बोलवून घेतले.
माधव..माधवी चे सारे रिपोर्ट्स मी पाहिले..तिच्या मेंदूवर एक मोठा फोड वा पुळी आली आहे..ऑपरेशन हाच एकमेव मार्ग आहे...डॉक्टर म्हणाले..
माधव मात्र हे ऐकून घाबरला....तसं घाबरायचं कारण नाही...पण ति पुळी काढणे आवश्यक आहे..
केव्हा करावे लागेल हे ऑपरेशन?/
लवकरात लवकर अगदी उद्या सुद्धा..वेळ दवडण्यात अर्थ नाही....
डॉक्टर मी बोलतो अन १०-१५ मिनिटात तुम्हाला सांगतो..तिच्या आई बाबांना कल्पना देतो..
शुअर.. डॉ. म्हणाले
*
माधवने आईबाबा ना फोन केला व जवळचा एक मित्र होता त्याला पण फोन करून बोलविले..
सारे आले..
आईबाबांना धक्काच बसला..माधवी ला पण काय करावे कळत नव्हते..शेवटी सर्वांनी चर्चा करून ऑपरेशन उद्याच करावे असा निर्णय घेतला व डॉक्टरांना कळवला....
आम्ही आमच्या कडूनं प्रयत्न करूच..शिवाय ऑपरेशन झाल्यावर त्यांना आराम पण वाटेल डॉक्टर म्हणाले...
*
माधवी ला ऍडमिट करून घेतले...
माधव तिच्या बेडजवळ बसून होता..बघ ना अचानक काय झाले ते...माधवी म्हणाली..
काळजी नको करूस तू ठीक होशील...माधव ने तिला धीर दिला...मला जगायचं आहे रे..तुझ्या सोबत...माधवी म्हणाली
माधवी तुला काही होणार नाही....
*
११ च्या सुमाराला माधवीला ऑपरेशन थिएटर मध्ये हालवले..
बाहेर माधवी चे आई बाबा माधव ची आई मित्र माधव सारे प्राण कंठाशी आणून माधवीची वाट बघत होते..
डॉक्टर बाहेर आल्यावर सा-यानी त्यांना गराडा घातला..
माफ करा माधव..वर दिसणारी पुळी जरी लहान असली तरी क्यान्सर मेंदूत आत खोलवर पसरला होता...आम्ही नाही वाचवू शकलो
माधवी बॉडी थिएटर मधून बाहेर आली...
खेळ संपला होता..
माधव भकास पणे हताश होऊन सारे बघत होता...
*
काळ पुढे सरकत होता..माधव माधवी ची आठवण आली की व्यथित होत असे..
पहिले वर्ष श्राद्ध आले त्या वेळी माधवी चे आईबाबा ...साठे काका आले होते..
नाही म्हटले तरी दुःखाचा जोर ओसरलेला होता..
गप्पांच्या ओघात साठे काका म्हणाले..माधवराव..एक विचार व्यक्त करतो..माधवी गेली..ती ईश्वरेच्छा..ते आपल्या हातात नाही..तुम्ही तरुण आहात व उभे आयुष्य आपल्यापुढे वाढून ठेवले आहे..अशा वेळी साथीदाराची गरज असते..तुम्ही पुनर्विवाह करावा व नव्या आयुष्यास सुरवात करावी..आम्ही पिकली पाने केव्हाही गाळून जाऊ....
माधव काहीच बोलला नाही..मात्र "माधवीची खूप आठवण येते" असे म्हणाला..यावर काका म्हणाले मान्य आहे पण आठवणीवर आयुष्य जगता येत नाही..आपण सुज्ञ आहात..काय पटेल तो निर्णय घ्या.
काही दिवसातच माधव ने पुनर्विवाह केला..रेवती शी लग्न लावले व संसार सुरू झाला...
रेवती फार सुंदर नव्हती पण गृहकृत्य दक्ष होती...
*
आज वट पौर्णिमेचा दिवस होता..अनायासे माधवाला पण सुटटी होती..
तू पुजा करणार आहेस का आज? माधवने विचारले...
खरं तर माझा फारसा विश्वास नाही अश्या गोष्टीवर..पण तुम्हा म्हणत असाल तर करेन पुजा..पण उपास करणे जमणार नाही....रेवती म्हणाली...
हरकत नाही... केली तर आनंदच आहे नाही केली तरी हरकत नाही....माधव म्हणाला...
दुपारी रेवती तयार झाली..व म्हणाली मी तयार आहे चला आपण जाऊ वड पुजायला...
माधवने तिला एका वडाच्या झाडाजवळ नेले दुपारची वेळ होती..गर्दी पण नव्हती...
तू पुजा उरकून घे ..असे म्हणत तो बाजूला बाक होता त्यावर जाऊन बसला.
रेवती पुजा करू लागली अन अचानक वडाच्या झाडावरून एक स्त्री दणकणं खाली आली..तिचे केस पिंजारलेले होते डोळ्यात क्रुद्ध भाव होते..तिला पाहताच रेवती घाबरली...
तू माधवची दुसरी बायको ना? तिच्या आवाजात जरब होती...हो रेवती तत फफ करत म्हणाली पण तू कोण?/तुला पाहिल्यासारखे वाटते...
मी माधवी माधवची प्रथम पत्नी..त्याने मला ७ जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले होते...
तिचा तो आवेश बघता रेवती घाबरली व चक्कर येऊन पारावर पडली...
तिथून माधवी माधव कडे आली तो मोबाईल वर मेसेज वाचत होता...
माधव..असे म्हणताच त्याने समोर पाहिले माधवीला पाहताच तो आश्चर्य चकित झाला...तू????
हो मी च...आठवतंय ना ७ जन्म एकत्र राहण्याचा आपला संकल्प होता...
माधव नखशीकांत घामाने डबडबला होता...
हो पण तूच सोडून गेलीस...चाचरत माधव म्हणाला...
अरे पण वड पुजला आहे..त्याचे बळ माझ्यात आहे..तुला आठवते.तू म्हणाला होतास.."खूप छान दिसते आहेस"..त्यावर मी गोड हसले
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...तू हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खूप आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझा कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."असे मी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " हे तुझेच शब्द आहेत ना???
जर सावित्री मृत्यू लोकातून सत्यवानाला इहलोकात परत आणू शकते तर मग मी तुला मृत्युलोकात का नाही घेऊन जाऊ शकत...असे बोलत ती विकटपणे हसली
माधव तिचे बोलणे ऐकून घाबरला...नको गं ..मी इथेच बरा आहे...
नाही..ति डोळे विस्फारत म्हणाली तुला माझ्या बरोबर यावेच लागेल असे म्हणत तिने त्याचा हात धरला...
अन दोघेही इहलोकातून अंतर्धान पावले.
*
थोड्या वेळातच रेवती शुद्धीवर आली..तिने आकांताने माधवला हाक मारली..पण ओ आली नाही..
ति पारावरून खाली उतरली..पण माधव दिसेना तिने बरेच शोधले..व कंटाळून घरी आली..
सर्व ठिकाणी तिने माधव चे चौकशी केली पण माधव सापडेना..ति भय कंपित झाली..
शेवटी तिने पोलिस ठाण्यात "मिसिंग " ची तक्रार नोंदवली..
बरेच दिवस ति ठाण्यात चकरा मारत होती..पण माधव सापडला नाही...
*
अमावास्येची रात्र होती ..रेवती झोपली असताना साधारण १२-१२.३० च्या सुमारास तिला जाग आली.
बेडरूम एकदम थंड पडली होती..बहुतेक खिडकी उघडी राहिली असावी असे म्हणत ति उठली..
कोप-यात एक पांढरी आकृती उभी होती..
ति घाबरली तिने नाइट दिवा लावला....
कोप-यात एक व्यक्ती उभी होती..सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा होता..
तिने पाहिले तो माधव होता ....चेहरा भयानक झाला होता ती किंचाळणार तेव्हढ्यात माधव म्हणाला.......
रेवती मी माधव आहे..आता मी या जगात नाही..माधवी ने सुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...माझा शोध घेणे थांबव...मी निघतो..." असे म्हणत ति आकुती वायू रूपाने खिडकीतून बाहेर गेली..व सुताचा ढिगारा कोप-यात कोसळला..
हे सारे बघताच रेवतीची शुद्ध हरपली...
तिच्या मुखातून"माधव तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

संस्कृती

प्रतिक्रिया

नाखु's picture

20 Jun 2016 - 10:13 am | नाखु

वाचकांच्या नाकाशी सूत आणणारी कथा...

दैनीक टका टाइम्स

अकुंचे (झाडासकट)पुनरागमन
नाखु समाचार

गुंडाळलेले सुत आणि सूटलेले भूत (मिपाच्या मानगुटीवर)

जेपी साप्ताहीक
(संपादकांनी नाव बदलले तरी साप्ताहीकाचे नाव तेच आहे)

संकलक नाखु

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2016 - 10:58 am | टवाळ कार्टा

=))

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 12:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

सुतीया गोष्ट!!!!

(निरागस स्मायलीतला बालक) बाप्या

जव्हेरगंज's picture

20 Jun 2016 - 7:57 pm | जव्हेरगंज

सुतीया गोष्ट!!!!

=))

अभ्या..'s picture

20 Jun 2016 - 8:29 pm | अभ्या..

सुतीया कलाईयाँ वे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2016 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा

वाचकांच्या नाकाशी सूत आणणारी कथा...

दैनीक टका टाइम्स

अकुंचे (झाडासकट)पुनरागमन
नाखु समाचार

गुंडाळलेले सुत आणि सूटलेले भूत (मिपाच्या मानगुटीवर)

ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2016 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाखु असे सुताच्या धाग्याच्या गळ्याला नाखुन काय लावता हो ? ;) =))

कविता१९७८'s picture

20 Jun 2016 - 11:41 am | कविता१९७८

रेवती पुजा करताना झाडावरुन एक दणकट बाई आली हे वाचुन जे हसु फुटले ते शेवटपर्यत थाम्बले नाही.

नीलमोहर's picture

20 Jun 2016 - 11:45 am | नीलमोहर

एक स्त्री दणकन खाली आली असे आहे ते,
दणकट स्त्री =))

कविता१९७८'s picture

20 Jun 2016 - 12:09 pm | कविता१९७८

दणकन असो की दणकट , ती झाडावरुन खाली आली हे वाचुनच हसु फुटले.

मी पण दणकट स्त्रीच वाचलं पण .. वडाच्या झाडावरुन माधव ला गायब करणारी दणकट च पाहिजे पण.

अकु,

>> तिच्या मुखातून"माधव तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

.... आणि आमच्या मुखातून "कथा कुठे आहे" एव्हढेच शब्द निघाले...

आ.न.,
-गा.पै.

जव्हेरगंज's picture

20 Jun 2016 - 8:00 pm | जव्हेरगंज

कहर

=))

सस्नेह's picture

20 Jun 2016 - 11:46 am | सस्नेह

या वर्षातली सर्वात पॉवरबाज हास्यकथा !

सस्नेह's picture

20 Jun 2016 - 11:56 am | सस्नेह

लेखनाविषय वाचून ड्वाले पाणावले.

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2016 - 12:00 pm | टवाळ कार्टा

हेलाकाकांनीच वाचवली अस्णार तिला...बुडत होती बिचारी

खेडूत's picture

20 Jun 2016 - 11:49 am | खेडूत

:)
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत- अमृतांजन आणि दीनानाथ रुग्णालय..!
इहलोक- म्रुत्युलोक- अंतर्धान, काय नाही यात? पण पुढच्या मालिकेसाठी विचार व्हावा.

नीलमोहर's picture

20 Jun 2016 - 11:49 am | नीलमोहर

'माधव - माधवी' कित्ती तो योगायोग, कित्ती गोड !!
कथा वाचून घाबरले पण .

आता रेवतीच्या पुर्न विवाहाची कथा पण येऊद्या.!
show must go on.!

कविता१९७८'s picture

20 Jun 2016 - 12:07 pm | कविता१९७८

सहमत

जव्हेरभौ सारख क्लिक क्लिक करुन कथा वाढवता येईल.

आदूबाळ's picture

20 Jun 2016 - 6:05 pm | आदूबाळ

पुर्न विवाहाची

पुनर्विवाहाची.

पूर्न विवाहाची कथा लिहायची तर इथे पण पॉर्न अंक काढायला लागेल.

रातराणी's picture

20 Jun 2016 - 12:26 pm | रातराणी

फारच सरधोपट कथा. अस काही असत तर मानलं असतं अकु.
माधवीला हॉस्पिटलमधे भरती केल्यावर माधव रोज वडाची पूजा करू लागतो. एक दिवस पूजा करायला जात असताना त्याच्या गाडीखाली एक काळ मांजर येतं. ते काळ मांजर पूर्व जन्मी एक प्रसिद्ध सर्जन असतं. माधव त्याला फार सॉरी वगैरे म्हणतो आणि त्याच्या गुणांवर प्रसन्न होऊन मांजर त्याला वडाच्या झाडात लपवलेल्या त्याच्या ऑपरेशन साहित्याची माहिती देत. माधव म्हणतो मी डॉक्टर नाही ते घेऊन मी काय करू तर मांजर त्याला सांगत घाबरू नको. मी सांगतो तशीच पूजा कर आज.मग मांजर माधवच्या कानात सगळा विधी सांगतो. मांजराचे व्यवस्थित कार्य करून माधव झाडाजवळ येतो. तिथे तो आधी ते टूल्स शोधून काढतो. मग मांजराने सांगितल्याप्रमाणे पूजा करतो. मग त्याला दिव्य शक्तीनी आपल्याला सर्जरी करता येते हे कळते. तो तडक माधवीला घरी घेऊन येतो आणि मांजराने दिलेल्या टूल्स नी तिच ऑपरेशन करतो. माधवी ताडकन उठून बसते. तो दिवस नेमका वट पौर्णिमेचा असतो. माधवी म्हणते मला गेलं पाहिजे पूजा करायला. माधव तिला म्हणतो अं हं राणी सरकार आता ते काम माझं आहे. तुम्ही फक्त आराम करायचा. माधव आणि माधवी सुखाने संसार करतात. हळु हळू सर्वाना ही गोष्ट माहीत होते आणि दर वट पौर्णिमेस पुरुषांची वडाच्या झाडाखाली गर्दी होते. पूजा झाली की सगळे काउ स्टेम्पचा प्रसाद वाटप करतात आणि दिवसभर मोकळ्या हवेत श्वास घेतात.

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2016 - 12:33 pm | टवाळ कार्टा

_/\_
कहर आहेस

नीलमोहर's picture

20 Jun 2016 - 12:56 pm | नीलमोहर

कसं जमतं गं?
काउ स्टेम्पचा प्रसाद =))

ते काळ मांजर पूर्व जन्मी एक प्रसिद्ध सर्जन असतं.

हा थोर टर्न आहे! दण्डवत!

श्रोडिन्जर चौकातलं हो.काळे चौकानंतर, हायसेनबर्गच्या थोडं अलिकडे.श्राद्धाचे वडे मिळतात ना तिथे एका दुकानात.

चांदणे संदीप's picture

21 Jun 2016 - 8:50 pm | चांदणे संदीप

कहर!! =))
कौ स्टॅम्प =)) =)) =))

रातराणी's picture

21 Jun 2016 - 10:38 pm | रातराणी

काऊ स्टेम्प शब्दाचे जनक पैजारमाऊली किंवा अभ्या आहे. आता नक्की आठवत नाही, कुठल्या धाग्यावर वाचला होता. शब्दश्रेय त्या दोघांना. ज्यांचा असेल त्यांनी समजून घ्या. =))

अभ्या..'s picture

21 Jun 2016 - 10:44 pm | अभ्या..

पैजार माऊली.
"आता आमची काऊ स्टॅम्प घ्यायची वेळ झाली" हेच ते जगप्रसिद्ध पैजारमाऊलीवचन

रातराणी's picture

21 Jun 2016 - 11:22 pm | रातराणी

=))

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 12:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

अकु काका तुमचे

माधव/शिरीष/वसंत/हेमंत इत्यादी सगळे नॅशनलाईझ्ड बँकेतच का हो असतात?? Ibps चे क्लास कुठं करतात म्हणे ते??

नै नै ..पन मी म्हंतो कायले अशे प्रस्न इचारून लेखकाले हैरान करता थुम्ही?
थो माधव नॅशनलाईझ्ड बँकेत चपराशी असंन ना..तुमचं काय जाते ?
Ibps चे क्लास कुठ हाय ते सांगतल्यावर फी विचारान थुम्ही..मंग अकुकाकाले डिस्कौण्ट मागान..

nanaba's picture

23 Jun 2016 - 1:13 pm | nanaba

sagale Shirish (kharya ayushyat) nationalize banket nasatat.. pan tyanche aai vadil asu shakatat :D

अप्रतिम कथा !! गेल्या २५०० वर्षात अशी कथा वाचली नव्हती !!
धन्य तो माधव! धन्य ती माधवी !! धन्य तो वड

अकुकाका तुम्ही लिहित राहा...आम्ही वाचत राहू...या दुत्त दुत्त मिपाकरांकडे दुर्लक्ष करा..

गेल्या २५०० वर्षात अशी कथा वाचली नव्हती

बाप रे! २५०० वर्ष म्हणजे फारच दीर्घायुषी आहात ह!!

... की तुम्ही पण... ?
अरे देवा!!

;)

२५०० वर्षापूर्वी लिहिलेल्या कथा आज वाचता येतात की राव..
बाकी दीर्घायुष्य म्हणाल तर माईचा आर्शिवाद आहे..

मुक्त विहारि's picture

20 Jun 2016 - 1:40 pm | मुक्त विहारि

त्यांच्या आशीर्वादने बर्‍याच जणांना नवसंजीवनी मिळू शकते.

भरत्_पलुसकर's picture

20 Jun 2016 - 1:09 pm | भरत्_पलुसकर

वामातन बाहेर आणणारी कथा! एक फांदी पकडून बसतो.

भरत्_पलुसकर's picture

20 Jun 2016 - 1:09 pm | भरत्_पलुसकर

वामातन बाहेर आणणारी कथा! एक फांदी पकडून बसतो.

धनंजय माने's picture

20 Jun 2016 - 1:11 pm | धनंजय माने

असलंच कायतरी आधी वाचलं होतं असं मलाच वाटतंय काय???? नावं पण अशीच होती.

अकुकथाच होती.

सस्नेह's picture

20 Jun 2016 - 1:14 pm | सस्नेह

गेल्या जन्मी की त्याच्या गेल्या ?

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2016 - 1:16 pm | टवाळ कार्टा

=))

नीलमोहर's picture

20 Jun 2016 - 1:26 pm | नीलमोहर

एवढे सगळे जन्म, त्यातही लोकांची बरीच उधारीही बाकी ठेवतात ते,
किती आणि काय काय लक्षात ठेवायचं त्यांनी तरी.

धनंजय माने's picture

20 Jun 2016 - 5:39 pm | धनंजय माने

काहीही हा नीमो!
कुठली उधारी म्हणे?
आमच्या आयडीचे खून करतात हे दुत्त दुत्त लोक मग पुनर्जन्म घ्यावा लागतो कुठलं कुठलं झाड़ पकडून. ;)

अकुकथा जुनी च आहे ओ स्नेहातै. बहुतेक दुसऱ्या जन्मी वाचली होती.

मराठी कथालेखक's picture

20 Jun 2016 - 1:15 pm | मराठी कथालेखक

मजेदार कथा... :)

मुक्त विहारि's picture

20 Jun 2016 - 1:20 pm | मुक्त विहारि

(अकुकथा फॅन) मुवि

सस्नेह's picture

20 Jun 2016 - 1:25 pm | सस्नेह

तुम्ही पक्ष कधी बदलला ? मोजींच्या पक्षात होता ना ?

मुक्त विहारि's picture

20 Jun 2016 - 1:34 pm | मुक्त विहारि

मोजी आणि अकू ह्यांच्या कथांना वेगळे करावे लागत नाही.

मुळात मोजी आणि अकू कूट कथा लिहितात, असे आमचे मत आहे.

अर्थात ह्या कथेत पण कूट असेलच.

मराठी कथालेखक's picture

20 Jun 2016 - 4:39 pm | मराठी कथालेखक

मोजीच्या कथेमध्ये डोकेदुखी, टेस्ट्स, कॅन्सर , ऑपरेशन वगैरे त्रासदायक प्रकार नसता त्याऐवजी माधव आणि माधवी वटपूजा आटोपून बसने येत असताना बसला एक सायकल धडकली आणि खिडकीपाशी बसलेली माधवी जागच्या जागी गतप्राण झाली असं काहीसं सोप्प वळण कथेनं घेतलं असतं...

काहीसं सोप्प वळण कथेनं घेतलं असतं...

मोजीच्या कथा वळणं बिळणं घेत नसतेत. डैरेक्ट घाव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2016 - 6:33 am | डॉ सुहास म्हात्रे

"माधवी बसने परत येत असताना एका पुलावर बसला एक सायकलने धडक दिली. त्या धडकेने बस पुलावरून नदीत पडली आणि माधवी बुडून मेली"

... हे मोजी स्टाईलमध्ये जास्त फिट्ट बसेल =))

मोजींच्या कथा इतक्या पुढे गेलेल्या असतात की त्या न्युटनच्या क्षुद्र नियमांची तमा बाळगत नाहीत.

सिरुसेरि's picture

20 Jun 2016 - 1:26 pm | सिरुसेरि

वेगळ्या ढंगाची कथा . अशाच प्रकारच्या कथेवर आधारीत काही चित्रपट आले होते . "सत्यवान , सावित्री आणी ती" / "सुवासिनीची / वटसावित्रीची हि सत्वपरीक्षा" / , " वटसावित्रीची हि पुण्याई" अशी काहितरी नावे होती .

अजून किती बळी घेणार हा वड?
मला वाटत होतं पहिला पाऊस लागल्यावर झाडांवरचे उरलेसुरले आंबे फणस एका झटक्यात विकून टाकण्यासाठी या व्रताची योजना केली आहे -पाच फळे,सात फेरे सुताच्या इएमआइमध्ये न्याशनालाइज्ड/( आइटी वाचावे )ब्यान्केतला गडी सात जन्म मिळतो.

वाल्मिक's picture

20 Jun 2016 - 2:26 pm | वाल्मिक

गेला माधव कोणीकडे?

स्रुजा's picture

20 Jun 2016 - 5:49 pm | स्रुजा

ख्या ख्या ख्या.. प्रतिसाद म्हणजे ___/\___

बाकी रेवाक्काच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत ;)

आदूबाळ's picture

20 Jun 2016 - 6:08 pm | आदूबाळ

बाकी कथा वाचताना महत्प्रयासाने हसू दाबलं होतं पण...

कोप-यात एक व्यक्ती उभी होती..सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा होता..माधवी ने सुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...माझा शोध घेणे थांबव...मी निघतो..." असे म्हणत ति आकुती वायू रूपाने खिडकीतून बाहेर गेली..व सुताचा ढिगारा कोप-यात कोसळला..

हे सूत प्रकरण वाचून कहर हसलो.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jun 2016 - 6:34 pm | प्रसाद गोडबोले

कथा विनोदीच आहे पण ...

लग्नानंतरच्या २-४ वर्षातच एक-दीड वर्षाची मुलगी आजारपणात आणि त्या धक्क्याने बायको वारलेल्या एकांना अत्यंत जवळुन ओळखतो, त्यांची आठवण आली .

हसु आले नाही :(

मनिमौ's picture

20 Jun 2016 - 6:39 pm | मनिमौ

माधव माधवी को मिलाते चलो.माधवरूपी इजिप्शियन ममी आली डोळ्यासमोर

बाळ सप्रे's picture

20 Jun 2016 - 6:49 pm | बाळ सप्रे

अकु चांगले टेस्टर होउ शकतील.. दुसर्‍या बायकोच्या वटपौर्णीमेच्या वेळी पहील्या बायकोला वडाने केलेल्या कमिटमेंट्चा सिनारीओ मस्त शोधून काढलाय :-)

विशाखा राऊत's picture

20 Jun 2016 - 7:15 pm | विशाखा राऊत

हॅ हॅ हॅ..

प्रशु's picture

20 Jun 2016 - 7:31 pm | प्रशु

भंसाळीने ह्या कथेवर सिनेमा बनवला तर त्या वटाखाली माधवी आणी रेवतीचा पिंगा पण असेल

मारवा's picture

20 Jun 2016 - 7:34 pm | मारवा

कथा आवडली.

ह्यायला अकुकाका आधनं मधनं बेक्कार दंगा करायला वाव देतेत राव.
मिपाला काका हवा तर अक्कुकाकासारखाच.
चा वट आणि खेळकर

लेखक महाशय कथा गुंडाळून गेले कुठं?

फेरफटका's picture

21 Jun 2016 - 12:58 am | फेरफटका

उन्हाळ्यातली सुती कथा किंवा सुतसुतीत कथानक

काय जबरदस्त भूत सूतकथा आहे.
काय एकेक प्रतिसाद आहेत.भूताने सूत गुंडाळलं म्हणजे कळेल एकेका मिपाकराला.
अच्र्त कुठचे ;)

नाखु's picture

21 Jun 2016 - 8:56 am | नाखु

पुर्व परवानगी (गृहीत) धरून हात (चलाखी) उर्फ पाककृती

जव्हेरगंज पद्धत

अमावास्येची रात्र होती ..हे ज्याम काळा अंधार रस्त्यावरच्या डांबरात कोळसा उगाळावा तसा. रेवती झोपली उगा आपली आलट्ण पाळट्ण, झोप कस्ली येती नुस्ती आपली चुळबुळ.
बेडरूम एकदम थंडगार ..रेवतीला जाग आली,बहुतेक खिडकी उघडी राहिली असल असं समजून उभी राहीली..

पाहते तर काय? कोप-यात एक पांढरी आकृती उभी ..

ती घाबरली नाही थेट नाइट दिवा लावला....
कोप-यात एक व्यक्ती उभी होती.. अगदी पिठाच्या गिरणीतल्या गड्यावानी..केस भुर्रे,पापण्याभुर्या अगदी मिश्यापण पांढर्याछ्याट
तिने ओळ्खलं माधवच होता ....सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले चेहरा भयानक विद्रुप होता, ती किंचाळणार तेव्हढ्यात .......
रेवती मी माधव आहे..आता मी या जगात नाही..माधवी ने भुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...माझा शोध घेणे थांबव...मी निघतो..." असे म्हणत ति आकुती झटदिशी खिडकीतून बाहेर गेली..व पिठाचा ढिगारा कोप-यात कोसळला..
हे सारे बघताच रेवतीची शुद्ध हरपली...

बाहेर खिडकीखाली माधव आणि माधवी आता पुढ्ची शिकार कोण याचीच कुजबुज करीत होते..

सुश्रीश्रीके पद्धत

अमावास्येची रात्र होती ..मी निवांत झोपलो असताना साधारण १२-१२.३० च्या सुमारास तिला जाग आली.
बेडरूम एकदम थंड पडली होती..बहुतेक खिडकी उघडी राहिली असावी असे म्हणत मी उठलो..
कोप-यात एक पांढरी आकृती उभी होती..
मी घाबरून कोपर्यातला नाइट दिवा लावला....
पुढ्यात एक व्यक्ती उभी होती..सारे शरीर त्याचे मिपाच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा मी पाहिले तो वाचक होता ....चेहरा भयानक कृद्ध झाला होता मी किंचाळणार तेव्हढ्यात वाचक म्हणाला.......
अजून किती डयर्या आहेत तुझ्याकडे आणि किती पाने खरडली आहेस्,इथेच होळी करु यात काढ सगळ्या डायर्या.." डायरीच्या ढीगाला आग..व राखेचा ढिगारा कोप-यात कोसळला..
हे सारे बघताच माझी शुद्ध हरपली...

माझ्या मुखातून "वाचक तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

दिनु गवळी पद्धत

अमावास्येची रात्र होती ..रेवती झोपली साधारण १२-१२.३० पर्यंतच नंतर उठुन बसली का तर बेडरूम एकदम थंड पडली होती.. खिडकी उघडी बाहेर बघायची त्च्यात हिंंमत नव्हतीच ..

अंदाजानेच तिने नाइट दिवा लावला....

कोप-यात एक पांढरी आकृती उभी होती....सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा होता..
तिने पाहिले तो रवी होता ....चेहरा भयानक झाला होता ती किंचाळणार तेव्हढ्यात रवी म्हणाला.......
रेवती मी रवी आहे..आता मी या गावात नाही..गाववाल्यांनी भुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...तु आता इथं थांबन चुकीच आहे चल ईथुन माझा शोध घेऊ नको ...तु पहिले मामाला बोलाव मी निघतो..." असे म्हणत ति आकुती झटदिशी खिडकीतून बाहेर गुल झाली..व पोत्याचा ढिगारा कोप-यात कोसळला..

हे सारे बघताच रेवतीची (पुन्हा) शुद्ध हरपली...

तिच्या मुखातून"दिनु तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

आस्वादक संकलक

नाखु चायपत्ती

जेपी's picture

21 Jun 2016 - 9:30 am | जेपी

ही ही ही...
नाखुन काकांनी बोचकारल..=))

चिनार's picture

21 Jun 2016 - 10:09 am | चिनार

हा हा हा !!!

आदूबाळ's picture

21 Jun 2016 - 10:29 am | आदूबाळ

लोल!

आता सर पद्धत, पटाईतकाका पद्धत, मोजी पद्धत आणि नाडीकाका पद्धत पण योंद्या.

रातराणी's picture

21 Jun 2016 - 11:56 am | रातराणी

तूफ़ान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2016 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

अजया's picture

21 Jun 2016 - 3:45 pm | अजया

नाखुनी हल्ला =))))

वाल्मिक's picture

22 Jun 2016 - 12:19 am | वाल्मिक

परा पद्धत राहिली

माझीही शॅम्पेन's picture

21 Jun 2016 - 1:08 pm | माझीही शॅम्पेन

ही कथा म्हणजे मिपाच्याच नव्हे तर संपुर्ण मराठी साहित्यातील एक सुतळि मैलाचा दगड आहे , एवढ्या सुत्यागीरीच्या अत्युच पायरीवर असलेल्या ह्या कथेला ताबडतोब वस्त्रपीठ पुरस्कार मिळाला पाहिजेच

एवढ्या सुत्यागीरीच्या

:-) :-) लय भारी !

माधव च्या आईचे पुढे काय झाले ?

तिमा's picture

21 Jun 2016 - 2:02 pm | तिमा

कथेतील वाक्य न वाक्य सत्य आहे असे धरुन, पुढील निष्कर्ष निघतात.
बायकांऐवजी पुरुषांनी वडाची पूजा करावी.
सूत वडाला न गुंडाळता बायकोलाच गुंडाळावे.
चुकून सुद्धा सात जन्माचे वचन देऊ नये.
दुसरे लग्न करावे लागलेच तर नास्तिक बायको निवडावी. उभयतांनी कायम, लसुण मारके वडापाव खावा म्हणजे भुतं जवळ येणार नाहीत.

आदूबाळ's picture

21 Jun 2016 - 2:46 pm | आदूबाळ

उभयतांनी कायम, लसुण मारके वडापाव खावा म्हणजे भुतं जवळ येणार नाहीत.

उभयताही एकमेकांजवळ येणार नाहीत.

दारुड्याला दारुचा वास येत नाही अशी एक म्हण ऐकलीय ब्वा.
(म्हणजे आफ्टर पार्टी घरी जाणेबल कंडीशन चेक करण्यासाठी न पिणारा मित्र हा विश्वासार्ह ब्रेथ अ‍ॅनालायझर असायचा.)

शेवट वाचताना वाटलं ... अश्या तऱ्हेने ममी प्रथेचा जन्म झाला, असं काहीतरी वाक्य येईल की काय !

चतुरंग's picture

22 Jun 2016 - 1:00 am | चतुरंग

ही सूतकथाई वाचून फॉक्कन हसलो! ;)
भयकथा, गूढकथा, कूटकथा अशा कथांच्या विविध प्रकारांसारखाच 'अकुकथा' हा नवीन साहित्यप्रकार मराठीला ब(बे)हाल करुन नवा पायंडा पाडणार्‍या अकुकाकांचा विजय असो!;)

(अकुकथासरित्सागरप्रेमी)सूतरंग

अविनाशकुलकर्णी's picture

25 Jun 2018 - 8:29 pm | अविनाशकुलकर्णी

..